रेडीमिक्स ची गुलाबी हवा ८ फेब्रुवारी पासून !!! एका दिवसात ३.५ लाखांहून अधिक लोकांची पसंती !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
‘रेडीमिक्स’ची गुलाबी हवा ८ फेब्रुवारी पासून! एका दिवसात ट्रेलरला ३.५ लाखांहून अधिक लोकांची पसंती!! प्रेमाचं जाळ विणण्यासाठी ‘हिवाळा’ म्हणजे प्रेमवीरांसाठी समृद्धीचा काळ’ आणि त्यात सोनेपे सुहागा म्हणजे फेब्रुवारी मधला व्हेलेंटाईन डे! प्रेमाची कोरी पाटी असलेल्या प्रेमवीरांच्या यशकिर्तीचे नवनवे सोपान गाठण्याचा सुवर्णदिन. हे औचित्य साधून या वर्षी खास युथसाठी प्रस्तुतकर्ते अमेय विनोद खोपकर, निर्माते प्रशांत घैसास, सुनिल वसंत भोसले, ख्यातनाम लेखक शेखर ढवळीकर आणि दिग्दर्शक जालिंदर कुंभार‘रेडीमिक्स’चं वेड लावणार आहेत. आणि हे सरप्राईज म्हणजे लव्हरबॉय वैभव तत्ववादी, गुलाबी क्वीन प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी यांचा ट्रिपल ‘रेडीमिक्स’ धमाका. तरुणाईला झिंग लावणारी प्रार्थना आणि वैभव तत्ववादीच्या जोडीला नेहा जोशीची बिनधास्त अदाकारी व्हेलेंटाईन डेच्या एक आठवडा आधीपासूनच म्हणजे ८ फेब्रुवारी पासून सर्वांना एन्जॉय करता येणार आहे. काही जण खूप विचार करून कृती करतात, पण विचार कुठे थांबवायचा आणि कृत...