पोस्ट्स

१७ लाखांची शिष्यवृत्ती मिळवत वाबळेवाडी शाळेतील तब्बल २२ विद्यार्थी एनएमएमएस मध्ये चमकले !

इमेज
१७ लाखांची शिष्यवृत्ती मिळवत वाबळेवाडी शाळेतील तब्बल २२ विद्यार्थी एनएमएमएस मध्ये चमकले !  - शिष्यवृत्ती तज्ञ तुषार सिनलकर यांचे दैदिप्यमान यश ता.२८ (प्रतिनिधी)::- महाराष्ट्रातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आदर्श शाळा वाबळेवाडीतील तब्बल २२ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये निवड झाली असून शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. या परीक्षेला शाळेचे एकूण ३३ विद्यार्थी बसले होते. यातील सर्व ३३ विद्यार्थी पास झाले असून शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तज्ञ तुषार सिनलकर यांनी मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये वर्षभर कसलाही खंड न पडू देता अविरत शिक्षण चालू ठेवणाऱ्या तुषार सिनलकर यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. निकाल जाहीर होताच ग्रामस्थांनी मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या मदतीने शिक्रापूर केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर साहेब यांच्या हस्ते विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान केला.              राज्यातील पहिली टॅबलेट शाळा

NITI Aayog Releases Report - Promoting Millets in Diets: Best Practices across States/UTs of India आहारामध्ये भरडधान्यांना प्रोत्साहन: भारतातील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वोत्तम प्रघात यावरील नीती आयोगाचा अहवाल जारी !

इमेज
NITI Aayog Releases Report - Promoting Millets in Diets: Best Practices across States/UTs of India आहारामध्ये भरडधान्यांना प्रोत्साहन: भारतातील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वोत्तम प्रघात यावरील नीती आयोगाचा अहवाल जारी !         नवी दिल्ली::-'आहारात भरडधान्यांना प्रोत्साहन: भारतातील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वोत्तम प्रघात' या शीर्षकाचा अहवाल नीती आयोगाने प्रसिद्ध केला. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन के. बेरी यांनी हा अहवाल जारी केला. यावेळी सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के. पॉल, सदस्य (कृषी) डॉ. रमेश चंद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम उपस्थित होते.           हा अहवाल राज्य सरकारे आणि संस्थांनी भरडधान्य मूल्य-साखळीच्या विविध पैलूंमध्ये विशेषतः उत्पादन, प्रक्रिया आणि वापरामध्ये अवलंबलेल्या चांगल्या आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा एक संच सादर करतो. अहवाल तीन संकल्पनांमध्ये आहे. म्हणजे (अ) भरडधान्याला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य मिशन आणि उपक्रम; (ब) आयसीडीएस मध्ये भरडधान्यांचा समावेश; (क) संशोधन आणि विकास आणि नाविन्यपूर्ण पद्धतींसाठी तंत्रज्ञानाचा वापर. हा अहव

साप्ताहिक न्यूज मसाला चा दिनांक २७ एप्रिल २०२३ चा अंक !

इमेज
साप्ताहिक न्यूज मसाला चा दिनांक २७ एप्रिल २०२३ चा अंक !

सहायक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !!

इमेज
सहायक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !!     नासिक::-आलोसे सचिन माणिकराव चव्हाण, वय ४८ वर्ष पद सहाय्यक अभियंता (वर्ग- 2)  महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, घोटी व वैतरणा विभाग यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.         यातील तक्रारदार यांचे वॉटर प्यूरिफिकेशन प्लांट येथे सद्यस्थितीत असणाऱ्या इलेक्ट्रिसिटी मीटरवर वाढीव लोड मंजूर करून देण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे ४००००/- रुपये लाचेची मागणी करून ४००००/- रुपये लाचेची रक्कम ही पंचासमक्ष स्वीकारताना रंगेहात मिळून आले म्हणून आलोसे यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.          सापळा अधिकारी अभिषेक पाटील, सापळा पथक सहायक पोलिस उपनिरीक्षक सुखदेव मुरकुटे, पोलिस नाईक प्रणय इंगळे यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, नारायण न्याहाळदे अप्पर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

राज्य लघुलेखक मोफयुसिल संघटनेची नाशिक विभागीय कार्यकारीणी जाहिरअध्यक्ष -सुरेश आघाव, उपाध्यक्ष -राजश्री साळवे, सचिवपदी डॉ. सोमनाथ वडनेरे

इमेज
राज्य लघुलेखक मोफयुसिल संघटनेची नाशिक विभागीय कार्यकारीणी जाहिर अध्यक्ष -सुरेश आघाव, उपाध्यक्ष -राजश्री साळवे, सचिवपदी डॉ. सोमनाथ वडनेरे            नाशिक (न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.)::- महाराष्ट्र राज्य स्टेट गव्हर्नमेंट मोफयुसिल स्टेनोग्राफर असोसिएशन, नागपूरच्या नाशिक विभागाची कार्यकारीणीची निवड झालेली असून अध्यक्षपदी सुरेश आघाव- नाशिक, उपाध्यक्ष  राजश्री साळवे- नाशिक, सचिवपदी डॉ. सोमनाथ वडनेरे जळगाव यांची निवड झालेली आहे.           शॉर्टहँड कला विकास तसेच प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी राज्य स्टेनोग्राफर्स  संघटना गेल्या ५४ वर्षापासून कार्य करीत आहे. नाशिक विभागाच्या कार्यकारिणीचे गठण करण्यासाठी  नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील लघुलेखकांची अनौपचारिक बैठक नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या सभागृहात येथे आयोजित करण्यात आली.त्यात नवीन कार्यकरीणीची निवड झाली. नवनियुक्त  कार्यकारिणी पुढीलप्रमाणे::- अध्यक्ष - सुरेश  आघाव, (नाशिक), उपाध्यक्ष- राजश्री साळवे (नाशिक) सचिव- डॉ. सोमनाथ वडनेरे (जळगाव) कोषाध्यक्ष -नवनाथ लोहकरे (न

ओळख आपल्या विश्वाची ! आकर्षक चित्रफीतींसह आगळ्यावेगळ्या पद्धतीने होत असलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन !!

इमेज
ओळख आपल्या विश्वाची !    आकर्षक चित्रफीतींसह आगळ्यावेगळ्या पद्धतीने होत असलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन !! गिरीश पिंपळे यांच्या पुस्तकाचा रविवारी प्रकाशन सोहळा ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.       नाशिक ( प्रतिनिधी )- येथील सुप्रसिद्ध खगोल अभ्यासक डॉ. गिरीश पिंपळे यांनी लिहिलेल्या “ओळख आपल्या विश्वाची“ या पुस्तकाचे प्रकाशन “ संस्कार भारती “ तर्फे येत्या रविवारी ३० एप्रिल रोजी होणार आहे. हे पुस्तक पुणे येथील राजहंस प्रकाशन या नामवंत संस्थेतर्फे प्रकाशित होत आहे.     या पुस्तकात कोणतीही अवघड तांत्रिक माहिती न देता अगदी साध्या-सोप्या भाषेत आपल्या अतिविराट विश्वाची ओझरती ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खगोलशास्त्र या विषयाची ज्यांना आधीपासूनच आवड आहे त्यांची आवड अधिक वाढावी आणि ज्यांना या विषयात रस नाही त्यांना तो निर्माण व्हावा यासाठी हे पुस्तक पिंपळे यांनी लिहिले  आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष पं. डॉ. अविराज तायडे असून पुस्तकाचे प्रकाशन डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते होणार आहे. डॉ. विद्यासागर हे नामवंत विज्ञान साहित्यिक असून रामानंद तीर्थ विद्यापीठाचे

सोशल मीडिया बळकटीकणासाठी महाराष्ट्र भर झंझावात, जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या प्रवाहात सामील करावे-श्वेता शालिनी

इमेज
सोशल मीडिया बळकटीकणासाठी महाराष्ट्र भर झंझावात, जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या प्रवाहात सामील करावे-श्वेता शालिनी           नाशिक: सोशल मीडियाची व्याप्ती कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचून भारतीय जनता पार्टीचे विविध उपक्रम व केंद्र सरकार व राज्य सरकारचे निर्णय सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवावेत असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश प्रवक्त्या व सोशल मीडियाच्या प्रदेश प्रभारी श्वेता शालिनी यांनी केले. त्या सोशल मीडियाच्या नाशिक  बैठकीत बोलत होत्या. त्यांचा सोशल मीडियाच्या मजबुती करण्यासाठी महाराष्ट्रभर दौरा चालू असून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नाशिक महानगर व नाशिक ग्रामीण च्या सोशल मीडिया कार्यकर्त्यांना संबोधित केले . या वेळी संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव तसेच प्रदेश प्रवक्ते व माजी सोशल मीडिया प्रदेश संयोजक, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, नाशिक शहर सोशल मीडिया संयोजक तुषार जोशी नाशिक ग्रामीण सोशल मीडिया संयोजक योगेश चौधरी, राम डोबे, प्रदीप पाटील, ऋषिकेश ठाणगावकर, निखिल जाधव, दिलीप सानप, विशाल ललवाणी, प्रारब्ध नाठे, स्वप

आश्चर्य आणि चमत्कार या दोन गोष्टींचा अनुभव आयुष्यात प्रत्येकाला कधीनाकधी येतोच ! "सरी" म्हणजे हृदयस्पर्शी प्रेमाची गोष्ट !

इमेज
आश्चर्य आणि चमत्कार या दोन गोष्टींचा अनुभव आयुष्यात प्रत्येकाला कधीनाकधी येतोच ! "सरी" म्हणजे हृदयस्पर्शी प्रेमाची गोष्ट !  'सरी' ५ मे रोजी होणार प्रदर्शित !! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक      नाशिक ( प्रतिनिधी )::-  आश्चर्य आणि चमत्कार या दोन गोष्टींचा अनुभव आयुष्यात प्रत्येकाला कधीनाकधी येतोच. म्हणूनच तर म्हणतात ना, 'लाईफ इज फुल ऑफ सरप्राईजेस अँड मिरॅकल्स'. याच सरप्राईजेस अँड मिरॅकल्सने भरलेल्या 'सरी' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आता प्रतीक्षा संपणार असून लवकरच ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.          आतापर्यंत झळकलेल्या टिझर, गाण्यांवरून यात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार याची कल्पना आली असेलच. ट्रेलरमध्ये सुरुवातीलाच दिया (रितिका) ‘मला माझं पूर्ण जीवन तुझ्यासोबत घालवायचंय... आय लव्ह यू...’ म्हणताना दिसत आहे. आता हे वाक्य नक्की कोणासाठी आहे, रोहित (अजिंक्य) की आदी (पृथ्वी) साठी? रोहितवर मनापासून प्रेम करणाऱ्या दियाच्या आयुष्यात आदीही दिसत आहे. मात्र या तिघांच्याही प्रेमात अनेक चढउतार दिसत आहेत. आता तिघांच्या आयुष्यात आलेले

रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष यांची संचालक पदी निवड !

इमेज
रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष यांची संचालक पदी निवड ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.       ब्राह्मणांनी(सटाणा::- संपूर्ण बागलाण तालुक्यात सहकार क्षेत्रात नावारूपाला आलेल्या " सटाणा सहकारी ग्राहक संघाच्या "तज्ञ संचालक" पदी आज सटाणा येथे संस्थेच्या कार्यालयात झालेल्या सर्व संचालक, पदाधिकारी यांच्या सभेमध्ये रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व ब्राह्मणगाव ग्रामपालिकेचे उपसरपंच बापुराज खरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना सटाणा ग्राहक संघाचे उपसभापती राहुलदादा सोनवणे व सोबत सर्व संचालक मंडळ.    या निवडीबद्दल बापुराज खरे यांचे संपुर्ण तालुक्यात व जिल्ह्यात सर्वच स्थरातून अभिनंदन होत आहे.

'कारण गुन्ह्याला माफी नाही' झटपट पैसे जिंकण्याच्या आशेने या ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात,,,,,,,,,,,!

इमेज
'कारण गुन्ह्याला माफी नाही'  झटपट पैसे जिंकण्याच्या आशेने या ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात,,,,,,,,,,,! मालिका १ मेपासून सोनी मराठी वाहिनीवर ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.       नाशिक ( प्रतिनिधी )::- सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ ही नवी थरारक मालिका  प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते आहे. त्याची झलक प्रेक्षकांना आवडली आहे. 'तुमची मुलगी काय करते' या थरारक मालिकेचा चमू ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेसाठीही कार्यरत आहे.     या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते इन्स्पेक्टर भोसले आणि जमदाडे आपल्याला निराळ्या अंदाजात पाहता येणार आहेत. निरनिराळ्या व्यतिरेखांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री अश्विनी कासार ही या मालिकेतून पुनरागमन करताना दिसणार आहे. अभिनेत्री अश्विनी कासार पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे.  एसीपी अनुजा हवालदार असे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. सोबतच रुपल नंद ही सुद्धा या मालिकेत पुनरागमन करताना दिसते आहे. मोहिनी दुभाषी असे तिच्या व्यक्त