पोस्ट्स

सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन !

इमेज
सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन !                 नासिक::-  दि.३१ आक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त ग्रामपंचायत पिंप्री सय्यद ता.व जि. नाशिक येथे एकता दौड कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंद पिंगळे,  उपमुकाअ (ग्रापं) रविंद्र परदेशी, तसेच गटस्थरावरील सर्व खातेप्रमुख  मा.सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामस्थ, माध्यमिक शाळेतील विध्यार्थी, गांवपातळीवरील सर्व कर्मचारी  सहभागी होते, कार्यक्रम प्रसंगी ४ किमी. एकता दौड करण्यात आली, सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल यांनी प्रतीमा पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व एकात्मतेची शपथ घेण्यात आली, तसेच ग्रामस्थांच्या एकजुटी बाबत व सर्वधर्म समभाव बाबत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी आशीमा मित्तल यांनी समाधान व्यक्त केले.

प्रशासकीय यंत्रणांनी जनसहभागातून‘चला जाणुया नदीला’ अभियान यशस्वी करावे- जिल्हाधिकारी

इमेज
प्रशासकीय यंत्रणांनी जनसहभागातून ‘चला जाणुया नदीला’ अभियान यशस्वी करावे- जिल्हाधिकारी गंगाथरन डी.          नाशिक (जिमाका वृत्तसेवा)::-   नद्या बाबत जनसामान्यांशी संवाद, समन्वय, नद्यां बाबतची माहिती जाणून घेण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या औचित्याने 'चला जाणुया नदीला' अभियान शासनाने हाती घेतले आहे. जिल्ह्यातील सर्व संबधीत प्रशासकीय यंत्रणांनी जनसहभागातून हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.  ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या चला जाणुया नदीला या अभियानासाठी गठित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत  बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, राज्यस्तरीय समितीचे अशासकीय सदस्य राजेश पंडित, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे दिंडोरी उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी,  इगतपुरी -त्र्यंबकेश्वर उप विभागीय अधिकारी तेजस चव्हाण, बालगाण उपविभागीय अधिकारी  बबन काकडे, मालेगाव उपविभागीय अ

आयबीटी इंटरनॅशनल ब्युटी अकॅडमीच्या वतीने आज ‘फॅशन शास्त्र 2022’ चे आयोजन !

इमेज
आयबीटी इंटरनॅशनल ब्युटी अकॅडमीच्या वतीने आज ‘फॅशन शास्त्र 2022’ चे आयोजन !  त्र्यंबकरोड वरील ग्रेप कौंटीच्या टर्फवर सायंकाळी रंगणार कार्यक्रम !!        नाशिक : सौंदर्य शास्त्राशी निगडीत आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाची कवाडे नाशिककरांसाठी खुली करून देणाऱ्या आयबीटी इंटरनॅशनल ब्युटी अकॅडमीच्या वतीने रविवारी (दि. ३०) ‘फॅशन शास्त्र 2022’ या मेगा इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. त्र्यंबकरोड वरील ग्रेप कौंटीच्या टर्फवर सायंकाळी रंगणाऱ्या या इव्हेंटच्या मोफत प्रवेशिका फॅशन प्रेमींसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.          यासंदर्भात माहिती देताना अकॅडमीच्या संस्थापिका तथा व्यवस्थापकीय संचालिका भाग्यश्री धर्माधिकारी यांनी सांगितले, ‘फॅशन शास्त्र 2022’ कार्यक्रमाचे औचित्य साधून १२० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. अप्सरा या थीमवर आधारित फॅशन शो उपस्थितांना स्वर्गीय सौंदर्याच्या मॉडेल्सचे दर्शन घडवेल. यानिमित्त प्रथमच नाशिककरांना वैविध्यपूर्ण सौंदर्यवतींचे पदलालित्य अनुभवयास मिळणार आहे. याप्रसंगी मराठी, मुस्लीम, राजवाडी, बंगाली, क्याथलिक, दाक्षिणात्य, मणिपुरी आदी श्रेणींतील ब्रायडल ल

'सुपर ५०' विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे !

इमेज
 'सुपर ५०' विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे ! अनुसूचित जाती जमाती विद्यार्थ्यांना मिळणार CET/JEE चे धडे       नाशिक ::- जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद नाशिक कडून 'सुपर ५०' उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये अनुसूचित जाती / जमाती या प्रवर्गातील सन २०२२-२३ मध्ये इयत्ता ११ वी विज्ञान शाखेतील अनुदानित, अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळेतील प्रवेशीत विद्यार्थ्यांकरीता निवासी स्वरुपात नियमित अभ्यासक्रमाबरोबर सीईटी, जेईई  (CET/JEE) या पात्रता परीक्षेकरीता ५० विद्यार्थ्यांची परीक्षेद्वारे निवड करण्यात येऊन या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यातून यासाठी एक पात्रता परीक्षा घेण्यात येणार असून यामधील ५० विद्यार्थ्यांची निवड ही 'सुपर ५०' उपक्रमांतर्गत करण्यात येणार आहे. यासाठीच्या पूर्व परीक्षेला बसण्यासाठी विद्य

अजय कुमावत यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर !

इमेज
अजय कुमावत यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर !      लासलगाव::- येथील द्रोनागिरी आयुर्वेदालय चे संचालक अजय व्ही. कुमावत यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कारजाहीर करण्यात आला. कुमावत यांनी मागील पंधरा वर्षापासून सतत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल साई आधार सोशल हेल्थ फाउंडेशन नाशिक यांनी घेत पुरस्कारांची घोषणा केली. फाउंडेशन च्या वतीने शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रत्नांचा सन्मान सोहळा २०२२ लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. कुमावत यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल त्यांचे लासलगाव परिसरातील सर्व राजकीय क्षेत्र, व्यापारी बंधू, मित्रपरिवार व कुमावत समाजाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे, द्रोणागिरी आयुर्वेदालय च्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळा गोर गरीब बांधवांना मोफत आयुर्वेदिक औषधांचे व जडीबुटीचे वाटप करणे, अनाथ आश्रमामध्ये वेळोवेळी अन्नदानाचे उपक्रम व धार्मिक संस्थांना मोफत पूजेचे साहित्याचे वाटप करून विविध उपक्रम वेळोवेळी राबविले आहेत. अजय कुमावत हे सेवानिवृत्त गटविकास अधिकारी व्ही. टी. कुमावत य

जिल्ह्यातील गोठे आणि गोवर्गीय जनावरांच्या परिसराची एकाचवेळी स्वच्छता !वसुबारस : ग्रामपंचायतींकडून होणार गोठे, जनावरांचा वावर असलेला परिसर स्वच्छता !!

इमेज
जिल्ह्यातील गोठे आणि गोवर्गीय जनावरांच्या परिसराची एकाचवेळी स्वच्छता ! वसुबारस : ग्रामपंचायतींकडून होणार गोठे, जनावरांचा वावर असलेला परिसर स्वच्छता !!         नाशिक : नाशिक जिल्ह्यात जनावरांमधील लंपी आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यात सर्वत्र जनजागृतीपर कार्यक्रम आणि लसीकरण मोहीम यांसह प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील एकूण आठ लाख ९५ हजार पन्नास गोवर्गीय जनावरे असून यापैकी आठ लाख ४० हजार तीनशे ९३ जनावरांचे (९३.८८%) लसीकरण पूर्ण झाले आहे. जनावरांमधील लंपी हा आजार डास, कीटक, गोमाश्या, गोचिड यांच्या चाव्याने व बाधित जनावरांच्या प्रत्यक्ष संपर्काने होतो. त्यामुळे या आजाराच्या नियंत्रणासाठी गोठ्यांची साफसफाई, गोचिड, डास, बाह्य कीटकांचे निर्मूलन करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यावतीने देण्यात आले होते. यालाच अनुसरून जिल्हा पशुसंवर्धन विभागाने एक विशेष मोहीम हाती घेतली असून दिवाळीपूर्वी वसुबारस सणाच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी गोठे, जनावरांचा वावर असलेला परिसर हा स्वच्छ आणि न

स्वराज्य मिळालं असलं तरी त्याचं सुराज्य करणं हाच आपल्या गणेशोत्सवाचा संकल्प असला पाहिजे - सांस्कृतिक मंत्री

इमेज
स्वराज्य मिळालं असलं तरी त्याचं सुराज्य करणं हाच आपल्या गणेशोत्सवाचा संकल्प असला पाहिजे - सांस्कृतिक मंत्री         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार २०२२' या  स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मंगळवार १८ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वा. रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला.  या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय,  सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव श्रीमती विद्या वाघमारे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे उपस्थित होते. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय स्पर्धेत विजयी मंडळाना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.          पर्यावरणपूरक मूर्ती,  पर्यावरणपूरक सजावट, सामाजिक संदेश देणारे, सामाजिक उपक्रम, समाज प्रबोधन, विकासाभिमुख देखावे, ध्वनी प्रदूषण रहित वातावरण, रक्तदान शिबीर तसेच वैद्यकीय शिबिर इत्यादींचे आयोजन, म