पोस्ट्स

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

इमेज
आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशी कोणताही संबंध नाही - दातार         नाशिक ( प्रतिनिधी ) - त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तुपादेवी फाट्याजवळ असलेल्या आधारतीर्थ आश्रमात एका बालकाचा संशयास्पद मृत्यू झाला. काल ( दि.२३)भ विविध वृत्तपत्रात हे वृत्त प्रसिद्ध झाले. नाशिकमध्ये आधाराश्रम ही संस्था घारपुरे घाट, अशोकस्तंभ येथे गेली ६८ वर्षे निराधार बालकांचे संगोपन, पुनर्वसन करते. या संस्थेचा संबंधित वृत्ताशी कोणताही संबंध नाही असे संस्थेचे अध्यक्ष विजय दातार यांनी सांगितले.    आधाराश्रमाचे सचिव सुनीता परांजपे व हेमंत पाठक म्हणाले,  सुप्रसिद्ध वैद्य आण्णाशास्त्री दातार यांनी १९५४ साली या संस्थेची स्थापना केली. अधिकृतपणे बालके दत्तक देणारी आधाराश्रम ही नाशिक जिल्ह्यातील एकमेव सरकारमान्य संस्था आहे. सदर बातमीतील नामसाधर्म्यामुळे बऱ्याच हितचिंतक यांचे फोन आल्यामुळे व जनतेचा कोणताही गैरसमज होऊ नये यासाठी आम्ही हा खुलासा करीत आहोत. यापूर्वी काहीवेळा आधाराश्रम ही आमचीच संलग्न संस्था असल्याचा खोटा प्रचार काही सस्थांनी केला होता, हे देखील  निदर्शनास आले होते असे पाठक यांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बालक-पालकांना दिलासा !

इमेज
आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बालक-पालकांना दिलासा !   दि.१ ते ३० नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून घोषित करण्यात आला आहे. निराधार बालक आणि अपत्यासाठी आसुसलेले पालक या दोन टोकांना दत्तक विधान एकत्र आणते. मात्र या क्षेत्रात अपप्रवृत्ती शिरल्याने आर्थिक देवाणघेवाण होऊन फसवणूक देखील केली जाते. बेकायदेशीर दत्तक प्रकरणे घडतात. नाशिकमध्ये आधाराश्रम ही सेवाभावी संस्था समाजाने नाकारलेल्या निरागस बालकांचे संगोपन करते. त्यांचे शैक्षणिक, मानसिक पालनपोषण करते. आरोग्याची काळजी घेते. अधिकृत दत्तक प्रक्रिया राबवून बालकांना हक्काचे पालक, कुटुंब मिळवून देते. आतापर्यंत सुमारे ९५० पेक्षा जास्त बालके देश-परदेशात दत्तक देण्यात आली आहेत.    रस्त्यावर टाकून दिलेल्या बेवारस बालकांनाही इतरांसारखे आपल्याला आईबाबा असावेत, आपले घर असावे असे वाटते. प्रेम करणारी, हक्काची माणसे आजूबाजूला असावीत अशी सर्वसाधारण मुलांप्रमाणेच अनाथ बालकांचीही  साहजिक इच्छा असते. दुसरीकडे चारचौघांप्रमाणे आपल्याही संसारवेलीवर बाळाच्या रूपाने  फूल फुलावे, आपला वंश पुढे सुरु राहावा असे अपत्य नसलेल्या जोडप्यांचे स्वप्न असते. या दोन्

कर्मचारी बँक- सरकारी कर्मचारी यांची आधारवड-

इमेज
कर्मचारी बँक- सरकारी कर्मचारी यांची आधारवड-        नाशिक मधील राज्य सरकारी व जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी यांची नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी ही बँक आधारवड म्हणून ओळखली जाते. स्वातंत्र्यप्राप्ती पूर्वी दिनांक २२ सप्टेंबर १९२० रोजी दिंडोरी येथे कै.माधवराव रामचंद्र तथा एम. आर. देशपांडे साहेब यांनी या बँकेची स्थापना केली. सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीसाठी तात्काळ मदत व्हावी आणि त्याचबरोबर त्यांना बचतीची देखील सवय लागावी या दूरदृष्टी विचाराने व उदात्त हेतूने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या बँकेची त्यावेळी स्थापना करण्यात आली.    आज बँकेला १०२ वर्षे पूर्ण होऊन १०३ व्या वर्षात बँकेने पदार्पण केलेलं आहे. या १०२ वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासात बँकेने अनेक चढउतार बघितलेले आहे, आणि अनेक संकटाशी देखील सामना करावा लागला आहे, हे जरी खरी असले तरी त्या त्या वेळी कार्यरत प्रामाणिक संचालक आणि पदाधिकारी यांची बँके प्रति असणारी निष्ठा, सन्माननीय सभासदांचा बँकेवर असणारा अतूट विश्वास आणि त्याचबरोबर बँकेची एक निष्ठेने सेवा करीत असणारे माजी व विद्यमान सेवक वर्ग यांचे योगदान निश्चितच मोजण्या

हमारे बाद हाल-ए-गम सुनाने कौन आएगा…?हंसाने तो सब आएंगे मगर हाल-ए-दर्द सुनानेवाला कौन आएगा ? खुलासे अधुरेच राहतात आणि निघायची वेळ होते…. रणजित राजपूत.

इमेज
खुलासे अधुरेच राहतात आणि निघायची वेळ होते… आदरणीय…          गेल्या ३२ महिन्यांपासून मी नाशिक चा जिल्हा माहिती अधिकारी म्हणून आपल्या सोबत होतो. आज मी या पदाची सूत्रे माझ्या ज्युनियर सहकारी श्रीमती अर्चना देशमुख मॅडम यांच्याकडे सोपवून नंदुरबार येथे जिल्हा माहिती अधिकारी पदावर रूजू होणार आहे.            ऐन कोरोनाच्या पहिल्या लाटेत १३ मार्च २०२० रोजी मी जिल्हा माहिती अधिकारी, नाशिकची सुत्र स्वीकारली. तेव्हापासून आजतागायत जवळ जवळ २४ तास सोबत राहिलो. माझ्या नाशिकच्या पोस्टींगची २ वर्षे कोरोनासोबत गेली. विशेष म्हणजे कोरोना काळातील सर्व बातम्यांना आम्ही *C* ने क्रमांकाने सुरूवात केली. भविष्यात या बातम्यांच्या C क्रमांकाने आपण कधीही कोरोना काळातील संदर्भ म्हणून उपयोगात आणू शकाल. विशेष म्हणजे या सर्व काळातील वृत्तपत्रीय बातम्यांच्या कात्रणांचे डिजिटल संकलन ही एक मोठी उपलब्धी जिल्हा माहिती कार्यालयात भविष्यात सर्वांसाठी असेल. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा काळ आश्वासकपणे पार पाडू शकलो. असेच सहकार्य आपण भविष्यात श्रीमती देशमुख मॅडम व माझ्या सहकाऱ्यांना देत रहावे, विनंती.            जिल्हा माहिती

जिल्हा परिषद "ग्रामविकासाची शाळा" या पुस्तकाची राष्ट्रीय विक्रम म्हणुन नोंद !

इमेज
जिल्हा परिषद "ग्रामविकासाची शाळा" या पुस्तकाची राष्ट्रीय विक्रम म्हणुन नोंद !       नाशिक (प्रतिनिधी)::- जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभांचे पंचवार्षिक इतिवृत्त पुस्तक रुपात प्रसिद्ध करण्याची संकल्पना नाशिक जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागात मुख्य औषध निर्माण अधिकारी म्हणुन कार्यरत असणारे जी.पी. खैरनार यांनी तात्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती पत्राद्वारे केली होती. नाशिक जिल्हा परिषदेने या वैविध्यपूर्ण उपक्रमास नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नियमित विषय घेऊन अभिनंदनासह मान्यता दिली होती. नाशिक जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संपादकीय जबाबदारी घेऊन नाशिक जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त उपलब्ध करुन दिले होते. जी. पी.खैरनार यांनी सदर इतिवृत्त संकलित करुन जिल्हा परिषद नाशिक "ग्रामविकासाची शाळा" हे शीर्षक घेऊन पुस्तकाची बांधणी केली होती. प्रस्तुत पुस्तकाचे प्रकाशन नाशिक जिल्हा परिषदेने नाशिक जिल्हा परिषदेच्या दिनांक २८ फेब्रुवारी, २०२२ च्या सर्वसाधारण सभेत केले होते. ना

मंगळवारी जनजाती गौरव दिनी अभिवादन कार्यक्रम, प्रतिमापूजन आणि व्याख्यान !

इमेज
मंगळवारी जनजाती गौरव दिनी अभिवादन कार्यक्रम, प्रतिमापूजन आणि व्याख्यान !       नाशिक ( प्रतिनिधी )- मंगळवारी ( दि.१५ ) रोजी जनजाती क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिन हा जनजाती गौरव दिन म्हणून साजरा होणार आहे. या निमित्त जनजाती कल्याण आश्रमाच्या नाशिक शाखेतर्फेही अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता कल्याण आश्रमाच्या कृषी कॉलनी, कॉलेज रोड येथील मुख्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन, प्रतिमापूजन व प्रा. डॉ. बाळासाहेब घुटे यांचे व्याख्यान  होणार असल्याची माहिती आश्रमाचे प्रांत सचिव शरद शेळके आणि उपाध्यक्ष व नामवंत धावपटू कविता राऊत यांनी दिली.          वनवासी कल्याण आश्रमाच्या पाठपुराव्यामुळे गेल्या दीड दशकापासून दि. १५ नोव्हेंबर हा दिवस जनजाती गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. वनवासी कल्याण आश्रम जनजातींच्या सेवेत सन् १९५२ पासून आहे. या संस्थेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविले जातात. याचा आढावाही  सचिव शेळके यांनी मांडला. शेळके म्हणाले, सद्यस्थितीत आश्रमाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात २९

जनजाती गौरव दिनीअभिवादन कार्यक्रमप्रतिमापूजन आणि व्याख्यान !

इमेज
जनजाती गौरव दिनी अभिवादन कार्यक्रम प्रतिमापूजन आणि व्याख्यान !       नाशिक ( प्रतिनिधी )- मंगळवारी (दि.१५) रोजी जनजाती क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिन हा जनजाती गौरव दिन म्हणून साजरा होणार आहे. या निमित्त जनजाती कल्याण आश्रमाच्या नाशिक शाखेतर्फेही अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता कल्याण आश्रमाच्या कृषी कॉलनी, कॉलेज रोड येथील मुख्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन, प्रतिमापूजन व प्रा. डॉ. बाळासाहेब घुटे यांचे व्याख्यान  होणार असल्याची माहिती आश्रमाचे प्रांत सचिव शरद शेळके आणि उपाध्यक्ष व नामवंत धावपटू कविता राऊत यांनी दिली.          वनवासी कल्याण आश्रमाच्या पाठपुराव्यामुळे गेल्या दीड दशकापासून दि. १५ नोव्हेंबर हा दिवस जनजाती गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. वनवासी कल्याण आश्रम जनजातींच्या सेवेत सन् १९५२ पासून आहे. या संस्थेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविले जातात. याचा आढावाही  सचिव शेळके यांनी मांडला. शेळके म्हणाले, सद्यस्थितीत आश्रमाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात २९ शैक्षणिक प्