पोस्ट्स

गणितशास्र, गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत, गतिशास्र, प्रकाशकी, दृकशास्र शोध शास्त्रज्ञ ! अद्वितीय शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन यांचा (२० मार्च) स्मृतिदिन !

इमेज
गणितशास्र, गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत, गतिशास्र, प्रकाशकी, दृकशास्र शोध शास्त्रज्ञ ! अद्वितीय शास्त्रज्ञ :  सर आयझॅक न्यूटन  यांचा स्मृतिदिन !  सर  आयझॅक  न्यूटन यांचा जन्म ४ जानेवारी  १६४३ रोजी म्हणजे ज्या वर्षी महान संशोधक  गॅ लिलिओ मरण पावला त्याच वर्षी इंग्लंडमधील  वूलस्थॉर्प   मध्ये झाला .   प्राचीन ज्युलियन कॅलेंडर चा उपयोग करता, न्यूटन ची जन्मतिथी  २५ डिसेंबर १६४२  म्हणूनही वापरली जाते.   त्याचे शिक्षण केंब्रिज विद्यापीठात झाले .  तेथेच त्याची १६६९ साली गणितशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली .  गणितशास्त्र ,  गुरुत्वाकर्षण ,  गतिशास्त्र ,  प्रकाश ,  दृकशास्त्र इ .  क्षेत्रात न्यूटनने संशोधन करून महत्वाचे सिद्धांत मांडले . १ .  गणितशास्त्र  :  न्यूटन एक श्रेष्ठ गणिती होता .  गणितशास्त्रामधील शून्यलब्धी चा शोध त्याने लावला . ( कॅलक्य़ुलसचा शोध भास्कराचार्यांनी लावला .  या शास्त्राला ते शून्यलब्धि म्हणत असत .  म्हणजे शून्याच्या जवळ पोचणार्‍या संख्याफलांचे गणित ) .  सर्वंकष स्वरूपातला बायनॉमियल थिरम ज्याच्या आधारे  ' क्ष '  अधिक  ' य '  अशा दोन संख्यांच्या बेरजे

पूर्व प्राथमिक वयात मूल्यआधारित शिक्षण महत्वाचे - विनय जोशी

इमेज
पूर्व प्राथमिक वयात मूल्यआधारित शिक्षण महत्वाचे - विनय जोशी  न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801 नाशिक( प्रतिनिधी )-  मेंदूचा विकास हा वयाच्या पाच वर्षापर्यंत सुमारे ९०  टक्के होतो. ही विकासाची वर्ष मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी खूप महत्त्वाची असतात. लहान मुलांचा मेंदू हा स्पंजसारखा असतो. या वयात ते जे काही बघतात ऐकतात किंवा अनुभवतात ते सगळे त्यांच्या मेंदूत समाविष्ट होते म्हणूनच या वयात मुलांनी चांगल्या गोष्टी शिकणं, ऐकणं आणि बघणं खूप महत्त्वाचं ठरतं.          यासाठीच आम्ही मूल्य शिक्षणावर भर दिला आहे. पूर्व प्राथमिक वयात जर मूल्यांवर आधारित शिक्षण दिलं गेलं तर मुलं त्या दृष्टीने तयार होतील आणि आपली संस्कृती जपण्यात याचा नक्कीच फायदा होईल असे प्रतिपादन इनोवेरा  स्कूलचे  सहसंस्थापक विनय जोशी यांनी केले.     याप्रसंगी संचालक विकास  जकुने व  शैक्षणिक समन्वयक प्राजक्ता पवार या उपस्थित होत्या. माय स्कूलची पहिली शाखा (इनोवेरा प्रि-स्कूल) लवकरच नाशिक शहरात सुरू होत असून त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की  या वयात मुलांना अनुभवातून शिकवलं तर ते खूप चांगल

कुलगुरूंच्या उपस्थितीत नॅब चे २५ मार्चला राज्यस्तरीय विशेष गौरव पुरस्कार वितरण !

इमेज
कुलगुरूंच्या उपस्थितीत नॅब चे २५ मार्चला राज्यस्तरीय विशेष गौरव पुरस्कार वितरण ! न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801           नाशिक ( प्रतिनिधी ) : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्राच्या ( नॅब ) वतीने शैक्षणिक क्षेत्रातील राज्यस्तरीय विद्यार्थी, आदर्श प्राध्यापक, संस्था आणि शिक्षक व विशेष गौरव पुरस्कार सोहळा पुरस्कार वितरण सोहळा दि. २५ मार्च रोजी होणार आहे. अशी माहिती पुरस्कार समितीचे चेअरमन मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, नॅब महाराष्ट्राचे संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, मानद महासचिव गोपी मयूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.        या संदर्भात  माहिती देताना  मुनशेट्टीवार यांनी पुढे सांगितले की, नाशिक नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र नाशिक यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे राज्यातील इयत्ता दहावी व बारावी बोर्डातील प्रथम श्रेणीतील विद्यार्थी, विद्यापीठाद्वारे अंतिम पदवी प्राप्त विद्यार्थी, दृष्टीबाधित शाळेत किंवा दृष्टीबाधितांना शिकविणारे दृष्टिबाधित किंवा डोळस विशेष शिक्षक, महाविद्यालयातील दृष्टी बाधित प्राध्यापक, दृष्टीबाधितांसाठी कार्य करणारी संस्था, विशेष कार्य करण

पंचायत समितीचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
पंचायत समितीचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ! चांदवड (नासिक १७)::- आरोपी नारायण विश्वनाथ शिंदे. वय ४२ वर्षे, कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (APO), पंचायत समिती चांदवड, जि.नाशिक याने ५०००/- रुपये (पाच हजार) मागणी केली, तडजोडी अंती ४०००/- रूपयांची लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.       यातील तक्रारदार यांचे वडिलांचे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांचे गोठ्यासाठी शासकीय अनुदान प्रकरण मंजूर करून  देण्याच्या कामाच्या मोबदल्यात  एकूण पाच हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती ४०००/- रुपये लाचेची रक्कम  आज दिनांक १७ मार्च २०२३ रोजी कार्यालयात स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. सापळा अधिकारी श्रीमती वैशाली पाटील, पोलीस उप अधीक्षक, सह सापळा अधिकारी - पो. नि. अनिल बागुल व सापळा पथक पो.ना. राजेश गीते, शरद हेंबाडे, अजय गरुड यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, पोलीस अधीक्षक, नारायण न्याहळदे, अप्पर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार, पोलीस उपअधीक्षक, वाचक, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.

श्री सच्चियाय भवानी मातेच्या ज्योतीचे गुढीपाडव्याच्या दिवशी नाशकात आगमन !

इमेज
श्री सच्चियाय भवानी मातेच्या ज्योतीचे गुढीपाडव्याच्या दिवशी नाशकात आगमन ! नाशिक (न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801)::- राजस्थानातील जोधपुर जवळील ओशिया गावातील ओशियाँ माता उर्फ श्री सच्चियाय भवानी माता जैन, माहेश्वरी समाजाची कुलदेवी आहे. प्रसिद्ध व्यापारी संजय राठी जोधपूरहून मातेची अखंड ज्योत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बुधवारी (दि.२२) नाशिकमधील रविवार कारंजा येथे घेऊन येणार आहेत. त्यानिमित्ताने भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे.              मिरवणुकीमध्ये महिला दिवे, देविचे रुप व ध्वज घेवुन सहभागी होतील. रविवार कारंजापासून मेनरोड - धुमाळ पॉईंट- मुंदडा मार्केट, टिळक पथ, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ - रविवार - पेठे मार्गे  मिरवणूक राठी वाड्यापर्यंत पोहचेल. या ठिकाणी महाप्रसाद वितरण व भजनाचा कार्यक्रम होईल. श्री सच्चियाय भवानी माता जैन समाजातील ओसवाल माहेश्वरीतील राठी, सारडा, लोया, लोढा व लढ्ढा आदींची कुलस्वामिनी आहे. रविवार पेठेतील राठी वाड्यात श्री सच्चियाय मातेचे स्वयंभू असे जागृत स्थान आहे. गुढीपाडव्यापासुन देवीचे चैत्र नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. त्यानिमित्त अयोध्याबाई, ठमाबाई,

राज्यातील १ हजार ८२ पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत !

इमेज
राज्यातील १ हजार ८२ पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ! - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक 7387333801             मुंबई  :    राज्यातील १०८९ पोलीस ठाण्यांपैकी १ हजार ८२ पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी नियमितपणे कॅमेरे सुरु असणे आणि रेकॉर्डिंग जतन केले जाणे याबाबींचे ऑडिट केले जाईल ,  अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.             विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान यासंदर्भात सदस्य अब्दुल्लाखान दुर्राणी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.             उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की ,  राज्यातील उर्वरित सात पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम नूतनीकरण आणि स्थलांतरामुळे प्रलंबित आहे. तसेच सध्या बसविलेल्या कॅमेऱ्यांमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंगची सुविधा नाही. अर्थात याठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याच्या कामांत विलंब झाल्यामुळे संबंधित सेवा पुरवठादारावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.           यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ,  शशिकांत शिंदे ,  अनिकेत त

भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या अधिपत्याखाली करणार !

इमेज
भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या अधिपत्याखाली करणार ! नासिक(न्यूज मसाला वृत्तसेवा::- बागलाण तालुक्यातील अंतापूर ग्रामपंचायतीत झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल या स्वतःच्या अधिपत्याखाली करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.         अंतापूर येथील शेकड्याच्या वर ग्रामस्थांनी आपल्या सहीनिशी आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिष्टमंडळाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. निवेदनात अठरा बाबतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.   सदर तक्रार अर्जात ग्रामपंचायत नूतन इमारत बांधकामातील अनियमितता, ग्रामपंचायत च्या शिल्लक रकमेत तफावत, गावातील अंतर्गत रस्त्यांचे काॅंक्रिटीकरण, प्लॅन इस्टिमेटनुसार भूमिगत गटार योजनेचे काम झालेले नाही, स्मशानभूमीतील पेव्हर ब्लॉक बसविणे, सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमत करून आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा दावा, पाण्याच्या टाकी परिसरातील काॅंक्रिटीकरण, व्यायाम शाळा निकृष्ट बांधकाम, प्राथमिक शाळेतील कंपाऊंड, वाॅल कंपाऊंडचे अर्धवट झालेले काम, त्याचप्रमाणे अंगणवाडीतील खर्च, दलित