पोस्ट्स

परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय ! जाणण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय !! मराठी पत्रकार परिषद आता तालुका संपर्क अभियान राबविणार !! पुणे दि. ४::- राज्यातील तालुकास्तरावरील पत्रकार संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आगामी काळात तालुका संपर्क अभियान राबविण्याचा महत्वाचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेच्या काल पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख होते.. यावेळी विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन, राज्य महिला संघटक जान्हवी पाटील यांच्यासह राज्यातून पन्नासवर पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते..  तालुकास्तरावरील पत्रकारांवर जास्त अन्याय होतात, हल्ले होतात मात्र त्यांचा आवाज वरपर्यंत पोहचत नाही.. त्यामुळे मराठी पत्रकार परिषदेने थेट तालुक्यांना मान्यता देत ते परिषदेशी जोडून घ्यावेत अशी सूचना अनेकांनी केल्यानंतर त्यादृष्टीने यंत्रणा उभी करून तसा निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही देशमुख यांनी दिली. त्यासाठी तालुकास्तरावरील अध्यक्षांची नावे जमा करून त्यांच्याशी संपर्क साधला जाईल. तीन तालुक्यांचा

अनोखी गुरुवंदना, सदाबहार गाने सुहाने !

इमेज
अनोखी गुरुवंदना, सदाबहार गाने सुहाने !          नाशिक (प्रतिनिधी)::- प्रख्यात गायिका रागिणी कामतीकर संचलित स्वराजित संगीत अकॅदमीतर्फे नुकतीच 'गाने सुहाने' ही सदाबहार गाण्यांची मैफिल संपन्न झाली. स्वराजितमध्ये संगीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी आपल्या गुरूप्रती कृतार्थ भावना व्यक्त करत ही अनोखी गुरुवंदना दिली. २८ जुलै रोजी सरत्या आषाढातल्या संध्याकाळी आणि येणाऱ्या श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येला रावसाहेब थोरात सभागृह येथे संपन्न झालेली ही संगीत पर्वणी रसिकांना मनापासून आवडली. स्वरांचा लखलखाट, दीप अमावस्येच्या संध्याकाळी नाशिककरांना आनंद देऊन गेला. संगीत म्हणजे तुम्हा आम्हा रसिकांच्या हृदयातील स्पंदने असून ज्याला साक्षात परमेश्वराने तयार केलेलं आहे म्हणून ते नेहमी हृदयाने ऐकले पाहिजे असे सांगणाऱ्या गुरु रागिणीताई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विद्यार्थिनींनी एकाहून एक अशी सदाबहार गाणी सादर केली. "आजा पिया" ह्या गाण्यापासून मैफिलीची सुरुवात झाली आणि "इत्तीसी हसी…इत्ता सा तुकडा, चांद का" ह्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी नव्या जुन्या गाण्यां

आज रंगणार रफी गीतांची सुरेल मैफल !

आज रंगणार रफीगीतांची विनामूल्य सुरेल मैफल, रविवारी प.सा.नाट्यगृहात रंगणार रफीगीतांची सुरेल मैफल.         नाशिक ( प्रतिनिधी) - सदाबहार श्रेष्ठ गायक मोहम्मद रफी हा दैवी चमत्कार होता. त्यांच्या गाण्यांचे आजही अनेक चाहते आहेत. या लोकप्रिय पार्श्वगायकाने १९४९ ते १९८० पर्यंतची तीन दशके आपल्या सुरेल गाण्यांनी श्रोत्यांना मोहित केले. रविवारी ३१ जुलै रोजी त्यांचा ४२ वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने  'मुझे तुमसे मोहब्बत है' या बहारदार मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ०५:३० वाजता प.सा. नाट्यगृहात ही विनामूल्य मैफल होईल.            लोकप्रिय गायक घनश्याम पटेल या मैफलीचे संयोजक आहेत. गेली १० वर्षे ते सातत्याने हा उपक्रम राबवतात. कोरोनाच्या काळातही दोन वर्षे ऑनलाईन कार्यक्रम सादर करण्यात आला. स्वर्गीय सुरांचे सुरेल गायक मोहम्मद रफी यांनी आपल्या ३१ वर्षांच्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली. हिंदीसह मराठी, ऊर्दू, पंजाबी, तेलुगु व अन्य अनेक भाषांमध्येही त्यांनी पार्श्वगायन केले. ६ फिल्मफेअर अवॉर्डसह राष्ट्रीय पुरस्कार तसेच पद्मश्री किताबाने रफी साहेबांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांची ल

आवाज की दुनिया का बेताज बादशहा ! तुम मुझे यु भुला न पाओगे.

इमेज
आवाज की दुनिया का बेताज बादशहा  !   तुम मुझे यु भुला न पाओगे.        स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेले पार्श्वगायक   मोहम्मद (महम्मद) रफी यांचा  ३१ जुलै हा स्मृतिदिन. रफींना जाऊन आज ४० हून अधिक वर्षे लोटली असली तरी त्यांचा आवाज भारतीय संगीत रसिकांच्या कानावर पडला नाही ,  असा एकही दिवस गेला नसेल.  गेल्या कित्येक वर्षांत अनेकांनी  ' प्रति रफी '  बनण्याचा प्रयत्न केला. मात्र ,  कोणालाही रफींच्या जवळपासही फिरकता आले नाही, यातच रफींच्या गायकीचे वेगळेपण अधोरेखित होते. रफींनी अजरामर केलेल्या गीतांची यादी अफाट असून त्यांच्या    क्या हुआ तेरा वादा...( हम किसीसे कम नही ), बहारों फूल बरसाओ...(सूरज),   बाबूल की दुवाएँ लेती जा...(नीलकमल), ए रेश्मी जुल्फें...(दो रास्ते), उड़े जब जब जुल्फें तेरी ...(नया दौर),   ओ दुनिया के रखवाले... (बैजू बावरा) आदी गीतांचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्यांनी उर्दू, पंजाबी, मराठी आणि तेलगू भाषेतही गाणी गायली. त्यांचे  ‘हा रुसवा सोड सखे...’ हे गाणे ऐकताना एक अमराठी माणूस गातोय असे कुठेच जाणवत नाही.  रफी यांनी अनेक पार्श्वगायिकांसोबत गाणी गायली. विशेषत: लता मंगेशकर

आज रंगणार रफीगीतांची विनामूल्य सुरेल मैफल.रविवारी प.सा.नाट्यगृहात रंगणाररफीगीतांची सुरेल मैफल.

आज रंगणार रफीगीतांची विनामूल्य सुरेल मैफल. रविवारी प.सा.नाट्यगृहात रंगणार रफीगीतांची सुरेल मैफल.                नाशिक ( प्रतिनिधी) - सदाबहार श्रेष्ठ गायक मोहम्मद रफी हा दैवी चमत्कार होता. त्यांच्या गाण्यांचे आजही अनेक चाहते आहेत. या लोकप्रिय पार्श्वगायकाने १९४९ ते १९८० पर्यंतची तीन दशके आपल्या सुरेल गाण्यांनी श्रोत्यांना मोहित केले. रविवारी ३१ जुलै रोजी त्यांचा ४२ वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने  'मुझे तुमसे मोहब्बत है' या बहारदार मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता प.सा. नाट्यगृहात ही विनामूल्य मैफल होईल.            लोकप्रिय गायक घनश्याम पटेल या मैफलीचे संयोजक आहेत. गेली १० वर्षे ते सातत्याने हा उपक्रम राबवतात. अगदी कोरोनाच्या काळातही दोन वर्षे ऑनलाईन कार्यक्रम सादर करण्यात आला. स्वर्गीय सुरांचे सुरेल गायक मोहम्मद रफी यांनी आपल्या ३१ वर्षांच्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली. हिंदीसह मराठी, ऊर्दू, पंजाबी, तेलुगु व अन्य अनेक भाषांमध्येही त्यांनी पार्श्वगायन केले. ६ फिल्मफेअर अवॉर्डसह राष्ट्रीय पुरस्कार तसेच पद्मश्री किताबाने रफी साहेबांना सन्मानित करण्यात आले होते.

आज रंगणार रफीगीतांची विनामूल्य सुरेल मैफल !

इमेज
आज रंगणार रफीगीतांची विनामूल्य सुरेल मैफल ! रविवारी प.सा.नाट्यगृहात रंगणार रफीगीतांची सुरेल मैफल !!                नाशिक( प्रतिनिधी) - सदाबहार श्रेष्ठ गायक मोहम्मद रफी हा दैवी चमत्कार होता. त्यांच्या गाण्यांचे आजही अनेक चाहते आहेत. या लोकप्रिय पार्श्वगायकाने १९४९ ते १९८० पर्यंतची तीन दशके आपल्या सुरेल गाण्यांनी श्रोत्यांना मोहित केले. रविवारी ३१ जुलै रोजी त्यांचा ४२ वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने  'मुझे तुमसे मोहब्बत है' या बहारदार मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता प.सा. नाट्यगृहात ही विनामूल्य मैफल होईल.                            लोकप्रिय गायक घनश्याम पटेल या मैफलीचे संयोजक आहेत. गेली १० वर्षे ते सातत्याने हा उपक्रम राबवतात. अगदी कोरोनाच्या काळातही दोन वर्षे ऑनलाईन कार्यक्रम सादर करण्यात आला. स्वर्गीय सुरांचे सुरेल गायक मोहम्मद रफी यांनी आपल्या ३१ वर्षांच्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली. हिंदीसह मराठी, ऊर्दू, पंजाबी, तेलुगु व अन्य अनेक भाषांमध्येही त्यांनी पार्श्वगायन केले. ६ फिल्मफेअर अवॉर्डसह राष्ट्रीय पुरस्कार तसेच पद्मश्री किताबाने रफी साहेबांना सन्मानित

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यसैनिक काॅ. श्रीपाद अमृत डांगे कुटुंबियांचा सन्मान व जिल्हा प्रशासनाच्या वतीने मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन !

इमेज
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यसैनिक काॅ. श्रीपाद अमृत डांगे कुटुंबियांचा सन्मान व जिल्हा प्रशासनाच्या वतीने मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन !         नाशिक - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या वारसांचा नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे योगदान अनन्यसाधारण होते. ब्रिटिश काळात महाविद्यालयीन जीवनात विल्सन कॉलेजमध्ये असताना कॉम्रेड डांगे यांनी मराठी भाषा मंडळासाठी व पदवी अभ्यासक्रमात इंग्रजी व फ्रेंच भाषेसारखाच मराठी भाषेचा समावेश व्हावा यासाठी विद्यार्थ्यांचा संप घडवून आणला होता. भारताच्या कामगार चळवळीच