पोस्ट्स

वारली कलेने आदिवासी महिलांना व्यक्त होण्याची संधी दिली - श्रीमती लीना बनसोड, ( मुकाअ जिल्हा परिषद )

इमेज
  न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक,.  7387333801          वारली कलेने आदिवासी महिलांना  व्यक्त होण्याची संधी दिली - बनसोड          नाशिक ( प्रतिनिधी ) :- महाराष्ट्राची वारली कला जगभरात पोहोचली आहे. या कलेने आदिवासी महिलांना व्यक्त होण्याची संधी दिली. त्यांनीही ११०० वर्षांची परंपरा जतन केली. वारली चित्रे दिसतात तेव्हढी सोपी नसतात. प्रत्यक्ष करतांना ते समजते. अनेक कलाकारांनी सुंदर वारली चित्रे रेखाटून प्रदर्शनात मांडली आहेत. पत्रकार व वारली चित्रकलेचे अभ्यासक संजय देवधर यांनी या उपक्रमाद्वारे त्यांना प्रकाशात आणले असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांनी केले.    वारली आर्ट फाउंडेशन आणि पीएनजी आर्ट इनीशीटिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने समूह वारली चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. नाशिकरोडच्या पु.ना. गाडगीळ अँड सन्सच्या कलादालनात या प्रदर्शनाचे उद्घाटन काल महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने करण्यात आले. उद्घाटक लीना बनसोड व प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, रंगकर्मी सतीश मोहोळे तसेच व्यवस्थापिका प्रविणा दुसाने आदी मान्यवर उपस्थित होते. संयोजक संजय देव

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी समूह वारली चित्रप्रदर्शनाचे उद्धाटन!

इमेज
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी होणार समूह वारली चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन !       नाशिक ( प्रतिनिधी ) - येथील वारली आर्ट फाउंडेशनतर्फे दि. १ ते ८ मे दरम्यान समूह वारली चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन रविवारी दि. १ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक व रंगकर्मी सतीश मोहोळे उपस्थित राहणार आहेत. पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे नाशिकरोड येथे पासपोर्ट ऑफिसशेजारी शोरूम आहे. त्याठिकाणी वातानुकूलित कलादालन तयार करण्यात आले आहे.तेथेच हे चित्रप्रदर्शन भरविण्यात येत आहे. नाशिककर रसिकांना उत्तम वारली चित्रे बघण्याची व खरेदी करण्याची यानिमित्ताने संधी मिळेल.    यासंदर्भात प्रदर्शनाचे संयोजक वरिष्ठ पत्रकार व वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर यांनी माहिती दिली. समूह वारली चित्रप्रदर्शनात अपूर्वा भंडारे, स्नेहल बंकापुरे, शुभश्री चित्राव, विलास देवळे, सुप्रिया देवधर, गौरवी घोडके, हर्षदा माळी, आबा मोरे, सोमेश्वर मुळाणे, पद्मजा ओतूरकर, रविंद्र वैष्णव

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी होणार समूह वारली चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801 समूह वारली चित्रप्रदर्शनाचे रविवारी दि.१ मे रोजी उद्घाटन !    नाशिक ( प्रतिनिधी ) - येथील वारली आर्ट फाउंडेशनतर्फे दि. १ ते ८ मे दरम्यान समूह वारली चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन रविवारी दि. १ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक व रंगकर्मी सतीश मोहोळे उपस्थित राहणार आहेत. पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे नाशिकरोड येथे पासपोर्ट ऑफिसशेजारी शोरूम आहे. त्याठिकाणी वातानुकूलित कलादालन तयार करण्यात आले आहे.तेथेच हे चित्रप्रदर्शन भरविण्यात येत आहे. नाशिककर रसिकांना उत्तम वारली चित्रे बघण्याची व खरेदी करण्याची यानिमित्ताने संधी मिळेल.         यासंदर्भात प्रदर्शनाचे संयोजक वरिष्ठ पत्रकार व वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर यांनी माहिती दिली. समूह वारली चित्रप्रदर्शनात अपूर्वा भंडारे, स्नेहल बंकापुरे, शुभश्री चित्राव, विलास देवळे, सुप्रिया देवधर, गौरवी घोडके, हर्षदा माळी, आबा मोरे, सोमेश्वर मुळाणे, पद्मजा ओतूरकर, रविंद्र वैष्णव, मंगला वाघमार

मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक होण्यासाठी आवाहन !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801         मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक होण्यासाठी आवाहन !           मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जोगेश्वरी पूर्व मेघवाडी येथे "मराठा सामाजिक संस्थेच्या" वतीने मराठा पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 'विषय गंभीर तिथे मराठा खंबीर' या उक्तीप्रमाणे मराठा समाजानेही जुन्या चालीरीती संस्कृती परंपरेत न अडकता गुजराती मारवाडी सिंधी लोकांप्रमाणे उद्योगात यशस्वी झाले पाहिजे. त्यासाठी "रिस्क" ही घेतलीच पाहिजे. शिवरायांनी बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले होते तसेच आता त्यांचीच विचारधारा पुढे चालवत उद्योगक्षेत्रात जिद्दीनं उभे राहणे गरजेचे आहे असे आवाहन बैठकीत करण्यात आले. बैठकीत मराठा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव सुर्वे, उपाध्यक्ष सुहास तावडे, कार्यवाहक संदीप भोसले, अश्विनीताई भोसले, कैलास येरुणकर, साक्षीताई घोसाळकर, उद्योग आणि सहकार विभाग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल कदम यांनी नवउद्योग करणाऱ्य

"मुंबईकर" महाराष्ट्रदिनी आपल्या भेटीला ! मी मुंबईकर... मै मुंबईकर... दुनिया में कोई नहीं मुझसे बेहतर… हालात हों जैसे भी मै सिकंदर... !!

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक    ‘मुंबईकर’ महाराष्ट्रदिनी मुंबईकरांच्या भेटीला !         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : 'मुंबईकर’ ही मुंबईत राहणार्‍या माणसाला अभिमानास्पद अशी पदवीच वाटते. सार्‍या भारतातच नव्हे तर जगात अनेक ठिकाणी ही ओळख ठळकपणे आपलं अस्तित्व दाखवते. मुंबईचं श्रीमंतीचं, ग्लॅमरचं वलय आपसुक मिळत असलं तरी, मुंबईकर हा माणूस म्हणून स्वतःची वेगळी ओळख असलेला आहे. त्याच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंचं वर्णन करणाऱ्या ‘मुंबईकर’ या हिंदी गाण्याचा म्युझिक व्हिडिओ १ मे या महाराष्ट्रदिनी रसिकांसमोर मिथिलेश पाटणकर या यूट्यूब चॅनेलवर आणि ऑडिओ इतर सर्व प्रमुख ऑडिओ प्लॅटफॅार्मस् वर प्रसिद्ध होत आहे.           या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार डॉ. प्रमोद बेजकर आहेत. मिथिलेश विश्वास पाटणकर यांनी या गाण्याचं संगीत संयोजन आणि गायन केलं आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे, यात एक रॅप गाण्याचा भाग आहे, जो मिथिलेश यांनीच लिहिला असून, एका वेगळ्याच शैलीदार आवाजात गायला आहे. या गाण्याच्या व्हिडिओत, मुंबईची ओळख म्हणून प्रसिद्ध असलेली अनेक स्थळं पहायला मिळतील. तसंच मुंबईत विविध व्यवसाय करणारे देखिल आपण

ब्रम्हाकुमारीज् संस्थेच्या वतीने व्यक्तिमत्व विकास शिबिराचे यशस्वी आयोजन !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक   ब्रम्हाकुमारीज् संस्थेच्या वतीने व्यक्तिमत्व विकास शिबिराचे यशस्वी आयोजन !             नासिक::-ब्रम्हाकुमारीज् संस्थेच्या मुल्य शिक्षण ह्या विभागाद्वारे गंगापूर रोड नासिक येथील कॉमर्स मैनेजमेंट कम्प्युटर सायन्स कॉलेज येथे विद्यार्थांसाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर पाच दिवसीय कोर्स चे आयोजन करण्यात आले होते.          ब्रम्हाकुमारीज् संस्थेचे विकास साळुंके व प्राध्यापक सतिश भदाणे यांनी ब्रम्हाकुमारी वासंती दिदीजींच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे, प्राध्यापिका डॉ. वावीकर यांनी सहकार्य केले.           ब्रम्हाकुमारीज् गंगापूर रोड सेवा केंद्र संचालिका मनिषा दिदी यांनी विद्यार्थ्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर मार्गदर्शन करताना, सकारात्मक विचार, इमोशनल स्टॅबिलिटी, निर्णय शक्ती व एकाग्रता वाढवण्यासाठी टिप्स देताना विद्यार्थ्यांना गाईडेड मेडिटेशन चा अनुभव करवला. सोनी तर्वे यांनी गीतगायन केले. सुरेश साळुंके, तृप्ती देवरे, सतिश भदाणे, विकास साळुंके यांनीही विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास याविषयी सकारात्मक मार

मुंबई दूरदर्शन च्या वतीने प्रेक्षकांना 'शब्दसूरांचा जादूगार संगीतकार,,,,,,," या लघुपटाची दि. ६ व ७ मे रोजी अनोखी भेट !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक  मुंबई दूरदर्शन च्या वतीने प्रेक्षकांना 'शब्दसूरांचा जादूगार संगीतकार,,,,,,," या लघुपटाची दि. ६ व ७ मे रोजी अनोखी भेट ! `संगीतकार अशोक पत्की' लघुपटाचे दूरदर्शनवर ६ व ७ मे रोजी प्रसारण मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई दूरदर्शनच्या वतीने `शब्दसूरांचा जादूगार संगीतकार अशोक पत्की' या लघुपटाची निर्मिती केली आहे. त्याचे प्रसारण शुक्रवार दिनांक ६ मे रोजी सायंकाळी साडे सात वाजता आणि शनिवार दिनांक ७ मे रोजी दुपारी १.३० व रात्री १०.३० वाजता होईल. दूरदर्शनच्या माजी सहाय्यक संचालक निर्मात्या डॉ. किरण चित्रे यांनी त्याचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. यासाठी दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक नीरज आगरवाल यांचे सहकार्य मिळाले आहे.          अशोक पत्की हे संगीत विश्वातलं मोठं नाव, शास्त्रशुद्ध पद्धतीने संगीताचे शिक्षण न घेताही स्वकर्तृत्वाच्या बळावर त्यांनी संगीत क्षेत्रात अफाट आणि वैविध्यपूर्ण काम केले आहे. त्यांच्या सांगितिक जीवनाची यशोगाथा रसिकांसमोर यावी, यासाठी या लघुपटाचे संकलन प्रफुल्ल मोहिते यांनी केले आहे तर संकलन प्रमुख शुभांगी सावंत यांनी समन्वयकाची जबाबदारी