पोस्ट्स

राज्याच्या शाश्वत विकासात पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री

इमेज
राज्याच्या शाश्वत विकासात पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री मुंबई ::- पत्रकारांचे काम केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.         आज पत्रकार दिनानिमित्त मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे अप्रतिम मीडिया न्यूज नेटवर्कने आयोजित केलेल्या चौथा स्तंभ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, मुख्यमंत्री कार्यालयाच्या पायाभूत सुविधा कक्षाचे महासंचालक राधेश्याम मोपलवार, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, मंत्रालय विधिमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, सिने अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश देसाई, विवेक देशपांडे, रंजीत कक्कड आणि अप्रतिम मीडियाचे संचालक डॉ. अनिल फळे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.         मुख्यमंत्री म्हणाले की, बदलत्या तंत्रज्ञानाची नोंद घेऊन पत्रकारांनी वाटचाल केली पाहिजे. राज्य शासनही पत्रकारांसाठी वैद्यकीय सह

आजपासून 'युन्योया’ महोत्सव ! वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कडून ६ ते २१ जानेवारी दरम्यान आयोजन !!

इमेज
आजपासून 'युन्योया’ महोत्सव ! वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कडून ६ ते २१ जानेवारी दरम्यान आयोजन !!           मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)::- आंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आकर्षण असलेल्या 'युन्योया’ महोत्सवाचे शानदार आयोजन ६ ते २१ जानेवारी २०२३ या कालावधीत वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या मनोहर फाळके कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव म्हणजे सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक या क्षेत्रात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सर्वार्थाने पर्वणी ठरणार आहे. तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी ही मोठी पर्वणी राहिल, असा विश्वास आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.  आंतरमहाविद्यालयीन संगीत, नृत्य, फॅशन, क्रीडा, प्रश्नमंजुषा, सामान्य ज्ञान, व्याख्याने असे या महोत्सवाचे स्वरुप आहे. त्यासाठी अनेक पारितोषिकेदेखील दिली जाणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांना यासाठी निमंत्रित केले आहे. वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार काटकर, सरचिटणीस अॅड. आप्पासाहेब देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव शीव येथील संस्थेच्या संकुलात होत आहे. यासाठी सोहम शिंदे, भूमिका सै

मराठा विद्यालयाची आदिती शिरोडे प्रथम क्रमांकावर !

इमेज
मराठा विद्यालयाची आदिती शिरोडे प्रथम क्रमांकावर !    नासिक::- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या ३१ जुलै २०२२ च्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा काल जाहीर झालेल्या आठवी स्काॅलरशिप (शिष्यवृत्ती) परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसार कु. आदिती उदय शिरोडे हिने मराठा विद्यालयातून प्रथम तर  नाशिक जिल्ह्यातून पाचवा, नाशिक मनपा क्षेत्रातून तिसरा क्रमांक मिळवला. याबद्दल तिचे सर्व थरांतून अभिनंदन करण्यात येत.

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावा- मुख्य कार्यकारी अधिकारी !

इमेज
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावा- मुख्य कार्यकारी अधिकारी !         नाशिक : देशातील प्रतिभावंत आणि हुशार विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण देण्यासाठी १९८६ सालच्या शैक्षणिक धोरणामध्ये नवोदय विद्यालय स्थापनेची तरतूद करण्यात आली, या जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पात्रता परीक्षेची आयोजन हे दरवर्षी करण्यात येते. यावर्षी देखील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालयासाठी घेतल्या जाणाऱ्या पात्रता परीक्षेसाठी जास्तीत जास्त संख्येने फॉर्म भरावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.          जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी ३१ जानेवारी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत याबत माहिती पोहचवण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला दिले आहेत. जे विद्यार्थी, विद्यार्थिनी २०२२-२३ या शैक्षणिक सत्रामध्ये इयत्ता पाचवी मध्ये शिकत आहे, ज्यांची

६ जानेवारी रोजी होणार सह आयुक्त लिखित 'गोष्टीपलीकडचे महाभारत' चे प्रकाशन !

इमेज
६ जानेवारी रोजी होणार सह आयुक्त लिखित 'गोष्टीपलीकडचे महाभारत' चे प्रकाशन !        मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भरारी प्रकाशन आणि कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाती काळे (सहआयुक्त, वस्तू आणि सेवा कर विभाग, मुंबई) लिखित 'गोष्टीपलीकडचे महाभारत' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि 'विश्वातील १० आदर्श शिक्षिका' या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता मिनी थिएटर, (रवींद्र नाट्यमंदिर), तिसरा मजला, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. 'गोष्टीपलीकडचे महाभारत' या स्वाती काळे लिखित पुस्तकाचे प्रकाशन शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तसेच मुंबई शहर व कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रसिद्ध लेखक व साहित्यिक डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, धर्मशास्त्र, पुराभिलेख विद्या, भारतीय स्त्रीवाद व सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासक डॉ. प्राची अमोघ मोघे, लोकसाहित्य व लोककला अभ्यासक प्राध्यापक डॉ. प्रकाश खांडगे, कोकण मराठी साहित्य पर

प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याचे सरासरी वार्षिक उत्पन्न तब्बल पाच कोटींच्या आसपास !

इमेज
प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याचे सरासरी वार्षिक उत्पन्न तब्बल पाच कोटींच्या आसपास !       सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या युडायसवर सही करण्यासाठी एका शिक्षण संस्था चालकाकडे ५० हजार रुपयांची मागणी केली असता २५ हजार रुपये तडजोडी अंती ठरलेली रक्कम स्विकारताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने पकडण्यात आले होते, या प्रकरणाची चौकशी सुरू असताना काही बाबी समोर आल्या. या शिक्षणाधिकाऱ्यांची एकूण कारकीर्द फक्त ९ वर्षांची आहे, कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालक म्हणून दुहेरी जबाबदारी होती. मात्र तेथून त्यांना २०१८ मध्ये पदमुक्त करण्यात आल्यानंतर न्यायालयातून त्यांनी पदनियुक्ती करून आणली होती, १३ महीन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी पदावर रुजू झाले होते. इथेच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले व चौकशीत त्यांच्याकडे ५० कोटींच्या आसपास मालमत्ता आढळून आली असल्याचे सांगितले जात आहे. लोहार यांच्याकडे पाच चारचाकी वाहने, सात दुचाकी, कोल्हापूरात दोन फ्लॅट, कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा, राजारामपुरी, पाचगाव, शा

मतदार असलेल्या मतदारांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर !

इमेज
मतदार असलेल्या मतदारांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर ! नाशिक::- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ०८:०० ते दु. ०४:०० वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्याचे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी कळविले आहे.