अमास सेवा ग्रूपच्या सेवाभावी उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ !

अमास सेवा ग्रूपच्या सेवाभावी उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ ! नाशिक ( प्रतिनिधी ) आदिवासी भागातील पत्र्याचापाडा येथील विद्यार्थ्यांना मुंबईच्या अमास सेवा ग्रूप या सेवाभावी संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अनेक दानशूर व्यक्तींच्या वाढदिवसाच्या औचित्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. सन २०१६ पासून आदिवासी भागातील मुलांच्या, समाजाच्या समस्या ओळखून विविध मदत मिळवून देण्यासाठी 'अमास सेवा ग्रुप ' सतत प्रयत्नशील असतो. सामाजिक बांधिलकीचे हे नाते आता घट्ट झाले आहे. शैक्षणिक वर्ष २०२२ - २३ मध्ये अमास सेवा ग्रुपचे अध्यक्ष चंद्रकांतभाई देढीया, विजय भगत यांच्या नेतृत्वाखाली विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून पेठ, सुरगाणा, भंडारदरा, वैतरणा, दिंडोरी परिसरातील ९० जिल्हा परिषद शाळांमधील जवळपास ५ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ( स्कूल बॅग, वही, पेन्सिल बाॅक्स, रेनकोट, पाटी, वाॅटर बॅग, चित्रकला वही, पेन, स्केल व गिफ्ट सेट) वाटप करून समाजामध्ये एक नवीन आदर्श निर्माण करीत आहे. वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातील एक सुखद क्षण असत