महाराष्ट्र पोलीस बाँईज असोसिएशचा शेतकरी पुत्राच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठींबा ! जाणीव-शेतकऱ्यांप्रती पोलीस बाँईजची, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
शेतकरी पुत्राच्या अन्नत्याग आंदोलनाला महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन विद्यार्थी आघाडीचे समर्थन _________________________________ अकोला :- शेतकरी पुत्राच्या अन्नत्याग आंदोलनाला महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या विदयार्थी आघाडीने समर्थन दिले आहे. उरळ येथील शेतकरी पुत्र गोपाळ अंबादास पोहरे यांनी 25 ऑक्टोबर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी या आधीही मोबाईल टॉवर वर चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते. मागच्या वर्षी कपाशी वर आलेल्या बोंडअळीचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर न जमा केल्यामुळे आणि शिवाजी महाराज पिक विमा योजनेचे नाव बदलण्यासाठी पोहरे हे आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज असोसिएशन विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुषार ताले यांनी त्यांना भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला जाहीर समर्थन दिले आहे. यावेळी संदिप शेळके, राम निंबकर, विशाल खेळकर, सागर निंबेकर, सागर जामोदे, गौरव उमाळे आणि अतुल ताले यांच्या सह असोसिएशनचे समस्त पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. द्वारा-किरतकार 9665382780