पोस्ट्स

व्यक्तिमत्व लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मुख्याध्यापक दिनेश साळुंके अर्थात मदतीला धावून जाणारा खरा कोरोना योद्धा ! त्यांचा सत्कार म्हणजे सामाजिक भान असलेले सहृदयी व्यक्तिमत्वाचा सत्कार - प्रशांत जानी, डिस्ट्रिक गव्हर्नर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
कोरोना योद्धा सन्मान     कोरोना संचारबंदी,लाॅकडाऊन काळात नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात गरजू कुटुंबांना मदत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, खाजगी डाॅकटरांना पी.पी.ई. किटचे वाटप,माकस्चे मोफत वाटप, कोविड १९ आजारा संदर्भात जनजागृती करून अवरॅनेसचे काम, काळजी व उपाय संदर्भात सोशल मिडीया द्वारे माहिती प्रसिध्द केली.           २३ मार्चपासून सुरू असलेल्या लाॅकडाऊनमध्ये मुख्याध्यापक दिनेश साळुंके यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक गरजूंना मदत केली, मदतीसाठी मित्रपरिवारामार्फत गरजूंची माहीती घेत शक्यहोईल तितकी मदत पोहोचविली. शाळेला सुट्टी असूनही नंदूरबार व विखरण येथेच थांबणे पसंत केले, याची दखल घेत अनेक संस्थांनी त्यांचा कोविड योद्धा म्हणून प्रशस्तीपत्राद्वारे सत्कार केला. मात्र आंतरराष्ट्रीय रोटरी क्लब ऑफ नंदनगरी यांनी साळुंके यांचे कार्य फक्त प्रशस्तीपत्राने न करता महाराष्ट्र राज्याचे डिस्ट्रिक गव्हर्नर प्रशांत जानी यांच्या हस्ते केले. यावेळी जानी यांनी सांगितले की, साळुंके यांच्यासारखे मुख्याध्यापक म्हणजे सामाजिक भान असलेले सहृदयी व्यक्तिमत्व आहे.          आपासो.आ.ध.देवरे माध्यमिक विद्

नासिकच्या शिक्षकाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद !!! शैक्षणिक उपक्रम 'रविवारचा विरंगुळा" !!! कौतुक तर होणारच पण का ? उपक्रमाच्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नितीन प्रभू केवटे यांच्या ‘रविवारचा विरंगुळा’ या शैक्षणिक उपक्रमाची ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद            नासिक::-त्र्यंबकेश्वर येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचे शिक्षक नितीन प्रभू केवटे (जन्म ०२ नोव्हेंबर १९८९) यांनी प्रत्येक रविवारी मुलांना वर्गाबाहेरचे अनौपचारिक आणि व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी 'रविवारचा विरंगुळा' या आदर्श शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात केली. शिक्षण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया चार भिंतीच्या बंदिस्त खोलीत पूर्णत्वास येऊ शकत नाही. शिक्षण हे सहज निरीक्षणातून व कृतीतून घडते आणि समृद्ध होते. अनौपचारिक शिक्षणात व्यवसाय शिक्षण व जीवन शिक्षण देण्यासाठी मुलांच्या साह्याने शाळेत सिमेंटचा १२ x १४ फूट जागेवर ३ फूट उंच असा मजबूत किल्ला उभारला, सिंटेक्सच्या टाकाऊ टाकी पासून शौचालय निर्मिती, झाडाला सिमेंटचे चबुतरे, जुन्या लाईटच्या खांबाचा उपयोग करून हँडबॉल व व्हॉलीबॉल कोर्टची निर्मिती, शाळेतील टाकाऊ बँडच्या पत्र्यापासून घड्याळ व संख्यावाचन शैक्षणिक साहित्याची निर्मिती, गावातील भजनी मंडळाचा कार्यक्रम, मातीकाम, माळीकाम प्रशिक्षण, गावच्या पाणवठ्या

वय वर्षे फक्त ६८ ! विहिरीत जलयोग करणार्‍या योगपटू प्रकाश बेल्लद यांची ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
६८ व्या वर्षीही विहिरीत जलयोग करणार्‍या योगपटू प्रकाश बेल्लद यांची ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद कोल्हापूर::-कब्बुर येथील योगपटू प्रकाश बेल्लद (जन्म १९ एप्रिल १९५३) यांची ३३ वर्षांपासून जलयोगसाधना सुरू आहे. योगासनामध्ये जलयोग सर्वाधिक कठीण मानला जातो. पण, कब्बुर, तालुका चिक्कोडी येथील ६८ वर्षीय ज्येष्ठ योगपटू गेल्या ३३ वर्षांपासून १०० फूट खोल विहिरीत  जलयोग करत आहेत. पाण्यात सरळ थांबून केला जाणारा स्तंभासन हा योग प्रकार अवघड आहे. त्यासाठी खूप सराव करावा लागतो. आपली कला इतरांनाही शिकवण्यात योगपटू प्रकाश बेल्लद धन्यता मानतात. त्यांनी आजपर्यंत ५०० पेक्षा अधिक मुलांना पोहण्याचे व जलयोगाचे धडे दिले असून सध्या ते अत्यंत निरोगी जीवन जगत आहेत, पूर्वी ७७ किलो असलेले त्यांचे वजन आज ६४ किलो असून; त्यांनी आपली पत्नी सौ. जयश्री बेल्लद यांच्यासह देहदानाचा संकल्पसुद्धा केला आहे. योगपटू प्रकाश बेल्लद यांनी आपले संपूर्ण जीवन योगासाठी वाहून घेतले आहे. अन्य व्यक्ती जमिनीवर करत असणारी कठीण योगासने ते अगदी सहजरीत्या १०० फूट खोल विहिरीच्या पाण्यावर तरंगत करतात. यात पद्मासन, पर्वतासन, गरुडास

संजय देवधर- काय विशेषणे लावावीत या नांवापुढे,. चित्रकार, कलासमिक्षक, वारली शैली अभ्यासक, वार्ताहर, उपसंपादक, मुक्त पत्रकार, सहकारी, गुरू, बांद्रा स्कूल आॅफ आर्टचा विद्यार्थी, जे जे स्कूल ऑफ आर्ट चा विद्यार्थी, कलाविषयक संस्थांचे विश्वस्त, वारली चित्रसृष्टी या मराठी पुस्तकाचे लेखक की वारली आर्टवर्ल्ड या इंग्रजी पुस्तकाचे लेखक, आदर्श पती, आदर्श पिता वगैरे अपुरी पडतील !! नासिकच्या कलाक्षेत्रातील एक सुवर्णाक्षरांनी कोरलेले नांव-अभिमान नासिककरांचा !!! आज वयाची एकसष्टी पुर्ण करीत आहेत, या व्यक्तिमत्वाला शब्दबद्ध केले अजय हातेकरांनी !!! प्रेरणेचा स्त्रोत वाचायलाच हवा, यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!! न्यूज मसाला परीवाराकडून नासिकच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा- संपादक, नरेंद्र पाटील

इमेज
अष्टपैलू व्यक्तिमत्व !   चित्रकार, कलासमीक्षक, वारली चित्रशैलीचे अभ्यासक, वार्ताहर, उपसंपादक आणि सेवानिवृत्ती नंतर आता मुक्त पत्रकार एवढे सगळे पैलू एकाच व्यक्तीत असणे विरळाच. सहकारी व गुरु या दोन्ही नात्यांनी आमचे ऋणानुबंध जुळले. ज्येष्ठ स्नेही, मार्गदर्शक संजय देवधर दि.१३ जुलै रोजी वयाची ६१ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांच्यातील मला भावलेल्या व्यासंगी व्यक्तिमत्वाचे हे शब्दचित्र...        नाशिकमध्ये मध्यमवर्गीय परिवारात संजय देवधर यांचा १३ जुलै १९५९ रोजी जन्म झाला. त्यांचे पणजोबा प्राणाचार्य कृष्णशास्त्री देवधर प्रख्यात वैद्य होते. त्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली होती. रविवार पेठेतील त्यांचा वाडा असलेल्या गल्लीला तत्कालीन नगरपालिकेने सन्मानार्थ देवधर गल्ली असे नाव दिले. अशा घराण्यात जन्मलेल्या संजय देवधर यांना चित्रकलेची उपजत आवड होती. पेठे विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याचे त्यांनी ठरवले. नाशिक कलानिकेतन या संस्थेत एक वर्षाचा फाउंडेशन कोर्स त्यांनी पूर्ण केला. नंतर उपयोजित कलेचे उच्चशिक्षण घेण्यासाठी मुंबईतील बांद्रा स्कुल ऑफ आर्ट व ज