पोस्ट्स

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

इमेज
इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !  नाशिक ( प्रतिनिधी ) इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग व एअर कंडीशनींग इंजिनिअर्स (इशरे) या संस्थेच्या नाशिक शाखेचा नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचा पदग्रहण व शपथग्रहण समारंभ  शनिवारी (दि. २०) एप्रिल रोजी हाॅटेल ग्रॅन्ड रिओ येथे करण्यात आला. शपथग्रहण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुप बालानी, उपाध्यक्ष मिहीर संघवी, पश्चिम विभागीय व्यवस्थापक  मनीष गुलालकरी उपस्थित होते.     नवनिर्वाचित अध्यक्ष अशफाक कागदी, उपाध्यक्ष वरुण तिवारी, सचिव अनिकेत चौधरी, खजिनदार अनिता बोराडे व कार्यकारिणी सदस्य  गुलाम हुसेन, प्रविण कामाले, प्रविण पातुरकर, सारंग दिडमिशे, रोहिणी मराठे, शामसुंदर कापसे यांनी शपथ घेतली. संस्थेचे मावळते अध्यक्ष गोविंद नायर यांनी  २०२३ - २४ या वर्षातील संस्थेच्या कार्यक्रमांचा आढावा घेतला व विविध उपक्रमातील सहकार्याबद्दल मावळत्या संचालक मंडळाचे आभार मानले. नवनिर्वाचित अध्यक्ष अशफाक कागदी यांनी आगामी संकल्पित कार्यक्रमांची रूपरेषा विषद केली.       यावेळी इतर सोसायटीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची उपस्थ

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

इमेज
निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते ! लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार घ्यावी लागते शपथ नाशिक::- लोकसभा, राज्यसभा,  विधानसभा आणि विधानपरिषदेसाठी  निवडणूक लढविणा-या उमेदवारांना भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार त्यांचा उमेदवारी अर्ज म्हणजेच नामनिर्देशन पत्र दाखल करतांना भारताच्या संविधानावर माझा खरा विश्वास आणि निष्ठा असेल आणि आणि मी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखेल अशी शपथ किंवा प्रतिज्ञा घ्यावी लागते. ही शपथ आयोगाने निर्देशित केलेल्या व्यक्तींपुढेच घ्यावी लागते, ही माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास सर्वसाधारणपणे निवडणूक होणा-या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेपुढे अशी शपथ घेता येते. तसेच आयोगाचे निर्देशानुसार प्रथम वर्ग दंडाधिकारी, जिल्हा न्यायाधीश यांच्यापुढे देखील उमेदवारांना अशी शपथ घेता येते. नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी निवडणूक लढविणारा उमेदवार जर प्रतिबंधात्मक स्थानबद

अनंत कान्हेरे मैदान विकसित तरी समस्या कायम ! आयुक्तांना निवेदन !

इमेज
अनंत कान्हेरे मैदान विकसित तरी समस्या कायम ! आयुक्तांना निवेदन !            नासिक::- नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान कोट्यवधी रुपये निधी मंजूर होऊन खर्च करण्यात आला परंतु तिथे अद्यापही पूर्णपणे सुविधा जॉगर्स धारकांना मिळत नाहीत. पुर्वी ज्या समस्या होत्या त्या अजूनही जशाच्या तशा कायम आहेत. मैदान विकसीत होऊन समस्या मिटतील असे वाटत होते. परंतु त्या समस्या तत्पूकाळ सुटण्याऐवजी हळूहळू पूर्व पदावर येत आहेत मग मैदान विकसित करून मिळवले काय हा प्रश्न कायम आहे, आज मैदानात झाडांना पाणी मारले जात नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. हिरवळ तयार करून हिरवाईचा हिरवा रंग राहिला नाही, संध्याकाळी मैदानात वाहने येतात अन जातात  यावर कुठलेही निर्बंध नाही. मैदानात रात्री टवाळखोरांची मनसोक्त सोय होते, प्रेमीगुलांचा तर प्रेमाचे अड्डे निर्माण झाले आहेत. मग या मैदानाला सुसज्ज कसे म्हणता येईल. मैदान विकसित केले तरी मैदानाची देखभाल होत नाही. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मैदानाची अशी अवस्था असेल तर बाकीच्या मैदांनाचे काय ? या सर्व बाबीकडे प्रशासनाकडून लक्ष देण्यात यावे म्हणून मोरया ज

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड युके कडून उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर सन्मानित !

इमेज
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड युके कडून उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर सन्मानित !        छत्रपती संभाजीनगर::- येथील प्रथितयश लेखिका, प्रेरक व्याख्यात्या तथा उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांना रविवार दिनांक दहा मार्च रोजी शिर्डी येथे एका समारंभात लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् (युनायटेड किंगडम) या संस्थेचे अध्यक्ष संतोष शुक्ला यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र आणि पदक देऊन गौरविण्यात आले. समाजातील सर्व स्तरातून अंजली धानोरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !

इमेज
सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !        नासिक::-  दिनांक ७ मार्च २०२४ रोजी जिल्हा परिषद नाशिक मधील अनिल गीते व अनिल सानप यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी मधून सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली. तसेच वरिष्ठ सहाय्यक श्रीमती छाया सोनवणे, राजेंद्र येवला, धनराज पवार, दिलीप पाटील, विलास ननावरे, मंगेश चव्हाण, ओम प्रकाश पाटोळे, किरण माळवे, चंद्रकांत पगारे यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली. गजेंद्र घाडगे व जीवन पारधी यांना कनिष्ठ सहाय्यक पदावरून वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यात आली.       पदोन्नती चार प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता आज हा प्रश्न मार्गी लागल्याने लिपिक वर्गीय कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले. सदरच्या पदोन्नती पारदर्शकपणे राबविल्याने व कर्मचाऱ्यांची गैरसोय न झाल्याने कर्मचारी यांनी समाधान व्यक्त करत परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्रीमती वर्षा फडोळ, मुख्य

सार्वजनिक आरोग्य विभागाची १९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान विशेषमोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम, पंधरवड्यात १ लाख शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट !

इमेज
सार्वजनिक आरोग्य विभागाची १९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम पंधरवड्यात १ लाख     शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट               मुंबई  :    राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षिणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत दि. १९ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२४ दरम्यान राज्यभरात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे.    या कालावधीत १ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.    शासकीय रुग्णालय ,  मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्था रुग्णालय येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा ,  असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.           या मोहिमेंतर्गत १ लाख शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हानिहाय नियोजन केले असून संबंधित आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्र शासनामार्फत  ‘ राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान ’  ही विशेष मोहीम जून , २०२२  पासून राबविण्या

प्रेरणादायी गोष्टींमधून विशेष बालकांनी अनुभवले छत्रपती शिवाजी महाराज !

इमेज
प्रेरणादायी गोष्टींमधून विशेष बालकांनी  अनुभवले छत्रपती शिवाजी महाराज !         नाशिक ( प्रतिनिधी ) निरागस विशेष  बालकांनी शिवचरित्र समजून घेत स्वराज्य संस्थापक शिवरायांच्या गोष्टींमधून नवे स्वप्न बघितले. स्वतःतील न्यूनगंड दूर करून प्रगती करण्याची प्रेरणा घेतली. प्रेरणादायी गोष्टींमधून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज अनुभवले.     रायझिंग चाईल्ड डेव्हलपमेंट अँड लर्निंग सेंटरतर्फे आज ( दि. १८ ) शिवजयंतीच्या औचित्याने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गतीमंद विशेष बालकांच्या या प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका मोनिका गोडबोले - यशोद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या छोट्या प्रेरक कथा सांगितल्या. मुलांनी मावळ्यांचा वेष परिधान करून शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला.‌ शिवरायांचा‌ जयजयकार केला. मुलांनी कुतुहलाने अनेक प्रश्न विचारले. त्यांची समर्पक उत्तरे मिळाल्याने त्यांचे समाधान झाले. यावेळी अनुष्का यशोद, ऋतुजा ढोरे, लीना काळे, मयूर कारंडे यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. पालकांनीही सहभाग नोंदवला.