साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्काराने जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांचा सन्मान..... !! एक मोठं कुटुंब तयार झालं याचा मला अभिमान वाटतो, या कुटुंबातील सदस्य शिक्षकांना सामना कराव्या लागणाऱ्या स्थानिक तसेच राज्यस्तरीय प्रशासकीय अडचणी सोडविण्यासाठी मी वेळोवेळी आपल्या सोबत राहील - अध्यक्ष संजय देवरे !!! एसकेडी चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम !!!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल www.newsmasala.in -संपादक नरेंद्र पाटील ,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!
साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्काराने जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांचा सन्मान..... जळगाव ::- एस. के.डी.चॅरिटेबल ट्रस्ट आणि गिरणा गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, पुरस्कार वितरण सोहळा प्रमुख पाहुणे जळगावच्या प्रथम नागरिक सिमाताई भोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, यावेळी तहसीलदार कैलास चावडे, जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य चौधरी , जैन ग्रुपचे किशोर कुलकर्णी, एस.के.डी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संजय देवरे, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार वितरणानंतरच्या एसकेडी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजय देवरे यांनी जिल्ह्यातील उपस्थित शिक्षक, त्यांचे आप्तेष्ट, मित्रपरिवार यांच्याशी संवाद साधताना आपल्या मनोगतात ग्रामीण भागातील पाहीलेले वास्तव व त्यातून पुढे समाजातील घटकांसाठी कार्य करणे, ही भावना रूजविण्याचे अपरोक्षपणे, व अव्याहत कार्य शिक्षकांकडून केले जाते अशा सर्वच शिक्षकांचा...