पोस्ट्स

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ अध्यक्षपदी विलास पोतदार तर कार्यवाह म्हणून सुभाष सबनीस यांची निवड...!

इमेज
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ नाशिक विभागाचे अध्यक्षपदी विलास पोतदार तर कार्यवाह म्हणून सुभाष सबनीस यांची निवड...!      नासिक::-अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या नाशिक विभागाचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी निवडीची घोषणा प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी नुकतीच केली आहे. अध्य‌क्षपदी वैशाली प्रकाशनाचे विलास पोतदार तर कार्यवाहपदी सुभाषित प्रकाशनचे सुभाष सबनीस यांची तर उपाध्यक्षपदी ज्योती स्टोअर्सचे वसंतराव खैरनार यांची निवड झाली आहे. खजिनदारपदी जी.पी. खैरनार यांना संधी देण्यात आली असुन कार्यकारिणी सदस्य म्हणून विनोद गोरवाडकर, सावळीराम तिदमे, किरण सोनार, संदीप देशपांडे, दिलिप बोरसे, विनायक रानडे, संतोष लहामगे, सौ.सुमती पवार, सौ.सुरेखा बो-हाडे यांची निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचे संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, कार्यवाह पराग लोणकर यांनी अभिनंदन केले आणि पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. नाशिक विभागात प्रकाशक लेखक यांच्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील आणि साहित्यिक सांस्कृतिक आणि वैचारिक परीस्थितीत प्रगल्भता आणण्यासाठी प्रयत्न करू अशी भुमिका यावेळी नुतन अध्यक्ष विलास पोतदार

भूलशास्त्र संघटनेतर्फे नासिकमध्ये राज्यस्तरीय युवा महाकॉन परिषद !

इमेज
भूलशास्त्र संघटनेतर्फे नासिकमध्ये राज्यस्तरीय युवा महाकॉन परिषद !             नाशिक ( प्रतिनिधी )भारतीय भुलशास्त्र संघटना (आयएसए) नाशिक या संघटनेच्यावतीने युवा महाकॉन २०२२ या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.२३ आणि रविवार दि.२४ जुलै या कालावधीत हॉटेल एक्सप्रेस इन येथे ही राज्यस्तरीय परिषद होणार असल्याची माहिती डॉ. अनिता नेहेते व सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.             आयएसए नाशिक ही संघटना भूलतज्ज्ञांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असते. सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध घटकांसाठी देखील संघटनेद्वारे उपक्रम राबविले जातात. यंदा पंचेचाळीस वयाच्या आतील भूलतज्ज्ञांसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारची राज्यस्तरीय युवा महाकॉन परिषद आयोजीत करण्यात आली आहे. आरोग्य सुविधांमध्ये आधुनिकता येत असतानाच भूलशास्त्रही प्रगत होते आहे. आरोग्य सेवेत भुलशास्त्र आणि भूल तज्ज्ञांचे महत्व अनन्य साधारण आहे. या शास्त्रात अंतर्भाव होणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाची, उपचार प्रणालीची सर्वांना माहिती व्हावी, विशेषतः वयाच्या पंचेचाळीशीच्या आतील भूल तज्ज्ञांच्या ज्ञानाचा अन्य सहकाऱ्यांना ही लाभ मिळावा, त्

मातीचा वसा आणि वारसा जपत महाविद्यालय सुसज्ज झाल्याचा आनंद - मा. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भास्कर विचारपीठावर माजी पोलीस सहआयुक्त बाबासाहेब बुधवंत

इमेज
👆👆👆👆👆👆👆 मातीचा वसा आणि वारसा जपत महाविद्यालय सुसज्ज झाल्याचा आनंद - मा. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भास्कर विचारपीठावर माजी पोलीस सहआयुक्त बाबासाहेब बुधवंत शेवगाव – “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी संस्थेने काळाची पावले ओळखून शेवगाव येथे महाविद्यालयाची उभारणी केली, त्यामुळे तळागाळातील विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग झाला, त्यांच्या स्वप्नांना बळ आणि ऊर्जा मिळाली, मातीचा वसा आणि वारसा घेऊन सुरु झालेले हे महाविद्यालय आज सुसज्ज झाल्याचे पाहून आनंद वाटला.” असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी केले.                            शेवगाव येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या वर्धापन दिना निमित्ताने माजी विद्यार्थी मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती निर्मला काटे होत्या, विचारपीठावर माजी पोलीस सहाय्यक आयुक्त बाबासाहेब बुधवंत, अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, माजी प्राचार्य शिवाजीराव देवढे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संजय फडके, बापूसाहेब भोसले, प

कोरोनापूर्वीच केली होती घोषणा, " एकदा काय झालं ! "

इमेज
‘ एकदा काय झालं' मराठी  चित्रपट येणार ५ ऑगस्टला !     नाशिक ( प्रतिनिधी )::- पुणे टॉकीज प्रा. लि. आणि हेमंत गुजराथी यांची प्रस्तुती असलेला 'एकदा काय झालं' हा मराठी चित्रपट येत्या ५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सलील कुलकर्णी व कवी संदीप खरे यांनी सांगितले. यावेळी संदीप यांनी काही कविता सादर केल्या. त्यातून चित्रपटाचे कथानक उलगडले.     ‘एकदा काय झालं ’ हे वाक्य आपल्या सगळ्यांना अगदी लहानपणापासूनच परिचित असतं. या वाक्यापासून सुरूवात होणाऱ्या असंख्य गोष्टी आपण लहानपणापासून नेहमीच ऐकतो, अशाच वेगवेगळ्या भावनिक गोष्टींमधून साकारलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार हे नक्की. नात्यांचे बंध, भावनांचे अर्थ, एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम, जिव्हाळा आणि या सर्वांच्या जोडीला गोष्टी ! या सगळ्या कंगोऱ्यांची सांगड घालत साकार झालेला ‘एकदा काय झालं ’ हा चित्रपट ५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. सोशल मीडियात एक मोशन पोस्टर रिलीज करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली.आशयघन कथानक आणि उत्तम कलाकारांची मांदियाळी घेऊन चित्रपट दिग्दर्शित करण

कोरोनापूर्वीच केली होती घोषणा, 'एकदा काय झालं !'

मी अत्रे बोलतोय... सदानंद जोशींच्या जन्मशताब्दीला प्रारंभ !

इमेज
मी अत्रे बोलतोय... सदानंद जोशींच्या जन्मशताब्दीला प्रारंभ !    यश हे अपघाताने किंवा योगायोगाने मिळत नसते. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते असे सदैव आपल्या सोबतच्या सर्वांना सांगणाऱ्या सदानंद जोशी यांनी पुढील काळात यशाची कमान उभी केली. यशस्वीपणे एकपात्री सादरीकरण करून महाराष्ट्रातच नव्हे तर  भारतात इतिहास घडविला. आचार्य अत्र्यांच्या आवाजात आणि वेशात प्रत्यक्ष अत्र्यांचे  व्यक्तीदर्शन घडवून तीन हजार पेक्षा जास्त कार्यक्रम भारतात आणि अनेक देशांत सादर केले. एक उच्चांक स्थापन केला. अशा सुप्रसिद्ध सदानंद जोशींचा जन्म दि.१६ जुलै १९२२ रोजी नाशिक येथे एका उच्चशिक्षित घरण्यात झाला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने !   सदानंद जोशी यांचे वडील त्या काळी म्हणजेच शंभर वर्षापूर्वी एम.ए. झालेले होते. आजोबा शिक्षण अधिकारी होते, तर मामा वकिल होते. बालपणापासून उत्तम निरीक्षण करून कोणत्याही व्यक्तीच्या चालण्याबोलण्याची हुबेहूब नक्कल करण्यांत त्यांनी नेहमीच उत्तम यश मिळविले. साने गुरुजींसारख्या कोमल मनाच्या माणसापासून ते हिटलर सारख्या हुकुमशहा पर्यंत विविध लोकांच्या