पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नासिक जि. सरकारी व परिषद कर्म. सह. बँक नि. नासिक निवडणूक -सहकार पॅनेलला सर्वसमावेशक प्रतिसाद !

इमेज
नासिक जि. सरकारी व परिषद कर्म. सह. बँक नि. नासिक निवडणूक - सहकार पॅनेलला सर्वसमावेशक प्रतिसाद ! नासिक::- नासिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित, नासिक बॅंकेच्या २०२३-२८ या पंचवार्षिक निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही बाजूंनी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत.             सत्ताधारी समता पॅनलचे अनेक विद्यमान संचालक सहकार पॅनेलच्या गोटात आल्याने समता पॅनलला पराभव डोळ्या समोर दिसत असल्याने त्यांनी आता वेगवेगळे डाव आखण्यास सुरवात केलेली आहे असे सहकार पॅनलच्या वतीने सांगण्यात येत आहे. सहकार पॅनेलमधील काही प्रमुख नेत्यांशी संपर्क साधून आमिश दाखवण्यास सुरवात केलेली आहे. "आम्ही तुम्हाला काय कमी केले, आमच्याकडे या, तुम्हाला हवे ते देतो" तसेच रोज सहकार विभागाला सहकार पॅनेलच्या विरोधात मुद्दा शोधून पत्रव्यवहार केला जात असून सहकार पॅनल कसा अडचणीत आणता येईल याबाबत प्रयत्न केले जात आहेत, उच्च न्यायालयात दावा दाखल करण्याचे नियोजन सुद्धा करण्यात येत असल्याची शंका सहकार पॅनेलकडून व्यक्त केली जात आहे. प्रचारावर भर न देता सहकार पॅनल मध

Senior technician in the network of bribery department while accepting bribe of Rs. 30000 ! वरिष्ठ तंत्रज्ञ ३०००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
वरिष्ठ तंत्रज्ञ ३०००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !        नासिक::- विद्युत उप केंद्र जोरण ता. सटाणा येथील वरिष्ठ तंत्रज्ञ हेमंत विठ्ठल खैरनार उर्फ पप्पू यांस ३०००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.           तक्रारदार हे शेतकरी असून त्यांचे शेता जवळील सार्वजनिक डीपी जळाल्याने शेतातील डाळिंब बागेचे पाण्याशिवाय नुकसान होत असल्याने वायरमन पप्पू खैरनार यांनी शेतीसाठी सार्वजनिक इलेक्ट्रिक नवीन डीपी बसवून देण्याचे मोबदल्यात ३००००/- रुपये व केबल लावण्याचे मोबदल्यात २०००/- रुपये असे एकूण ३२०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती ३० हजार रुपये स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.           सापळा अधिकारी श्रीमती साधना इंगळे, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो.हवा.सचिन गोसावी, पो.हवा. प्रफुल्ल माळी, चा.पो.हवा. विनोद पवार यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्

पोलिस शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
पोलिस शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !      नासिक::- पोलिस शिपाई, तालुका पोलिस ठाणे, मालेगाव येथील करण गंभीर थोरात यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.           यातील तक्रारदार यांचे बहिणीविरुद्ध  दारू बंधी कायद्या अंतर्गत मालेगाव तालुका पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोद करण्यात आला होता.त्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्या करीता  तक्रारदार कडून  ४०००/- रुपये लाचेची मागणी  करून रुपये ४०००/- लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना आलोसे रंगेहात मिळून आले म्हणून त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .                        सापळा अधिकारी- साधना बेलगावकर, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पोह चंद्रशेखर मोरे, पोह पंकज पळशीकर, पोना दीपक पवार यांनी सौ.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

सहा. पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
  सहा. पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !           नासिक::- येवला तालुका पोलिस ठाण्यातील सहा. पोलिस उपनिरीक्षक विजय नारायण शिंदे, नाशिक ग्रामीण यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.                तक्रारदार यांचे पत्नीने येवला तालुका पोलिस स्टेशन येथे दिलेल्या एनसी वरून सामनेवाले यांचेवार कारवाई करण्यासाठी व तक्रारदार त्यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या एनसी व तक्रार अर्जानुसार दखलपात्र गुन्हा दाखल न करण्याचे मोबदल्यात बक्षीस म्हणून ४०००/- रुपये लाचेची मागणी  करून त्यातील पहिला हप्ता रुपये ३०००/- लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना आलोसे रंगेहात मिळून आले म्हणून त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .                          सापळा अधिकारी वैशाली पाटील, पोलीस उप अधीक्षक, सापळा पथक पोना राजेश गिते, पोना शरद हेंबाडे, पोना अनिल राठोड यांनी सौ.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !       नासिक::- आलोसे ग्रामसेवक गुलाब रामदास चौधरी, जामन्यापाडा ग्रामपंचायत, पंचायम समिती शिरपुर ता. जि. धुळे यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली.            तक्रारदार हे जामन्यापाडा ता शिरपुर येथील रहीवाशी असुन त्यांच्या आत्याचा जन्म दि.०१/०५/१९६८ रोजी मौजे जामन्यापाडा, ता. शिरपुर येथे झाला असुन त्यांचे आजोबा अशिक्षित असल्याने त्यांच्या जन्माची नोंद केली गेली नव्हती त्यांची जन्माची नोंद होणे करीता तक्रारदार यांची आत्याने शिरपुर येथील मे ज्युडीशिअल मॅजि वर्ग ०१ यांच्या न्यायालयात जन्माची नोंद होणे करीता फौजदारी किरकोळ अर्ज नं ४७२/२०२२ दाखल केला होता. सदर अर्जावर सुनावणी होवुन मा. न्यायालयाने तक्रारदार यांच्या आत्याची जन्माची दप्तरी नोंद घेणे बाबत दि.१४ आक्टो.२०२२ रोजी आदेश पारित केले आहेत. त्याप्रमाणे तकारदार यांनी आत्याच्या जन्माची दप्तरी नोंद होणे करीता दि. १६ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय, जामन्यापाडा येथे जावुन मा. न्यायलयाच्या आदेशांची प्रत जोडुन अर्ज ग्रामसेवक गुलाब चौधरी यांच्याकडे जमा केला होता. त्यावेळी त

माझी वसुंधरा अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी - आशिमा मित्तल यांचा सन्मान !सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना राज्यस्तरीय बक्षीस !!

इमेज
माझी वसुंधरा अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी - आशिमा मित्तल यांचा सन्मान ! सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना राज्यस्तरीय बक्षीस !! न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक ७३८७३३३८०१            नाशिक: पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या 'माझी वसुंधरा ३.०' २०२२-२३ स्पर्धेतील मानकऱ्यांना मुंबई येथे पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्रयाच्या हस्ते गौरविण्यात आले. या अभियानात सलग तिस-या वर्षी नाशिक जिल्हयातील ग्रामपंचायतींनी राज्यस्तरीय बक्षिस मिळविले असून यावर्षी ३ ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम तर नाशिक तालुक्यातील शिंदे व निफाड तालुक्यातील विंचूर ग्रामपंचायतीने वेगवेगळ्या गटात राज्यात तृतीय क्रमांक मिळवला. तसेच अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचाही सन्मान करण्यात आला.                माझी वसुंधरा अभियाना सुरु झाल्यापासून या अभियानात राज्यस्तरीय पुरसकारामध्ये नाशिक जिल्हयाचा नावलौकिक राहिला आहे. पहिल्य

विश्वस्तांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू, अर्ज करण्याचे आवाहन !

इमेज
विश्वस्तांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू, अर्ज करण्याचे आवाहन ! न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक, त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरु !      नाशिक (विमाका वृत्तसेवा)::- त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचा कालावधी ३ जुलै, २०२३ रोजी संपुष्टात येत असून विश्वस्त मंडळामध्ये ४ भाविक प्रतिनिधी विश्वस्तांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्याअनुषगांने इच्छुक, योग्य व पात्र व्यक्तिंनी नेमणुकीकरिता विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह धर्मादाय सह आयुक्त कार्यालय, जानकी प्लाझा, पहिला मजला नाशिक - पुणे रोड, नाशिक येथे करावा, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक शि.ना.दुतोंडे यांनी केले आहे.         विश्वस्त मंडळामध्ये ४ भाविक प्रतिनिधी विश्वस्तांची नेमणुकीबाबतची अधिसूचना २६ मे, २०२३ रोजी जारी करण्यात आली आहे. सदरची अधिसूचनेची एक प्रत, अर्जाचा विहीत नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी धर्मादाय सह आयुक्त कार्यालय, नाशिक, त्र्यंबकेश्वर देवस्थान, त्र्यंबकेश्वर नगर परिषद आणि महानगरपालिका, नाशिकच्या सूचना फलकावर

माझं नाशिक, माझी चित्रेबुधवारी चित्रप्रदर्शन उदघाट्न !

इमेज
माझं नाशिक, माझी चित्रे बुधवारी चित्रप्रदर्शन उदघाट्न !          नाशिक( वार्ताहर ) नाशिकला जलरंग  निसर्गचित्रणाची मोठी कलात्मक परंपरा लाभलेली आहे. चित्रमहर्षी वा. गो. कुलकर्णी यांनी जलरंगात प्रथम नाशिकचे वैभव रंगवले. त्यानंतर शिवाजी तुपे, पंडित सोनवणी, आनंद सोनार व पुढे अनेकांनी त्यात सुंदर चित्रांची भर घातली. या परंपरेतील चित्रकार बाळासाहेब पाटसकर यांच्या जलरंगातील 'माझे नाशिक, माझी चित्रे' या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी ( दि. ७) सायंकाळी ५.३० वाजता नाशिकरोडला स्टार झोन मॉलमध्ये पु. ना. गाडगीळ कलादालनात उदघाट्न होईल.    चित्रकार बाळासाहेब पाटसकर यांनी जलरंग माध्यम वापरून नाशिक शहर व परिसरातील विविध ठिकाणची दृश्ये रंगवली आहेत. त्यातील सुमारे ५० चित्रांचा समावेश प्रदर्शनात करण्यात येणार आहे. ज्येष्ठ चित्रकार भी. रा. सावंत यांच्या हस्ते  उदघाट्न होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध छायाचित्रकार व राज्य सांस्कृतिक धोरण समिती सदस्य प्रसाद पवार तसेच पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या  शाखाव्यवस्थापिका प्रविणा दुसाने उपस्थित रहाणार आहेत. दि.१५ पर्यंत हे चित्रप्र

कायद्याने अशा आनंदी क्षणांना जगाशी सामायिक करू न शकणाऱ्या निराधार बालकांच्या चेहऱ्यावर पसरला वाढदिवसाचा आनंद ! The happy birthday is spread on the faces of destitute children who cannot share such happy moments with the world !

इमेज
कायद्याने अशा आनंदी क्षणांना जगाशी सामायिक करू न शकणाऱ्या निराधार बालकांच्या चेहऱ्यावर पसरला वाढदिवसाचा आनंद !        नाशिक ( प्रतिनिधी ) आपला वाढदिवस थाटामाटात साजरा व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं. निराधार बालकांनाही आपला वाढदिवस केक कापून साजरा व्हावा असे वाटते पण कायद्याने असे आनंदी क्षण जगाला दाखवू शकत नाही यावर अडून न बसता त्यांच्या आनंदाच्या सीमा वृद्धींगत करायला हव्यात हेच लक्षात घेऊन अलीकडे आधाराश्रमात बालकांचा एकत्रितपणे वाढदिवस साजरा केला जातो. त्यामुळे त्यांच्याही चेहऱ्यावर मोठा झाल्याचा आनंद पसरतो. मे महिना अखेरीस ६ बालकांचे वाढदिवस साजरे झाले. केक, खाऊ व नृत्याने चिमुकले खुश झाले.    राजकारण्यांच्या वाढदिवसाचा सर्वत्र भलीमोठी होर्डिंग्ज लाऊन गाजावाजा केला जातो. सर्वसामान्य माणसांचा सोशल मीडियावर वावर‌ वाढल्याने अनेक व्हॉट्सऍप ग्रुप्सवर, फेसबूकवर वाढदिवसाचे संदेश येतात. एकमेकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या जातात.  घारपुरे घाटाजवळ आधाराश्रम ही संस्था ७० वर्षे अनाथ, निराधार बालकांच्या संगोपनाचे, पालनपोषणाचे काम करते. अनेक दानशूर वेळोवेळी देणग्या देतात. वस्तू - साहित्य स्वरूपात

लाच स्विकारल्या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत मे. न्यायालयाने कैदेसह दंडात्मक शिक्षा सुनावली !

इमेज
लाच स्विकारल्या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत मे. न्यायालयाने कैदेसह दंडात्मक शिक्षा सुनावली !          नासिक::- भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदुरबार येथील तत्कालीन मोटार वाहन निरीक्षक सूर्यभान रेवजी झोडगे, व सहाय्यक रोखपाल वेलजी नहाडिया मावची, यांना गव्हाली चेक पोस्ट वर २०१२ साली लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले होते त्या संबंधित अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. आलोसे यांना शहादा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत मे. न्यायालयाकडून अंतिम शिक्षा सुनावण्यात आली.         भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अन्वये प्रत्येकी १ वर्ष कैदेची शिक्षा व ५,०००/- रु दंड, कलम १३ (ड) अन्वये प्रत्येकी २ वर्ष कैदेची शिक्षा व  ५,०००/- रुपये दंड ठोठावला.          वरील नमूद दोन्ही आलोसे हे दिनांक २४/०२/२०१२ रोजी गव्हाली चेक पोस्ट तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथे कर्तव्यावर होते. यावेळी मूळ तक्रारदार कंटेनर/ ट्रक चालक हे पुणे येथून त्यांच्या कंटेनरमध्ये माल भरून गुजरात राज्यात जात होते. दिनांक २४/०२/२०१

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा बहिस्थ परिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा बहिस्थ परिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !       नासिक::- अमळनेर जि. जळगांव येथील आलोसे विजय गुलाबराव पाटील, बहिस्थ परीक्षक, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, यांस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.             यातील तक्रारदार यांची पत्नी प्रियंका ह्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत बिलीप (Bachelor of Library) ची अंतिम  परीक्षा देत आहेत. सदर परीक्षेचे पेपर्स हे  अमळनेर प्रताप महाविद्यालय येथे सुरू आहेत. तक्रारदार यांची पत्नी प्रियंका व त्यांच्या सोबतच्या एकूण ८ विद्यार्थ्यांना आलोसे हे पेपर्स घेऊन विनाकारण त्रास देतात व त्यांना त्रास न देता सहकार्य करण्यासाठी आलोसे हे तक्रारदार यांचेकडे  प्रत्येक विषयासाठी १००/- रू असे एकूण ९ विषयाचे मिळून प्रत्येक विद्यार्थ्याकडे  ९००/- रू असे एकूण ७२००/- रुपयाची लाचेची मागणी करत होते. याबाबत तक्रारदार यांनी अमळनेर येथे दिलेल्या तक्रारीवरून आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष तडजोडी अंती ५६००/- रु ची  लाचेची मागणी  करून त्यापैकी तक्रारदार यांनी दिलेली  ५०००/- रुपये रक्कम

महिला शिक्षणाधिकारी व लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
महिला शिक्षणाधिकारी व लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !        नासिक::- जिल्हा परिषद नासिक च्या माजी  शिक्षणाधिकारी (प्र), तथा महापालिका शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर आणि मनपा शिक्षण विभागाचा लिपिक नितीन जोशी यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.                                  निलंबित असलेल्या मुख्याध्यापकास पुन्हा रूजू करून घेण्यासाठी लाच मागण्यात आली होती, सदर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला असता विभागाच्या वतीने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघे सापडले आहेत. अधिक चौकशीसाठी धनगर व जोशी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.          लाचलुचपत विभागाच्या कारवाईमुळे महापालिकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यातील लिपिक जोशीने ५ हजार रुपये तर ४५ हजार रुपये शिक्षणाधिकारी धनगर यांनी स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे.         सदर कारवाई पोलिस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात

पोलिसाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले !

इमेज
पोलिसाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले !          नासिक::- आलोसे हरी जानू पालवी, पोलीस हवालदार, चांदवड पोलीस स्टेशन, ता. चांदवड, जि.नाशिक यांस १००००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले. तक्रारदार यांचे त्यांच्या भावासोबत शेत जमिनीच्या वहीवाटीवरून वाद झाल्याने चांदवड पोलीस स्टेशन येथे तक्रारदार व त्यांच्या भावाचे एकमेकाविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते. तक्रारदार यांच्याकडून दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीतांविरुद्ध वाढीव कलम लावून आरोपींवर कारवाई करण्याकरिता तक्रारदार यांचे कडून पंचासमक्ष २००००/- रुपये लाचेची मागणी  करून त्यातील पहिला हप्ता रुपये १००००/- लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना आलोसे रंगेहात मिळून आले म्हणून त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .                       सापळा अधिकारी मंजितसिंग चव्हाण, पोलीस  निरीक्षक, पर्यवेक्षण अधिकारी अभिषेक पाटील, पोलीस उपअधीक्षक, सापळा पथक राजन कदम, संतोष पावरा, रामदास बारेला, मकरंद पाटील, गायत्री पाटील, प्रवीण पाटील, चालक जगदीश

ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !              नासिक::- आलोसे हंसराज श्रावण बंजारा, ग्रामसेवक, वर्ग ३, नेमणूक ग्रामपंचायत कार्यालय अधरवड, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.                                               यातील तक्रारदार यांच्या भावाचे रमाई घरकुल आवास योजनेसाठी प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयात सादर करून घरकुलाची मंजुरी आणून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून तसेच यापुढेही नमुद घरकुलासाठी शासनाकडून मिळणाऱ्या रकमेचे हप्ते विनाअडथळा बँक खात्यावर लवकर जमा करण्यासाठी ५०००/- रुपये पंच साक्षीदारासमक्ष लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम ५०००/- रुपये पंचासमक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.         सापळा अधिकारी मीरा आदमाने, पोलीस  निरीक्षक, सापळा पथक पो.हवा. पंकज पळशीकर, पो.ना. प्रवीण महाजन, पो.ना.प्रभाकर गवळी, पो.ना. नितिन कराड, चालक परशुराम जाधव यांनी सौ.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, एन.एस. न्याहाळदे, अप्पर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशि

कालिदास संस्कृत विद्यापीठातून नाशिकचा अद्वैत पैठणे सर्वप्रथम !

इमेज
कालिदास संस्कृत विद्यापीठातून नाशिकचा अद्वैत पैठणे  सर्वप्रथम !              नाशिक ( प्रतिनिधी )::-  येथील महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानचा विद्यार्थी अद्वैत पैठणे शुक्ल यजुर्वेद वेदविद्या विषयात उत्तम गुणांनी विद्यापीठात सर्वप्रथम उत्तीर्ण झाला आहे. हे प्रतिष्ठान कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक, नागपूर विद्यापीठाचे अधिकृत वेदविद्येसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव मान्यताप्राप्त केंद्र आहे.     या निवासी गुरुकुलाद्वारे वेदविद्या प्रवेशिका, वेदविद्या कनिष्ठ पदविका, ज्येष्ठ पदविका इयत्ता बारावी समकक्ष अभ्यासक्रम असून 'वेदविद्या बीए' चा अभ्यासक्रम या वेदपाठशाळेत राबविण्यात येतो. यावर्षीच्या उन्हाळी परीक्षा गेल्या महिन्यात घेण्यात आल्या. त्यात या केंद्रावर सदतीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान वेदपाठशाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या विद्यार्थ्यांना वेदाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी, वेदमूर्ती हरीश जोशी, वेदमूर्ती गोविंद पैठणे आदींचे मार्गदर्शन लाभले. प्रतिष्ठानच्या वतीने सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंद

लेखा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
लेखा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !             नासिक::- यावल जि. जळगाव येथील आलोसे रविंद्र भाऊराव जोशी, लेखा अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल. ता. यावल जि. जळगाव. वर्ग-२ याने प्रथम ३६,५००/-रूपये व तडजोडीअंती २०,०००/-रुपये लाच स्विकारली म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने त्याला ताब्यात घेण्यात आले.            यातील तक्रारदार यांनी पत्नीच्या नावे असलेल्या मे.सप्तश्रृंगी माता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था, दहिवद ता.अमळनेर जि.जळगाव या संस्थेच्या नावे आदिवासी मुलांचे वस्तीगृह (नविन) चोपडा ता.चोपडा या वस्तीगृहास सन-२०२१-२२ या शैक्षणिक वर्षात वस्तीगृहात लागणारे दैनंदीन भोजनाचा ठेका घेतलेला होता. त्यांनी वर्षभर सदर वस्तीगृहास पुरविलेल्या भोजन ठेक्याचा मोबदला म्हणून पत्नीच्या नावे असलेल्या संस्थेच्या बँक खात्यामध्ये एकुण ७३,००,०००/-रुपये डी. डी. द्वारे अदा करण्यात आलेले आहेत. सदर वर्षभराचे सर्व भोजन ठेक्याचा मोबदला म्हणून एकुण ७३,००,०००/-रुपये बँकेच्या माध्यमातून अदा करून दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष आलोसे यांनी एकुण ७३,००,

मुंबईच्या देवदूतांनो आपल्याकडे याचना केली जात आहे !मुंबईतील आपल्या मित्रांना लिंक शेअर करण्यात यावी हि अपेक्षा जेणेकरून ५ वर्ष वय असलेल्या हर्षी साठी मोलाचं सहकार्य होईल !संपादक-न्यूज मसाला, नासिक

इमेज
मुंबईच्या देवदूतांनो आपल्याकडे याचना केली जात आहे ! मुंबईतील आपल्या मित्रांना लिंक शेअर करण्यात यावी हि अपेक्षा जेणेकरून ५ वर्ष वय असलेल्या  हर्षी साठी मोलाचं सहकार्य होईल ! संपादक-न्यूज मसाला, नासिक         नासिक::- मुंबईचे देवदूत अर्थात रक्तदाते यांना सविनय निवेदन करण्यात येत आहे की जय जालोरी यांची भाची हर्षी जैन वय वर्ष ५ हिच्यावर एनएच, एस आर सी सी चिल्ड्रन्स हॉस्पिटल, मुंबई येथे मोठ्या आजारावर उपचार सुरू असून तिला ओ पॉझिटिव्ह रक्ताची नितांत व मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज आहे. मुंबईतील ओ पॉझिटिव्ह तथा इतर बदली रक्तदात्यांनी हॉस्पिटलमध्ये रक्तदान करून तिला व तिच्या नातेवाईकांना एक दैवी मदत करावी असे निवेदन करण्यात आले आहे. त्यासाठी संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक 9303930930 (९३०३९३०९३०) या क्रमांकावर संपर्क साधून आपली सामाजिक भूमिका पार पाडावी असे निवेदन करण्यात येत आहे. पत्ता एक, १ ए, केशवराव खाडे मार्ग, हाजी अली, हाजी अली गव्हर्नमेंट कॉलनी, महालक्ष्मी, मुंबई असा आहे. मित्रहो या छोट्या बच्चू साठी आपले सामाजिक दायित्व देवदूत रूपाने द्यावे ही विनंती.

उजेड पेरायचा आहे, व्हाया नांदगाव ते लंडन - भास्कर कदम

इमेज
उजेड पेरायचा आहे, व्हाया नांदगाव ते लंडन - भास्कर कदम     नासिक::- मित्रहो, समतेचे गीत गात गात 'उजेड पेरायचा आहे' व्हाया 'नांदगाव ते लंडन' या प्रवासवर्णन पुस्तकाचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, फ.मु.शिंंदे यांच्या हस्ते गुरुवार दि. २५ मे २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता, सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृह नाशिक येथे होत आहे, प्रकाशन सोहळ्यासाठी अगत्यपूर्वक यावे ही विनंती लेखक भास्कर कदम यांच्याकडून करण्यात आली आहे.

एवरेस्ट बेस कॅम्प सफर ! जयश्री काकड यांच्या शब्दांत थरारक, हिंमतीचा, प्रेरणादायी स्वानुभव ! सफरीतील अडथळ्यांवरील मात करत केलेला अतुलनीय प्रवास !!

इमेज
एवरेस्ट बेस कॅम्प सफर ! जयश्री काकड यांच्या शब्दांत थरारक, हिंमतीचा, प्रेरणादायी स्वानुभव ! सफरीतील अडथळ्यांवरील मात करत केलेला अतुलनीय प्रवास !!                कधी कधी आयुष्यात असे काही चमत्कारिक घडते की स्वतःलाच विश्वास बसत नाही, असाच चमत्कारिक योग माझ्या नशीबात आला. एकदा माऊंट एव्हरेस्ट उघड डोळ्यांनी प्रत्यक्षात  बघावा अशी अगदी लहानपणापासूनची इच्छा होती. तसे करण्यासाठी EBC Everest BACE CAMP नावाची ट्रेक असते ह्याबद्दल माहिती मिळवली. (उंचाईया नावाचा चित्रपटाने त्यात मोलाची कामगिरी बजावली) माऊंट एव्हरेस्ट जर मला बघायचा आहे तर तसे करण्यासाठी EBC - Everest BACE CAMP नावाची ट्रेक असते ह्याबद्दल मला माहिती मिळाली. (अर्थात उंचाईया नावाच्या चित्रपटाने त्यात मोलाची भर पाडली.) आणि बस्स स्वतःहूनच ठरवून टाकले. जायचे म्हणजे जायचेच Google वर सर्च केल्यावर थ्रिलोफिलिया नावाची ट्रॅव्हल कंपनी अशी टूर अरेंज करते असे समजले. वेबसाईट वर दिलेल्या संपर्क क्रमांका वर सपंर्क साधला तेव्हा त्यांच्या ऑपरेशन टीम मध्ये असलेल्या किंजल हिने त्या ट्रेक बद्दल आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चा बद्दल अगदी व्यवस्थित माहिती

२००० च्या नोटेमध्ये खरोखर "इलेक्ट्रॉनिक चीप" बसवली होती !

इमेज
२००० च्या नोटेमध्ये खरोखर "इलेक्ट्रॉनिक चीप" बसवली होती !                 ८ नोव्हेंबर २०१६ ला मोदी सरकारच्या काळात ५०० व १००० च्या नोटांवर नोटबंदी जाहीर केली, नोटबंदीचे कुठे स्वागत तर कुठे विरोधही नोंदविला गेला मात्र नोटबंदी झाली. त्यानंतर नवीन ५०० व २००० च्या नोटा चलनात आणल्या गेल्या. तेव्हा २००० च्या नोटेत "इलेक्ट्रॉनिक चीप" बसवलेली असून ही नोट कुणाकडे जात आहे, तिचा प्रवास कसा होत आहे हे सर्व, सरकारला तसेच रिझर्व्ह बँकेला समजणार अशी अफवा पसरवली गेली, ही अफवा फार काळ टिकली नाही, हा विनोदाचा भाग सोडून विचार केला तर आज तोच विनोद सत्यात उतरला आहे असे वाटते.        २३ मे २०२३ पासून ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० रुपयांची नोट बॅंकांनी वितरीत करु नये. ग्राहकांकडून स्विकारावी जेणेकरून २०१६ प्रमाणे नोटबंदी ठरणार नाही.  पुढे ती नोट चलनात असणारच नाही असे नाही. यावर अनेक जण आता आपापली मतं व्यक्त करतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मत व्यक्त करताना या नोटजमाचे स्वागत केले, तसेच सर्वसामान्यांच्या खिशात २००० ची नोट कमी प्रमाणात असते त्यामुळे या नोटजमाचा सर्वसाम

तहसीलदार व खाजगी इसम २०००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
तहसीलदार व खाजगी इसम २०००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !    नासिक ::- आलोसे तहसीलदार विजय जबाजी बोरुडे, व खाजगी इसम गुरमीत सिंग दडियल, रा. कोपरगाव यांना २००००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.         तक्रारदार यांचे वाळू वाहतूकीचे गाडीवर कारवाई न करण्याकरिता गुरुमीत दडीयाल याने आलोसे तहसीलदार विजय बोरुडेसाठी २०००० रुपयेची लाचेची मागणी करून नमूद लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. तहसीलदार बोरूडे याने नमूद लाचेचे मागणीस प्रोत्साहन दिले असून लाचेची रक्कम दडीयाल याने  स्वीकारताना त्यांना पंच साक्षीदारा समक्ष रंगेहात पकडण्यात आले आहे. म्हणून आरोपी यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.          सापळा अधिकारी संदीप साळुंखे, पोलीस निरीक्षक, सहसापळा अधिकारी वैशाली पाटील पोलीस उप अधीक्षक यांच्या सह सापळा पथक पो. ह. पंकज पळशीकर, पो.ना. नितीन कराड, पो.ना. प्रवीण महाजन, पो. ना प्रभाकर गवळी, चापोना संतोष गांगुर्डे यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, नारायण न्याहाळदे अप्पर पोल

अधिकारी व दोन सेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
अधिकारी व दोन सेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !         नाशिक::- आलोसे श्रीमती वैशाली दगडू पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी , नाशिक, संजय रामू राव, आरोग्य सेवक, व कैलास गंगाधर शिंदे, आरोग्य सेवक, जिल्हा हिवताप विभाग, नाशिक, यांना लाचलुचपत विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.              तक्रारदार हे आजारी असल्याने ते वैद्यकीय रजेवरून हजर झाले नंतर त्यांचा पगार काढून देण्याचे मोबदल्यात आलोसे क्र.०१ श्रीमती वैशाली पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी, नाशिक यांनी दि.१५ मे रोजी १००००/-₹ लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले व आलोसे क्र.०२ संजय रामू राव, आरोग्य सेवक, हिवताप नाशिक यांनी दि.१५ मे रोजी १००००/-₹ लाचेची मागणी करून आज दि.१७  रोजी आलोसे क्र.०३ कैलास गंगाधर शिंदे, यांना स्वीकारण्यास सांगितले असता आलोसे क्र.०३ शिंदे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.         सापळा अधिकारी श्रीमती साधना इंगळे, पोलीस निरीक्षक, यांच्या सह सापळा पथक पो. हवा. सचिन गोसावी, पो. हवा. प्रफुल्ल माळी, पो. हवा

२५००० रुपयांची लाच मागिल्याप्रकरणी आलोसे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात !

इमेज
२५००० रुपयांची लाच मागिल्याप्रकरणी आलोसे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात !           नासिक::- आलोसे विवेक अशोक पवार, वय- ३५ वर्ष, धंदा- नोकरी , सहाय्यक पोलीस निरीक्षक, नेमणूक - कोतवाली पोलीस स्टेशन, अहमदनगर यांस २५०००/- रुपये लाच मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.     यातील तक्रारदार यांचा मावस भाऊ व त्याच्याबरोबर असलेले चार सह आरोपी यांचेवर कोतवाली पोलीस ठाणे, अहमदनगर येथे दाखल गुन्ह्यामध्ये त्यांना अटक न करता अटकपूर्वक जामीन मंजूर होणे कामी मदत करण्याच्या मोबदल्यात तीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती पंचवीस हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.          सापळा अधिकारी संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, सापळा पथकतील पो. हवा. एकनाथ बाविस्कर, पो. ना. प्रकाश महाजन, पो. शि. नितीन नेटारे यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, नारायण न्याहाळदे अप्पर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

सामाजिक न्याय पर्व अंतर्गत विद्यार्थ्यांना जात वैधता व जात प्रमाणपत्रांचे वाटप !

इमेज
सामाजिक न्याय पर्व अंतर्गत विद्यार्थ्यांना जात वैधता व जात प्रमाणपत्रांचे वाटप ! सामाजिक न्याय पर्व अंतर्गत नाशिक जिल्हयातील ३६६२  विद्यार्थाना जात वैधता व ५६९७ जात प्रमाणपत्रांचे वाटप !          नाशिक::- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिनांक १एप्रिल २०२३ ते ३० एप्रिल २०२३ या महिनाभराच्या कालावधीत “सामाजिक न्याय पर्व"   हा उपक्रम राबविण्यात आला आहे. विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे व बार्टीचे महासंचालक, सुनिल वारे यांच्या मार्गदर्शन व निर्देशानुसार जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या या कालावधीत राबविण्यात आलेल्य मोहिमेत जिल्हातील ९ हजाराहुन अधिक विद्यार्थाना जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.             या विशेष मोहिमेमध्ये नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून ३६६२ विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन निर्गमित करण्यात आलेले आहेत व नाशिक जिल्हयातून सर्व उप

साप्ताहिक न्यूज मसाला चा दिनांक ११ मार्च २०२३ चा अंक !

इमेज
साप्ताहिक न्यूज मसाला चा दिनांक ११ मार्च २०२३ चा अंक  !

जिल्हा परिषद, नाशिक "ग्रामविकासाची शाळा" या पुस्तकाची राष्ट्रीय विक्रम म्हणुन नोंद झालेल्या पुरस्काराचे ऍड.उज्ज्वल निकम यांचे हस्ते वितरण !

इमेज
जिल्हा परिषद, नाशिक "ग्रामविकासाची शाळा" या पुस्तकाची राष्ट्रीय विक्रम म्हणुन नोंद झालेल्या पुरस्काराचे ऍड.उज्ज्वल निकम यांचे हस्ते वितरण !         नासिक::- महाराष्ट्र राज्याच्या जनतेस त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेतील जिल्हा परिषद या सर्वोच्च संस्थेच्या सर्वसाधारण सभांचे पंचवार्षिक सभांचे इतिवृत्त पुस्तक रूपाने प्रसिद्ध करणारी महाराष्ट्र राज्यातील पहिली आणि एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे. या प्रकाशन उपक्रमाची दखल घेऊन त्यांच्या या विक्रमाची नोंद द ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस राष्ट्रीय विक्रम म्हणून करण्यात आली होती. सदरच्या राष्ट्रीय स्तरावरील नोंदीच्या पुरस्कारांचे वितरण नाशिक येथील अधिवेशनात अखिल भारतीय प्रकाशक संघाच्या ४ थ्या लेखक प्रकाशक संमेलनात नामवंत विधिज्ञ ऍड. उज्वल निकम यांचे शुभहस्ते नाशिक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पोपट पिंगळे व संकलक जी. पी.खैरनार यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पदक प्रदान करण्यात येऊन सन्मानित करण्यात आले. प्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, स्वागताध्यक्ष विश्वास ठाकुर, जेष्ठ साहित्यिक प्रविण

कनिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
कनिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ! नासिक::- धुळे पंचायत समिती, धुळे येथील कनिष्ठ सहाय्यक लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा जाळ्यात. धुळे पंचायत समिती मधील बांधकाम विभागात कार्यरत कनिष्ठ सहाय्यक शामकांत नानाभाऊ सोनवणे यास ३५०० ला स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. तक्रारदार हे पंचायत समिती धुळे येथे शाखा अभियंता या पदावर कार्यरत असून ते एप्रिल २२ पर्यंत रत्नपुरा बीट येथे नेमणुकीस होते. सदर कालावधीतील बीटचे विभागीय लेखापरीक्षण झालेले होते.  लेखापरीक्षण केलेल्या नावाने बक्षीस म्हणून कनिष्ठ सहाय्यक सोनवणे हे तक्रारदार यांच्याकडे वेळोवेळी भेटून अथवा मोबाईलवर संभाषण करून लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आली होती. सदर रुपये ३५०० ची लाच स्वीकारताना आज त्यास पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले असून देवपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. कारवाई उपाधीक्षक अनिल बडगुजर पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे पोलीस निरीक्षक मंजित सिंग चव्हाण, सहकारी राजन कदम, भूषण खलाणेकर, शरद काटके, भूषण शेटे, संतोष पावरा, गायत्री पाटील, प्रशांत