अहिर सुवर्णकार समाजातर्फे वधू वरांना मदतीचा हात ! स्व. विजयकुमार पवार यांच्या कार्याचा गौरव संस्कार दिन म्हणून साजरा-श्याम बिरारी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
अहिर सुवर्णकार समाजातर्फे आर्थिक दुर्बल वधू-वरांना मदतीचा हात नाशिक : नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाज हरिओम सांस्कृतिक संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक स्व. विजयकुमार पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त संस्कार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अहिर सुवर्णकार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिर सुवर्णकार संस्थेतर्फे दरवर्षी विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात. आपला संसार सुखाचा व्हावा, आपल्याला आयुष्याचा जोडीदार चांगला मिळावा, अशी सर्वांचीच इच्छा असते. मात्र, शिक्षित असूनही केवळ घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे समाजातील आर्थिक दुर्बल वधू-वरांना आपले स्वप्न साकारता येत नाही. अशा वधू-वरांना संस्थेतर्फे मदतीचा हात दिला जाणार असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष श्याम बिरारी यांनी व्यक्त केले. स्व. विजयकुमार पवार यांच्या स्मृतिदिनानिमित जैन गुरुकुल (वसतीगृह), मखमलाबाद आणि पेठ रोड येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वसतिगृहातील अनाथ मुलांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. अनाथ व इच्छुक मुलांच्या शिक्षणासाठी समाजातील दानश