संपूर्ण जिल्ह्यात १५ ते ३१ डिसेंबर दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार- अध्यक्ष ना. बाळासाहेब क्षीरसागर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आज झालेल्या शिबिरात रक्तदान करून महीला वर्गापुढे एक आदर्श निर्माण केला ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!
जिल्हा परिषदेत रक्तदान शिबीर संपूर्ण जिल्ह्यात १५ ते ३१ डिसेंबर दरम्यान राबवली जाणार मोहीम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनीही केले रक्तदान नाशिक : जिल्हा परिषदेतर्फे मंगळवार दि. १५ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या कै. रावसाहेब थोरात सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील सरकारी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा भरुन काढण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यात १५ ते ३१ डिसेंबर या काळात टप्प्या-टप्प्याने रक्तदान शिबीर घेण्याचा मनोदय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी व्यक्त केला होता. या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात दिनांक १५ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद, नाशिक व जिल्हा शासकीय रुग्णालयाची शासकीय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर पार पडले. या रक्तदान शिबिरात ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसो