पोस्ट्स

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा...     जवळपास सारे जग  वेठीस धरणाऱ्या कोरोनाच्या संकटामुळे, यंदा मार्च महिन्यात नाशिकला होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ९ महिने लांबणीवर पडले. आता ते ३ ते ५ डिसेंबर दरम्यान होणार आहे. भुजबळ नॉलेज सिटीच्या परिसरात होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ संशोधक, शास्त्रज्ञ व विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर आहेत. यापूर्वी नाशिकला १९४२ साली ऑक्टोबर महिन्यात २७ वे व २००५ साली जानेवारी महिन्यात ७८ वे  अशी दोन संमेलने झाली होती. नाशिकला समृद्ध अशी साहित्यिक, सांस्कृतिक परंपरा आहे. नाशिक ही मंत्रभूमी, देवभूमी, धर्मभूमी, कर्मभूमी, स्वातंत्र्य चळवळीतील शौर्यभूमी, साहित्य क्षेत्रातील सारस्वतांची भूमी, मोक्षभूमी तसेच आधुनिक काळातील तंत्रभूमी म्हणून ओळखली जाते. नाशिक हे जनस्थान म्हणजे साधकांसाठी सिद्धस्थान आहे. श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही तपोभूमी आहे. येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो; तशीच सारस्वतांची मांदियाळी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तीन दिवस जमणार आहे.   नाशिकला साहित्य, संस्कृतीची दीर्घ व समृद्ध परंपरा लाभलेली आहे. ये

नव्या पिढ्यांमध्ये कलापरंपरा  रुजवणारे संपत ठाणकर !  लेखाचा उत्तरार्ध वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नव्या पिढ्यांमध्ये कलापरंपरा  रुजवणारे संपत ठाणकर  (उत्तरार्ध)   अभ्यासू आदिवासी वारली चित्रकार संपत ठाणकर सातत्याने कलेच्या  प्रसारासाठी प्रयत्नशील आहेत. स्वतः चित्रे रेखाटण्याबरोबरच जमातीतील इतर प्रज्ञावंत कलावंत, लेखक, कवी यांचा ते शोध घेतात. त्यांना प्रोत्साहन देण्याचेही काम करतात. हाडाचे शिक्षक असल्याने स्वस्थ न बसता नोकरीव्यतिरिक्त त्यांनी असंख्य आदिवासी मुलांना वारली चित्रकला शिकवली आहे. त्यातील अनेकजण पारंगत होऊन कलेच्या माध्यमातून उदरनिर्वाह करीत आहेत. कुडाच्या भिंतीवरची ही कला जगभरात पोहोचली. मात्र वारल्यांच्या नव्या पिढ्यांनी आपली परंपरा, संस्कृती विसरु नये ही संपत यांची तळमळ आहे. त्यासाठी वारली चित्रकलेवर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या तिन्ही भागात तपशीलवार, सचित्र मार्गदर्शन केले आहे.    'वारली चित्रकला' या पुस्तकाच्या पहिल्या भागात ही कला ठिपके, रेषा व सोप्या-मूलभूत आकारांवर आधारित आहे हे संपत यांनी सोदाहरण सांगितले आहे. रेखाटनाचा सराव कसा करावा हे देखील ते सांगतात. त्रिकोण, वर्तुळ व चौकोन या प्राथमिक भौगोलिक आकारांचा वापर करून मानवी आकृत्या, त्यांच्या हाल

त्र्यंबकनगरीत २२ नोव्हेंबरपासून रंगणार राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धा ! पिंच्याक सिलॅट खेळाविषयी थोडक्यात जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
त्र्यंबकनगरीत २२ नोव्हेंबरपासून रंगणार राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धा !           नाशिक : महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन आयोजित ११ व्या राज्यस्तरीय पिंक्याच सिलॅट स्पर्धा २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान त्र्यंबकेश्‍वर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत अशी माहिती इंडियन पिंच्याक फेडरेशनचे अध्यक्ष तथा महा. पिंच्याक सिलॅट असोसिएशनचे महासचिव किशोर येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.           त्र्यंबकेश्‍वर येथील ओम जगद्गुरू जनार्दन स्वामी, मौनगिरी महाराज आश्रमात होणाऱ्या पिंच्याक सिलॅट स्पर्धा सर्व वयोगटातील महिला आणि पुरुष खेळाडूंसाठी खुल्या आहेत. स्पर्धेत राज्यभरातील ३४ जिल्ह्यातील सुमारे ७०० खेळाडू यामध्ये सहभागी होणार असून पहिल्या दिवशी (दि.२२) १० ते १४ वयोगटातील २३० खेळाडू खेळणार आहेत. मंगळवार (दि.२३) १४ ते १७  वयोगटातील २४० तर तिसऱ्या दिवशी (दि.२४) १७ ते ४५ वयोगटातील २३० खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती येवले यांनी दिली. स्पर्धेचे उद्घाटन दुपारी दोन वाजता खासदार हेमंत गोडसे, किशोर येवले, तृप्ती बनसोडे व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. बक्षीस वितरण २३ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वा

१५ नोव्हेंबर महाराष्ट्राचे ख्यातनाम संख्याशास्त्रज्ञ, संख्याशास्त्राचे प्रसारक, डॉ.वसंत शंकर हुजुरबाजार यांचा स्मृतिदिन ! प्रा. कोष्टी यांनी घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
                                                                     . १ ५ (नोव्हेंबर )  महाराष्ट्राचे ख्यातनाम संख्याशास्त्रज्ञ ,  संख्याशास्त्राचे   प्रसार क ,  डॉ . वसंत शंकर  हुजुरबाजार  यांचा स्मृतिदिन. मूळ गणिताचे विद्यार्थी असलेल्या  हुजुरबाजार   यांनी  संख्याशास्त्रा मध्ये संशोधन करून संभाव्यता सिद्धांतामध्ये मौलिक योगदान दिले.  संभाव्यता सिद्धान्तातील अलौकिक कामगिरी साठी अ‍ॅडम्स पारितोषिक (१९६०) ,  पद्माभूषण पुरस्कार (१९७४) ,  सर जेफ्रीज यांनी एका निष्पत्तीला दिलेले  ‘ हुजुरबाजारांचा अपरिवर्तनीय घटक (इनव्हेरिअंट) ’  हे नाव (१९७६) ,  इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटतर्फे गौरवग्रंथ (१९७९) अशा अनेक सन्मानांनी गौरविलेल्या हुजुरबाजार यांचे संख्याशास्त्रातील योगदान निश्चीतच स्फूर्तिदायी आहे.  आयुष्याच्या अखेरपर्यंत अध्ययन-अध्यापनात व्यस्त असणाऱ्या  हुजुरबाजार   यांचे देशातील संख्याशास्त्राच्या प्रसाराला चालना देण्यातील योगदान कधीही विसरता येणार नाही .  त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने   त्यांच्या   कार्याची ओळख तरुणाईला व्हावी म्हणून त्यांच्या कार्याचा थोडक्या त घेत लेला आ ढावा

लोकप्रिय व्यंगचित्रकार अनंत दराडे यांचे निधन ! साप्ताहिक न्यूज मसाला व लोकराजा दिवाळी विशेषांक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली !!

इमेज
लोकप्रिय व्यंगचित्रकार अनंत दराडे यांचे निधन ! नाशिक ( प्रतिनिधी ) लोकप्रिय व्यंगचित्रकार अनंत दराडे यांचे काल ( दि.१३) अल्प आजाराने निधन झाले. ते विद्यार्थीप्रिय कलाशिक्षक होते. सातत्याने व्यंगचित्रे रेखाटून त्यांनी रसिकांची मने जिंकली होती. व्यंगचित्रांच्या माध्यमातून ते सातत्याने समाजप्रबोधन करीत. राजकीय व्यंगचित्रांद्वारे हसवता हसवता त्यांनी वाचकांना नेहमीच अंतर्मुख केले. मृत्यूसमयी ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तसेच वृध्द आईवडील, एक भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. त्यांचे स्नेही व्यंगचित्रकार अवि जाधव यांनी अनंत दराडे यांचे कॅरिकेचर रेखाटून अर्पण केलेली ही श्रद्धांजली.

बालदिन- बालकांना ज्ञानदानाबरोबर वारली चित्रशैली ची पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या संपत यांची कला हीच संपत्ती !! लेखाचा पूर्वार्ध सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
कला हीच संपत यांची संपत्ती !            ( पूर्वार्ध )   "वारली चित्रकला हा आम्हा आदिवासींच्या जीवनमूल्यांचा गाभा आहे. आदिवासींचे लोकजीवन व कलासंस्कृती वेगळ्या करता येणार नाहीत. वारली चित्रशैली सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक दृष्ट्या महत्त्वाची आहे. 'वरलाट' या प्रदेशात राहणारे म्हणून 'वारली' हे नाव आमच्या जमातीला मिळाले. मी आमच्या संस्कृतीला, परंपरेला, वारली चित्रकलेला संपत्ती मानतो", असे उद्गार आहेत आदिवासी कलाकार संपत ठाणकर यांचे. ते सातत्याने ध्यासपूर्वक लेखन, चित्रांकनातून साहित्यसेवा करतात.आज (दि.१४) बालदिन आहे. संपत यांनी बालकांना ज्ञानदान केलेच त्याचबरोबरीने वारली चित्रशैली त्यांच्यात रुजवण्यासाठी पुस्तके लिहिली.             तलासरीच्या ज्ञानमाता सदन शाळेतील शिक्षक संपत देवजी ठाणकर अलीकडेच सेवानिवृत्त झाले. ते डहाणू तालुक्यातील जीतगाव येथे रहातात. अभ्यासू वृत्तीच्या संपत यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. २००८ साली त्यांचे वारली चित्रकलेवरील पहिले पुस्तक प्रकाशित झाले. त्याची दुसरी आवृत्ती २०११ मध्ये प्रकाशित करण्यात आली. नंतर त्यांनी भाग २ व ३ प्रकाशि

संशोधक वृत्तीचा कलासंस्कृती रक्षक मधुकर वाडू संशोधक कलावंत; अभ्यासू साहित्यिक. यशोगाथेचा परीपाठ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!   (उत्तरार्ध)

इमेज
संशोधक वृत्तीचा कलासंस्कृती रक्षक                       (उत्तरार्ध)          आदिवासी वारली जमातीच्या लग्नचौकात साखळीसारखे आकार रेखाटले जातात. तशाच स्वरुपाचे रेखाटन फ्रान्समधील एका पुरातन गुहेत दगडावर कोरलेले आढळले. या 'मेगालिथिक' संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी  महाराष्ट्रातील मनोरजवळच्या कोंढाण येथील मधुकर वाडू फ्रान्सला गेले. तेथील मानव्यविद्येवर संशोधन करणाऱ्या सुप्रसिद्ध 'ब्रिटनी' या संस्थेने त्यांना निमंत्रित केले होते. संशोधक वृत्तीच्या कलासंस्कृती रक्षक मधुकर यांनी आदानप्रदान करून फ्रेंच व वारली कलेतील साम्यस्थळांवर प्रकाश टाकला.          फ्रान्स दौऱ्यात त्यांना तेथील अनेक विद्यापीठांमध्ये व्याख्याने देण्यासाठी निमंत्रण मिळाले. तेथे मधुकर वाडू यांनी भारतीय संस्कृतीसह आदिवासी वारली कलासंस्कृती समजावून दिली. तेथील माध्यमिक शाळांमध्ये भेटी देऊन वारली कलेचा प्रसार - प्रचारही केला. तेव्हाचे अनुभव सांगताना मधुकर म्हणतात, "परदेशातील छोट्या विद्यार्थ्यांपासून मोठया अभ्यासकांना भारताविषयी आणि एकूणच भारतीय कला, संस्कृती, जीवनशैली याबद्दल खूप उत्सुकता असते. ते