पोस्ट्स

बालविवाह रोखणे यंत्रणेतील प्रत्येकाची जबाबदारी - लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जि.प.

इमेज
महिला बालकल्याण विभाग व यूनिसेफची एकत्रित बैठक !  बालविवाह रोखणे यंत्रणेतील प्रत्येकाची जबाबदारी - लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जि.प. नाशिक         नाशिक - जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आज महिला व बालकल्याण विभाग आणि यूनिसेफ (UNICEF) या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, महिला व बालकल्याण विभागाच्या एक मूठ पोषण कार्यक्रम, नवजात बालकांची संख्या व कमी वजनाची बालके, सर्वसाधारण वजनाची बालके त्याचबरोबर बाल आधार नोंदणी यासंदर्भात आढावा घेत प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली, ग्रामीण भागात बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणेतील सर्व घटकांनी एकत्र येत काम करावे, अंगणवाडी सेविकांनी किशोरवयीन मुलींचे मेळावे घ्यावे व महिला बचत गटांच्या मासिक सभा, ग्रामसभा यामध्ये बालविवाह रोखण्यासाठी प्रबोधन करत लोकसहभागातून बालविवाह थांबवण्यासह बालविवाह करण्याच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी काम करावे असे निर्देश या बैठकीत दिले, उपस्थित बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी यावेळी कश

जायंटस् वेल्फेअर फाऊंडेशनचे कार्य समाजोपयोगी - आ. सीमाताई हिरे

इमेज
जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे कार्य समाजोपयोगी - आ. सीमा हिरे        नाशिक ( प्रतिनिधी ) जायंट्स ही सेवाभावी संघटना समाजोपयोगी सेवाकार्ये सातत्याने करते. आदर्श नेतृत्वाखाली अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवता येतात. नाशिकचे अनुपकुमार जोशी यांनी गेल्या १५ वर्षात विविध महत्वाची पदे भूषवली आहेत. आता ते अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेत आहेत. आपल्या कार्यकाळात सहकाऱ्यांसह ते उत्तम कार्याचा ठसा नक्कीच उमटवतील असा विश्वास आ. सीमा हिरे यांनी व्यक्त केला. जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन फेडरेशन २ अ च्या शपथविधी व पदग्रहण समारंभात त्या बोलत होत्या.            आ.सीमा हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील चिंतामणी मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जायंट्स फेडरेशन २ अ चे नूतन अध्यक्ष अनुपकुमार जोशी व कौन्सिल सदस्य यांचा शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहात झाला. याप्रसंगी १० नेत्रहीन बांधवांना पांढऱ्या काठीचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. आ.सीमा हिरे यांनी आपल्या भाषणात जायंट्स करीत असलेले उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले, पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सन २०२१ मध्ये ज्या ग्रुपने व सदस्यांनी उत्कृष्ट कार्य केले त्

जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे कार्य समाजोपयोगी - आ. सीमा हिरे

इमेज
जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे कार्य समाजोपयोगी - आ. सीमा हिरे        नाशिक ( प्रतिनिधी ) जायंट्स ही सेवाभावी संघटना समाजोपयोगी सेवाकार्ये सातत्याने करते. आदर्श नेतृत्वाखाली अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवता येतात. नाशिकचे अनुपकुमार जोशी यांनी गेल्या १५ वर्षात विविध महत्वाची पदे भूषवली आहेत. आता ते अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेत आहेत. आपल्या कार्यकाळात सहकाऱ्यांसह ते उत्तम कार्याचा ठसा नक्कीच उमटवतील असा विश्वास आ. सीमा हिरे यांनी व्यक्त केला. जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन फेडरेशन २ अ च्या शपथविधी व पदग्रहण समारंभात त्या बोलत होत्या.            आ.सीमा हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील चिंतामणी मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जायंट्स फेडरेशन २ अ चे नूतन अध्यक्ष अनुपकुमार जोशी व कौन्सिल सदस्य यांचा शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहात झाला. याप्रसंगी १० नेत्रहीन बांधवांना पांढऱ्या काठीचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. आ.सीमा हिरे यांनी आपल्या भाषणात जायंट्स करीत असलेले उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले, पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सन २०२१ मध्ये ज्या ग्रुपने व सदस्यांनी उत्कृष्ट कार्य केले त्

भगवान बुद्धांचे पर्यावरणवादी विचार ! १६ में बुद्ध जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

इमेज
भगवान बुद्धांचे पर्यावरणवादी विचार !        १६ मे ला बुद्ध जयंती साजरी होत आहे. सद्यपरिस्थितीमध्ये मानव आणि निसर्ग सुखरूप कसे राहतील? हाच सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. गौतम बुद्धांच्या मते, मानवाने निसर्गातील झाडे-झुडपे तसेच तमाम जीवजंतु बरोबरच नदी-तलावांतील पाणी स्वच्छ ठेऊन या सर्वांचे रक्षण केले तरच मानव स्वतःही सुरक्षित आणि स्वस्थ राहील. ‘भवतु सब्ब मंगलम्’ या त्यांच्या वचनाप्रमाणे माणूसच नव्हे  तर सर्व प्राणिमात्र, जीवसृष्टीचेच कल्याण व्हावे यासाठी त्यांची धडपड चालली होती. आपल्या शिष्यांच्या मदतीने त्यांनी आपल्या लोककल्याणकारी संदेशांचा आणि वचनांचा प्रसार आणि प्रचार केला. त्यांचे संदेश आणि वचने ‘उदान’ नावाने ओळखली जातात. माणसाने जागृत म्हणजेच डोळस किंवा प्रज्ञावान व्हावे, बुद्धिवंत म्हणजेच  बुद्ध व्हावे, परावलंबी न राहता  स्वावलंबी बनावे, प्रकाश पुंज  म्हणजेच दीपक व्हावे, ‘अत: दीप भव:’ असे ते सांगतात. कारण मनुष्य जन्म दुर्लभ असून तो पुनः मिळण्याची शाश्वती नसल्याने माणसाने तात्काळ जागे व्हावे असे म्हणतात.         गौतम बुद्ध सांगतात की प्रदूषण हे दोन स्तरावर समझून घेऊन ते रोखले पाहिजे.

अधिवेशनात मांडला ठराव-विद्युत कर्मचाऱ्यांसाठी ‘एक राष्ट्र, एक नियम’ असावा !

इमेज
विद्युत कर्मचाऱ्यांसाठी ‘एक राष्ट्र, एक नियम’ असावा ! समारोप : अखिल भारतीय विद्युत मजदूर संघाच्या अधिवेशनात ठराव ! नाशिक(प्रतिनिधी):-ऊर्जा क्षेत्र कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचा दुवा आहे. भारतात देखील ऊर्जा क्षेत्र गेल्या कित्येक दशकापासून आर्थिक विकासात मोठा हातभार लावत आहे. त्यामुळे भारत सरकारने २०२२ पर्यंत ऊर्जा क्षेत्रात २२७ गीगावॅट क्षमता प्राप्त करण्यासाठी रोड मॅप तयार करायला हवा. सध्या भारतात कोळशावर आधारित २०२.४१ गीगावॅट वीज अपेक्षित आहे. त्यासाठी सरकारने वीज कर्मचाऱ्यांसाठी ‘एक राष्ट्र, एक ग्रीड, एक नियम’ याबाबतचे धोरण आखावे असा प्रस्ताव अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाच्या दोन दिवशीय अधिवेशनात मांडण्यात आला. पुणे विद्यार्थी वसतीगृह संचलित देवधर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी कार्यकारिणीकडून पाच प्रस्ताव मांडण्यात आले. त्यामध्ये ‘विद्युत उत्पादन, पारेषण आणि वितरण उद्योगावर औद्योगिक त्रिपक्षीय समितीचे पूर्णगठण करणे, केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात एक संयुक्त उद्यमच्या माध्यमातून राज्य विद्युत निगम तथा कंपन्यांना

आशापुरी मातेचा आंनदोस्तव सोहळा व माहेरवाशिणीचे स्नेहमिलन उत्साहत संपन्न !!

इमेज
खामखेडा येथे आशापुरी मातेचा आंनदोस्तव सोहळा व माहेरवाशिणीचे स्नेहमिलन उत्साहत संपन्न !!         देवळा, महेश शिरोरे (प्रतिनिधी )--  देवळा तालुक्यातील खामखेडा येथे अक्षय तृतीयेच्या  साडेतीन मुहूर्तावर (८ मे रोजी) खामखेडा नगरीत आई आशापुरी आंनदोस्तव सोहळा, माहेरवाशिणी स्नेहमिलन आणि शिरोरे परिवाराचे स्नेहसंमेलन हा त्रिवेणी, त्रिसूत्री कार्यक्रम  दिमाखदार सोहळ्यात आनंददायी वातावरणात संपन्न झाला.      ब्रम्ह वृंदाच्या साक्षीने सकाळी पहाटे पाच वाजेपासून ते साडे अकरा वाजेपर्यंत होम हवन विधी करण्यात आला तर परिवारातील आलेल्या सर्व माहेरवाशिणी व जावाई, भाचे, शिरोरे परिवारातील सर्व सदस्य, खामखेडा वासीय यांच्या उपस्थितीत आई आशापुरी मातेची रथातून मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गावात रांगोळी काढून गांव सुशोभित करण्यात आले होते. सर्व माहेरवाशिणी व उपस्थितांनी देवीच्या गाण्यांच्या तालावर तल्लीन होऊन नाचण्याचा आनंद लुटला. मिरवणुकीत जांभळ्या रंगाची साडी व फेटा परिधान केलेल्या माहेरवाशिणी सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या, पुरुषांना सफेद ड्रेस कोड , तर भाचींना लाल साडी, सासरवाशिनींना केशरी रंगाची साडी असल्याने

धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंधेला त्यांच्यावरील चरित्रपट ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ सिनेमाची झाली घोषणा !

इमेज
धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंती दिनीच्या पूर्वसंधेला त्यांच्यावरील चरित्रपट ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ सिनेमाचा झाली घोषणा !             मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, संभाजी महाराज ह्यांच्या जयंती दिनी त्यांच्यावरील 'छावा-दि ग्रेट वॉरियर' ह्या चित्रपटाचा मुहूर्त झाला. डॉ. जयसिंगराव पवार लिखीत ‘छत्रपती संभाजी महाराज’ ग्रंथावर आधारित ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ चित्रपट असणार आहे. मल्हार पिक्चर्स प्रस्तुत, वैभव भोर आणि सनी रजानी निर्मित आणि राहुल जनार्दन जाधव दिग्दर्शित ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ संभाजी महाराजांच्या साहस आणि शौर्याची गाथा असेल.           ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ सिनेमाचे दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणतात, ” शंभूराजे खरे 'युथ आयकॉन' आहेत. वयाच्या नवव्या वर्षांपासून राजकारणाचे धडे घेत असलेल्या स्वराज्याच्या पहिल्या युवराजांची फक्त युद्धकौशल्यावरच नाही तर चौदा भाषांवर आणि साहित्यावरदेखील मजबूत पकड होती. कल्पनेतल्या सुपरहिरोंपेक्षा वास्तवातील सुपरहिरोवर सिनेमा बनवण्याची इच्छा होती. जी छावा-दि ग्रेट वॉरियर मधून पूर्ण होतेय.”          थोर इतिहासकार आणि काद