८ जानेवारीच्या देशव्यापी संपात जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर, कंत्राटी व किमान वेतन कर्मचारी होणार सहभागी याबाबत चे निवेदन जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. ... नासिक::- देशभरातील महागाई , आर्थिक मंदी, बेरोजगारी, कामगार कायद्यात मालक धार्जिणे बदल , खाजगीकरण कंत्राटी करण, आणि जन विरोधी धोरणामुळे केंद्र सरकार विरोधी देशभरातील केंद्रीय ट्रेड युनियन व अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ तथा विविध, अखिल भारतीय कामगार कर्मचारी, असंघटित कामगार, कंत्राटी कामगार, किमान वेतन कर्मचारी, श्रमिक - शेतकरी या संघटनांचेे देशात २ कोटी औद्योगीक कामगार - कर्मचारी, श्रमीक वर्ग ८ जानेवारी २०२० ला आपल्या मागण्यांकरीता एक दिवसाच्या देशव्यापी संपात सहभागी होत आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, पेट्रोल , डिझेल, घरगुती गॅस व इतर जिवनावश्यक वस्तूवरील दर नियंत्रनात आणा, अतिवृष्टीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून तात्काळ मदत द्या. स्वामीनाथन आ...