दीपोत्सवाने साजरी केली अहिल्यादेवी जयंती ! नाशिक जिल्हाध्यक्ष नवनीत वजीरे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
दीपोत्सवाने साजरी केली अहिल्यादेवी जयंती ! नाशिक जिल्हाध्यक्ष नवनीत वजीरे नाशिक दि.३१::- प्रतिनिधी धनगर समाजाचे आराध्य दैवत शूर मर्दांगिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती संपूर्ण भारतात दरवर्षी मोठ्या आनंदात व हर्ष उत्साहात साजरी केली जात असते, यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९५ वी जयंती आज रविवार दि ३१ मे २०२० रोजी साजरी करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. जागतिक महामारी कोरोना कोविंड १९ मुळे सर्व जगावर मोठे संकट आले आहे आपल्या भारत देशात आपले बांधव भगिनी या कोरोना महामारी ला बळी पडत आहेत. त्यामुळे संपूर्ण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाँकडाउनची घोषणा केली आहे, अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व समाज बांधवांनी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आपल्या घरीच दिवे लावून व आपल्या घरावर पिवळा झेंडा उभारून साजरी केली. धनगर समाज संघर्ष समिती चे नाशिक जिल्हा अध्यक्ष नवनीत वजीरे व जिल्हा सचिव आबासाहेब टरपले यांनी एका पत्रकाद्वारे जयंती घरीच साजरी करण्याचे आवाहन केले होते. ...