इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !


इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !
 नाशिक ( प्रतिनिधी ) इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग व एअर कंडीशनींग इंजिनिअर्स (इशरे) या संस्थेच्या नाशिक शाखेचा नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचा पदग्रहण व शपथग्रहण समारंभ  शनिवारी (दि. २०) एप्रिल रोजी हाॅटेल ग्रॅन्ड रिओ येथे करण्यात आला. शपथग्रहण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुप बालानी, उपाध्यक्ष मिहीर संघवी, पश्चिम विभागीय व्यवस्थापक  मनीष गुलालकरी उपस्थित होते. 

   नवनिर्वाचित अध्यक्ष अशफाक कागदी, उपाध्यक्ष वरुण तिवारी, सचिव अनिकेत चौधरी, खजिनदार अनिता बोराडे व कार्यकारिणी सदस्य  गुलाम हुसेन, प्रविण कामाले, प्रविण पातुरकर, सारंग दिडमिशे, रोहिणी मराठे, शामसुंदर कापसे यांनी शपथ घेतली. संस्थेचे मावळते अध्यक्ष गोविंद नायर यांनी  २०२३ - २४ या वर्षातील संस्थेच्या कार्यक्रमांचा आढावा घेतला व विविध उपक्रमातील सहकार्याबद्दल मावळत्या संचालक मंडळाचे आभार मानले. नवनिर्वाचित अध्यक्ष अशफाक कागदी यांनी आगामी संकल्पित कार्यक्रमांची रूपरेषा विषद केली.  
    यावेळी इतर सोसायटीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली. आग्नेय आणि सुरक्षा संघटनेचे अध्यक्ष हर्षद भामरे, इंडियन प्लंबिंग असोसिएशनचे अध्यक्ष  मिलिंद शेटे, आर्किटेक्ट आणि इंजिनिअर्स संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र भुसे यांची विशेष उपस्थिती होती. संस्थेच्या सभासदांनी तसेच मुंबई, ठाणे, पुणे आणि औरंगाबाद शाखांच्या प्रतिनिधींनी शुभेच्छा दिल्या. इशरे संस्थेच्या होणाऱ्या उपक्रमांच्या अधिक माहितीसाठी कृपया www.ishrae.in‌ या ई पत्यावर भेट द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !