पोस्ट्स

औद्योगिक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सामाजिक दातृत्वाची अनुभूती,. निमाकडून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास ६० मेडिकल किट भेट ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
निमाकडून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास ६० मेडिकल किट भेट नासिक ::-  'निमा' नाशिक च्या वतीने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास ६० मेडिकल किट त्याच बरोबर थर्मामीटर गन, पल्स ऑक्सिमीटर हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागास प्रदान करण्यात आले. या मेडिकल किट मध्ये दोन गॉगल, २ एन९५ मास्क, २५ डिस्पोझेबल मास्क, १००मिली. सॅनिटायझर बॉटल, २५० मिली. सॅनिटायझर बॉटल अशा स्वरूपाच्या वस्तू आहे, या वस्तू ग्रामीण भागात काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केले, निमाच्या या सामाजिक दायित्वाबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी उपस्थित निमाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले, यावेळी निमाचे मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, निमाचे उपाध्यक्ष श्रीपाद कलकर्णी, बाळासाहेब गुंजाळ, निमा हेल्थ कमिटीचे चेअरमन जयंत पवार, कैलास वराडे, लिगल कमिटीचे चेअरमन संजय महाजन, निमाच्या कार्यकारी सचिव सोनाली देवरे आदी उपस्

यंदा तरी साखर कारखान्याचे बाॅयलर पेटणार का ? !!! !!!! न्यूज मसाला सर्विसेस ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस यंदा तरी रासाकाचे बाॅयलर पेटणार का ?           नासिक::-निफाड तालुक्यातील साखर कारखान्यांचा अवघ्या दोन महिन्यावर उसाचा गळीत हंगाम येऊन ठेपला आहे. गेल्या हंगामातील शिल्लक ऊस आणि यंदाच्या हंगामातील ऊस तसेच जिल्हाभरातील कादवा आणि द्वारकाधीश हे दोन साखर कारखाने सोडले तर निसाका, रासाका, गिसाका, वसाका, रावळगाव, के.जी.एस. सर्व कारखाने बंद असल्याने मोठ्या प्रमाणात अतिरिक्त असलेल्या उसासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील कारखान्यांचे उंबरे झिजवावे  लागणार आहेत, त्यासाठी यंदा तरी रासाका अर्थात कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचे बाॅयलर पेटलेच पाहिजेत या मागणीवरून आक्रमक होत रासाका कृती समितीचे अध्यक्ष नामदेव शिंदे यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे, वर्षाच्या  सुरवातीला निसाका रासाका सुरु होण्याच्या अपेक्षांचे धुमारे फुटण्यास विधानसभा निवडणुकीत झालेला सत्तापालट अन निवडणुकीपुर्वी दिलेले  निसाका, रासाका सुरु करण्याचे आश्वासन कारणीभुत आहे, तसेच कोरोना महामारीमुळे कादवा गोदा खोऱ्यातील उत्पादीत ऊसाला असलेल्या रसवंती, चाऱ्याच्या बाजारपेठा बंद, ऊसतोड करण्

पुण्यस्मरणानिमित्ताने भक्ताने पुतळ्यावरील अंधार केला दूर ! कोणी व कसा केला पुतळ्यावरील अंधार दूर व त्यावरील प्रतिक्रिया सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
संतोष गिरी यांजक डून, न्यूज मसाला सर्वि सेस,          नासिक: :- निफाड तालुक्यातील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना अर्थात रासाकाच्या कार्यस्थळावर कर्मवीर काकासाहेब वाघ यांचा पूर्णाकृती पुतळा गत अनेक वर्षांपासून रासाकाचा  वीजपुरवठा खंडित असल्याने अंधारात असल्याने कर्मवीर प्रेमींमध्ये नाराजीची भावना संपूर्ण तालुक्यात होती. ही जन भावना रासाका चे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील डुकरे यांच्या लक्षात आली. त्यात दत्तात्रय पाटील अध्यक्ष असताना कर्मवीर काकासाहेब वाघ यांचा पूर्णाकृती पुतळा महाराष्ट्र राज्याचे दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते व दिवंगत लोकनेते मालोजीराव मोगल यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत वीस वर्षांपूर्वी रासाका कार्यस्थळावर उभारण्यात आला होता, रासाका बंद असल्याने   पुतळ्याची देखभाल होत नसल्याने कर्मवीरांच्या या पुतळ्याला कोणीच वाली नसल्याचे चित्र होते, पुतळा कायम अंधारात होता, कर्मवीरांनी या परिसरात सर्वप्रथम वीज आणून  या परिसराला उजेडात आणले त्यांचाच पुतळा आज अंधारात असल्याची बाब डुकरे  पाटील यांना खटकत होती म्हणूनच आज त्यांच्या पुण्यस्मरणा न

राजकारण विरहित वातावरणात यंदा बाॅयलर पेटणार की पेटवणार ! कृषीमंत्र्यांना घातलेले साकडे पूर्णत्वास जावे अशी शेतकऱ्यांची इच्छा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस "निसाका"साठी कृषिमंत्री दादा भुसे यांना गोदाकाठवासीयांचे साकडे नासिक::-निफाड तालुक्यातील जनतेच्या जीवन मरणाचा विषय असलेल्या निसाका-रासाका शासन दरबारी लवकर प्रयत्न करून कार्यान्वित करावा, या मागणीचे निवेदन देऊन आज गोदाकाठ वासीयांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना साकडे घातले. आढावा बैठकीसाठी आज सायंकाळी निफाडमध्ये आलेल्या कृषिमंत्री दादा भुसे यांची निफाड सेवा सहकारी सोसायटीच्या सभागृहात करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांच्या पुढाकाराने गोदाकाठच्या शिष्टमंडळाने माजी आमदार अनिल  पाटील कदम व जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थितीत भेट घेऊन चर्चा केली.! यावेळी निसाकासाठी शासन दरबारी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दादा भुसे यांनी शिष्टमंडळाला दिले.!          करंजगावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपालिका सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज रोजी निफाड तालुक्यात साडेपाच हजार हेकटर पेक्षा अधिक ऊस उभा आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे उन्हाळ्यात रसवंतीगृहे बंद असल्