पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुढच्या पिढीला "वैभवशाली" इतिहास सांगताना,,,,,,,,. काॅग्रेस कमिटी कार्यालय !!

इमेज
    नासिक::- शहर व जिल्ह्यातील राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी एकेकाळी सतत गजबजलेले,  एमजी रोडवरील काॅंग्रेस भवनाची आजची विदारक परिस्थिती. कार्यालय बंद, बाकावर कुणीतरी वामकुक्षी घेत आहे, युवक काँग्रेस चा फलक, गवताने पेव्हर ब्लाॅकमधून आपले अस्तित्व दाखवून देण्याचा केलेला प्रयत्न शहर व जिल्हा कमिटीलाच संदेश देत असावा. पक्षाच्या झेंड्याखाली येत याच भवनातून मंत्रीपद, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरसेवक, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्यत्व मिळाले, त्याच मातृसंस्थेची दुरावस्था बघताना कुणालाही दखल घ्यावीशी वाटू नये ही खेदजनक बाब म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. शहरातील महत्त्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी असलेले भवन ! राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयाची अशी अवस्था बघून सर्वसामान्यांच्या मनात येणाऱ्या प्रश्नांचे उत्तर कोण देईल ? याच भवनातून मिळालेल्या जहागिरीला आता जागण्याची वेळ आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपाचे हायटेक कार्यालये, सत्तेत आल्यावर शिवसेनेच्या ही कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात आले आणि वर्षानुवर्षे जिल्ह्याच्या राजकारणा...

कागदावरच निर्बंध शिथिल, जाच मात्र कायम केशव डिंगोरे : जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशन उठवणार आवाज ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
कागदावरच निर्बंध शिथिल, जाच मात्र कायम केशव डिंगोरे : जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशन उठवणार आवाज !      नाशिक : शासनाने निर्बंध शिथिल केल्याचे सांगितले जाते, मात्र हे निर्बंध कागदावरच शिथिल असून, मंडप डेकोेरेटर्स व या व्यवसायाशी निगडीत इतरांना जाच कायम आहे. त्यामुळे शासनाच्या या धोरणाविरोधात असोसिएशनच्या व्यासपीठावरून आवाज उठविला जाणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष केशव डिंगोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. असोसिएशनच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केशव डिंगोरे म्हणाले की, ‘गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मंडप डेकोरेशन, बॅण्डपथक, लॉन्स धारक व या व्यवसायाशी निगडीत इतर लोकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता शासनाने निर्बंध शिथिल केल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र निर्बंध अजून कायम आहेत. लॉन्सधारकांना अजूनही स्थानिक प्रशासनाचा जाच आहे. अधिकाऱ्यांच्या श्रेयवादाच्या लढाईत आमचे मरण होत आहे. पालकमंत्र्यांना भेटल्यास अधिकारी दुखावले जात आहेत. तर पालकमंत्री आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटण्य...

अंतराचा अक्षरोच्चार म्हणजे कविता – संतोष हुदलीकर सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
अंतराचा अक्षरोच्चार म्हणजे कविता – संतोष हुदलीकर        नाशिक दि. - कवितेमध्ये तांत्रिकता महत्वाची नसते आणि तसा हट्टही नसावा. कारण तंत्रशुद्ध कविताच कविता असतात आणि इतर कविता या कविता नसतात का? असा मुलभूत प्रश्न निर्माण होतो. कवितेमध्ये भावगर्भता असावी, रचनेमध्ये सुलभता असावी. कवीने अथवा लेखकाने सातत्याने लिहित जावे. कवीला हुकमी लिहिता यायलाच हवे याबरोबरच कवितेमध्ये उत्स्फूर्तता असावी, शब्द लालित्य असावे. असे प्रतिपादन कवी संतोष हुदलीकर यांनी केले ते नाशिक कवीच्या काव्यकोजागरी निमित्ताने आयोजित  कवी, कविता आणि काव्यसंस्था या विषयावर बोलत होते. यावेळी नाशिक कवीचे कार्यवाह सुभाष सबनीस यांनी कवी आणि काव्यसंस्था याविषयी बोलतांना कवीने एखाद्या कवितेत अडकून पडू नये तसेच नवोदितांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांशी आपली नाळ तुटू देवू नये असे सांगितले. प्रमुख पाहुणे आर्किटेक्ट कवी प्रवीण पगार म्हणाले मी कवी असल्याचा मला अभिमान आहे असाच अभिमान प्रत्येक कवीने आपल्या मनी बाळगला पाहिजे. कार्यक्रमाचे आणि  ‘नाशिक कवी’ चे अध्यक्ष इंजी.बाळासाहेब मगर यांनी आपल्याला काह...

' लोकराजा 'चे दिमाखात आगमन होत आहे ! संपादकीय सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !! सर्वांना दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! - संपादक.

इमेज
दि. २८ आक्टोबर २०२१ चे संपादकीय,,,,, ' लोकराजा 'चे दिमाखात होणार आगमन !    दिवाळी अंकांच्या बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. त्यातच न्यूज मसाला साप्ताहिकाचा ' लोकराजा ' दिवाळी अंक उद्या दिमाखात दाखल होत आहे. १० वर्षांची परंपरा कायम ठेवत  'लोकराजा' दिवाळी विशेषांक नेहमीच वाचक, साहित्यिक, वर्गणीदार यांच्यात लोकप्रिय ठरला आहे. अनेक पुरस्कार प्राप्त झाल्याने जबाबदारीत वाढ करून घेतली. आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेकडूनही गौरविण्यात आले मात्र अडचणींना तोंड देतांना ' लोकराजा 'ने दर्जात कधीही तडजोड केली नाही व करीत नाही. जाहिरातींचा ओघ कमी झाला त्यामुळे आर्थिक ओढाताण सहन करावी लागते पण सर्वांचा विश्वास संपादन केला असल्याने यंदाही ' लोकराजा ' तुमच्या आनंदात भर घालण्यासाठी दिवाळीचा साहित्यिक फराळ घेऊन येत आहे. हे सांगताना निश्चितच समाधान वाटते.      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दीड वर्षे सर्वानाच खूप अडचणींना सामोरे जावे लागले. त्यातून वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके व प्रकाशन संस्थादेखील सुटल्या नाहीत. गतवर्षीच्या कठोर टाळेबंदीत प्रकाशन व्यवसाय अनेक स...

मधुकर वाडू संशोधक कलावंत; अभ्यासू साहित्यिक. यशोगाथेचा परीपाठ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
मधुकर वाडू संशोधक कलावंत; अभ्यासू साहित्यिक !     शालांत परीक्षा अनुत्तीर्ण झालेल्या एका युवकाने आपली अभ्यासू वृत्ती, हुशारी, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर इंग्लिश व जर्मन भाषेत आंतरराष्ट्रीय स्तरावर लेखन केले आहे. तो पारंपरिक वारली चित्रकार तर आहेच ; पण वारली जमातीची समृद्ध परंपरा, चालीरीती यांचा अभ्यास करून  त्याने वेळोवेळी विपुल लिहिले देखिल आहे. त्याने ७०० लोककहाण्यांचा संग्रह केला असून त्यावर आधारित १०१ वारली चित्रेही रेखाटली आहेत. सध्या एक २०० पानी पुस्तक इंग्रजी व मराठीत प्रसिद्ध करण्याचे काम आणि त्यासाठी चांगल्या प्रकाशकाचा शोध सुरु आहे. याशिवाय कालौघात नष्ट होऊ पहाणाऱ्या १४ पारंपरिक वाद्यांचा अभ्यास तो करतोय. या कलाकार - साहित्यिकाचे नाव आहे मधुकर वाडू. त्याच्या कार्याची व्याप्ती व परीघ मोठा असल्याने, दोन भागांमध्ये प्रसिद्ध होत असलेल्या लेखाचा हा पूर्वार्ध...    मधुकर रामभाऊ वाडू यांचा जन्म १९६८ साली जव्हार जवळच्या आपटी पाड्यावर झाला. पालघर तालुक्यातील मनोर जवळच्या कोंढाण या दुर्गम गावात ते राहातात. आई जानकीबाई शेती करायची तर वडील रामभाऊ सा...

दिवाळीत घरोघरी दिवे उजळणार ' घर तिथे दिवा ' उपक्रमाला प्रारंभ ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
दिवाळीत घरोघरी दिवे उजळणार ' घर तिथे दिवा ' उपक्रमाला प्रारंभ !    नाशिक ( प्रतिनिधी )  प्रभाग क्रमांक सहा मखमलाबाद येथे ' घर तिथे दिवा ' या विशेष उपक्रमाला गुरुवारी सुरुवात करण्यात आली. शिवसेना व भारतीय विद्यार्थी सेना उपमहानगरप्रमुख अंकुश प्रकाश काकड व सौ. सुवर्णा अंकुश काकड यांच्या माध्यमातून ही संकल्पना सुरू करण्यात आली. या उपक्रमामागील उद्देश कोरोनासारख्या महामारीमध्ये जी असंख्य कुटुंबे उध्वस्त झाली त्यांना मायेचा आधार देऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणे हा आहे.    मागील दीडवर्षात अनेक कुटुंबामधील कर्तेधर्ते पुरुष, कमावती तरुण मुले, घरातील महिला - भगिनी यांची कोरोना विरुद्धची लढाई अपयशी ठरली. अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. त्यामुळे कुटुंबांमध्ये दाटून आलेला अंधार दूर करण्याकरिता ' घर तिथे दिवा ' हा उपक्रम हाती घेतला. त्यातून शिवसेना सदैव आपल्या पाठीशी राहील हा संदेश देण्यात आला. शिवस्वराज्य महिला प्रतिष्ठानने सहकार्य केले. उपक्रमाच्या प्रारंभी देवी मंदिरात दिवे प्रज्वलित करून कोरोनाचा सर्वत्र नायनाट व्हावा अशी प्रार्थना करण्यात आली. याव...

आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन !             नासिक ::-२१ ऑक्टोबर २०२१ रोजी आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक यांचे तर्फे नाशिक जिल्ह्यात साजरा होणार राष्ट्रीय गलगंड दिवस अर्थात आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम २०२१, प्रत्येकाच्या शरीरातील आयोडीनचे प्रमाण चांगले राखण्यासाठी व गलगंड होऊ न देणे कामी जनजागृती दिन साजरा करण्यात येतो, राष्ट्रीय गलगंड दिनाचे ( आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम ) औचित्य साधून नाशिक जिल्ह्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रामध्ये राष्ट्रीय गलगंड दिनानिमित्त निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिचारिका प्रशिक्षण विभागाच्या विद्यार्थिनी तसेच आरोग्य सेवक प्रशिक्षणार्थी यांच्यामध्ये निबंध स्पर्धा होणार असून, घोषवाक्य तयार करणे, पोस्टर तयार करणे, चित्र गोष्ट तयार करणे,  तसेच पथनाट्य सादरीकरण करून जनजागृती करण्यात येणार आहे. पेठ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर राष्ट्रीय गलगंड दिन साजरा करण्यात येणार आहे, याची पूर्वतयारी करण्यात येत असून आरोग...

१९ ऑक्टोबर भारताचे नाव उज्वल करणारे संख्याशास्त्रज्ञ : डॉ. शरद्चंद्र श्रीखंडे यांच्या जयंतीनिमित्त,,,,,,,. संख्याशास्त्राचे सहयोगी प्रा. विजय कोष्टी यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
१९ ऑक्टोबर भारताचे नाव उज्वल करणारे संख्याशास्त्रज्ञ : डॉ. शरद्चंद्र श्रीखंडे यांच्या जयंतीनिमित्त,,,,,,,           संख्याशास्त्रांच्या प्रमेयांची नवी उकल करून आधुनिक विज्ञानशाखांचा रस्ता सोपा करणारे,  जागतिक कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ डॉ. शरदचंद्र श्रीखंडे यांचा १९ ऑक्टोबर हा जन्मदिन.  लिओनार्द ऑयलर या अठराव्या शतकातल्या जागतिक कीर्तीच्या स्विस गणितज्ञाने १७८२ मध्ये केलेल्या लॅटिन चौरसाच्या उकलीतल्या मर्यादा, ज्या १७७ वर्षे कोड्यात टाकत होत्या, त्या १९५९ मध्ये डॉ. श्रीखंडे यांनी आर. सी. बोस आणि ई. टी. पार्कर यांच्यासमवेत स्पष्ट केल्याच्या  महत्वपूर्ण घटनेची बातमी रविवार, २६ एप्रिल १९५९ रोजीच्या न्युयॉर्क टाइम्स च्या पहिल्या पानावर आली होती. हे त्यांचे सर्वात महत्वाचे संशोधन. याशिवाय डॉ. श्रीखंडे यांनी शोधून काढलेला १६ शिरोबिंदू (व्हर्टायसेस), ४८ बाजू (एजेस्) आणि ६ डिग्री (प्रत्येक शिरोबिंदूला ६ बाजू येऊन मिळतात) असलेला ‘श्रीखंडे आलेख’ नावाने ओळखला जाणारा आलेख कोडिंग सिद्धान्त, क्रिप्टोग्राफी, नेटवर्क सिद्धान्त, प्रयोग संकल्पन...

नावातल्या 'मोराचा' डौल चित्रांमध्येही...! जपानी रसिकांची वाहवा मिळवणारा राजेश मोर !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नावातल्या 'मोराचा' डौल चित्रांमध्येही...    "मी जंगलात राहातो आणि त्याचाच  एक अविभाज्य  भाग आहे. झाडंझुडुपं, वेली, शेती, पशुपक्षी यांच्याशी माझं अतूट नातं आहे. आम्ही एकमेकांपासून दूर राहू शकत नाही. मी त्या साऱ्यांचा प्रतिनिधी असून त्यांच्याच भावना चित्रातून व्यक्त करतो. आडनावाप्रमाणेच मोरासारखा डौल माझ्या कलेत यावा म्हणून मी प्रयत्नशील असतो, सुदैवानं त्यात यशस्वीही होतो. बारीक नक्षीकाम आणि आकारांची सुंदर गुंफण हे इतरांच्या दृष्टीतून जाणवणारं माझ्या चित्रांचं वैशिष्ट्य आहे", असं वारली कलाकार राजेश मोर आवर्जून सांगतो. मोरांची चित्रे ही तर त्याची खासियत आहे. त्याने अनेकरंगी वारली चित्रे रेखाटण्याचेही यशस्वी प्रयोग केले आहेत.    डहाणू तालुक्यातील गंजाड जवळच्या दुर्गम पाड्यावर १९८२ साली राजेश लक्ष्मण मोर याचा जन्म झाला. वडील भगताचे काम करायचे. आई बानीबाई झोपडीच्या भिंती वारली चित्रांनी सजवायची. तिला व वडिलांना लग्नघरी चौक लिहायला बोलवायचे. छोटा राजेश आईला मदत करता करता वारली चित्रशैली शिकला. जवळच्या कासा गावातील आश्रमशाळेत राहून त्याचे दहावीपर्यंतचे...

संस्कार, संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी वाचन संस्कृती जोपासण्याची गरज- पोतदार ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
संस्कार, संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी वाचन संस्कृती जोपासण्याची गरज- पोतदार.            वाडीव-हे::-मोबाईल वरील समाजमाध्यमामुळे नव्वद टक्के पीढ़ी वाचन संस्कृति पासून दूर गेली आहे, समृद्ध जीवन जगण्यासाठी पुस्तकांचे वाचन अतिशय महत्वाचे आहे. स्वताचे जीवन, आपले संस्कार, संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील त्यासाठी पुस्तकेच मार्गदर्शक ठरतील, त्यासाठी पुस्तकांना गुरु स्थानी ठेवून आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनवता येईल असे प्रतिपादन वैशाली प्रकाशनचे विलास पोतदार यांनी केले. इगतपुरी तालुका साहित्य मंडळ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदे दुमाला येथील सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालयात एका परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.      वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधुन "वाचाल तर वाचाल" या विषयावर पोतदार यांनी मार्गदर्शन केले तर "मराठी भाषेचे महत्व आणि संवर्धन" या परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. प्रथमता प्रतिमापुजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळ...

महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सवाचे १७ आक्टोबरला नाशिकमध्ये आयोजन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सवाचे १७ आक्टोबरला नाशिकमध्ये आयोजन !        नाशिक प्रतिनिधी : सम्यक विद्यार्थी आंदोलन, महाराष्ट्र राज्याच्या वतीने लोकशाहीर वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोसत्व नाशिकमध्ये होतो आहे. महाकवी वामनदादा कर्डक यांची जन्मभूमी असलेल्या नाशिकपासून या महोत्सवाची सुरुवात होऊन, महाड पर्यंत या महोत्सवाचे आयोजन केले आहे. दादांच्या सांस्कृतिक क्षेत्रांतील अनमोल कामगिरीबद्दल कृतज्ञता म्हणून तसेचं लोकांपर्यंत त्यांची गाणी व  विचार पोहचवणे हा या कार्यक्रमामागील संयोजकांचा मानस आहे. नाशिक येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयाच्या प्रांगणात दि.१७ ऑक्टोबरला सकाळी ११ वा. तीन सत्रात संपन्न होणा-या या महोत्सवात विविध मान्यवर वामनदादांंच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा गीत-काव्य आणि व्याख्यानातून मांडणार आहेत. पहिल्या सत्रात, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगीत विभाग प्रमुख आणि प्रसिद्ध संगीतकार डॉ. संजय मोहड हे वामनदादांच्या गीतांचा 'गीत भीमायन' हा कार्यक्रम सादर करणार आहेत. शाहीर मेघानंद जाधव (औरंगाबाद) ...

ग्रामसेवक लाचलुचपत च्या जाळ्यात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
ग्रामसेवक लाचलुचपत च्या जाळ्यात ! नासिक::- शासकीय घरकुल योजनेंतर्गत बांधकाम केलेल्या शौचालयाचे प्रकरणाचा अहवाल फिर्यादी यांचे बाजूने तयार करून गटविकास अधिकाऱ्यांना पाठविण्यासाठी २७५००/- रुपयांची मागणी करण्यात आली होती. सदर प्रकरणी फिर्यादी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने आज रोजी आरोपी लोकसेवक चंद्रकांत पाटील ग्रामसेवक दहेगाव (म) ता. चांदवड यांस रुपये २५०००/- लाचेची मागणी करून लाच  स्विकारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचेविरूद्ध चांदवड पोलिस ठाण्यात ५७४/२०२१ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

अनिल चैत्या वांगड एक प्रतिभावान शिष्योत्तम ! वारली चित्रशैली म्हणजे मातीचा सन्मान !!

इमेज
प्रतिभावान  शिष्योत्तम                "आदिवासी वारली चित्रशैलीला ११०० वर्षांची ज्ञात परंपरा आहे. या कलेला समृद्ध सांस्कृतिक पार्श्वभूमी, वारसा आणि स्थानिक भौगोलिक संदर्भ आहेत. माझे गुरू पद्मश्री जिव्या सोमा मशे यांच्यामुळेच वारली कलेला नाव आणि वैभव प्राप्त झाले. ते टिकवून अधिक उंचीवर नेण्याचे काम माझ्यासह नव्या पिढीने करायचे आहे. सरकारी पातळीवरील गुरू-शिष्य योजनेतून मी त्यांच्याकडे शिकलो. सध्याची व्यावसायिकता व अर्थकारणाच्या रेट्यामुळे एकूणच कलाविश्वात परिवर्तन अपरिहार्य आहे. मात्र तरीही विचारात सुस्पष्टता असेल तर वारली चित्रशैली विशुद्ध स्वरुपात टिकवणे शक्य होईल", असा अभिप्राय मशे यांचे प्रतिभावान शिष्योत्तम अनिल वांगड व्यक्त करतात.                अनिल चैत्या वांगड यांचा जन्म १९८३ साली डहाणू तालुक्यातील गंजाड जवळच्या वांगडपाडा येथे झाला. नववीपर्यंत आश्रमशाळेत शिक्षण झाल्यावर परिस्थितीमुळे त्यांनी शिक्षण सोडले. पुढे सरकारी पातळीवरील गुरू-शिष्य योजनेत जिव्या सोमा मशे ...

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे कोविड योद्धा पुरस्कार जाहीर ! नासिक जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, तात्याराव लहाने, दिशा प्रतिष्ठान सह ३० मान्यवरांचा उपमुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार गौरव !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे कोविड योद्धा पुरस्कार जाहीर तात्याराव लहाने, प्यारे खान, अमितेशकुमार, मातृभूमी, दिशा प्रतिष्ठान, यांच्या सह राज्यातील ३० मान्यवरांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५ तारखेला मुंबईत गौरव.     मुंबई - कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासुन राज्यात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्ति, संस्था व अधिकार्‍यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन संघटनेच्या वतीने गौरव करण्यात येत आहे. राज्यातील पुरस्कारांची घोषणा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी आज येथे केली. मंगळवार दि. ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत सह्याद्रि अतिथीगृह येथे सायंकाळी ४.०० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ३० मान्यवरांना स्मृतिचिन्ह व कृतज्ञतापत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण व संस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि कृषि राज्य मंत्री डॉ. विश्वजित पतंगराव कदम हे उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार विजेत्या...

भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या दोन दिवसीय अभिनव पथ परीषदेचे उद्घाटन !! परिषदेत "दि रुल्स अँड रेड फ्लॅग्स" या पुस्तकाचे अनावरण !!

इमेज
नाशिक शाखेच्या परिषदेत "दि रुल्स अँड रेड फ्लॅग्स" या पुस्तकाचे अनावरण            भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम विभागाच्या दोन दिवसीय "  अभिनव पथ  " प्रादेशिक परिषदचे, उदघाटन नाशिक येथे दि ०२ ऑक्टोबर २०२१ रोजी नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे आणि जळगाव शाखेच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शाखेत करण्यात आले. सदर परिषदेत नाशिकचे  खासदार हेमंत गोडसे , इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे  माजी अध्यक्ष सीए. प्रफुल्ल छाजेड , प्रमुख अतिथी म्हंणून उपस्थित होते.             नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव  व  धुळे परिसरातील  २०० पेक्षा अधिक सनदी लेखापालांनी या परिषदेत भाग घेतला.   या परिषदेत  सीए. राजेंद्र शेटे  लिखित  “दि रुल्स अँड रेड फ्लॅग्स”  या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी सीए. राजेंद्र ...

ईगल फौंडेशनच्यावतीने " ईगल ब्रँड आयकॉन २०२१ " पुरस्कारासाठी आवाहन ! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
ईगल फौंडेशनच्यावतीने " ईगल ब्रँड आयकॉन २०२१ " पुरस्कारासाठी आवाहन ईगल फौंडेशनच्या ( ईगल न्यूज चॅनल ISO 9001:2015   सर्टीफाईड) वर्धापन दिनानिमित्ताने ईगल फौंडेशनच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी आवाहन करण्यात आले आहे. आदर्श माता, आदर्श पिता, आदर्श माता- पिता  पुरस्कार देण्यात येणार आहेत. महिला, वैद्यकीय, प्रशासकीय, उद्योग, युवा, शेती, पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक, आदी क्षेत्रातील  व्यक्ती अथवा संस्थांना सहभाग घेता येईल. पुरस्कार नामांकन फॉर्म 9422420611 या व्हॉटस्अप नंबरवर आपले नाव, पत्ता, हुद्दा कळवावा. दि.३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन शेखर सुर्यवंशी (सांगली), सागर पाटील (रत्नागिरी ), प्रशांत लाड (चिवे), प्रकाश वंजोळे (खंडाळा), सुभाष भोसले (कागल), बाबासाहेब राशिनकर (गुहागर), दिपक पोतदार (जयसिंगपूर),  प्रा,बापुसाहेब कांबळे (मुंबई), संजय नवले (अहमदनगर), प्रा.तुकाराम पाटील (कोल्हापूर),  प्रा.अरुण घोडके (इस्लामपूर ), अशोक शिंदे (येलूर), संजय गायकवाड (रोहा), भगवान देवकर (कुरळप), डॉ.सुनील भावसार (नाशिक),  प्रा.सर्जेराव राऊ...

राष्ट्रपती भवनात झळकले वारली चित्रशैलीतील रामायण ! हरेश्वर वनगा : पुरोगामी वारली चित्रकार !!

इमेज
हरेश्वर वनगा : पुरोगामी वारली चित्रकार   आई मथीबाई यांच्याकडून हरेश्वर वनगा यांना वारली चित्रकलेचा वारसा मिळाला. उद्धवराव पंडित यांच्या घरी ती मोलकरणीचे काम करायची. तेथे हरेश्वर व त्यांच्या भावंडांवर  नागरी संस्कार झाले. तलासरीच्या जनजाती आश्रमशाळेतील विकास प्रकल्पात त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रप्रेमी विचारांनी ते प्रेरित झाले व स्वयंसेवक बनले. पुरोगामी विचारसरणीच्या हरेश्वर यांनी नातेवाईकांच्या व समाजाच्या दबावाला न जुमानता, आपल्या दोन मुलींना 'वंशाची पणती' मानून उत्तम शिकवले. त्यांना उच्चशिक्षित केले. राज्य सरकारने आदिवासी सेवक पुरस्काराने त्यांना गौरविले आहे. त्यांनी वारली कलेत स्वतःचे वेगळेपण सिध्द केले आहे. त्यांचे रामायणावर आधारित असलेले वारली चित्र थेट राष्ट्रपती भवनात विराजमान झाले आहे.    डहाणू आगर येथे १९६५ साली जन्मलेल्या हरेश्वर नथू वनगा यांची आई मथीबाई झोपडीच्या भिंतीवर चित्रे रंगवायची. छोट्या हरेश्वरला ते बघून खूप उत्सुकता वाटायची. आईकडून ही कला त्यांनी आत्मसात केली. ५ बहिणी व १ भाऊ अशा मोठ्या कुटु...