सर्वात कमी वयांत फिल्म फेअर पुरस्कारप्राप्त, ८०-९० दशकांतील अष्टपैलु अभिनेत्री कोण ? १४ वर्षानंतर मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर येत आहे !!! हा यशस्वी "प्रवास" जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा , निश्चितच जुन्या आठवणींना उजाळा मिळेल, गुणी अभिनेत्रीचं नक्की स्वागत कराल अशी दिग्दर्शकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे !!!

पद्मिनी कोल्हापुरेंचा समृद्ध प्रवास!

१४ वर्षानंतर पुन्हा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण!

सर्वाधिक कमी वयात फिल्म फेअर पुरस्काराची मानकरी ठरत आपल्या अभिनयाद्वारे सशक्त कारकीर्द घडवणारी मराठी अष्टपैलू अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे. ८० – ९० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत स्टार पदावर विराजमान झालेल्या पद्मिनी कोल्हापुरेंचा आजपर्यंतचा प्रवास समृद्ध आणि बहारदार राहिला आहे. इंसाफ का तराजू साठी १९८१ साली सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्री तर प्रेम रोग साठी १९८३ साली सर्वोत्कृष्ठ नायिकेचा पुरस्कार पटकावणाऱ्या त्या सर्वाधिक तरुण अभिनेत्री आहेत. ‘चिमणी पाखरं’ या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करून मराठी रसिकांच्या थेट हृदयात स्थान पटकावले. या चित्रपटासाठी त्यांना विविध पुरस्कार तर मिळालेच पण चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तगड यश मिळाल्याने या गुणी अभिनेत्रीच्या अभिनयाला मराठी रसिकांची आपलं म्हणत मनापासून दाद मिळाली. आशुतोष गोवारीकर यांच्या महत्वाकांक्षी ‘पानिपत’ या हिंदी व शशांक उदापूरकर दिग्दर्शित ‘प्रवास’ या मराठी चित्रपटात त्या प्रमुख भूमिका करीत आहेत. नव्या – अनुभवी मराठी – हिंदी दिग्दर्शकांसोबत काम करताना त्या उत्साही दिसत आहेत.

पद्मिनी कोल्हापुरे यांनी ‘एक खिलाडी बावन पत्ते’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले त्यानंतर ‘इश्क इश्क इश्क’,  ‘जिंदगी’,  ‘ड्रीम गर्ल’, ‘साजन बिन सुहागन’, ‘सत्यम शिवम सुन्दरम’, ‘इंसाफ का तराजू’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘ज़माने को दिखाना है’, ‘प्रेम रोग’, ‘विधाता’, ‘सौतन’, ‘लवर्स’, ‘वो सात दिन’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘प्यार किया है प्यार करेंगे’, ‘दाता’, ‘स्टार’, ‘मजदूर’, ‘यह इश्क नही आसान’, ‘सड़क छाप’, ‘आग का दरिया’, ‘हम इंतजार करेंगे’, ‘हवालात’, ‘प्यार के काबील’, ‘किरयादार’, ‘प्रीती’, ‘सुहागन’, ‘मुद्दत’,‘स्वर्ग से सुंदर’, ‘बेवफाई’, ‘अनुभव’, ‘नया कदम’, ‘नयी पहेली’, ‘प्रोफेसर कि पडोसन’, ‘माई’, ‘फटा पोस्टर निकला हीरो’ अश्या जवळपास शेकडो हिंदी चित्रपटांमध्ये साकारलेल्या प्रमुख नायिका कायम रसिकांच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत.

राज कपूर, शशी कपूर, ऋषी कपूर, राजेश खन्ना, जितेंद्र, मिथुन चक्रवर्ती, अनिल कपूर, संजय दत्त, जॉकी श्रॉफ, राज बब्बर, कुमार गौरव ते शाहीद कपूर पर्यंतचा हा प्रवास खरंच अथांगच म्हणावा लागेल... त्यांनी ग्लॅमरस, सोशिक, वात्सल्यासोबत विविध जातकुळीच्या भूमिका जिवंत केल्या आहेत. त्यांनी पठडीबाज अभिनय कधी केला नाही. सतत चौकट मोडून वेगळ्या भूमिका केल्या.

मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना त्यांनी रसिकांच्या पसंतीचा विचार प्रथम केला. त्यांनी नॉन-ग्लॅमर भूमिका निवडत ‘चिमणी पाखरं’ मधील आईची आव्हानात्मक भूमिका निवडली. त्यांनी साकारलेली या चित्रपटातली ‘आई’ रसिकांच्या आजही काळजात घर करून आहे. आपल्या लेकारांपासून दूर जाताना तिच्या जीवाला होणाऱ्या यातना प्रेक्षकांनाही जाणवल्या. व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरून सहज ताबा घेण हीच खरी पद्मिनी कोल्हापुरेंची खासियत आहे. असाच सखोल अनुभव पुन्हा मराठी रसिकांना पहायला मिळणार आहे. त्यांची प्रमुख भूमिका असलेला ‘प्रवास’ हा आगामी चित्रपट सुरु झाला असून त्या यात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असून अशोक सराफ यांच्यासोबत त्यांची प्रथमच जोडी जमली आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत झाले आहे.

हिंदी चित्रपटांमध्ये व्यस्त असतानाही त्यांनी त्यांचे पती प्रदीप (टूटू) शर्मा यांच्या मदतीने हिंदी, मराठीसह इतर भाषांमधील चित्रपटांची निर्मिती चालूच ठेवली आहे. ‘खुबसुरत’, ‘वन नाईट स्टँड’, 'श्री सिंघ / श्रीमती मेहता', ‘तेरा क्या होगा जॉनी’, ‘रॉकफोर्ड’,  ‘राजकुमार’, ‘घरवाली बाहरवाली’, ‘नीयत’, ‘मर मिटेंगे’, ‘पाँच’, ‘अमीरी गरीबी’, ‘खुल्लम खुला प्यार करेंगे’,‘महाराजा’, ‘ऐसा प्यार कहा’, ‘जख्मी शेर’, ‘मेहंदी रंग लाएगी’, ‘आकाश गोपुरम’ इत्यादी चित्रपटांसोबत त्यांनी दूरदर्शनसाठी ‘अथांग’ या मराठी मालिकेची निर्मिती केली आहे. तसेच ‘भुताचा भाऊ’, ‘लाठी’, ‘चीटर’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्र्यांना महापुजेपासुन रोखण्यासाठी नासिकमधून हजारोच्या संख्येने तरूण पंढरपूरला जाणार-सकल मराठा समाज,नासिक !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

फ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार सुरू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!