"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !
"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)::- ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिग्दर्शित केलेला "राजकारण गेलं मिशीत" हा विनोदी चित्रपट नुकताच सगळीकडे प्रदर्शित झालेला आहे.
सुप्रसिद्ध साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या कथेवर आधारित या चित्रपटातील बहुतांश कलाकार मराठवाड्यातील असून छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ कवी आणि गीतकार उद्धव भयवाळ यांच्या 'लावण्य बहार' या अल्बम मधील एक लावणी या चित्रपटात घेण्यात आलेली आहे.
या लावणीच्या निमित्ताने उद्धव भयवाळ यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले असून समाजातील सर्व स्तरांमधून भयवाळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
२० एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथील प्रोझोन मॉल मधील आयनॉक्स चित्रपटगृहात या चित्रपटाचा प्रिमियर शो झाला. यावेळी दिग्दर्शक मकरंद अनासपुरे, संगीतकार अतुल दिवे, गीतकार उद्धव भयवाळ तसेच चित्रपटातील इतर कलाकार उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा