पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

,,,,,,,,,,,,२९ भावंडांचा जीव धोक्यात ?,,,,,,,,,,,,,,,. हॅशटॅग चिपको चळवळ महाराष्ट्रासह पोहचली गोव्यात !! मी बोलू, बघू, ऐकू शकत नसलो तरीही तुमच्यासारख्याच भावना मलाही आहेत !!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
न्यूज मसाला सर्विसेस नासिक 7387333801 ********************************** माझा आवाज झाली आहे 'हॅशटॅग चिपको' चळवळ !     मी बोलू ,बघू ,ऐकू शकत नाही. तरीही मला तुमच्या सारख्याच भावना आहेत.मी वर्षानुवर्षे ताठपणे उभा राहून अनेक पावसाळे अनुभवले आहेत. भूमाता माझे लालनपालन करते तर वरुणदेवाच्या आशीर्वादाने मी बहरतो. फुले, फळे देतो. स्वतः कार्बन डायऑक्साईड घेऊन हवेत प्राणवायू सोडतो. अनेक पक्षी माझ्या अंगाखांद्यावर खेळतात, रात्री विसावतात पण तुमच्यासारखी माणसे मात्र माझ्या मुळावर उठतात ! आताच नाशिकमधील माझ्या २९ भावंडांचा जीव धोक्यात आल्याने काही संवेदनशील पर्यावरणप्रेमी त्यांच्या बचावासाठी तातडीने धावून गेले. त्यातून 'हॅशटॅग चिपको' ही चळवळ जन्माला आली. बघता बघता ती राज्यात सर्वत्र पसरली व थेट गोव्यापर्यंत जाऊन पोहोचली. ही चळवळ आता माझे डोळे, कान आणि मुख्य म्हणजे आवाज बनली आहे.त्यामुळेच हा मनमोकळा संवाद...     उत्तुंग झेप फाउंडेशनचे संस्थापक तसंच सामाजिक कार्यकर्ते रोहन देशपांडे व सहकाऱ्यांनी हॅशटॅग चिपको,नाशिक ही चळवळ तळमळीने उभी केली. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सुंदरला

हॅशटॅग चिपको चळवळीला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद ! यमराजाच्या वेशभूषेतून जनजागृती !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
न्यूज मसाला सर्विसेस नासिक 7387333801 हॅशटॅग चिपको चळवळीला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद ! नाशिक( प्रतिनिधी) - शनिवारी (दि१२) नाशिकमध्ये पर्यावरणप्रेमी नागरिकांनी एकत्र येत अवैध वृक्षतोडी विरोधात हॅशटॅग चिपको चळवळ उभी केली. त्याला काहीजणांनी फोन करुन विरोध दर्शविला. मात्र त्याचवेळी असंख्य निसर्ग व पर्यावरणाबाबत जागरूक असणाऱ्यांनी चळवळीला पाठिंबा देत मदतीचा हात पुढे केला. त्यामुळेच या चळवळीचे लोण राज्यभरात पसरु लागले असून सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हा उपक्रम व्यापक बनला आहे.          आज गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाचे जलतज्ज्ञ राजेश पंडित यांनी चळवळीत सहभागी होत सध्याचा प्रश्न केवळ २९ झाडांपुरता मर्यादित नसून हजारो झाडांशी व पर्यावरणाशी निगडित आहे असे स्पष्ट केले. यावेळी यमराजाच्या वेशातील कलाकाराने अनोखी जनजागृती केली. उत्तुंग झेप फाउंडेशनचे रोहन देशपांडे व सहकाऱ्यांच्या पुढाकाराने हॅशटॅग चिपको चळवळ उभी राहिली आहे. काल दुसऱ्या दिवशीही कार्यकर्त्यांनी प्रबोधनात्मक उपक्रम राबविला. यावेळी राजेश पंडित म्हणाले, सर्वोच्च व मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात वेळो

संकल्प नंदिनी च्या शुद्धिकरणाचा... नमामी गोदावरी अभियानाची नांदी ! सविस्तर वृत्त वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
न्यूज मसाला सर्विसेस,   ७३८७३३३८०१ संकल्प 'नंदिनी'च्या शुद्धिकरणाचा...          नाशिकच्या नंदिनी नदीला प्रदूषण आणि अस्वच्छतेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी, तिला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काही सुजाण नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून, मानवी साखळी करून नाशिककरांचे लक्ष वेधण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या सिडको मंडलाने त्यासाठी पुढाकार घेतला.भाजपाचे ज्येष्ठ नेते व प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांची ही संकल्पना होती. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन जनजागृती केली. नंदिनी नदीचे सौन्दर्य- संवर्धन तर व्हायला हवेच, त्याबरोबरच गोदावरी व तिच्या सर्व उपनद्यांंकडेही असेच लक्ष देण्याची गरज आहे. अरुणा- वरुणा (वाघाडी), गायत्री, सावित्री व मेघा या पाच उपनद्या काळाच्या ओघात लुप्त झाल्या असून सरस्वती नदीचे रूपांतर तर नाल्यात होऊन बराचसा काळ लोटला आहे! महत्त्वाचे म्हणजे गोदावरी नदी बारमाही वाहणे आवश्यक आहे. तिच्यावरील पाणवेलींचे आक्रमण दूर होऊन पुन्हा निर्मळ स्वरूप यायला हवे.              पाच जूनला 'जागतिक पर्यावरण दिना'च्या औचित्याने झालेल्या या उपक्रमात भाजप

बदनाम गल्लीवर कोरोनाचे सावट ! सेवाभावी संस्था व सरकारी यंत्रणांचे स्तुत्य कार्य ! निशा डांगे यांनी एका दैनिकाच्या माध्यमातून आलेल्या बातमीवर टाकलेला वास्तव व समाजभान जागवणारा "कटाक्ष", सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
बदनाम गल्लीवर कोरोनाचे सावट !        कोरोना नावाच्या भस्मासुराने संपूर्ण जग आपल्या विळख्यात घेतले आहे. प्रत्येक शहरातील, गावातील प्रत्येक गल्ली, गल्लीत कोरोना महामारी पसरली आहे. बऱ्याच शहरात, गावात एक रेड लाईट एरिया असतो. या रेड लाईट एरिया मधील बदनाम गल्लीवरही कोरोनाचे सावट पसरलेले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टनसिंग काळाची गरज ठरली आहे. गेल्या मार्च महिन्यासून आपण लॉकडाऊनचे व सोशल डिस्टनसिंगचे पालन करीत आहोत. कालांतराने आज लॉकडाऊनमध्ये प्रत्येक ठिकाणच्या परिस्थिती नुसार शिथिलता देण्यात येत आहे. सोशल डिस्टनसिंग मात्र कटाक्षाने पाळला जात आहे. टाळेबंदी आणि बेरोजगारी !          लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यवसाय ठप्प झालेत त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. या लॉकडाऊन व सोशल डिस्टनसिंगमुळे सर्वात जास्त बेरोजगारीचा फटका बसला आहे तो बदनाम गल्लीतील महिलांना. त्यांचा देह विक्रीचा व्यवसाय नि हे सोशल डिस्टनसिंग यांचं गणित कसं काय जुळणार? त्यांच्या या व्यवसायावर त्यांचे कुटुंब अवलंबून असते. देह विक्रीच्या व्यवसायाशी अनेकजण निगडित असतात. लॉकडाऊन व सोशल डिस्टनस

अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेंतर्गत (पेसा) ५% थेट निधीचे वितरण ! तिसऱ्या टप्यात १३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त ! आदिवासी जनतेच्या कल्याणासाठी निधी वापराची खबरदारी घ्यावी- जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर ! ग्रामपंचायत विभागाने आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी खर्च करावा-मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
न्यूज मसाला सर्विसेस, नासिक, 7387333801 अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेंतर्गत पेसा  ५% थेट निधीचे वितरण ! तिसऱ्या टप्यात १३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त !         नाशिक - सन २०२०-२१ वर्षात आदिवासी बहुल ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेंतर्गत विकासकामांसाठी तिसऱ्या टप्यातील १३ कोटी ९६ लक्ष ५५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे, राज्य शासनातर्फे पहिल्या टप्प्यातील निधी २९ जानेवारी २०२१, दुसऱ्या टप्प्यातील १७ मार्च २०२१, व २७ एप्रिल २०२१ रोजी तिसऱ्या टप्प्यातील सम प्रमाणातील निधी थेट ग्रामपंचायतींना वितरित करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. नाशिक जिल्हातल्या अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्रामपंचायतींना ५% निधी योजनेच्या तिस-या टप्प्याचा निधी १८ मे रोजी थेट ग्रामपंचायतींना प्राप्त झाला असुन यामुळे जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील विकासकामांना गती मिळणार आहे. जिल्ह्याल्या नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, बागलाण, देवळा या नऊ तालुक्यातील ५७४ ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश असुन १०४५ गावांना या निधीचा लाभ होणार आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामपं

माझी वसुंधरा स्पर्धेत पिंपळगाव (ब) ग्रामपंचायतला राज्यात प्रथम क्रमांक ! जिल्ह्याचा बहुमान वाढविला- जिल्हा परिषद अध्यक्ष नाम. बाळासाहेब क्षिरसागर !! पुरस्कार मिळाला ही अतिशय आनंदाची बाब- मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड !!! न्यूज मसाला सर्विसेस, नासिक, 7387333801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
नाशिक: पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या 'माझी वसुंधरा' २०२०-२१ स्पर्धेतील मानकऱ्यांना राज्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने या अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला तर अभियानाच्या उत्कृष्ट अंमलबजावणी साठी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांना सन्मानित करण्यात आले. प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर उपस्थित होते.              दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित या कार्यक्रमात राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामीण विकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन, राजशिष्टाचार पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे , विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर- म्हैसकर आदि उपस्थित होते.                महाराष्ट्र शासनाच्या वतीने पर्यावरण व वातावरणीय ब

१)उत्तुंग झेप संस्थेचा झाडे वाचवू या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद ! २) राष्ट्रवादीचे शहरात २१०० वृक्षरोपण करून वृक्षसंवर्धन करण्याचे उद्दिष्ट !! सविस्तर बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
झाडे वाचवू या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद ! नाशिक ( प्रतिनिधी )- जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने काल ( दि.५) झाडे वाचवू या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. नाशिकरोडच्या शिखरेवाडी परिसरातील उद्यानालगत दुतर्फा रस्त्यावर झालेल्या या उपक्रमाची संकल्पना उत्तुंग झेप संस्थेचे अध्यक्ष रोहन देशपांडे यांची आहे.परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मोहिमेत सहभाग नोंदवला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पिंपळ, बकुळ,बहावा अशा ५ भारतीय वृक्षांची रोपे लावण्यात आली. त्यांचे रक्षण, संवर्धन करण्याची प्रतिज्ञाही घेण्यात आली.       झाडे वाचवू या मोहिमेला नाशिक महापालिकेचा उद्यान विभाग, पर्यावरण प्रेमी नागरिक, पर्यावरण तज्ज्ञ व परिसरातील नागरिकांचे मनापासून सहकार्य लाभले. यावेळी रोहन देशपांडे म्हणाले, बऱ्याचदा अनेक जुने वृक्ष उन्मळून पडतात. काही कारणांनी वृक्ष हलविण्याची वेळ येते. त्यांचे पुनररोपण करणे गरजेचे आहे. या उपक्रमाला मनपाचे उपायुक्त शिवाजी आमले तसेच विजय गायकवाड, शेख, गिरी आवर्जून उपस्थित होते. पर्यावरण तज्ज्ञ अश्विनी भट यांच्या सूचनेनुसार उन्मळून पडलेल्या झाडांच्या मुळांजवळ जुनी बा

५ जून, जागतिक पर्यावरण दिवस, निसर्गाच्या लयतत्वाशी इमान राखणारी आदिवासी वारली जीवनशैली व कलासंस्कृती !! निसर्गाच्या वरदानाविषयी कृतज्ञभाव व्यक्त करणे काळाची गरज !!! आपणही करुया जपणूक !!!

इमेज
पर्यावरणपूरक वारली कलासंस्कृती     दरवर्षी दि.५ जून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. आदिवासी वारली जीवनशैली व कलासंस्कृती पर्यावरणाशी कमालीचा समतोल साधते. निसर्गाच्या लयतत्त्वाशी इमान राखते. ही जमात निसर्गस्नेही असून पर्यावरण संरक्षण, संवर्धन हा त्यांच्या साध्यासुध्या व अत्यंत कमी गरजा असलेल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. दुर्गम भागात निसर्गाच्या सान्निध्यात रममाण झालेल्या वारली लोकांना कसलाही हव्यास नसतो. निसर्गाच्या जीवनचक्राला ते खीळ घालत नाहीत. वारली चित्रशैलीत निसर्गातील झाडे, वेली, पशुधन, पक्षिजगत,माणसाचे दैनंदिन जीवन यांना महत्त्वाचे स्थान आहे.म्हणूनच आदिवासींना जल, जमीन, जंगलांचे अधिकार मिळायला हवेत.      वारली ही प्राचीन काळापासून दुर्गम अशा जंगल, डोंगराळ प्रदेशात वास्तव्य करून राहणारी प्रमुख आदिवासी जमात आहे. 'वारलं' म्हणजे जमिनीचा तुकडा ! त्यावर उदरनिर्वाह करणारे म्हणून त्यांना 'वारली' संबोधले जाते. सह्याद्रीच्या डोंगररांगांत असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील वरच्या भागात मोठ्या प्रमाणावर वस्ती असणारे म्हणूनही 'वरले'- 'व

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
न्यूज मसाला परीवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा !! काल ३१ मे रोजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.सुभाषचंद्र देशमुख साहेब सेवानिवृत्त झाले, पुढील आयुष्यासाठी खुप खूप आरोग्यदायी शुभेच्छा... अभिमान है हमे कि हम अंग है इस वर्दी कां बडी किस्मतवालो को मिलता है ये खाकी रंग वर्दी का.... बेईमान को मजबूर बनाती इमानदार को मजबूत बनाती जिनके कंधो पर भार है जनता की अभिलाषा का मनुष्य होकर भी ये मनुष्य को मिले अधिकारो से वंचित है तुम्हे सुरक्षित रखने के लिए खुद रातभर नं सोते है सुनसान अंधेरी रातो में चूपचाप कटी सन्नाटो में घूमघामकर थक जाते है नं जाने कब सोजाया करते है पत्थर खाकर भी खडे रहे वो लहू बनकर अडे रहे जब दुनिया जश्न मनाती है तब पुलिस फर्जं निभाती है रातो में सिर्फ चोर ही नहीं घुमते ये वर्दीवाले रक्षा के लिए तैय्यार रहते है धूप -छाव सब सहते है जीवनपथ दुर्गम गहते है इनके जीवन में अरमान ना कुछ रहते है जब तन पर खाकी सजती है इन वर्दी वालो के जीवन का अजिब फसाना है तीर भी चलाना है और परिण्दे को भी बचाना है रात को आँखो में नींद नहीं ना दिल में करार ये मोहब्बत नहीं खाकी की न