गणेशाची विविध रुपे आणि प्रतिमा ! वारली चित्रशैलीचे विद्रुपीकरण नको-प्रसिद्ध वारली चित्रकार संजय देवधर. न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. वारली चित्रकलेचा लेख सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

गणेशाची विविध रुपे आणि प्रतिमा ! गणपती म्हणजे बुद्धीची देवता. गणेशाचे रूप अत्यंत सृजनात्मक आहे. कलाकारांना अनेक रुपात गणराया दिसतो. साध्यासोप्या आकारातून गणेशप्रतिमा आकाराला येते. गजवदन, लंबोदर, एकदंत, शूर्पकर्ण अशा त्याच्या विविध नावातूनच त्याच्या रूपाचे वर्णन दिसते. मूर्तिकार व चित्रकारांनी वेगवेगळ्या आकारात गणेशप्रतिमा साकारल्याचे आढळते.आदिवासी वारली कलाकार भौमितिक मुलाकार वापरुन त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैलीत गणेशाची प्रतिमा साकारतात. आदिवासी वारली जमातीत मूळातच मूर्तिपूजा नव्हती. नंतरच्या काळात आदिशक्तीची, पंचतत्वांंची प्रतिकात्मक पूजा केली जाऊ लागली. वारली जमात कलेतच देवत्व शोधते आणि निसर्गालाच परमेश्वर मानते. त्यांचे देवदेवता दगडावर किंवा मोठ्या लाकडी फळीवर कोरलेले असतात. बऱ्याच ठिकाणी घरातील देव तांदळाच्या टोपलीतही ठेवले जातात. अलीकडे शहरी संस्कृतीशी येणाऱ्या संपर्कातून काही वारली पाड्यांवर गणेशोत्सव साजरा केला जातो. त्रिकोण,चौकोन, वर्तुळ या भौमितिक मुलाकारांचा वापर करुन गणपतीची प्रतिमा सा...