पोस्ट्स

जिल्ह्यातील ७५ आरोग्य संस्थांमध्ये गरोदर मातांना आरोग्य सेवा देऊन आरोग्य विभाग साजरा करणार आजादीका अमृत महोत्सव !

इमेज
  जिल्ह्यातील ७५ आरोग्य संस्थांमध्ये गरोदर मातांना आरोग्य सेवा देऊन आरोग्य विभाग साजरा करणार आजादीका अमृत महोत्सव !     नासिक (प्रतिनिधी)::- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वस्थ भारत चे स्वप्न साकार करण्यासाठी जि. प. आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय नाशिक, स्त्री रुग्णालय मालेगाव, ३२ ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे १३ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांच्या संकल्पने नुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांच्या प्रमुख मार्गदर्शनानुसार जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचे सनियंत्रणाखाली विशेष गरोदर माता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील गरोदर मातांचे आरोग्य चांगले राहावे. गरोदरपणामध्ये विशेष स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांकडून त्यांची तपासणी व्हावी तसेच त्यांना औषधोपचार, आहार सल्ला, बालकाची काळजी याविषयी मार्गदर्शन मिळावे तसेच जोखमीच्या मातांचे प्रमाण कमी करणे, माता व बालक मृत्यू कमी करण्यासाठी आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्ग

डॉ. ज्योती विनायक मेटे अस्थी विसर्जनासाठी नाशिकला येणार - अमित जाधव

इमेज
डॉ. ज्योती विनायक मेटे अस्थी विसर्जनासाठी  नाशिकला येणार - अमित जाधव   : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय आमदार विनायकराव मेटे यांचे ऑगस्ट मध्ये मुंबई येथे राज्य सरकारने आयोजित केलेल्या मराठा आरक्षण बैठकीसाठी मुंबईच्या दिशेने जात असतांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर  पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झाले आणि सर्व महाराष्ट्र राज्यातील शिवसंग्राम कार्यकर्ते व मराठा समाज बांधव पोरका झाला. नाशिक जिल्ह्यात २२ ऑगस्टला स्वर्गीय आमदार विनायक मेटे यांचा अस्थी कलश नाशिक येथे आला व नाशिक जिल्ह्यात अनेक गावात ही कलश यात्रा अस्थी दर्शनासाठी गेली परंतु अस्थिंचे विसर्जन हे बाकी असल्याने ते रविवारी १० सप्टेंबर ला डॉ. ज्योती विनायक मेटे यांच्या उपस्थितीत होणार आहे डॉ. ज्योती मेटे या नाशिक येथे सहनिबंधक या पदावर कार्यरत आहे त्यामुळे त्यांना सांत्वनास्पद भेटण्यासाठी अनेक लोक इच्छुक आहेत. यासाठी मेटे यांचे निकटवर्तीय व शिव संग्रामचे जिल्ह्याचे नेते अमित जाधव यांच्या पिंपळगाव खांब च्या निवास्थानी शनिवारी वारी सकाळी ८ ते १० या वेळेत ज्योती ताई या लोकांना भेटणार आहे व त्यानंतर १० वाजता पिंपळगाव खांब येथू

शिक्षकांचे न्यायालयीन प्रश्न सोडविण्याचे ऍड.. अप्पासाहेब देसाई ह्यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण पुरस्कार प्रदान !

इमेज
शिक्षकांचे न्यायालयीन प्रश्न सोडविण्याचे ऍड.. अप्पासाहेब देसाई ह्यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण पुरस्कार प्रदान !       मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पालिकेच्या शाळा बंद पडण्याची कारणे शोधताना त्यावर उपाय म्हणून पालक आणि मुलांनी एकत्र येऊन पुढाकार घेतला पाहिजे परंतु त्यापेक्षाही शासनाने सरकारी आणि खासगी शाळा नीट चालल्या पाहिजेत, ह्यासाठी आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे, नियम आणि धोरणात शिथिलता आणली पाहिजे, असे विचार सुप्रसिद्ध विधिज्ञ आणि वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे जनरल सेक्रेटरी ऍड. आप्पासाहेब देसाई यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केले. महापालिका माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात त्याचे वितरण शिक्षक दिनी करण्यात आले. ह्यापूर्वी हे पुरस्कार प्रकाशभाई मोहाडीकर,  सरोज पाटील आदींना देण्यात आले आहेत.           शिक्षकांचे न्यायालयीन प्रश्न सोडविणारे सुप्रसिद्ध विधिज्ञ तसेच वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे जनरल सेक्रेटरी ऍड. आप्पासाहेब देसाई यांनी गेल्या अनेक दशकांपासून शिक्षण क्षेत्रात अविरत कार्य केले आहे. वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या शिक्षण संकु

अन त्यांनी कथन केला 'आदर्श' प्रवास ! जि. प. आदर्श शिक्षकांचे अनुभव कथन !!

इमेज
अन त्यांनी कथन केला 'आदर्श' प्रवास  ! जि. प. आदर्श शिक्षकांचे अनुभव कथन !!        नाशिक - शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात २०२१-२२ वर्षाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी संवाद साधला. यावेळी शिक्षकांनी स्वतः केलेल्या उपक्रमांबद्दल माहिती देत शालेय जीवनातील अनुभवांचे कथन केले. जिल्ह्यातील एक मुख्याध्यापक, नऊ शिक्षक आणि पाच शिक्षिका अशा १५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले, या शिक्षकांशी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी संवाद साधत त्यांनी केलेल्या उपक्रमांची माहिती घेतली यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाना पुस्तक भेट देत पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले, गेल्यावर्षी कोविड काळात अध्यापन करताना शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला या अडचणींवर मात करत शिक्षकानी अध्ययनाचे काम सुरु ठेवले. यामध्ये काही शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून  विद्यार्थ्यांना शिकवले तर दुर्गम आदिवासी भागात ज्या ठिकाणी अध्यापनाला तंत्रज्ञानाची जोड देता येत ना

नवनवीन जीवनकौशल्ये आत्मसात करून व्यक्तिमत्त्व विकास घडवावा - समीर भुजबळ

इमेज
नवनवीन जीवनकौशल्ये आत्मसात करून व्यक्तिमत्त्व विकास घडवावा - समीर भुजबळ  तीन दिवसीय कार्यशाळेचा उत्साहात समारोप    नाशिक ( प्रतिनिधी ) - विद्यार्थ्यांनी जगाच्या पाठीवर नवीन काय घडतंय हे जाणून घेतले पाहिजे. नवनवीन जीवनकौशल्ये शिकून आत्मसात केली पाहिजेत. त्यातूनच व्यक्तिमत्त्व विकास होतो. सर्वांगीण जीवन समृद्ध होते असे प्रतिपादन भुजबळ नॉलेज सिटीच्या मेट स्कूल आर्किटेक्चर आणि इंटेरियर डिझाईनचे विश्वस्त समीर भुजबळ यांनी केले. सात यशस्वी कार्यशाळांच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.      संस्थेच्या वतीने गोवर्धन कॅम्पस येथे  दि. १ ते ३ सप्टेंबर २०२२ दरम्यान " आर्ट अँड क्राफ्ट  कार्यशाळांचे  आयोजन करण्यात आले. त्यात चित्रपट निर्मिती, नाट्याविष्कार, डिझाइन थिंकिंग, विणकाम, पॉटरी, बांबू रचना,  लाकडावरील कोरीवकाम व प्रिंट यांचा समावेश होता.काल त्याचा समारोप झाला. यावेळी विश्वस्त समीर भुजबळ, ट्रस्टच्या संचालिका शेफाली भुजबळ, इन्स्टिट्यूटचे संचालक वास्तुविशारद भालचंद्र चावरे, प्राचार्या कृष्णा राठी तसेच अक्षता मोकाशी, योगेश कांबळे , आर्कि. श्रेयांक खेमलापुरे व आर्कि. अजय सोनार, अक्षय इंदलकर, अ

२३ वे ग्रामीण साहित्य संमेलन नाशिक मध्ये ! आयोजकांकडून संमेलनाची रुपरेषा जाहीर !!

इमेज
२३ वे ग्रामीण साहित्य संमेलन नाशिक मध्ये ! वाडीव-हे ::- इगतपुरी तालुका साहित्य मंडळाचे २३ वे ग्रामीण साहित्य संमेलन ५ व ६ नोव्हेंबर २०२२ मध्ये नाशिक येथे होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा जेष्ठ ग्रामीण साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली आहे.         हे दोनदिवसीय साहित्य संमेलन नाशिक येथील मानवधन सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या पाथर्डी फाटा येथील शैक्षणिक प्रांगणात आयोजित करण्यात येणार आहे.हे दोन दिवशीय साहित्य संमेलन सहा सत्रात संपन्न होणार असून ग्रंथ दिंडी, उद्घाटन सोहळा, निमंत्रितांचे कवी संमेलन, व्याख्यान, परिसंवाद, पुरस्कार वितरण, कथा कथन, खुले कवी संमेलन असा भरगच्च कार्यकम होणार असून सहित्यिकांनी या साहित्य संमेलनात अवश्य सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.       या अगोदर इगतपुरी तालुका साहित्य मंडळाने २२ ग्रामीण साहित्य संमेलन इगतपुरी तालुक्यातील विविध भागात भरवून अनेक नव सहित्यिकांना प्रेरणा देणारे ठरले आहे, यातून प्रेरणा घेवून अनेक साहित्यिक महाराष्ट्रात साहित्याची परंपरा जोपसत आहे. या साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील अनेक मान्यवर सहित्यिकांचा सहभाग असत

अंमलबजावणी व गुणवत्तेबद्दल केंद्रस्तरीय पथकाकडून जिल्ह्यातील गावांना भेटी !

इमेज
जलजीवन मिशन अंतर्गत केंद्रस्तरीय पथकाकडून जिल्हयातील गावांना भेटी ! ‍नाशिक- जल जीवन मिशन अंतर्गत अंमलबजावणी व गुणवत्तेबद्दल केंद्रस्तरीय पथकाकडून नाशिक जिल्हयातील ७ गावांची पाहणी करण्यात आली. या भेटीत गावातील कुटुंबस्तरावरील नळजोडणी, पाणीपुरवठा योजना, पाणी गुणवत्ता या बाबत पडताळणी करण्यात आली. दरम्यान, चांदवड तालुक्यातील सुतारखेडे गावातील कामांबाबत पथकाने समाधान व्यक्त करत कौतूक केले. देशातील प्रत्येक कुटुंबाला घरगुती स्तरावर नळाव्दारे नियमित, शुध्द व ५५ लिटर प्रतिमाणसी पाणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाने जल जीवन मिशनची सुरुवात केलेली आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक महसुली गावातील १०० टक्के कुटुंबांना नळ जोडणी देऊन ५५ लिटर प्रतिमाणसी शुध्द व शाश्वत पाणी पुरवठा करावयाचा आहे. तसेच गावातील सर्व शाळा, अंगणवाडी, संस्था, सार्वजनिक ठिकाण यांना नळाव्दारे पाणी पुरवठा करावयाचा आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांचे काम सुरु आहे.  जलजीवन मिशन योजनेची अंमलबजावाणी कशाप्रकारे करण्यात येत आहे. याब