पोस्ट्स

गुढी माणुसकीची ! उद्धव भयवाळ रचित दशक काव्य प्रकारातील कविता !!

इमेज
           गुढी माणुसकीची धर्म ,  पंथ ,  लिंग भेदभाव,                                        यांना नकोच देऊया थारा !                                    प्रेमाने राहूया सारेजण,                                     तिरस्काराचा नको वारा !!  माणुसकीची गुढी उभारू,                                एकमेकांसोबतच राहू !                                        कुणी उपाशी नको रहाया,                                 सर्वांचीच खुशहाली वाहू !!  मानवतेचा धर्म तो पाळू,                                  ज्येष्ठांचा सदा आदर करू !                              जुन्याचा सोडून दुराग्रह,                                   परिवर्तनाची वाट धरू !!                                 *******     उद्धव भयवाळ, औरंगाबाद

जल जीवन अभियानाअंतर्गत २०२१-२२ मध्ये ४०,००९ कोटी रुपये वितरित तर २०२२-२३ साठी ६०,००० कोटी रुपयांची तरतूद !

इमेज
जल जीवन अभियानाअंतर्गत २०२१-२२ मध्ये ४०००९ कोटी रुपये वितरित ! जलजीवन अभियानासाठीची तरतूद वाढवून २०२२-२३ साठी ६०,००० कोटी ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट, २०१९ रोजी जलजीवन अभियानाचा आरंभ केल्यापासून, आतापर्यंत ६ कोटींहून अधिक घरांना नळाने पाण्याची जोडणी पुरवण्यात आली. नवी दिल्ली::-चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ यामध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय अनुदानाचा राज्याच्या हिश्श्यासह वापर करण्याच्या संदर्भातील कार्यक्षमतेनुसार घरोघरी नळाच्या पाण्याची जोडणी देण्यासाठी ४०००० कोटी रुपयांपेक्षा अधिक अनुदान देण्यात आले आहे. जलजीवन अभियानांतर्गत  २०२२-२३ साठीची तरतूद केंद्र सरकारकडून वाढविण्यात आली  असून ६०,००० कोटी रुपये करण्यात आली आहे. यामुळे ‘हर घर जल’ या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. पाणी हे सर्व विकास कामांच्या केंद्रस्थानी आहे आणि देशातील दुर्गम  भागात राहणाऱ्या ग्रामीण लोकसंख्येची 'जीवन सुलभता '(ईझ ऑफ लिव्हिंग) सुनिश्चित करण्यासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवणे हे भविष्यातील  विशाल कार्य  ठरेल. गेल्या दोन वर्षांत कोविड-१९ महामारी आणि परिणामी टाळेबंदी यांचा व्यत

राजस्थान रॉयल्सचा दिमाखदार विजय !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, 7387333801 राजस्थान रॉयल्सचा दिमाखदार विजय            मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर टाटा आपीएल २०२२ चा पाचवा सामना   एकतर्फी झाला. हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. राजस्थान कडून खेळाची सुरूवात करायला जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल उतरले. दोघांनीही आवश्यक सरासरी राखत डाव फुलवला. ७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूंवर यशस्वी जयस्वाल रोमारीओ शेफर्डच्या गोलंदाजीवर ऐडन मार्करामकडे झेल देऊन परतला. त्याने २ चौकार आणि १ षटकारांच्या सहाय्याने १६ चेंडूंत २० धावा काढल्या. धावफलक ५८/१ दर्शवत होता. त्याच्या जागी कर्णधार संजू सॅमसन आला. ह्यांची जोडी चांगली धावसंख्या उभारेल असं वाटत असतानाच जोस बटलर उमरान मलिकच्या जाळ्यात फसला. त्याचा झेल निकोलस पुरनने टिपला. त्याने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने २८ चेंडूंत ३५ धावा काढल्या. राजस्थानकडून देवदत्त पडीक्कल फलंदाजीसाठी उतरला. सॅमसन आणि पडीक्कल डावाला आकार देण्यास सुरूवात केली. ७० पेक्षा अधिक धावांची या जोडीने भर घातली. १५

३२ विदेशी भाषेत भाषांतरित झालेली "पोरी शाळेत निघाल्या" या कवितेचे कवी गणेश आघाव यांनी "कवी आपल्या भेटीला" कार्यक्रमाद्वारे ऐकविल्या कविता !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा,  7387333801 कवी गणेश आघाव यांनी विद्यार्थ्यांना ऐकवल्या कविता  पुणे २९(प्रतिनिधी) ::-येथील महात्मा फुले विद्यालय, उमरखेड येथे विद्यार्थ्यांसाठी 'कवी आपल्या भेटीला' या कार्यक्रमात कवी गणेश आघाव यांनी विद्यार्थ्यांना "पोरी शाळेत निघाल्या", या शैक्षणिक कवितेने कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी अनेक शेती मातीच्या कविता विद्यार्थ्यांपुढे सादर केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक, प्रमोद देशमुख हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी पी. आर. खांडरे , स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा उमरखेडचे सहाय्यक व्यवस्थापक कैलास बोईवार, एड. भक्ती चौधरी याही उपस्थित होत्या.               महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात नवोपक्रम या सदराखाली विद्यालयांमध्ये संपन्न झाला. या उपक्रमामध्ये जवळपास ९९ विद्यार्थ्यांनी काव्यलेखन स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धेत प्रथम क्रमांक चिन्मय संजय कदम ₹१००१ रुपये तर द्वितीय कु. दुर्गेश्वरी संतोष जाधव हिस ₹७०१ व तृतीय क्रमांक कु. रीता सिद्धार्थ मुनेश्वर हिस ₹५०१ बक्षीस देऊन या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात

जिल्हा परिषदेत आरोग्य सहाय्यिका पदी पदोन्नतीसह समुपदेशनाने पदस्थापना !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, 7387333801 जिल्हा परिषदेत १२ महिला कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यिका पदी पदोन्नती सह समुपदेशनाने पदस्थापना ! नाशिक : आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आरोग्य सेविका या संवर्गातून आरोग्य सहाय्यिका या संवर्गात १२ महिला कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पदोन्नतीने पदस्थापना दिली. पदोन्नती दरम्यान समुपदेशनासाठी अपंग, दुर्धर आजाराने त्रस्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले, यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंदराव पिंगळे, पदोन्नती समितीचे अधिकारी आदी उपस्थित होते. समुपदेशनाने पदोन्नतीची प्रक्रिया पार पडल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत मुख्य कार्यकारी अधिकारी व पदोन्नती समिती व आरोग्य विभागातील संकलन, सहायक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.

दिव्यांगांच्या सेवेसाठी कायमस्वरूपी केंद्राचे लोकार्पण ! मारवाडी युवा मंच, समकित ग्रुप, महावीर सेवा फाउंडेशन, उमीद फाऊंडेशन, नवकार आशिष ग्रुप

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, 7387333801 दिव्यांग (अपंग) सेवेसाठी कायमस्वरूपी केंद्राचे लोकार्पण ! नाशिक (प्रतिनिधी ):- नव्या पिढीतील युवा कार्यकर्ते उत्तम सेवाकार्य करीत आहेत. त्यांना समाजाने सहकार्य करावे. नुकतेच ३२ खोल्या असणारे वसतिगृह घेण्यात आले आहे. तेथे अनेक गरजू विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. दिव्यांगांच्या सेवेसाठी महावीर धर्मार्थ दवाखान्यात कायमस्वरूपी विनामूल्य केंद्र सुरू करण्यात आले असून त्याचे लोकार्पण करण्यात येत आहे असे प्रतिपादन जे. सी. भंडारी यांनी केले. ७५ दिव्यांग व्यक्तींना जयपूर फूट वितरण प्रसंगी ते बोलत होते.           नवकार आशिष सेवा ट्रस्ट तर्फे काल रविवारी ( दि.२७) श्री महावीर धर्मार्थ दवाखाना संचलित आरएमडी हॉस्पिटलमध्ये ७५ गरजू विकलांग व्यक्तींना जयपूर फूट वितरित करण्यात आले. त्यासाठी पुण्याच्या साधू वासवानी ट्रस्टने सहकार्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे. सी. भंडारी होते. ते म्हणाले, नवकार आशिष सेवा ट्रस्ट तर्फे गेल्या चार वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पुस्तके देण्यात येतात. रक्तदा

कोल्हापूरच्या रोहिणी पराडकरांचा साहित्य क्षेत्रातील अनोखा उपक्रम !!

इमेज
सौ. रोहिणी अमोल पराडकर जिल्हा प्रशासक कोल्हापूर यांनी भारतीय साहित्य सांस्कृतिक मंच कोल्हापूर या समूहात एक आगळा-वेगळा उपक्रम घेतला आणि सर्व लेखकांना लिहिण्यास व वाचण्यास उस्फुर्त केले. साहित्य क्षेत्रातील अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात आले.            जास्तीत जास्त साहित्य पाठविणाऱ्यास लेखन सम्राट, लेखन सम्राज्ञी पदवी देऊन म्हणून सन्मानित करण्यात आले. लेखकांनी पाठविलेल्या साहित्य वाचून जास्त अभिप्राय देणाऱ्यांना अभिप्राय सम्राट व सम्राज्ञी ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाने समूहात उस्फुर्त, आनंददायी वातावरणात सदर पदवीप्रदान सोहळा संपन्न झाला.         ८३ लेख पाठविणाऱ्या तृप्ती कळसे लेखणी सम्राज्ञी, ८१ लेख पाठविणाऱ्या जयश्रीताई साहित्य शिरोमणी तर पुरुष गटामध्ये ३६ लेख पाठविणाऱ्या विनायक पाटील लेखणी सम्राट तसेच ९२ अभिप्राय पाठविणाऱ्या मनिषा हिस अभिप्राय सम्राज्ञी म्हणून सन्मानित करण्यात आले.

छगन भुजबळ यांच्याकडून रेशन दुकानदाराचे कौतुक ! आय एस ओ प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना !!

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, 7387333801 मंत्री छगन भुजबळ यांची मुळशी येथे स्वस्त धान्य दुकानास भेट ! आयएससो नामांकनास आवश्यक नियमावली पूर्ततेची केली पाहणी ! मुळशी,पुणे,दि.२७ मार्च :-   राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे आज पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील दौऱ्यावर असतांना त्यांनी मुळशी तालुक्यातील चाले या गावातील परवानाधारक धनजंय दाभाडे यांच्या स्वस्त धान्य दुकानास अचानकपणे भेट दिली. यावेळी शासनाने आयएससो नामांकन प्राप्त करण्यासाठी ठरवून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन केले जाते की नाही याबाबत पाहणी केली.        यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी आयएसओ नामांकन आवश्यक असलेल्या अटी व नियमांनुसार रेशन दुकानातील वजनमापे काटा, धान्यवाटप प्रमाणपत्र फलक, दरपत्रक फलक, जिल्हा दक्षता कमिटी बोर्ड, तालुका दक्षता कमिटी बोर्ड, परवाना फलक, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार कीट, व्हिजीट बुक, तक्रार पुस्तिका, ऑनलाईन विक्री रजिस्टर या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आलेली आहे की नाही याची प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान स्वस्त धान्य दुकानदाराकडून आयएसओ नामांकन प्राप्त करण्

राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान सोहळा ! जिल्हा परिषद मा. अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर सन्मानित !

इमेज
राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान सोहळा ! जिल्हा परिषद मा. अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर सन्मानित !       नासिक(प्रतिनिधी)::- जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांना आज जाणीव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यकर उपायुक्त, वस्तू व सेवाकर विभाग मुंबई चे संजय पोखरकर, आयमाचे सचिव तथा उद्योजक गोविंद झा, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंबई जयंत गायकवाड, सी.आर.पी.एफ. शहीद शिवराज शंकर चव्हाण यांच्या वीरपत्नी विमल चव्हाण, मा. नगरसेविका श्रीमती वत्सलाताई खैरे, विधानसभा सदस्य अॅड. श्रीमती हुसनबानो खलिफे, जलसंधारण अधिकारी मालेगाव अंकीता वाघमारे, मा. स्थायी सभापती अमोल जाधव, डॉ.अतुल वडगांवकर, अॅड. अनिलराव कासार या मान्यवरांना जाणीव पुरस्कार आज कालिदास कलामंदिर येथे  प्रदान करण्यात आला.        पुरस्कार प्रदान करण्यासाठी मान्यवर सुप्रसिद्ध इतिहास तज्ञ स्मिता देशमुख, नासिक मनपा माजी उपमहापौर भिकूताई बागूल, डॉ. स्वप्निल बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते संतोष मराठे, जाणीव सांस्कृतिक अभियान संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, जिल्हा

कृषी पर्यटनाने द्राक्षांचे महत्व वाढेल ! जिल्ह्याला द्राक्ष राजधानीचा मान !!

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, (7387333801)  जिल्ह्याला द्राक्ष राजधानीचा मान नाशिक ( प्रतिनिधी ):- कृषी पर्यटनाने द्राक्षांचे महत्व अधिक वाढेल. शेतकऱ्यांचे दर्जेदार उत्पादन वाढून उत्तमभाव मिळेल. नाशिक जिल्हा द्राक्ष राजधानी ठरली आहे असे प्रतिपादन खा. हेमंत गोडसे यांनी केले. ते नाशिक द्राक्ष महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर जगदीश होळकर, ट्रॅव्हल असोसिएशनचे अध्यक्ष राकेश बकरे, दत्ता भालेराव, सुला वाईनचे उपाध्यक्ष संजीव पैठणकर, सोमा वाईनचे अधिकारी पाचपाटील, कृषिविभाग अधीक्षक सोनवणे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विभागीय प्रकल्प उपसंचालक मधुमती सरदेसाई - राठोड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.           द्राक्षपंढरी असा नावलौकिक असणाऱ्या नाशिकमध्ये ग्रेप हार्वेस्ट महोत्सवाने रंगत आणली आहे. विभागीय उपसंचालक पर्यटन संचालनालय यांच्या मार्फत दोन दिवसांच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या गंगापूर धरणाजवळ असलेल्या ग्रेप पार्क रिसॉर्ट येथे ही संधी पर्यटकांना उपलब्ध झाली. अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरणाने बाहेरून आलेले पर्य