पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अवलिया युवा कलाशिक्षक प्रदीप शिंदे !

इमेज
पळसे येथील नासाका माध्यमिक विद्यालयाचे युवा कलाशिक्षक प्रदीप भाऊसाहेब शिंदे (86056 57132) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पिंपळपानावर रेखाटलेल्या प्रतिमा. 

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!

इमेज
'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!      न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801        कळवण::- कवी अशोक बुरबुरे यांच्या कवितेसह अनेक कविता सादर करत आईच्या आठवणींचा जागर कळवणच्या आप्पाश्री लॉन्समध्ये रंगला. निमित्त होतं सेवानिवृत्त मुख्याध्यापिका लीलाबाई दिनकर गरुड यांच्या प्रथम स्मृतिदिनाचं. महाराष्ट्राभर गाजत असलेल्या अरुणराज प्रस्तुत 'मायबाप' च्या १८९ व्या प्रयोगातून मातेच्या स्मृतींना अनोखे अभिवादन करण्यात आले.       कवी आणि सादरकर्ते राजेंद्र उगले, अरुण इंगळे यांनी रसिकांसमोर मायबापाची एक-एक आठवण हळुवारपणे मोकळी करत रसिकांच्या डोळ्यात पाणी उभे केले.    'नाही घातलीस माळ, नाही लावियेला टिळा   माझ्या मायमाऊलीचा, भक्तिमार्ग साधाभोळा !' असे म्हणत कवी राजेंद्र उगले यांनी संसारात रमलेल्या पण मुलांच्या संगोपनात घरालाच मंदिर मानणाऱ्या आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या तर कवी अरुण इंगळे यांनी संस्कारांची शिदोरी देणाऱ्या आपल्या वडिलांचं मोठेपण मांडताना-   'श्रीमंती मनाच

पितृपक्षातले पुण्यकर्म, अन्नदान खरा धर्म-"स्वामी" संस्थेचा स्तुत्य उपक्रम !

इमेज
पितृपक्षातले पुण्यकर्म, अन्नदान खरा धर्म-"स्वामी" संस्थेचा स्तुत्य उपक्रम !             मुंबई::- भारतीय संस्कृतीचे एक मोठे वैशिष्ट्य हे आहे की, ती जिवंत असताना विविध कर्मकांडातून आणि धर्माचे पालन करून मानवी जीवन सुधारण्याचे मार्ग सांगतेच, पण मृत्यूनंतरही, अंतिम संस्कारांनंतरही ती आपल्याला आत्म्याच्या उद्धारासाठी कोणकोणत्या कर्मकांड केले पाहिजेत याबद्दल सांगते. शास्त्रात आणि पुराणात मरणोत्तर विधी आणि संस्कारांचे वर्णन केले आहे. अश्विनचा कृष्ण पक्ष (गुजरात-महाराष्ट्रानुसार भाद्रपद) हा  हिंदू धर्मात श्राद्ध पक्ष म्हणून साजरा केला जातो. विष्णू, वायू, वराह, मत्स्य इत्यादी पुराणांमध्ये आणि महाभारत, मनुस्मृती इत्यादी धर्मग्रंथांमध्ये श्राद्धाचा महिमा आणि पद्धत विविध ठिकाणी वर्णन केलेली आहे. पूज्यश्रींचे उपदेश प्रस्तुत पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत जेणेकरून सर्वसामान्यांना 'श्राद्धा महिमा' ची ओळख व्हावी आणि त्यांच्या पूर्वजांप्रती असलेले कर्तव्य पार पाडता यावे.             दैवी पूर्वजांच्या पवित्र आशीर्वादाने, दैवी आत्मा कुटुंबात अवतार घेऊ शकतात. ज्यांनी आयुष्यभर एवढं रक

सातारा रत्न पुरस्कारासाठी आवाहन !

इमेज
सातारा रत्न पुरस्कारासाठी आवाहन ! न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801          मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात राहून तिथल्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सातारा वासियांसाठी गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या 'आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान' संस्थेच्या वतीने दसरा मेळावा व स्नेहसंमेलन सोहळा दि. २३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने राजकीय, प्रशासकीय, सामाजिक, सहकार, उद्योग, कायदा, शैक्षणिक, क्रीडा, वैद्यकीय, कामगार, साहित्य, कला व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील किर्तीवंतांचा सत्कारदेखील करण्यात येणार आहे. संपूर्ण महाराट्रातून सातारकराना नामांकने पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दसरा मेळावा व स्नेहसंमेलन निमित्त मान्यवरांना त्यांची नामांकने दि. १८-१०-२०२३ पर्यंत संस्थेच्या कार्यालयात पाठवायची आहेत. सोबत संपूर्ण माहिती, कार्याचा आढावा, गावाचे नाव व तालुका, नामांकन क्षेत्र ¸छायाचित्र पुढील पत्त्यावर किंवा ईमेल द्वारे पाठवावे. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान, मुंबई¸ बी-१ प्रोग्रेसिव्ह बिल्डिंग, दत्ताराम लाड मार्ग, चिंचपोकळी (पूर्व

दि नाशिक जिल्हा ॲडव्होकेट मल्टीपर्पज सहकारी संस्था मर्यादित, संस्थेतर्फे वकिलांचा सत्कार

इमेज
दि नाशिक जिल्हा ॲडव्होकेट मल्टीपर्पज सहकारी संस्था मर्यादित, संस्थेतर्फे वकिलांचा सत्कार :       नासिक::- दि नाशिक जिल्हा एडवोकेट मल्टीपर्पज सहकारी संस्था मर्यादित या संस्थेतर्फे ४५ वर्षात ज्यांनी संस्थेच्या कार्यकारी मंडळात काम केले त्या सर्वांचा सत्कार संपन्न झाला. सत्कार्थी वकीलांना सन्मानाचिन्ह आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले.          यावेळी संस्थेचे संचालक ऍड. पांडुरंग तिदमे यांच्या हस्ते एडवोकेट मिलिंद चिंधडे व सौ. मुक्ता चिंधडे यांचा सत्कार करण्यात आला.                  उपस्थितांमध्ये आणि ज्यांचे सत्कार झाले त्यांच्यामध्ये ९४ वर्षांचे ऍड. दौलतराव घुमरे यांच्यापासून वकिलीतल्या चार पिढ्या उपस्थित होत्या. त्यामध्ये ऍड. भास्करराव पवार, ऍड. एनजी गायकवाड, ऍड. संतोष गटकळ, नासिक वकील संघाचे अध्यक्ष ऍड. नितीन ठाकरे, ऍड. हेमंत गायकवाड, ऍड. वैभव शेटे इत्यादींचा समावेश होता.          कार्यक्रमात उत्तम गुणांनी दहावी बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सभासद पाल्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या आधी ४५ वी सर्वसाधारण सभा संपन्न  झाली. त्यात अनेकांनी क्रियाशील पद्धतीने भाग घ

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!

इमेज
दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे !  कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!          नाशिक ( प्रतिनिधी ) दातार कुळातील अनेक व्यक्ती देशभरात तसेच जगभरात पोहोचलेल्या आहेत. दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे. आपले नाव सार्थक करून ते समाजापुढे आदर्श निर्माण करतात. ही वृत्ती सर्वांनी अनुसरावी अशीच आहे असे प्रतिपादन निवृत्त कमोडोर हर्षद दातार यांनी केले. अखिल भारतीय दातार कुलसंमेलनाच्या उदघाट्नप्रसंगी ते बोलत होते.          सर्व दातार कुटुंबियांचे चौथे कुलसंमेलन नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले. रविवारी (दि.१) गंगापूररोडवरील प्रसाद मंगल कार्यालय येथे हे संमेलन झाले. कमोडोर हर्षद दातार यांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले. कुलसंमेलन अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी - दातार उपस्थित होते. त्यांनी कुलवृत्तांत व आगामी निवडणूकीच्या संदर्भात माहिती दिली. दातार कुळात आगरकर, आघारकर, कुलकर्णी, वर्तक, फडणीस, सबनीस, दप्तरदार, चौकर यांचाही समावेश असल्याने त्यांचाही सहभाग होता. माहेरवाशिणींसह अनेकांनी उपस्थिती नोंदवली. सकाळी ९ वाजता संमेलनाला सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे म्हणून भालचंद्र तथा बाबासाहेब दातार उपस्थित होते. त्या