बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है !आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय गणिती रामानुजन यांच्या मते मैत्री २२० आणि २८४ प्रमाणे असते ! राॅबीन डनबार यांचे मैत्रीसाठी सांख्यिकीय विश्लेषण !

बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है ! ‘ दिए जलते है , फूल खिलते है , बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है ! ’ १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या नमकहराम चित्रपटातील गीतकार आनंद बक्षी यांचे हे गीत , अगदी समर्पक आणि अर्थपूर्ण आहे . ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार ( यंदा दि . ७ ऑगस्ट ) म्हणजे तरुणाईचा आवडता ‘ फ्रेंडशिप डे ’ अर्थात मैत्री दिन . या दिवशी विविध रंगांचे धागे एकमेकांच्या हातावर बांधून मैत्रीचे संदेश एकमेकांना पाठविले जातात . या संदेशांमधून मैत्रीच्या वेगवेगळ्या व्याख्या वाचावयास मिळतात . त्यापैकी संकटात जो पाठीशी उभा राहतो , तोच खरा मित्र असतो , अशी मित्राची व्याख्या बहूतेकांनी केलेली पहावयास मिळते . तथापि , ‘ संकटकाळी मदतीस येतो तो खरा मित्र नसून ज्याला आपल्या मित्राच्या उन्नतीतून खरा आनंद मिळतो , तोच खरा मित्र असतो ’ अशी मैत्रीची अचूक व्याख्या हिंदी कवी कमलेश्वर यांनी केली आहे . एकदा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय गणिती रामानुजन यांना त्यांच्या मित्रांनी मैत्रीची व्याख्या विचारली असता , त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मित्रता