सदाचारी बनो जीवन में आगे बढो !
सदाचारी बनो जीवन में आगे बढो ! नासिक::- बॉईज टाऊन पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम व्यक्तिमत्व व बदलत असलेली शिक्षण पद्धती यांचे महत्व सांगण्यासाठी दि. २५ नोव्हेंबर रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ यांचे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. आजच्या समाजात शिक्षणाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शिक्षणाचे बरेच उपयोग आहेत परंतु त्यास एक नवीन दिशा देणे आवश्यक आहे. शिक्षण आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आवश्यक साधन आहे. आपल्या जीवनात शिक्षणाची ही साधने वापरुन आपण काहीही चांगले साध्य करू शकतो. उच्च स्तरीय शिक्षण लोकांना सामाजिक आणि कौटुंबिक आदर ठेवण्यास आणि एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करते. शिक्षणाचा काळ हा सर्वांसाठी, सामाजिक आणि वैयक्तिकरित्या खूप महत्वाचा काळ आहे, यामुळेच आपल्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व आहे.आजच्या आधुनिक आजच्या काळात शिक्षणाची पातळी वाढवण्यासाठी अनेक पद्धती अवलंबल्या जातात हे सांगताना त्यांनी गुरुकुल पद्धतीचे शिक्षण व त्याचे फायदे देखील विविध उदाहरणांतून विद्यार्थ्यांसमोर मांडले; तसेच करोना महामारी