पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अनंत कान्हेरे मैदान विकसित तरी समस्या कायम ! आयुक्तांना निवेदन !

इमेज
अनंत कान्हेरे मैदान विकसित तरी समस्या कायम ! आयुक्तांना निवेदन !            नासिक::- नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान कोट्यवधी रुपये निधी मंजूर होऊन खर्च करण्यात आला परंतु तिथे अद्यापही पूर्णपणे सुविधा जॉगर्स धारकांना मिळत नाहीत. पुर्वी ज्या समस्या होत्या त्या अजूनही जशाच्या तशा कायम आहेत. मैदान विकसीत होऊन समस्या मिटतील असे वाटत होते. परंतु त्या समस्या तत्पूकाळ सुटण्याऐवजी हळूहळू पूर्व पदावर येत आहेत मग मैदान विकसित करून मिळवले काय हा प्रश्न कायम आहे, आज मैदानात झाडांना पाणी मारले जात नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. हिरवळ तयार करून हिरवाईचा हिरवा रंग राहिला नाही, संध्याकाळी मैदानात वाहने येतात अन जातात  यावर कुठलेही निर्बंध नाही. मैदानात रात्री टवाळखोरांची मनसोक्त सोय होते, प्रेमीगुलांचा तर प्रेमाचे अड्डे निर्माण झाले आहेत. मग या मैदानाला सुसज्ज कसे म्हणता येईल. मैदान विकसित केले तरी मैदानाची देखभाल होत नाही. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मैदानाची अशी अवस्था असेल तर बाकीच्या मैदांनाचे काय ? या सर्व बाबीकडे प्रशासनाकडून लक्ष देण्यात यावे म्हणून मोरया ज

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड युके कडून उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर सन्मानित !

इमेज
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड युके कडून उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर सन्मानित !        छत्रपती संभाजीनगर::- येथील प्रथितयश लेखिका, प्रेरक व्याख्यात्या तथा उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांना रविवार दिनांक दहा मार्च रोजी शिर्डी येथे एका समारंभात लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् (युनायटेड किंगडम) या संस्थेचे अध्यक्ष संतोष शुक्ला यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र आणि पदक देऊन गौरविण्यात आले. समाजातील सर्व स्तरातून अंजली धानोरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !

इमेज
सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !        नासिक::-  दिनांक ७ मार्च २०२४ रोजी जिल्हा परिषद नाशिक मधील अनिल गीते व अनिल सानप यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी मधून सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली. तसेच वरिष्ठ सहाय्यक श्रीमती छाया सोनवणे, राजेंद्र येवला, धनराज पवार, दिलीप पाटील, विलास ननावरे, मंगेश चव्हाण, ओम प्रकाश पाटोळे, किरण माळवे, चंद्रकांत पगारे यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली. गजेंद्र घाडगे व जीवन पारधी यांना कनिष्ठ सहाय्यक पदावरून वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यात आली.       पदोन्नती चार प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता आज हा प्रश्न मार्गी लागल्याने लिपिक वर्गीय कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले. सदरच्या पदोन्नती पारदर्शकपणे राबविल्याने व कर्मचाऱ्यांची गैरसोय न झाल्याने कर्मचारी यांनी समाधान व्यक्त करत परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्रीमती वर्षा फडोळ, मुख्य