पोस्ट्स

#beti bachavo beti padhavo #बेटी बचावो बेटी पढावो. #ashima mittal #news masala लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जिल्हाभरात 'मुलगी वाचवा, मुलगी शिकवा' जनजागृती अभियानाला सुरवात !

इमेज
जिल्हाभरात 'मुलगी वाचवा, मुलगी शिकवा' जनजागृती अभियानाला सुरवात ! १ ते ८ मार्च दरम्यान चित्ररथ आणि पथनाट्यातून होणार जनजागृती !         नाशिक : जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांना महिला दिनानिमित्त जनजागृती अभियान राबविण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुषंगाने जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्हाभरात मुलगी वाचवा, मुलगी शिकवा (बेटी बचाव, बेटी पढाओ) अभियान राबवण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आरोग्य विभागास दिले होते त्यानुसार "मुलगी वाचवा, मुलगी शिकवा" अभियानाला (बेटी बचाव, बेटी पढाओ) झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. या माध्यमातून दि.०१ मार्च ते ०८ मार्च महिला दिनापर्यंत जिल्ह्यात आरोग्य विभाग व अण्णाभाऊ साठे बहुद्देशीय सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चित्ररथ आणि पथनाट्याद्वारे जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार आहे. या चित्ररथाला मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी हिरवा झेंडा दाखवत शुभेच्छा दिल्या. पथनाट्य समूहाने जिल्हा परिषद आवारात अधिकारी व कर्मचारी यांच्यासमोर पथनाट्याचे सादरीकरण करत मुलगी वाचवा,