पोस्ट्स

अमास सेवा ग्रुपतर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना मदत !

इमेज
अमास सेवा ग्रुपतर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना मदत !        नाशिक ( प्रतिनिधी ) अमास सेवा संस्था (मुंबई) यांच्या माध्यमातून जॉय ऑफ गिव्हिंग या सेवाभावी उपक्रमात डोल्हारमाळ केंद्रातील तेरा शाळेतील ५३३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. त्यामध्ये स्कूलबॅग, रेनकोट ,वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, चित्रकला वही, रंगपेटी, पाटी, पेन्सिल बॉक्स, शार्पनर, कंपास पेटी, लाकडी पट्टी, पेन्सिल पाऊच अश्या दैनंदिन आवश्यक शैक्षणिक साहित्याचा समावेश करण्यात आला. जॉय ऑफ गिव्हींगचे प्रमुख  विक्रमभाई मेहता व सहकाऱ्यांनी मनोगतात कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा नव्याने शैक्षणिक सत्र जोमाने सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला व शुभेच्छा दिल्या. दिलेल्या मदतीचा योग्य उपयोग करून विद्यार्थ्यांनी प्रगती करावी असे त्यांनी नमूद केले.            अमास सेवा संस्थेचे समन्वयक चंदकांतभाई देढिरा यांचे याप्रसंगी मोलाचे सहकार्य, योग्य नियोजन व मार्गदर्शन मिळाले. कुळवंडी केंद्रातील सहकारी शिक्षक विजय भोये, बहीरम, बोरसे, कोकणे, घंटेवाड तसेच मानकापूर शाळेचे माजी सहकारी दिलीप शिंदे या शिक्षकांचे अनमोल सहकार्य मिळाले. या कार्यक्रमाच

वर्षाऋतूत बरसल्या भक्तीधारा, महामस्तकाभिषेक संपन्न !

इमेज
वर्षाऋतूत बरसल्या भक्तीधारा,  महामस्तकाभिषेक संपन्न ! ऋषभदेवपुरम- मांगीतुंगी  ( प्रतिनिधी )  सतत तेरा दिवस सुरू असलेल्या सोहळ्याची रंगत वाढत आहे. काल सोमवारी ( दि.२७) मांगीतुंगी सिद्धक्षेत्र येथे सकाळपासूनच मेघ दाटून आले होते. वर्षाऋतूमध्ये पावसाची सगळ्यांना आस लागली आहे. मोरांचा केकारव देखील सुरू आहे. अश्या अमृतमय वातावरणात भक्तीधारा बरसल्याने उपस्थित भाविकांनी जल्लोष केला. उपस्थित सर्व श्रावक- श्राविकांनी अतिशय श्रद्धापूर्वक अभिषेक, पूजनाचा व रत्नवृष्टीचा सात्विक आनंद मिळवला. अभिषेकानंतर दुपारी प्रत्यक्ष पर्जन्यवृष्टी सुरू झाली.    रविवारी रात्री मुंबई, डोंबिवली, कोल्हापूर, सोलापूर, नांदगांव, शिर्डी, मालेगाव, नाशिक, सटाणा येथून असंख्य भाविक खासगी वाहनांनी ऋषभदेवपुरम येथे दाखल झाले. त्यामुळे काल महाराष्ट्रातील दिगंबर जैन समाजाचा आणि मराठी मातीचा मोठा सहभाग होता. चेन्नई येथूनही काहीजण आले. काल सोमवारी( दि. २७) पहाटेपासून भाविकांची सहकुटुंब, सहपरिवार ऋषभदेवपुरम येथून ऋषभगीरीवर जाण्यासाठी रीघ लागली होती. सकाळपासून  पवित्र वातावरणात व उत्साहात भगवान ऋषभदेवांच्या गिनीज विश्वविक्रमी १०८ फु

नासिक येथील अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेची करमाळा जि. सोलापूर येथे शाखा...

इमेज
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेची करमाळ्याला शाखा...        नाशिक..दि.२४::-आखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिकच्या करमाळा येथे नविन केंद्राचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला. संस्थेचे कार्याध्यक्ष उदयकुमार मुंगी, सहकार्यवाह गंगाधर कुलकर्णी, कार्यकारीणी सदस्य सर्वश्री सचिन पाडेकर, सुभाष सबनीस, उल्हास पंचाक्षरी रोहीणी कुलकर्णी, सुप्रिया सबनीस आणि केंद्राचे पदाधिकारी संतोष कुलकर्णी, सदस्य सुधीर पुराणिक, नरहरी होशिंग, सारंग पुराणिक, सुनिल कुलकर्णी, सुनिल देशमुख, राजेंद्र सुर्यपुजारी, निलिमा पुंडे, सागर कुलकर्णी उपस्थित होते.                उद्घाटनाच्या निमित्ताने सामुदायिक व्रतबंधाचे आयोजन करण्यात आले होते. अठरा बटुंचा व्रतबंध यावेळी पार पडला. केंद्राच्या केंद्रप्रमुखपदी संतोष कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. आखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिकच्या ध्येय धोरणानुसार आणि संस्था पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा केंद्राच्या माध्यमातून समाजाची सेवा करू‌, तसेच विविध उपक्रम राबवून संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करू असे आश्वासन केंद्रप्रमुख संतोष कुलकर्णी यांनी यावेळी दिले. शेखर जोगळ

युवा वर्गातील वाढती व्यसनाधीनता हातात हात घालून हदयास हदय जोडून बंधू सहाय्याला लाहो बलसागर भारत होवो - साने गुरुजी

इमेज
युवा वर्गातील वाढती व्यसनाधीनता             हातात हात घालून             हदयास हदय जोडून             बंधू सहाय्याला लाहो             बलसागर भारत होवो                                   - साने गुरुजी         आज आपण २१ व्या शतकात पदार्पण करत आहोत. आपला भारत देश विश्वगुरू होण्याच्या शर्यतीत एकेक पाऊल पुढे टाकत आहे. या २१ व्या शतकात " युवा वर्गातील वाढती व्यसनाधीनता " यासारखा निबंध लिखानाचा विषय ठरावा. यासारखे दुर्देव कुठेच नसेल.         जगातील सर्वात जास्त युवक असलेला देश म्हणून भारताची ओळख आहे. कारण १८ ते ३५ या वयोगटातील ५५ टक्के युवक भारतात आहे. हा युवकवर्ग निरोगी, विवेकी, सुदृढ, विज्ञाननिष्ठ, व्यसनमुक्त असणे हीच देशाची खरी ताकद आणि यश आहे. परंतू भारतात विचित्र स्थिती पहावयास मिळते. किशोरवयींन लहान मुलांपासून ते युवकापर्यंतचे सर्वच घुटखा, मावा, तंबाखू, सिगारेट, बिडी, चरच, गांजा, ड्रग्स अशा विविध पदार्थांचे सेवन करून रस्त्यावर थुंकतांना दिसतात. अशी व्यसनाच्या जाळ्यात अडकलेली युवा पिढी देशाचे भवितव्य कसे ठरू शकेल हाच गंभीर प्रश्न आज भारतासमोर निर्माण झाला आहे.        शाळा, महाविद्

आपल्याकडे शेती नसेल तरीही प्रत्यक्ष शेतात जाऊन विषमुक्त भाजीपाला लागवडीसह सुदृढ जीवनशैलीचा मूलमंत्र !

इमेज
विषमुक्त भाजीपाला लागवडीसह मिळणार सुदृढ जीवनशैलीचा मूलमंत्र! नाशकातील मृद‍्गंध @ यंदे फार्म कडून अनोखी व्यवस्था सादर !        नाशिक::- शहरी जीवनशैलीचा अंगीकार करणार्‍यांना एकाच वेळी सेंद्रिय भाजीपाला उत्पादनाचा वेगळा अनुभव देताना दुसरीकडे दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करणारी अभिनव व्यवस्था नाशिक शहरात उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती यंदे फार्मच्या संचालिका स्मिता यंदे यांनी दिली. पुण्यामधील मृद‍्गंध स्टार्ट-अपच्या ​संयुक्त विद्यमाने नाशकात त्र्यंबकरोडवर हा प्रकल्प आकारणीस येत असल्याचे यंदे यांनी सांगितले.         यासंदर्भात अधिक माहिती देताना यंदे यांनी सांगितले की, शेतामध्ये भाडेतत्वावर उपलब्ध करून दिलेल्या सुमारे ७५० चौरस फूट जागेत गादीवाफे तयार करून भाज्यांची शेती करण्याची संधी यामध्ये दिली जाणार आहे. हे प्लॉट्स किमान सहा महिन्यांसाठी देताना त्यामधून सेंद्रिय पध्दतीने भाजीपाल्याची लागवड करता येणार आहे. यासाठी आवश्यक ते साहित्य मृद‍्गंध @ यंदे फार्मच्या वतीने पुरवण्यात येणार असून बिया आणि तत्सम वस्तू उत्पादक आणू शकतात. विषमुक्त भाजीपाल्याची लागवड करून सुदृढ जीवनशैलीचा मूलमंत्र

२५ जून भारतीय इतिहासातील सुवर्ण दिनच !

इमेज
२५ जून भारतीय इतिहासातील सुवर्ण दिनच !        २५ जून १९८३ हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली हा संघ विश्वचषकात सहभागी होण्यासाठी इंग्लंडला गेला तेव्हा या संघाकडून कोणालाच अपेक्षा नव्हती ,  पण युवा भारतीय संघाने आपल्या समर्पणाने आणि मेहनतीने जगातील सर्व संघांना गुडघे टेकायला लावून २५ जून १९८३ ला क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्डस वर दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजचा अंतिम फेरीत पराभव करून विश्वचषक जिंकला. त्या विजयानंतर क्रिकेट हा खेळ भारतात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. या स्पर्धेतील झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात भारताच्या १७ धावांत पाच विकेट पडल्यानंतर तरूण कर्णधार कपिल देवची नाबाद १७५ धावांची खेळी क्रिकेटच्या इतिहासात एक दंतकथा बनली आहे.   विश्वचषक विजय हा सामूहिक विजय होता. त्या विजयात प्रत्येक खेळाडूने आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कामगिरी केली. हा ऐतिहासिक विजय सर्व खेळाडूंसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. त्या विजयानंतर भारतीय संघाकडे आदराने पाहिले जात होते. क्रिकेटप्रेमी तो दिवस कधीच विसरणार नाहीत. तो

"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातून सुवर्ण भारताच्या दिशेने". व्याख्यान::- स्वर्णिम भारताच्या निर्मितीत महीलांचे योगदान !

इमेज
नाशिक - "स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातून सुवर्ण भारताच्या दिशेने" हे घोष वाक्य घेऊन  अंतरराष्ट्रीय स्थरावरील संस्था प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय तर्फे  जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ दरम्यान संपूर्ण भारतातील तसेच देश विदेशातील  विविध सेवाकेंद्र  तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.         याच शृंखलेत दिनांक १९ जून रोजी म्हसरूळ कलानगर येथील प्रभू प्रसाद या ब्रह्माकुमारी च्या मुख्य सभागृहांमध्ये स्वर्णिम भारत निर्मितीत महिलांचे योगदान या  विषयान्वये महिलांसाठी  एक दिवसीय व्याख्यानाचे आयोजन दिनांक १९ जून रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रमुख प्रमुख वक्ता म्हणून शिर्ड्डी साईबाबा संस्थांनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत, प्राचार्या डॉ. जेडी  सोनखासकर महिलांना विशेष मार्गदर्शन करणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दिदीजी स्वर्णिम भारत निर्मितीत  महिलाचे योगदान या विषयी आपले मनउदगार प्रस्तुत करणार आहेत. या कार्यक्रमासाठी अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहित