प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी "बांबू" लागतातच ! "बांबू" लागू नयेत यासाठी काय गरजेचे आहे ते बघूया २६ जानेवारीपासून !!

प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी "बांबू" लागतातच ! "बांबू" लागू नयेत यासाठी काय गरजेचे आहे ते बघूया २६ जानेवारीपासून !! नाशिक ( प्रतिनिधी ) - प्रेमाचा इतिहास हेच सांगतो की, खांद्यासाठी बांबू लागतो आणि बांबू लागला की, कोणाचा तरी खांदा हा लागतोच. खरंतर प्रेमात पडलेल्या सॅारी…. प्रेमात लागलेल्या अनेक बांबूचा अनुभव आयुष्यात प्रत्येकानेच घेतला असेल. हे बांबूच लागू नयेत यासाठी प्रेमाचे सायन्स पाळणे खूप गरजेचे आहे. प्रेमात बांबू कसे लागतात, याची गोष्ट सांगणारा ‘बांबू’ चित्रपट लवकरच दि.२६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. क्रिएटिव्ह वाईब प्रस्तुत, तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्मित, विशाल देवरूखकर दिग्दर्शित, अंबर विनोद हडप लिखित या चित्रपटात अभिनय बेर्डे, शिवाजी साटम, अतुल काळे, पार्थ भालेराव, वैष्णवी कल्याणकर, समीर चौघुले, स्नेहल शिदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. चित्रपटातील ‘मी तुला त्या नजरेनं’ हे धमाल गाणेही नुकतेच प्रदर्शित झाले असून तरूणाईला भुरळ घालणारे हे गाणे रोहित राऊत आणि ज्ञानदा पवारने गायले आहे. य