जिल्हा परिषदेत ५८ कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पदोन्नत्या ! कुटुंबप्रमुखच्या भूमिकेत मुख्य कार्यकारी अधिकारी !!
जिल्हा परिषदेत ५८ कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पदोन्नत्या ! सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, ग्रामविकास अधिकारी पदी बढती नाशिक : मागीलआठवड्यात अनुकंपा व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेत समावेश केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्हा परिषद सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी आनंदराव पिंगळे व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांना कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या होत्या, त्यानुषंगाने जिल्हा परिषदेत सेवेतील वरिष्ठ सहायक पदावरील कर्मचाऱ्यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर १६ तर कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावरून सहायक प्रशासन अधिकारी ०६ तर ग्रामसेवक पदावरून ग्रामविकास अधिकारी या पदावर ३६ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली, यावेळी महिला, वयोवृद्ध, दिव्यांग, दुर्धर आजाराने त्रस्त, पती पत्नी एकत्रीकरण यांच्याबाबत पदोन्नती देताना सहानुभतीपूर्वक विचार करण्यात आला. असे आहेत पदोन्नती झालेले कर्मचारी - सहायक प्रशासन अधिकारी पाठक वृषाली दिलीप जाधव ललिता ज्ञानेश्वर भुजबळ राजे...