पोस्ट्स

भारतीय लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कर्तव्यावर असताना दावचवाडीचा भूमिपुत्र शहीद ! उद्या होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! न्यूज मसाला परीवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली, जयहिंद, जयहिंद !!!!

इमेज
संतोष गिरी यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस, कर्तव्यावर असताना दावचवाडीचा भूमिपुत्र शहीद ! उद्या होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नासिक::- छत्तीसगड येथे १११ बटालियनमध्ये सेवेत असलेल्या आणि निफाड तालुक्यातील दावचवाडी येथील भूमिपुत्र राजाराम चिंधूबाबा कुयटे शहीद झाले आहेत.  कर्तव्यावर असताना गुरुवारी रात्री त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते.            याबाबत माहिती अशी की, छत्तीसगड येथे १११ बटालियनमध्ये सेवेत असलेल्या राजाराम चिंधूबाबा कुयटे कर्तव्यावर असताना गुरुवारी (दि. ९)  रात्री साडेअकराच्या सुमारास ह्रदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ४९ होते. उद्या शनिवार दि.११, सकाळी दावचवाडी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. राजाराम कुयटे यांना बालपणापासूनच देशसेवा करण्याची आवड होती. रानवड येथे त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. तर बारावीपर्यंतचे शिक्षण पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयात झाले. त्यानंतर लगेचच ते देशसेवेत रूजू झाले. राजाराम कुयटे यांनी गावातील मुलांना देखील देशसेवेचे धडे दिले होत