पोस्ट्स

अ.भा. मराठी प्रकाशक संघातर्फे आयोजित चौथ्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचा दिमाखदार सोहळ्यात समारोप !वाचक चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज-- अॅड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज संमेलनात न्यूज मसाला प्रकाशनचे नरेंद्र पाटील व मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेचा सन्मान !

इमेज
अ.भा. मराठी प्रकाशक संघातर्फे आयोजित चौथ्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचा दिमाखदार सोहळ्यात समारोप ! वाचक चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज-- अॅड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज     संमेलनात न्यूज मसाला प्रकाशनचे नरेंद्र पाटील व मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेचा सन्मान !          नाशिक :- समाज माध्यमांच्या रेट्यापुढे छापील पुस्तके टिकाव धरणार नाहीत हा अपप्रचार असून आजही छापील पुस्तकांकडे वाचकांचा कल आहे. कागदांच्या वाढलेल्या दरांमुळे पुस्तक प्रकाशित करणे आणि वितरीत करणे यात अडथळे येत असले तरी प्रकाशक, लेखक आणि वाचक यांनी सुवर्णमध्य काढत एकत्रित जबाबदारी घेऊन वाचक चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी केले .              अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची नाशिक शाखा आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ठाकर

पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणणे हे मुख्य उद्दिष्ट- उज्ज्वल निकम

इमेज
पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणणे हे मुख्य उद्दिष्ट- उज्ज्वल निकम, ज्येष्ठ विधीज्ज्ञ आणि विशेष सरकारी वकील ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.             नाशिकः- वकिली व्यवसायात कार्यरत असताना अनेक आव्हानात्मक खटले हाताळण्याची संधी मिळाली. त्यातीलच अझमल कसाब या खटल्याच्या माध्यमातून कसाबला केवळ फाशी देणे, हे उद्दिष्ट नव्हते पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणणे हे मुख्य उद्दिष्ट होते, असे मत ज्येष्ठ विधीज्ज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.            अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची नाशिक शाखा आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनात आज अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणेतर्फे देण्यात येणारा २०२२ चा जीवनगौरव पुरस्कार पॉप्युलर प्रकाशनाचे संचालक रामदास भटकळ यांना, तर साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ लेखक आणि कवी प्रवीण दवणे यांना आज ज्येष्ठ विधीज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी या संमेलनाचे

चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे उद्घाटन ! ..... आणि मी तरून गेलो, मायबाप सरकारच्या कृपेने मला दोन-अडिच वर्षे तुरूंगात जावे लागले. तुरूंगातील तो रूक्षकाळ निभावून नेण्यासाठी त्यावेळी पुस्तकांनी मित्रांसारखी मदत केली. तुरूंगात वेळच वेळ असल्याने इंग्रजी आणि मराठी भाषेतील अनेक पुस्तके वाचनाचा योग आला.-- छगन भुजबळ

इमेज
चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे उद्घाटन ! पुस्तकांच्या रूपाने विचारवंत आणि तज्ज्ञ सदैव वाचकांच्या समवेत- छगन भुजबळ, माजी पालकमंत्री     नाशिक::- जागतिक स्तरापासून ते स्थानिक पातळीपर्यंत अनेक विचारवंत आणि तज्ज्ञांनी त्यांचे विचार आणि जीवनदृष्टी पुस्तकांच्या माध्यमातून शब्दबद्ध करून ठेवली आहे. वेळोवेळी प्रकाशकांनी ती पुस्तके प्रकाशित केल्याने ते विचारवंत आणि तज्ज्ञ शरीररूपाने आपल्यात नसले, तरी पुस्तकांच्या माध्यमातून आपल्यात आहेत, अशी भावना नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.           अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची नाशिक शाखा आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित दोन दिवसीय चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.          यावेळी व्यासपीठावर या संमेलनाचे अध्यक्ष मॅजेस्टिक प्रकाशनाचे संचालक अशोक कोठावळे, विश्वास बँक लि., नाशिकचे संस्थापक विश्वास ठाकूर,  ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, महाराष्ट्र साहित्य पर

मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेचा अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाकडून सन्मान !

इमेज
मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेचा अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाकडून सन्मान ! नासिक::- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे चौथे दोनदिवसीय संमेलन ६/७ मे रोजी नासिक येथे होत आहे. संमेलनात मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेचा सन्मान करण्यात येणार आहे. संस्थेने विद्यार्थ्यांना स्वेटर, आरोग्य तपासणी, रुग्णांच्या नातेवाइकांना अन्नदान, आदिवासी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप अशा सामाजिक उपक्रमांसह मराठी भाषा वाचन संस्कृती जोपासण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत संस्थेचा सन्मान करण्यात येणार असल्याचे पत्र देण्यात आले.       संस्थेच्या सर्व सभासदांनी दिलेल्या सामाजिक योगदानाचा सन्मान होत असल्याने सामाजिक, राजकीय, साहित्यिक स्तरातून अभिनंदन होत आहे.  

अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !         नासिक::- संगमनेर येथील कंत्राटी अभियंता विकास सुरेश जोंधळे, वय (२८), सिटी लेवल टेक्निकल सेल अभियंता, (कंत्राटी), नेमणूक संगमनेर यांस १७०००/- रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.       यातील तक्रारदार यांनी प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत अनुदान मिळणे कामे संगमनेर नगरपरिषद येथे अर्ज दाखल केला होता. मंजूर झालेले अनुदानाची शिफारस करून तक्रारदार यांना अनुदान मिळवून देण्यासाठी आरोपी यांनी तक्रारदाराकडे  ४००००/- रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी दुसऱ्या हप्त्याच्या २००००/- रुपये लाचेच्या रकमेची तडजोडी अंती १७०००/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून नमूद लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांच्या समक्ष आरोपी यांना स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. म्हणून आरोपी यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.       सापळा अधिकारी संदीप साळुंखे, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो. ह. पंकज पळशीकर, पो.ना. नितीन कराड, पो.ना.प्रकाश महाजन, चापोना/परशुराम जाधव यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वाल

'तेल बचाव देश बचाव' उपक्रमाची रॅली उत्साहात !

इमेज
'तेल बचाव देश बचाव' उपक्रमाची रॅली उत्साहात !      नाशिक :- भारत सरकारच्या 'तेल बचाव देश बचाव' मोहिमेंतर्गत सिडको येथील सुमन पेट्रोलियम येथे रॅली काढण्यात आली. एचपीसीएलचे रिजनल मॅनेजर शशांक दाभाणे, सेल्स ऑफिसर भौमिक कौशिक, बी.अविरल सिंग,सुमन पेट्रोलियमचे डीलर अजित धात्रक  या मान्यवरांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी इंधनाची बचत करून सर्व देशवासीयांनी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन केले. सर्वांनी या उपक्रमांतर्गत इंधन वाचविण्याची प्रतिज्ञा घेतली. राज्याचे महामयम राज्यपाल यांचा 'सक्षम' कार्यक्रमाचा संदेशही यावेळी प्रदर्शित करण्यात आला. शहरात इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा घेण्यात आली. बीपीसीएलचे राज्य समन्वयक आणि मुख्य व्यवस्थापक मनोहर अंभोरे यावेळी उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे ६/७ मे रोजी संमेलन !

इमेज
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे ६/७ मे रोजी संमेलन ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.     नासिक::- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ ही संघटना मराठी प्रकाशकांना, लेखकांना आणि वाचकाना विविध उपक्रमांच्या सहाय्याने जोडण्याचे आणि एकत्रित ठेवण्याचे कार्य गेली अनेक वर्षे करीत आहे. लेखन संस्कृती आणि वाचन संस्कृती वाढावी म्हणून प्रकाशक संघाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. प्रकाशक आणि लेखकांसाठी विविध कार्यशाळा, शिबिरांचे आयोजन तसेच वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी विविध स्पर्धांचे आयोजनही केले जाते. अशाच विविध उपक्रमांपैकी एक असलेले लेखक प्रकाशक साहित्य संमेलन दरवर्षी घेण्यात येते. यापूर्वी पुस्तकांचे गाव भिलार, चिपळूण आणि सातारा येथे हि संमेलने झालेली आहे. नाशिककरांसाठी अभिमानाची बाब म्हणजे या वर्षी हे चौथे संमेलन आयोजित करण्याचा मान आपल्या नाशिक शहराला मिळालेला आहे. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ नाशिक शाखा आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ प्रकाशक अशोक कोठावळे मॅजेस्टीक प्रकाशन मुंबई यांची निवड करण्यात

सहायक पोलिस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
सहायक पोलिस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ! नासिक::- येथील उपनगर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक आलोसे सागर गंगाराम डगळे, (वय ३८ वर्ष) यांस ७०००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.          यातील तक्रारदार यांच्या भावाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपास कामी पुणे येथे जाण्यासाठी लागणाऱ्या खाजगी वाहनाचा खर्च व जेवणाच्या खर्चासाठी, आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे १०,०००/- रुपये लाचेची मागणी करून ७०००/- रुपये लाचेची रक्कम ही पंचासमक्ष स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. म्हणून आलोसे यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.       सापळा अधिकारी अनिल बागुल, (पोलीस निरीक्षक) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक सापळा पथक पो. ना. किरण अहिरराव, पो. ना.अजय गरुड, पो.ना. चंद्रशेखर मोरे यांनी  श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, नारायण न्याहाळदे अप्पर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली.

पैशांची सतत मागणी व पैसे न दिल्यास मोठा दंड आकारणी धमकी देणारा कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
पैशांची सतत मागणी व पैसे न दिल्यास मोठा दंड आकारणी धमकी देणारा कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !      नासिक (धुळे)::- पो.हे.कॉ.१६२३ नामे उमेश दिनकर सूर्यवंशी (वय ४७) ट्रॅफिक पोलिस, धुळे यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले. तक्रारदार हे कामानिमित्त चाळीसगाव येथून मोटरसायकलने येणे जाणे करतात,  ट्राफिक पोलीस हे तक्रारदार यांना नेहमी धुळे शहरातील तहसील चौक, उर्दु शाळा येथे अडवून त्यांच्या कडे मोटरसायकलचे सर्व संबंधित कागदपत्रे, वाहन चालविण्याचा परवाना असतांना सुद्धा त्यांच्याकडे २०० ते ५०० रुपये ची मागणी करतात, पैसे दिले नाही तर ट्राफिक पोलीस जाऊ न देता मोठ्या रक्कमेचा ऑनलाईन दंड देण्याचे धमकावतात, पोलिसांच्या नेहमीच्या पैसे वसुली च्या त्रासाला कंटाळून तक्रारदार यांनी दिनांक २ मे रोजी  ला.प्र. वि.धुळे येथे तक्रार दिली होती. त्यावरून आज दिनांक ३ मे रोजी पंच साक्षीदार यांचे समक्ष पडताळणी केली असता यातील आलोसे यांनी तक्रारदार यांचे कडे ऑनलाईन दंड नको असेल तर स्वतःसाठी २०० रुपये ची मागणी करून सदर रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. सदर सापळा कार्

१७ लाखांची शिष्यवृत्ती मिळवत वाबळेवाडी शाळेतील तब्बल २२ विद्यार्थी एनएमएमएस मध्ये चमकले !

इमेज
१७ लाखांची शिष्यवृत्ती मिळवत वाबळेवाडी शाळेतील तब्बल २२ विद्यार्थी एनएमएमएस मध्ये चमकले !  - शिष्यवृत्ती तज्ञ तुषार सिनलकर यांचे दैदिप्यमान यश ता.२८ (प्रतिनिधी)::- महाराष्ट्रातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आदर्श शाळा वाबळेवाडीतील तब्बल २२ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये निवड झाली असून शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. या परीक्षेला शाळेचे एकूण ३३ विद्यार्थी बसले होते. यातील सर्व ३३ विद्यार्थी पास झाले असून शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तज्ञ तुषार सिनलकर यांनी मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये वर्षभर कसलाही खंड न पडू देता अविरत शिक्षण चालू ठेवणाऱ्या तुषार सिनलकर यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. निकाल जाहीर होताच ग्रामस्थांनी मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या मदतीने शिक्रापूर केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर साहेब यांच्या हस्ते विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान केला.              राज्यातील पहिली टॅबलेट शाळा