पोस्ट्स

विकासात्मक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पंधराव्या वित्त आयोगाच्या पहिल्या हप्त्यापोटी ग्रामपंचायतींना रुपये ६५ कोटी वितरीत – बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद. निधी तत्काळ ग्रामपंचायत स्तरावर वितरीत करून जनहिताचे कामे विहित मुदतीत करणार- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नासिक. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
पंधराव्या वित्त आयोगाच्या पहिल्या हप्त्यापोटी ग्रामपंचायतींना रुपये ६५ कोटी वितरीत –  बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद, नाशिक         नाशिक (नरेंद्र पाटील)::- जिल्हा परिषदेस पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत निधी प्राप्त झाालेला आाहे. प्राप्त निधीतुन ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना तर जिल्हा परिषद १० टक्के व पंचायत समित्यांना १० टक्के निधी वितरीत करण्याबाबत शासनाच्या सुचना आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून पहिल्या हप्त्यापोटी रुपये ८२ कोटी ४ लाख ३७ हजार रुपये प्राप्त झालेले आहेत. नाशिक जिल्हयातील १३८५ ग्रामपंचायतींना शासन निर्देशानुसार रुपये ६५ कोटी ६३ लाख ४९ हजार रुपये पहिला हप्ता वितरीत करण्यात आलेला आहे. ग्रामपंचायत स्तरावरील निधीच्या वितरणाचे नियोजन, संनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची असणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर विकास कामांचा निधी उपलब्ध नसल्यामुळे कृती आराखड्यातील मंजुर असलेली विकास कामे सुरु करण्यास विलंब होत होता. नाशिक जिल्ह्यात माहे मार्च २०२० पासुन आजतागायत कोविड - १९ च्या प्रादुर्भाव ल

"लोकराजा" संपादक नरेंद्र पाटील यांचा सत्कार संपन्न ! दिवाणखान्यात स्थान मिळविलेला दिवाळी विशेषांक - ना. बाळासाहेब क्षीरसागर. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नामदारांनी केला न्यूज मसाला संपादकाचा सत्कार ! न्यूज मसाला चा प्रसिद्ध दिवाळी विशेषांक "लोकराजा" यांस आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना २०१९ चा उत्कृष्ट विशेषांक पुरस्कार जाहीर झाला यानिमित्ताने नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना. बाळासाहेब क्षीरसागर यांनी संपादक नरेंद्र पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अशोक मस्के व इतर मान्यवर उपस्थित होते.        सत्कारप्रसंगी नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षीरसागर यांनी सांगितले की "लोकराजा" दिवाळी विशेषांक हा सामाजिक भान ठेवत आपली वाटचाल करीत आहे. आजपर्यंतच्या प्रकाशित झालेल्या "लोकराजा" दिवाळी अंकातील साहित्य खऱ्या अर्थाने आबालवृद्धांना सामावून घेणारे व भारत सरकारच्या लोकसभा तथा राज्यसभा सदनात नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना "लोकराजा" दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर स्थान देण्याची परंपरा कायम राखत असल्याने प्रत्येक वाचकाच्या घरातील दिवाणखान्यात स्थान मिळवणारा विशेषांक ठरला आहे. भविष्यात "लोकराजा" दिवाळी अंकाची ही परंपरा कायम राखावी व समाजाल

जनसुविधा योजने अंतर्गत निधी वेळेत खर्च करा - बाळासाहेब क्षिरसागर ! न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
जनसुविधा योजने अंतर्गत निधी वेळेत खर्च करा - बाळासाहेब क्षिरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद, नाशिक             नाशिक - नाशिक जिल्हा परिषदेने सन २०१९-२० या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात जनसुविधा योजने अंतर्गत कामे प्रस्तावित करुन जिल्हा नियोजन मंडळास सादर केलेली होती. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरावरील कामांची निकड, लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या प्रमाणात जनसुविधेची कामे मंजुर करण्यात आली होती. सदर योजनेत मंजूर कामांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे, स्मशानभूमी बांधकाम करणे, दफनभूमी बांधकाम करणे, दशक्रिया विधी शेड बांधकाम करणे व तत्सम अनुषंगिक कामे आदी कामांचा समावेश असून यासाठी रुपये (२६,५७,७६,०००/-) सव्वीस कोटी सत्तावन्न लक्ष शहात्तर हजार रकमेची २५७ जनसुविधेची कामे मंजुर करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यात माहे मार्च २०२० पासुन आजतागायत कोविड - १९ च्या प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागात विकास कामांवर मोठा परिणाम झालेला होता. ग्रामपंचायत स्तरावर विकास कामांचा निधी उपलब्ध नसल्यामुळे मंजुर असलेली विकास क

करंजगाव येथे आज दि.१० विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण ! आमदार अनिल कदम यांच्या हस्ते, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थितीत !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक 7387333801.

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस करंजगाव येथे आज दि.१० विविध विकासकामांचे भूमिपूजन व  लोकार्पण         नासिक::-निफाड तालुक्यातील गोदाघाट परिसरात निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या विशेष प्रयत्नाने करंजगाव येथे साकारलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन आज सोमवार दि १० ऑगस्टला करंजगाव ग्रामपालिका पटांगणात सकाळी १० वाजता होणार आहे. माजी आमदार अनिल कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष  नामदार बाळासाहेब क्षीरसागर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती अनुसया जगताप, उपसभापती शिवा पाटील सुरासे, गट विकास अधिकारी संदीप कराड, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, पंचायत समिती सदस्या कमलताई शहाजी राजोळे, भास्करदादा राजोळे, कचरू राजोळे, सागर जाधव, रमेश राजोळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.              माजी आमदार अनिल कदम यांच्या विशेष प्रयत्नाने करंजगावी प्रगतीपथावर काम सुरू असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत एक कोटी ६८ लक्ष रुपयांच्या नळपाणीपुरवठा योजनेचे भूमिपुजन यावेळी करण्यात येणार आहे.