पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रविवारी मोहम्मद रफींच्या स्मृतीदिनी तेरी आँखो के सीवा... संगीत मैफल

इमेज
रविवारी मोहम्मद रफींच्या स्मृतीदिनी  तेरी आँखो के सीवा... संगीत मैफल         नाशिक ( प्रतिनिधी )::-लोकप्रिय गायक मोहम्मद रफी यांची रविवारी (दि. ३०) ४३ वी पुण्यतिथी आहे त्यानिमित्त सूर शारदा म्युझिकल फाउंडेशनतर्फे गायक घनश्याम पटेल यांनी 'तेरी आँखो के सीवा' या संगीत मैफलीचे आयोजन केले आहे. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सायंकाळी ६ वाजता ही विनामूल्य मैफल होईल.          मोहम्मद रफींनी हजारो सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांना बहाल केला आहे. त्यातील निवडक गाणी प्रमुख गायक घनश्याम पटेल यांच्यासह संजय डेरे, प्रकाश रत्नाकर, मनोहर देवरे, अमित गुरव सादर करणार आहेत. त्यांना गायिका स्मिता पांडे, उर्मिला शिंदे, नीता पवार स्वरसाथ करतील. संगीत संयोजन गायक नंदकुमार देशपांडे यांचे आहे. संगीतसाथ अमोल पाळेकर व सहकारी करतील. पवन वंजारी तांत्रिक बाजू सांभाळणार असून उस्मान पटणी‌  निवेदनाद्वारे रफींच्या सुरेल कारकिर्दीचा आढावा घेतील. सर्व रसिकांनी उपस्थित राहून सुवर्णमयी काळातील सुमधूर गाण्यांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर ! उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान !

इमेज
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर ! उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान ! जिल्हाध्यक्षपदी रवींद्र पगार, शहराध्यक्षपदी रंजन ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्षपदी विष्णूपंत म्हैसधुणे, गोरख बोडके तर महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी बाळासाहेब कर्डक यांची नियुक्ती !             मुंबई,नाशिक::- राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून नाशिक शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी रवींद्र पगार, नाशिक शहराध्यक्षपदी रंजन ठाकरे,जिल्हा कार्याध्यक्षपदी विष्णूपंत म्हैसधुणे व गोरख बोडके यांची तर महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी बाळासाहेब कर्डक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

संशयास्पद लाखो रुपयांचा निम कोटेड युरीया पकडला, संशयितासह दोघांवर गुन्हा दाखल !

इमेज
संशयास्पद लाखो रुपयांचा निम कोटेड युरीया पकडला, संशयितासह दोघांवर गुन्हा दाखल !           नासिक::- स्थानिक गुन्हे अन्वेषण नाशिक शाखेने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रुद्राय हाॅटेल, निफाड येथे ट्रक क्रमांक एम. एच. १८ बी. एच. १७८६ मध्ये रक्कम रुपये ३५ लाख मुल्य असलेले संशयास्पद निम कोटेड युरीयाच्या ५० कि. ग्रॅ. च्या ४९३ गोण्या, निमकोटेड युरीयाच्या ४५ कि. ग्रॅमच्या ९ गोण्या, स्टीचींंग मशिन, चंबल फर्टीलायझस, कृभको व झुआरी या ५२९ रिकाम्या गोण्या, ट्रक असा मुद्देमाल जप्त करून निफाड पोलिस स्टेशन येथे जगन सुर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, नाशिक यांनी संशयीत व इतर २  विरोधात खत नियंत्रण आदेश १९८५,  जिवनावश्यक वस्तु कायदा १९५५ व भादंवि ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.          निफाड पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषण व कृषी विभागाच्या संयुक्त कारवाईमध्ये मोहन वाघ सर, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक व शहाजी उमप, पोलिस अधीक्षक, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली जगन सुर्यवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांनी सागर कोते, सहायक पोलिस निरीक्षक, नितेंद्र पानपाटील, विभागीय गुण

३५० वा राज्याभिषेक बोधचिन्हाचे लोकार्पण !

इमेज
३५० वा राज्याभिषेक बोधचिन्हाचे लोकार्पण !          मुंबई -नासिक::- “३५० वा शिवराज्याशिषेक” निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि महाराजांचे पराक्रम, शौर्य अधोरेखित करणाऱ्या बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनामनात व्हावा, जगभरात जेथे जेथे मराठी माणूस आहे तेथे या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी हा या मागील उद्देश आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रचार प्रसिद्धित शासकीय पत्रव्यवहारात सदर बोधचिन्हाचा वापर करण्याचा शासन निर्णय राज्यपालांच्या आदेशानुसार काढण्यात आला.           बोधचिन्हाचा सर्व शासकीय पत्रव्यवहारात, प्रचार- प्रसिद्धित कटाक्षाने वापर करण्यात यावा. शासकीय कार्यालयात दर्शनी भागात बोधचिन्ह चित्रित करण्यात यावे अशा सूचना सर्व क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.

शास्त्रीय गायक, मार्गदर्शक पं. शशिकांत मुजुमदार यांचे निधन, संगीतक्षेत्रात शोक व्यक्त !

इमेज
शास्त्रीय गायक, मार्गदर्शक पं. शशिकांत मुजुमदार यांचे निधन, संगीतक्षेत्रात शोक व्यक्त !                    नाशिक ( प्रतिनिधी ) पंडित शशिकांत मुजुमदार ( ८७) यांचे अल्पश्या आजाराने शनिवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, दोन बंधू असा मोठा परिवार आहे. काल  रविवारी सकाळी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने संगीतक्षेत्रात शोक व्यक्त होत आहे.         त्यांचा अल्प परिचय - शशिकांत मुजुमदार यांचा जन्म १९३७ साली नाशिक येथे झाला. वयाच्या सातव्या वर्षापासून संगीताची आवड असल्यामुळे त्यांच्या वडिलांनी विष्णू संगीत विद्यालयामध्ये स्व. त्रिवेदी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यास पाठवले. शालेय शिक्षण चालू असताना संगीताचे शिक्षण पण सुरु होते. इच्छा असूनही आर्थिकदृष्ट्या परिस्थिती नसल्याने मोठ्या गायकाकडे गुरुकुल पध्दतीने शिक्षण घेता आले नाही. मुंबईला पंडित फिरोज दस्तुर यांच्याकडे त्यांनी काही काळ मार्गदर्शन घेतले. पण तेही पुढे जास्ती दिवस जमले नाही. नंतर स्वतः कठोर रियाज करून किराणा घराण्याचे संगीत आत्मसात केले.  सुरवातीला जिल्हाधिकारी कार्यालयात

डॉ. ज्योती कदम यांना शिक्षण, साहित्य व संशोधनातील योगदानाबद्दल गुरुरत्न सन्मान २०२३ प्रदान !

इमेज
डॉ. ज्योती कदम यांना शिक्षण, साहित्य व संशोधनातील योगदानाबद्दल गुरुरत्न सन्मान २०२३ प्रदान ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक,                  बृजलोक साहित्य कला संस्कृती अकादमी आग्रा यांच्यावतीने शिक्षण, साहित्य आणि संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी नुकतेच डॉ. ज्योती कदम यांना 'गुरुरत्न सन्मान २०२३' या पुरस्काराने गौरविण्यात आले. बृजलोक साहित्य कला संस्कृती अकादमीचे अध्यक्ष मुकेशकुमार वर्मा, कार्याध्यक्ष राहुल परिहार, प्रीतम निषाद, रामसुरत बिंद, प्रकाश जडे, प्रशांत असनारे, आसावरी काकडे, मारुती कटकधोंड, अशोक तेरकर, विजया नेरकर, कृष्णा शेवडीकर, नागेश शेवाळकर, ऋचा थत्ते, प्रल्हाद लुलेकर, विशाल इंगोले, भास्कर बडे, दिनकर जोशी, मारुती सावंत, उर्मिला चाकुरकर, माधुरी चौधरी यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. डॉ. ज्योती कदम या मराठी, हिंदी भाषेच्या साहित्यिक असून त्यांची आठ पुस्तके प्रकाशित आहेत. यापूर्वीही त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

स्वयंप्रेरणा चित्रप्रदर्शन प्रेरणादायी-नीलिमाताई पवार

इमेज
स्वयंप्रेरणा चित्रप्रदर्शन प्रेरणादायी-नीलिमाताई पवार             नाशिक ( प्रतिनिधी )::-  करणने आपल्या कलेचा छंद जिवंत ठेवला. त्याने सातत्याने चित्रे रंगवून चित्रकलेत प्राविण्य मिळवले. त्याच्या पहिल्याच चित्रप्रदर्शनात याचा प्रत्यय येतो. त्याचा हा प्रयत्न इतर युवकांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन मविप्रच्या माजी सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी केले. स्वयंप्रेरणा चित्रप्रदर्शनाच्या उदघाट्नप्रसंगी त्या बोलत होत्या.    चित्रकलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न घेता करण धोंडगे या युवकाने स्वयंप्रेरणेने कलासाधाना सुरु ठेवली. कृषी अभ्यासक्रम शिकताना तो आपला छंद जपतो आहे. त्याचे पहिलेच  'स्वयंप्रेरणा' हे चित्रप्रदर्शन नाशिकरोडच्या पीएनजी कलादालनात भरविण्यात आले आहे. करण विलास धोंडगे सध्या नाशिकच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषीमहाविद्यालयात बीएससी ऍग्रीकल्चरच्या तिसऱ्या वर्गात शिकत आहे. तो सातत्याने चित्रे रंगविण्यात रमून जातो. त्याचे स्वयंप्रेरणा चित्रप्रदर्शन नाशिकरोडला पासपोर्ट ऑफिस शेजारी पु.ना. गाडगीळ कलादालनात दि. ३० जुलै पर्यंत दररोज सुरु राहील. सकाळी ११ ते रात्री ८ या

जिल्हा सरकारी व परिषद बॅंकेच्या निवडणूक वचननाम्यात दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करणार- नवनिर्वचित चेअरमन बाळासाहेब ठाकरे यांची घाेषणा !

इमेज
जिल्हा सरकारी व परिषद बॅंकेच्या निवडणूक वचननाम्यात दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करणार- नवनिर्वचित चेअरमन बाळासाहेब ठाकरे यांची घाेषणा !       नासिक( प्रतिनिधी)::- नाशिक  जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बॅंकेच्या सभासदांनी सहकार पॅनेलला २१-० अशी आघाडी देत निवडणूकीतील वचननाम्यावर जो विश्वास व्यक्त केला तो १०० टक्के पूर्ण करण्यात येणार आहे. बॅंकेच्या व सभासदांच्या हितासाठी आम्ही सर्व समविचारी असून नवनिर्वाचित संचालकांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे प्रतिपादन चेअरमन बाळासाहेब ठाकरे -पाटील यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.          सभासदांच्या मुलींसाठी बॅंकेमार्फत ‘सुकन्या विवाह याेजना’ हाती घेण्यात आली असून मसूदा तयार करण्यात येत आहे. या याेजनेंतर्गत सभासद कन्येच्या विवाहानिमित्त ११ हजार रूपयांचा निधी दिला जाणार आहे.               जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बॅंकेच्या निवडणूकीनंतर प्रथमच संचालक मंडळाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. सभासदांनी जाे विश्वास  दाखवला त्यास कधीही तडा जाऊ दिला जाणार नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. कर्जाचा व्याजदर कम

जिल्हा आरोग्य अधिकारी पदी डॉ. अभयकुमार धानोरकरांची नियुक्ती !

इमेज
जिल्हा आरोग्य अधिकारी पदी डॉ. अभयकुमार धानोरकरांची नियुक्ती !     छत्रपती संभाजीनगर : येथील जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभयकुमार धानोरकर यांची जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नुकतीच बढतीवर नियुक्ती झाली आहे.             डॉ. अभयकुमार धानोरकर हे छत्रपती संभाजीनगर येथील उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांचे पती असून ज्येष्ठ साहित्यिक उद्धव भयवाळ यांचे ते जावई आहेत.

अहिरे यांना राज्यशासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर ! सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव !!

इमेज
अहिरे यांना राज्यशासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर ! सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव !! ग्रामविकास विभागाच्या वतीने २०२० -२१ गुणवंत कर्मचारी पुरस्काराची घोषणा          नाशिक : ग्राम विकास विभागांतर्गत राज्य शासनाच्या तसेच पुरस्कृत अनेक योजना व प्रकल्प राबविले जातात, अशा काही योजना प्रकल्प राबवितांना संबंधित अधिकारी तसेच कर्मचाऱ्याचे प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य पणाला लागते. असे प्रकल्प पूर्ण करताना अधिकारी / कर्मचाऱ्यामधील विशेष वैयक्तिक कौशल्य व गुणवत्ता आढळून येते. अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याची योजना शासनाने ग्रामविकास व जलसंधारण विभाग, शासन निर्णय, दिनांक २ सप्टेंबर २००५ अन्वये सन २००५-२००६ पासून सुरु केली आहे. त्यानुषंगाने सन २०२० २०२१ यावर्षी ग्राम विकास विभागातील मंत्रालयातील (खुद) व क्षेत्रिय स्तरावरील गुणवंत अधिकारी कर्मचारी पुरस्काराची घोषणा ग्रामविकास विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक प्रदीप अहिरे यांची निवड गुणवंत कर्मचारी म्हणून करण्यात आली आहे.         नाशिक जिल्हा परिषदेत कार्यरत असताना त्यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेत

"श्री साखर व श्री मोदक महानैवेद्य" अर्पण सोहळा !!

इमेज
"श्री साखर व श्री मोदक महानैवेद्य" अर्पण सोहळा !!           नासिक (प्रतिनिधी)::- नासिक महानगर क्षेत्रातील श्री गजानन महाराजांचे भक्त मंडळे व संस्थेच्या वतीने सोमवार दि. २४ जुलै २०२३ रोजी श्री क्षेत्र शेगांव येथे साखर व मोदक महानैवेद्य अर्पण सोहळा संपन्न होणार आहे.         या पूर्वी ६ ऑगस्ट २०१९ साली नाशिक महानगर क्षेत्रातील सर्व भक्तांनी मिळून सुमारे साडेतीन लाख मोदकाचा महानैवेद्य अर्पण सोहळा शेगांव येथून पंढरपूर येथे जाणारी व परत येणारी पायदळवारीच्या वेळी श्री मोदक व त्यानंतर २०२० मध्ये झुणका-भाकरी महानैवेद्य अर्पण सोहळा संपन्न झाला होता.              साखरेबरोबरच मोदक महानैवेद्यही अर्पण करण्याचा संकल्प केलेला असून प्रत्येक भक्ताने किमान २१ मोदक, भक्तांनी संपुर्ण नांव व मो. नंबर ची यादी दि. २१ जुलै २०२३ पावेतो द्वारा- रविंद्र जोशी, ३ वेरोनिका सोसायटी, माधव काॅलनी, जनरल वैद्य नगर पोस्ट ऑफिस समोर, पौर्णिमा स्टाॅप, नासिक, येथे जमा करावे असे आवाहन रविंद्र जोशी, मिलिंद नाईक, अमोल शेळके, सौ. सुजाता करजगीकर, सतीश वावीकर, सतीश करजगीकर, सुमती जोशी, सौ. भाग्यश्री नाईक, विजय उदगीरकर, सं

Thanks Google, धन्यवाद गुगल, न्यूज मसालाच्या बातम्यांना गुगल रॅंकींग !

इमेज
धन्यवाद गुगल ! मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेच्या सामाजिक कार्याच्या बातमीला गुगलकडून प्रथम क्रमांकावर रॅंकींग करण्यात आले, न्यूज मसालाच्या अनेक बातम्यांचा समावेश गुगल रॅंकींग वर करण्यात आला आहे त्याबद्दल गुगलचे अभिनंदन व आभार ! बातमी बघण्यासाठी गुगलवर मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्था किंवा इतर रॅंकींग झालेल्या बातम्यांसाठी न्यूज मसाला किंवा News Masala  टाईप करा ! संपादक न्यूज मसाला, संपादक लोकराजा दिवाळी विशेषांक नासिक Thanks Google! News of the social work of Marathi patrkar sahitya Sanskritik sanstha  Google was ranked first,  News Masala's news has been included on Google Ranking and thank you for Google Ranking ! Type News Masala for News for News मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्था or for other rankings on Google!  Editor News Masala Editor Lokraja Diwali Issue  Nashik 

तक्रारदाराच्या घरी जाऊन लाच मागितली, पोलिस ठाण्यात महिला तलाठीसह तिघांवर गुन्हा दाखल !

इमेज
तक्रारदाराच्या घरी जाऊन लाच मागितली, पोलिस ठाण्यात महिला तलाठीसह तिघांवर गुन्हा दाखल !      नासिक::- साक्री तालुक्यातील रोजगांव येथील तलाठी श्रीमती ज्योती के. पवार, (वर्ग-3) सध्या नेमणूक-मंडळ अधिकारी, तामथरे मंडळ, ता. शिंदखेडा, जि. धुळे, तसेच संगणक आॅपरेटर योगेश कैलास सावडे, व कोतवाल छोटू जाधव यांनी तक्रारदाराच्या घरी लाचेची रक्कम घेण्याकरिता गेले व पंच साक्षीदारांसमोर पुन्हा मागणी केल्याने सदर तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           तक्रारदार यांचे वडिलांचे व भावाचे नावाने रोजगाव ता.साक्री जि.धुळे येथील शिवारात सर्वे क्र.155/62 व 155/63 या शेतीचे खातेफोड करून तीन्ही भावांचे नावाने सातबारा तयार करून देण्याचे मोबदल्यात एकूण ४००००/- रू. लाचेची मागणी करून स्वतः तक्रारदार यांचेकडून १००००/- व मार्च-२०२३ मध्ये तक्रारदार यांचे वडिलांकडून १००००/- असे एकूण २००००/- रूपये काम करून देण्याचे मोबदल्यात अगोदरच घेतले.       त्यानंतर दि. १८ एप्रिल रोजी तक्रारदार यांनी ला.प्र.वि. नंदुरबार कार्यालयात तक्रार दिलेनंतर पंच साक्षीदारासमक्ष पडताळणी केली असता आलोसे तलाठी श्रीमती ज्योती पवार यांन

लेखक रवींद्र भयवाल यांना कादंबरी लेखनाचा प्रथम पुरस्कार !

इमेज
लेखक रवींद्र भयवाल यांना कादंबरी लेखनाचा प्रथम पुरस्कार !                संभाजीनगर (प्रतिनिधी)::- प्रसिद्ध लेखक कै. सुहास शिरवळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुहास शिरवळकर परिवारातर्फे आयोजित आणि स्टोरीटेल इंडिया प्रायोजित कादंबरी लेखन स्पर्धेत लेखक रवींद्र भयवाल लिखित "मिशन गोल्डन कॅट्स" या कादंबरीची निवड परीक्षकांनी 'विजेती कादंबरी' म्हणून केली आहे. या कादंबरी लेखन स्पर्धेत एकूण एकवीस लेखक सहभागी झाले होते. रवींद्र भयवाल यांच्या या यशामुळे साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून तसेच समाजातील सर्व स्तरांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.                रवींद्र भयवाल यांची आतापर्यंत साहित्यातील विविध प्रकारात एकूण सहा पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यांना राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.            रवींद्र भयवाल हे छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ साहित्यिक उद्धव भयवाळ यांचे सुपुत्र असून चेन्नई येथे एका बहुराष्ट्रीय कंपनीत विभागप्रमुख आहेत.

लंडन पॅलेस बॅंक्वेट हॉलमध्ये सनातन वैदिक धर्मसभेतर्फे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन !Srimad Bhagwat story organized by Sanatan Vedic Dharma Sabha at London Palace Hall !

इमेज
लंडन पॅलेस बॅंक्वेट हॉलमध्ये सनातन वैदिक धर्मसभेतर्फे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन ! Srimad Bhagwat story organized by Sanatan Vedic Dharma Sabha at London Palace Hall !          नाशिक ( प्रतिनिधी ) : सनातन वैदिक धर्मसभा, नाशिक तर्फे पुरुषोत्तम अधिक मासात सर्व भागवत भक्तांना उत्तम फलप्राप्ती व्हावी, या उद्देशाने शनिवार दि. ५  ते १५ ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ४ ते ७ या दरम्यान श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेचे प्रमुख कथाकार विश्वविख्यात आचार्य महामण्डलेश्वर स्वामी विद्यानंद सरस्वती हे आहेत. तपोवनातील लंडन पॅलेस बॅक्वेट हॉलमध्ये हा सोहळा होणार आहे.               याप्रसंगी पत्रकार परिषदेत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी सांगितले की, धर्म शास्त्रानुसार प्रत्येक तीन संवत्सरांनंतर (तीन वर्षांनंतर)  पुरुषोत्तम मास येतो. या पुण्यप्रद महिन्यात जप, तपश्चर्या आणि दान केल्याने अनंत पुण्य प्राप्त होते. या महिन्यात श्री कृष्ण स्मरण , श्रीमद भागवत कथा श्रवण  तसेच श्रीराम कथा श्रवण याचे विशेष महत्त्व आहे. या महिन्यास लोकपरंपरेनुसार अधिकमास, पुरुषोत्तम मास असे संबोधले जाते, पुरुषोत्तम म

पाच हजारांची लाच स्वीकारताना महीला अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
पाच हजारांची लाच स्वीकारताना महीला अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ! नासिक::- सिन्नर येथील  उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, सिन्नर येथील परीरक्षण भूमापक आलोसे प्रतिभा दत्तात्रय करंजे यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.              तक्रारदार यांनी मनेगाव ता. सिन्नर येथे सिटी सर्वे नंबर १९७, १९८, १९९ असे तिन प्लॉट पत्नीचे नावे खरेदी केले होते. त्यावरील जुने मालकाचे नाव कमी करून तक्रारदार यांचे पत्नीचे नवीन नाव लावण्यासाठी तक्रारदार यांनी उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय सिन्नर येथे अर्ज केला होता. सदर नवीन नावाची नोंदणी व जुने नाव कमी करण्यासाठी आलोसे प्रतिभा करंजे यांनी रुपये ५०००/- लाचेची मागणी करून ती स्विकारली असता त्यांना त्यांचे कार्यालयात रंगेहात पकडण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.           सापळा अधिकारी, विश्वजीत जाधव पोलीस उप अधिक्षक, सहाय्यक सापळा अधिकारी परशुराम कांबळे, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो. हवा. प्रकाश डोंगरे, पो हवा. संतोष गांगुर्डे, पो. हवा. प्रणय इंगळे, म पो. कॉन्स्टेबल श्रीमती शितल सूर्

नाशिकमध्ये राष्ट्रीय वेदशास्त्र महापरिषद, वेदशास्त्र संस्कृत पुरस्कार वितरण !

इमेज
नाशिकमध्ये राष्ट्रीय वेदशास्त्र महापरिषद, वेदशास्त्र संस्कृत पुरस्कार वितरण !            नाशिक ( प्रतिनिधी )- येथील महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान, दक्षिणाम्नाय श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य महासंस्थान शृंगेरी, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक यांच्यातर्फे नाशिकमध्ये राष्ट्रीय वेदशास्त्र महापरिषद आयोजित करण्यात आली आहे.                        कुलगुरू प्रो. डॉ. हरे राम त्रिपाठी     दि.१३ जुलै रोजी पंचवटीतील सरदार चौकातून गोपाल मंगल कार्यालयात दुपारी १२.३० वाजता महापरिषदेला प्रारंभ होईल. दि.१४ रोजी महापरिषदेचे उद्घाटन प्रो. डॉ. हरे राम त्रिपाठी ( कुलगुरू, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक, नागपूर) यांच्या हस्ते होईल. गंगापूररोडवरील शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कूर्तकोटी सभागृहात वेदशास्त्र संस्कृत पुरस्कार प्रदान सोहळा होईल. प्रतिष्ठानचे सचिव व प्रधानाचार्य वेदाचार्य रवींद्र पैठणे निमंत्रक आहेत. दि.१३ रोजी दुपारी १२.३० वाजता गोपाल मंगल कार्यालयात महापरिषदेचे उदघाट्न सत्र होईल. त्यानंतर वैदिक संहिता, जन संज्ञापन व संतांची वेदनिष्ठा या विषयावर परिसंवाद

साप्ताहिक न्यूज मसाला, दि.०६ जुलै २०२३ चा नियमित अंक ! Weekly News Masala, Regular issue of 6 July 2023.

इमेज
साप्ताहिक न्यूज मसाला, दि.०६ जुलै २०२३ चा नियमित अंक ! Weekly News Masala, Regular issue of 6 July 2023.

तलाठ्यासह कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
तलाठ्यासह कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !      नासिक::- त्र्यंबकेश्वर येथील तलाठी संतोष शशिकांत जोशी, कोतवाल रतन सोनाजी भालेराव कोतवाल यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.           तक्रारदार यांनी जमीन खरेदी केली असून त्यांची सातबारा उताऱ्यावर नाव नोंदणी करून दिल्याच्या मोबदल्यात वरील दोन्ही आलोसे यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम दोन हजार रुपये आलोसे क्रमांक एक यांनी तलाठी कार्यालय त्र्यंबकेश्वर येथे पंच साक्षीदारास समक्ष स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले  असुन याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .              सापळा अधिकारी मीरा आदमाने, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक, सापळा पथक पो. ना. प्रवीण महाजन, पो. ना. नितीन कराड, पो. ना. प्रमोद चव्हाणके चालक पोहवा संतोष गांगुर्डे यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार, वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

बॅंकेच्या नवनिर्वाचित संचालकांच्या वतीने खासदार गोडसेंचा सत्कार !

इमेज
बॅंकेच्या नवनिर्वाचित संचालकांच्या वतीने खासदार गोडसेंचा सत्कार !           नासिक::- नासिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक लि.नासिक च्या झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनलने एकवीस-शून्य असे घवघवीत यश संपादन केले. या यशाचे श्रेय विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना देत त्यांचा सत्कार करण्यात आला.       सत्कार प्रसंगी चर्चा करताना संचालकांनी बॅंकेच्या सर्वांगिण प्रगतीसाठी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून उत्पन्नाच्या स्रोतावर कर वजावट केली जाते तर त्याच कर्मचाऱ्यांना त्यांच्याच ठेवींवर मिळत असलेल्या व्याजावर पुन्हा कर कपात होते. ती होऊ नये यासाठी खासदार गोडसे यांनी प्रयत्न करावेत असे साकडे घालण्यात आले.        गोडसेंच्या सत्कार प्रसंगी पॅनेलच्या वतीने नवनिर्वाचित सदस्य प्रमोद निरगुडे, रविंद्र आंधळे, बाळासाहेब ठाकरेपाटील, विक्रम पिंगळे, अजित आव्हाड, विजय देवरे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील १३८८ वी ग्रामपंचायत स्थापन !

इमेज
जिल्ह्यातील १३८८ वी ग्रामपंचायत स्थापन ! त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा ग्रामपंचायतीमधून गोधड्याचा पाडा ही नविन ग्रामपंचायत स्थापना          नाशिक - ग्राम विकास विभागाच्या शासन अधिसुचना दि. ३० जून २०२३ अन्वये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरे ग्रामपंचायतीमधुन गोधड्याचा पाडा ही स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली आहे. त्यानुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यात ८४ ऐवजी ८५ व नाशिक जिल्हा परिषदेमध्ये १३८७ ऐवजी १३८८ ग्रामपंचायती झाल्या आहेत. सदर ग्रामपंचायत स्थापन होणेबाबत सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सदस्य व इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे स्थानिक राजकारणी यांची मागणी व पाठपुरावा चालु होता.           ग्राम विकास विभाग, शासन निर्णय दि. १२ फेब्रुवारी २००४ व शासन परिपत्रक दि. ०२ सप्टेंबर २००६ नुसार तसेच वाघेरे येथील ग्रामसभा दि. २६ नोव्हें. २०२१ नुसार वाघेरा ग्रामपंचायतीचे विभाजन करुन गोधड्याचा पाडा स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत ठराव करण्यात आला होता व याबाबत गट विकास अधिकारी, पंचायत समिती त्र्यंबकेश्वर यांचेकडुन शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर नाशिक जिल्हा परिषद, स्थायी समिती दि.

जिल्हा माहिती अधिकारीपदी विलास बोडके रूजू !

इमेज
जिल्हा माहिती अधिकारीपदी विलास बोडके रूजू !         नाशिक, दिनांक ०३ जुलै २०२३ (जिमाका वृत्तसेवा)::- नाशिक जिल्हा माहिती अधिकारीपदी विलास बोडके यांची शासनामार्फत नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार आज विलास बोडके यांनी जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी माहिती अधिकारी अर्चना देशमुख, उपसंपादक किरण डोळस यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते             बोडके यापूर्वी धुळे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते. तत्पूर्वी ते जिल्हा माहिती अधिकारी म्हणून जळगाव, नंदुरबार येथे तसेच मालेगाव, नाशिक, पुणे आणि मंत्रालय, मुंबई येथे त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालया अंतर्गत विविध पदांवर सेवा बजावली आहे.

श्री शृंगेरी मठात गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात संपन्न !

इमेज
श्री शृंगेरी मठात गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात संपन्न !                नाशिक ( प्रतिनिधी ) पंचवटीतील श्री शृंगेरी मठात सोमवारी (दि. ३) गुरुपौर्णिमा महोत्सव व महर्षी वेदव्यास पूजन करण्यात आले. सकाळी ८ वाजता कार्यक्रमाला प्रारंभ झाला. गुरुवंदन, श्री गणेश पूजन, पुण्याहवाचन, एकावर्ती रुद्राभिषेक, श्री जगदगुरू आदि शंकराचार्य पादुका पूजन, महर्षी वेद व्यास प्रतिमा पूजन तसेच आद्य गुरुपरंपरेचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पौरोहित्य वेदमूर्ती रवींद्र पैठणे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष जोशी, मंगेश जोशी, प्रसन्न जोशी, श्रीपाद गायधनी, अंकित पांडे,  प्रणव कावळे, जीवन भटमुळे, सौरभ कापसे यांनी केले. मठाचे व्यवस्थापक रामगोपाल व्ही. अय्यर यांनी सर्वांचे स्वागत व पूजन केले.                  पंचवटीतील सरदार चौकाजवळ श्री श्रुंगेरी शंकराचार्य मठात साडेतीनशे वर्षांपासून जगद्गुरू शंकराचार्य दक्षिणाम्नाय श्रुंगेरी शारदा पिठाधीश्वर यांच्या पवित्र परंपरेतील दोन महासमाधी आहेत. आद्य शंकराचार्यांनी भारताच्या चार दिशांना चार मठांची स्थापना केली. त्याच परंपरेतील नाशिक येथील मठाची स्थापना पहिल्या बाजीराव पेशव्य

गुरुपौर्णिमेनिमित्त सांगितिक गुरूंना विद्यार्थ्यांकडून सरगम अर्पण !

इमेज
गुरुपौर्णिमेनिमित्त सांगितिक गुरूंना विद्यार्थ्यांकडून सरगम अर्पण !              नाशिक ( प्रतिनिधी ) संगीत, गायन, वादन,  नृत्य या ललित कलाक्षेत्रात गुरु-शिष्य परंपरेला सर्वोच्च स्थान आहे. नंदकुमार देशपांडे संचलित सरगम म्युझिक अकादमीमध्ये काल गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. सकाळपासून रात्रीपर्यंत माजी-आजी विद्यार्थ्यांनी येऊन आपल्या सांगितिक गुरूंना त्यांनीच शिकवलेली सरगम अर्पण केली.            पंचवटी कारंजाजवळ, लक्ष्मीबाळ सदन येथील सरगम म्युझिक अकादमीमध्ये यावेळी मनाली गर्गे, सुगंधा शुक्ल, वैशाली शुक्ल, सानिका जैन, प्रीती पाठक, चारुलता विसपुते, शालिनी विसपुते, नीलिमा टकले, सुवर्णा यादव, रवींद्र मानकर, अनुष अक्कर, सुभाष सावरेकर, प्रकाश रत्नाकर, धनंजय भावसार यांनी हार्मोनियम वादक आणि गायक नंदकुमार देशपांडे यांना उद्देशून गुरुभक्तीपर गाणे सादर केले. सर्व विद्यार्थ्यांनी गुरु परमात्मा परेशु..., माऊली गुरुमाऊली..., धाव धाव गुरु माऊली..., विठू माऊली तू..., भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे अशी अनेक भक्ती गीते  सादर करून गुरूंविषयी आपला आदरभाव व्यक्त केला. अकॅडमीतील सर्व विद्यार्थी आणि पालकही उपस्

लाच स्वीकारताना तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
लाच स्वीकारताना तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !          नंदुरबार::- तळोदा तालुक्यातील अमलपाडा येथील तलाठी नंदलाल प्रभाकर ठाकूर यांस तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.               तक्रारदार यांच्या जमिनीच्या गाव नमुना ७/१२ महसूल अभिलेख्यावर नाव र्नोंद करून दिले आहे. तक्रारदार यांचे नाव सातबारा उताऱ्यावर लाऊन देण्याच्या करून दिलेल्या कामाबाबत व नवीन नावाच्या सातबारा उताऱ्यावर सही शिक्का देण्याच्या मोबदल्यात लोकसेवक तलाठी नंदलाल ठाकूर यांनी दिनांक २६ जून रोजी तक्रारदार यांच्याकडून ५०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३०००/- रूपये लाचेची मागणी केली.         तसेच मागणी केलेली लाचेची रक्कम ३०००/- रूपये आज दि ०३ जून रोजी पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.                   सापळा अधिकारी श्रीमती माधवी स. वाघ, पोलीस निरीक्षक, पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक  राकेश आ. चौधरी, सह सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक समाधान म. वाघ, सापळा कार्यवाही व मदत पथक पोहवा/ विजय ठाकरे, पोहवा/वि

नाशिक जिल्हा सरकारी व परिषद बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सुरू असलेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सहकार पॅनल आघाडीवर..

इमेज
नाशिक जिल्हा सरकारी व परिषद बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सुरू असलेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सहकार पॅनल आघाडीवर.. पहिल्या फेरी अखेर मिळालेली मते सहकार पॅनल  अजित आव्हाड १६७५ सुनील गीते १५६३ विनोद जवागे १४३९ बाळासाहेब ठाकरे पाटील १५०८ विजय देवरे पाटील १६१२ निलेश देशमुख १५३७ प्रमोद निरगुडे १५८२ रवींद्र बाविस्कर १४८९ ज्ञानेश्वर माळोदे १५५९ महेश मुळे १५२५ भरत राठोड १५१२ जयंत शिंदे १४४४ तालुका प्रतिनिधी अभिजित घोडेराव १५९८ अमोल बागुल १६२३ रमेश बोडके १६३८ सचिन विंचूरकर १५७५ इतर मागास विक्रम पिंगळे १६०४ अनु जाती जमाती मोहन गांगुर्डे १६०२ विमुक्त जाती भटक्या जमाती  रवींद्र आंधळे १७२६ महिला राखीव  धनश्री कापडणीस १६२७ मंदाकिनी पवार १५९० समता पॅनल सर्वसाधारण  अमित आडके ११२१ दीपक अहिरे १०५० प्रशांत कवडे १००९ विजय खातळे ११३२ सुरेश चौधरी ९६७ राजेश निकुंभ ९७९ सुधीर पगार ११२४ अमित पाटील १०७५ सतीश भोरकडे ९९० गणेश वाघ १०८३ शशिकांत वाघ ९३४ प्रीतीश सरोदे ९१७ तालुका प्रतिनिधी प्रशांत गोवर्धने १११२ संदीप दराडे ११३८ हेमंत देवरे १०८० मिर्झा गफुर बेग इसाबेग ९७१ इतर मागास प्रवर्ग विजयकुमार

डॉ. शंकर अंदानी यांचा कृषी प्रेरणा जीवन गौरव पुरस्काराने गौरव ! दिड हजार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्त्वाचा सत्कार !! Dr. Shankar Andani is honored with the Agricultural Inspiration Jeevan Gaurav Award !

इमेज
डॉ.शंकर अंदानी यांचा कृषी प्रेरणा जीवन गौरव पुरस्काराने गौरव ! दिड हजार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्त्वाचा सत्कार !!      नासिक::- ॲग्रोकेअर कृषिमंच व कृषीभूषण ग्रोवर्स प्रोड्यूसर कंपनी लि. नाशिक प्रस्तुत कृषि दिन व ॲग्रोकेअर कृषिमंच च्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्ताने महाराष्ट्रातील कृषि उद्योजक व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी AGRIBIZ CONNECT 2023- हा १६ वा वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार २०२३ वितरण सोहळा नाशिक येथे उद्घाटक आम. नितीन पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.           आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना शालेय साहित्य व धान्य वाटप, ११ शेतकरी उत्पादक कंपनीचे लोगो अनावरण, AGROBIZ APP चे लॉंचींग यावेळी करण्यात आले.           कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, प्रमुख पाहुणे दिपक शिर्के (सुप्रसिद्ध अभिनेता मुंबई ), प्रमोद रसाळ, जितेंद्र शहा, राजेंद्र देवरे, भूषण परशराम निकम उपस्थित होते. या सोहोळ्याच्या आयोजक अॅग्रोकेअर कृषीमंचच्या संचालक रोहिणी पाटील होत्या. नाशिक येथील  हॉटेल पंचवटी प्राईड येथे हा सोहोळा उत्साहात संपन्न झाला.       

तलाठ्यास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले !!

इमेज
तलाठ्यास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले !!                नासिक::- इगतपुरी तालुक्यातील सांजेगांव व मुरंबी येथील तलाठी सचिन काशिनाथ म्हस्के यांस २०००० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.            तक्रारदार व त्यांचे इतर ३ भागीदार यांनी मिळून इगतपुरी तालुक्यात मुरंबी गाव येथे जमीन खरेदी केली आहे. सदर जमिनीच्या गाव नमुना ७/१२ महसूल अभिलेखावर् नोंद करून देण्याचे मोबदल्यात लोकसेवक तलाठी नामे सचिन काशिनाथ म्हस्के यांनी २००००/- रुपये ची लाचेची मागणी करून काल दि. १ जुलै रोजी २००००/- रुपये पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.              सापळा अधिकारी संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो. हवा. एकनाथ बाविस्कर, पो. ना. प्रकाश महाजन, पो. शि. नितीन नेटारे यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात

चौकीदार ते पद्मश्री - नामदेव कांबळेंचा प्रवास !२ जुलै रोजी प्रकाशक रेषा शिक्षण संस्थेच्या शिक्षण महर्षी डॉ. बाबा नंदनपवार यांच्या "सुंदर माझे घर" पुस्तकाचे प्रकाशनानिमित्ताने पद्मश्री नामदेव कांबळे नासिकला येत आहेत, त्यांच्या साहित्यिक प्रवासाचा प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी घेतलेला थोडक्यात धांडोळा !!

इमेज
चौकीदार ते पद्मश्री - नामदेव कांबळेंचा प्रवास ! २ जुलै रोजी प्रकाशक रेषा शिक्षण संस्थेच्या  शिक्षण महर्षी डॉ. बाबा नंदनपवार यांच्या "सुंदर माझे घर" पुस्तकाचे प्रकाशनानिमित्ताने पद्मश्री नामदेव कांबळे नासिकला येत आहेत, त्यांच्या साहित्यिक प्रवासाचा प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी घेतलेला थोडक्यात धांडोळा !!                १९९५ ला "राघव वेळ" या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आणि नामदेव कांबळे या लेखकाचा परिचय सर्व दूर झाला. तत्पूर्वी त्यांनी "अस्पर्श" नावाची कादंबरी लिहून प्रसिद्ध केली होती. या कादंबरीवर चर्चा झाली होती. समीक्षकांनी केलेल्या टीकेचा आणि सूचनांचा विचार करून राघव वेळ या स्त्रीप्रधान कादंबरीचे लेखन नामदेव कांबळे यांनी केले. या कादंबरीला मराठीतील साहित्य अकादमीबरोबर ह. ना. आपटे, बा.सी मर्ढेकर, ग.त्रं. माडखोलकर यांच्या नावाचे साहित्य पुरस्कार प्राप्त झाले होते. 'राघव वेळ' ही स्त्रीप्रधान कादंबरी नाही रे वर्गाचे प्रतिनिधित्व करणारी आहे. या कादंबरीची नायिका विधवा आहे. तिचा संघर्ष कादंबरीत नामदेव कांबळे यांनी मांडला. देशमुख आणि