पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सामाजिक न्यायासाठी शासन व प्रशासन कटिबध्द- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे. चर्चेअंती लेखणी बंद आंदोलन मागे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
सामाजिक न्यायासाठी शासन व प्रशासन कटिबध्द- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ----------------------------------- सामाजिक न्यायासाठी शासन व प्रशासन कटिबद्ध असल्याचे मत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. मंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २८ जानेवारी २१ रोजी समाज कल्याण कर्मचारी संघटना गट क, महाराष्ट्र राज्य पुणे यांची बैठक झाली. सदर बैठकीत प्रधान सचिव शाम तागडे व डॉ प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज  कल्याण म. रा. पुणे हे उपस्थित होते. यावेळी कर्मचारी संघटनेच्या विविध प्रश्नांबाबत आढावा घेत असताना मुंडे यांनी सांगितले की, संघटनेच्या रास्त मागण्यासांठी सामाजिक न्याय विभाग हा संघटनेच्या पाठिशी आहे, परंतू कामाच्या कार्यक्षमतेबाबत (work accountability) कोणतीही तडजोड केली जाणार नाही.  सामाजिक न्याय विभागामध्ये शिस्तप्रिय पध्दतीने चाललेले कामकाज कौतुकास्पद असून सदर कामाकाजाच्या अनुषंगाने प्रत्येक कर्मचा-याने स्वत:ची कौशल्य व कार्यक्षमता वाढवून प्रत्येक नागरिक व लाभार्थ्याला न्याय देणे आवश्यक आहे. रिक्त पद, कामाचा बोजा हा सर्वच विभागांमध्ये आहे त्यामुळे ज्यावेळेस पद भरण्याचे

नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान ------------------ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा मुंबई दि २९ : नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. २६ मार्चपासून हे संमेलन नाशिक येथे गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होत असून ज्येष्ठ विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे आयोजित करण्यात येत असून लोकहितवादी मंडळ, नाशिक यांनी या संमेलनाच्या आयोजनासाठी निमंत्रण दिले आहे. गेल्या वर्षभरापासून आपण कोविडचा लढा लढत असून परिस्थितीत झपाट्याने सुधारणा होत आहे, या पार्श्वभूमीवर हे साहित्य संमेलन आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन पार पाडले जाईल तसेच या संमेलनामुळे मराठी साहित्य विश्वात परत एकदा उत्साहाचे  वातावरण निर्माण होईल अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त करून त्यांनी या संमेलनाच्या आयोजनास आपल्या शुभेच्छाही दिल्या. डॉ जयंत नारळीकर यांच्यासारखा महान खगोलशास्त्रज्ञ तसेच स

बॉक्सर अंजली व श्रीहरी यांचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गौरव ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
बॉक्सर अंजली व श्रीहरी यांचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गौरव !         नाशिक, दि.२४ जानेवारी :- महाराष्ट्र राज्याचा सन २०२० चा क्रीडारत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज बॉक्सर अंजली मोरे व श्रीहरी मोरे या बंधू व भगिणीचे आज नाशिक येथील कार्यालयात सत्कार करून गौरव करण्यात आला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ तसेच मोरे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.       बॉक्सिंग खेळाडू अंजली मोरे आणि श्रीहरी मोरे हे दोघेही विश्वविख्यात बॉक्सर मेरी कोम यांचेकडे गेल्या पाच वर्षांपासून प्रशिक्षण घेत आहे. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावले आहे. अंजली मोरे हिने आतापर्यंत २७ सुवर्णपदक तर श्रीहरी २५ सुवर्णपदक पटकावले असून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२० सालचा क्रीडारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

अथर्व वैरागकर, अथर्व वारे यांना मानाचा जोशी स्मृती पुरस्कार जाहीर ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
अथर्व वैरागकर, अथर्व वारे यांना मानाचा जोशी स्मृती पुरस्कार जाहीर        नाशिक ( प्रतिनिधी ):- भूपाली क्रिएटिव्हज या सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतर्फे दरवर्षी दिनरंग संगीत महोत्सव आयोजित करण्यात येतो. त्यामध्ये नाशिक परिसरातील होतकरु, उदयोन्मुख युवा कलाकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी पं.            गजाननबुवा जोशी पुरस्कार अथर्व ओंकार वैरागकर या युवा शास्त्रीय गायकाला तर पं. नारायणबुवा जोशी पुरस्कार युवा तबलावादक अथर्व नितीन वारे यांना काल ( दि.२३ ) जाहीर करण्यात आले. स्व. पं. दिनकर कैकिणी यांच्या स्मरणार्थ दिनरंग स्मृती महोत्सव लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. त्यावेळी हे दोन्ही पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. दोघांनाही घरुन सांगीतिक वारसा लाभला असून ते नेटाने तो पुढे नेत आहेत. भूपाली क्रिएटिव्हजचे प्रमुख संदीप आपटे यांनी अशी माहिती दिली. या संगीत महोत्सवात नाशिककर रसिकांना दमदार कलाकारांच्या कलेचा आस्वाद विनामूल्य घेता येणार आहे असेही त्यांनी सांगितले.

बालविवाह प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल !!! ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर यांनी दिली फिर्याद !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!

इमेज
बाल विवाह प्रतिबंधक कायद्यान्वये वणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.                नासिक::-कोरोना साथरोग लॉकडाऊन काळात करंजवण (दिंडोरी) येथे घराच्या पडवीत बालविवाह संपन्न झाला होता. अल्पवयीन मुलगी आणि तिची आई रा.लखमापुर फाटा, मुळगाव जळगाव यांनी करंजवण येथे एका घराचे पडवीत दि. २ मे २०२० रोजी अल्पवयीन मुलगी हिचे वय १३ वर्ष ३ महिने असताना तिचा बालविवाह घोटी ता. इगतपुरी येथील तरुणाचा चोरून संपन्न झाल्याने करंजवन ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर यांनी दि. २२ जानेवारी २०२१ रोजी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सहा. पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी आरोपी, आरोपीचे आई-वडील, बहीण व अल्पवयीन मुलीची आई यांचे विरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००७ चे कलम ९ , १० , ११ ( १ ), भारतीय दंड संहिता १९६० चे  कलम १८८ , २६९ , २७० , २७१ या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.         सदरचा प्रकार ज्यांच्या घराच्या पडवीत विवाह संपन्न झाला होता ते मयत झाल्याने त्यांच्या विधीसाठी अल्पवयीन मुलगी व मुलाचे स्वकीय करंजवन  येथे २४ नोव्हेंबर २०२० रोजी आले असता, पहाटे गरम पाण्याचा ड्रम सांडल्याने

महीलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराबाबत झालेल्या गैरसोय प्रकरणी आज सायंकाळपर्यंत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश !! दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक: त्र्यंबकेश्वर तालुकयातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीरप्रसंगी बेडअभावी महिला रुग्णांची गैरसोय झाल्या प्रकरणी आरोग्य विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले असून आज (दि. २) सायंकाळपर्यत चौकशी अहवाल सादर करुन याप्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत.  त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया झालेल्या स्त्री रुग्णांना दुस-या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रात हलविण्याच्या सुचनाही गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. कोरोनामुळे जिल्हयात कुंटुंबनियोजन शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. लॉकडॉऊन शिथील झाल्यानंतर डिसेंबरपासून जिल्हयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांना सुरुवात झाली आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हा नियमित स्वरुपाचा कार्यक्रम असून एप्रिल ते मार्चपर्यत नियमित स्वरुपात याची अंमलबजावणी करण्यात येते. त्र्यंबकेश्वर तालुकयातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येदेखील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ४१ महिला

महीला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया उद्दीष्ट पूर्ण करण्याचा खेळ ! आरोग्य केंद्राला जिप सदस्या व पंस सभापती यांनी दिली मध्यरात्री भेट !! स्तनदा माता शस्त्रक्रियेच्या नावाखाली वेठीस धरण्याचा निंदनीय प्रकार !! जिल्हा आरोग्य अधिकारी फोन रिसिव्ह करायला व प्रतिक्रिया देण्यास अनुत्सुक !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
शिरसगाव, ठाणापाडा आरोग्य केंद्रांला जि.प.सदस्या माळेकरसह सभापतींची मध्यरात्री भेट. महीला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात स्तनदा मातांचे आरोग्य वाऱ्यावर ! जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी फोन रिसिव्ह न केल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही !      नासिक::-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना महामारीच्या दरम्यान महीला कुटुंब नियोजन शस्रक्रिया थांबल्या होत्या. तर लॉकडाऊन शिथिल होताच तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्रांत  शस्रक्रिया सुरु झाल्या. परंतु शासनाने दिलेल्या नियमांना डावलून शिरसगाव, ठाणापाडा आरोग्य केंद्रांवर स्तनदा मातांना शस्रक्रियेच्या नावाखाली वेठीस धरण्याचा प्रकार हरसुल जिल्हा परिषद सदस्या सौ. रुपांजली माळेकर व सभापती मोतीराम दिवे यांनी दिनांक २० जानेवारीच्या रात्री एक वाजता अचानक दिलेल्या भेटीत वरील प्रकार उघडकीस आला.         जि. प. सदस्या माळेकर व सभापती दिवे यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शहानिशा करण्यासाठी दोन्ही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी मध्यरात्री महीला कुटुंब नियोजन शस्रक्रिया झालेल्या आरोग्य केंद्रा

आधुनिक संजीवनी दाखल ! कथा, व्यंगचित्रांचा समसमा संयोग आनंददायी !! ग्रामपालिकेच्या नवनिर्वाचित सर्व सदस्यांनी एकदिलाने काम करावे हीच ग्रामस्थांची इच्छा !!! व इतर सर्व सविस्तर बातम्यांसह आजचा अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
आजचा न्यूज मसालाचा अंक !

वै. हभप प्रभाकर पाटील एक अजातशत्रु व्यक्तीमत्व - आण्णासाहेब आहेर हिसवळकर ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
वै.हभप प्रभाकर पाटील एक अजातशत्रु व्यक्तीमत्व - आण्णासाहेब आहेर हिसवळकर !                        -------------------------------------                            नासिक(श्रमिकनगर) ::- मनात विचार, वाणीत उच्चार, व कृतीत आचाराचं समत्व हे काही महाभागांच्या जीवनाचा पाया व तोच परमार्थाचा कळस ठरत असतो, असा प्रवास देवत्व प्राप्त करतो, हभप वै. प्रभाकर पाटील हे संत विचाराचे पाईक होते. प्रवृत्ती धर्मातुन निवृत्ती धर्माकडे प्रवास करतांना त्यांनी पुन्हा कधी मागे वळुन पाहिलेच नाही, साधारणत: कोणतेही शास्र विरुध्द आचरण याला पाप म्हणतात, हे शास्रविरुध्द आचरण परमेश्वर प्राप्तीला प्रतिबंधक होते, असे शास्र आहे. पाप हे तीन प्रकारचे आहे, भगवंताला विसरणे हे अविद्यारुप मुख्य पाप, त्यामुळे देहात्मवादी होणे दुसरे पाप, "बळे देह मी म्हणता! कोटी ब्रम्हहत्या माथा!!" व भगवंताच्या आज्ञेच्या विरुध्द वागणे हे तिसरे पाप. त्यांनी मात्र  यापलीकडे वाटचाल केली होती. बाह्य जगात ही वैर नव्हते व अंतर शत्रु ही शांत करुन एक परमात्माच आपलासा केलेला पवित्र देह रुपी जीवन म्हणजे वै. प्रभाकर पाटील होय, त्यांना जीवनात कोणीच

बाबा एक महान विभूती !  ब्रह्माकुमारी संस्थेचे संस्थापक प्रजापिता ब्रह्मा बाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त !! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
बाबा एक महान विभूती  ब्रह्माकुमारी संस्थेचे संस्थापक प्रजापिता ब्रह्मा बाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त ! : जगात तेच लोक महान आणि पूज्य बनतात जे  दुसऱ्याच्या कल्याणासाठी जगतात. अशा महान विभूति चिर काळासाठी अमर होतात.  या महा पुरुषांचे स्मरणतूनच अनेकांना सामर्थ्य प्राप्त होते.  प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय  विश्व विद्यालय चे साकार संस्थापक प्रजापिता ब्रह्मा बाबांचे जीवन अशाच महान विभूतींपैकी एक आहे.  त्यांनी अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आपले तन मन धन जीवन संपूर्ण समर्पित केले होते.  बाबांना नेहमी वाटे की एक असा समाज  बनवा जेथे गुन्हे पापाचार, अत्याचार, व्यभिचार, तीलमात्र नसावा.  याच मजबूत मन्सूब्याने ब्रह्माबाबा यांनी ईश्वरीय निर्णया नुसार १९३६ च्या काळात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाची  मुहूर्तमेढ केली.  त्या काळात माता कन्यांना समाजात दुय्यम स्थान होते.  अशा परिस्थितीत मूल्यनिष्ठ समाज निर्मितीच्या कार्यात त्यांनी महिलांना फक्त सहभागी करून घेतले नाही तर संस्थेची धुरा अशा महिलांच्याच हाती दिली.  महिलांना ज्या काळात नरकाचे द्वार सर्पिणी अशा शब्दांनी हिणवले जात त्

विकास कामांची प्रत्यक्ष पहाणी करत लाभार्थ्यांशी साधला संवाद ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांची कळवण तालुक्यास भेट विकास कामांची प्रत्यक्ष पहाणी करत लाभार्थ्यांशी साधला संवाद                  कळवण - नासिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी आज (१२) रोजी कळवण तालुक्यास भेट दिली. यामध्ये विविध शासकीय योजनांचा आढावा घेत लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन कामाचा दर्जा गुणवत्ता आणि सदरील योजनांचा लाभार्थ्यांना झालेला फायदा याबद्दल माहिती घेतली. कृषी विशेष घटक योजना लाभधारक अण्णा हिरामण शिंदे यांना २०१९ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत विहीर बांधून देण्यात आली होती, या विहिरीच्या पाण्यावर त्यांनी २ एकर कांदा लागवड केली असुन त्यांच्या एकुण उत्पन्नात वाढ झाली असल्याचे यावेळी उपस्थित अधिका-यांना सांगितले. बायोगैस संयत्राचे लाभार्थी मिलिंद कारभारी वाघ यांच्या घरी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी भेट देत माझी वसुंधरा योजनेची माहिती देऊन  बायोगैस संयत्राचा वापर करणा-या वाघ कुटुंबीयांचे कौतुक केले. कळवण पंचायत समिती कृषी विभागाने विविध योजनांचा लाभ ह

छत्रपती संभाजी राजे यांची दरीआईमाता देवस्थानला सदिच्छा भेट ! येथील वनौषधींचा खजिना टिकवून ठेवण्यासाठी वनविभागाने लक्ष द्यावं !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!

इमेज
दरी :- दि.३ जानेवारी २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वे वंशज खासदार युवराज छत्रपती  संभाजी राजे यांची दरी गावातील  ग्रामदैवत असलेल्या दरीआईमाता देवस्थानला सदिच्छा भेट दिली            कोल्हापूर संस्थानचे युवराज छत्रपती संभाजी राजे यांचा गेल्या काही वर्षापासून दरीआई मातेच्या दर्शनाचा मानस होता तो नुकताच पूर्ण झाला, कोरोनाच्या काळात सर्व ठिकाणचे पर्यटनस्थळे बंद असताना एकमेव असे हे स्थळ खुले असल्याने याबाबत पर्यटनाचा मोठा गाजावाजा झाला. या काळात दरीआई माता परिसर विलोभनीय असा ठरला होता, त्यामुळे पर्यटनाचा हा मोठा मानबिंदू ठरू शकतो हा उद्देश समोर ठेऊन स्थानिक नागरिकांनी व शेतकऱ्यांनी येथे मोठी झाडे लावण्यास सुरवात केली असल्याने या परिसरात येण्याचा मोह कोणालाही आवरता येत नाही, त्यामुळे या पर्यटन स्थळाच्या संगोपनासाठी युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी देखील भेट देत गडकिल्ले संवर्धन या कार्यक्रमातून तसेच स्वतः लागेल ती मदत या साठी करण्यास सदैव तयार आहोत असे आश्वासन गावातील जनतेस दिले, तसेच पर्यावरणाचा समतोल टिकविण्यासाठी वृक्ष लागवड करा येथील आयुर्वेदिक व वनौषधी चा खजिना टिकून ठेवण्यास

जिल्हा परिषद प्रशासनाकडून ८ रोजी कोरोना लसीकरण मोहिमेचा ड्राय रन घेण्यात आला ! २५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे प्रात्यक्षित व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडून प्रक्रीयेचा आढावा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!

इमेज
सय्यद पिंप्री येथे कोरोना लसीची ड्राय रन संपन्न २५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे करण्यात आले प्रात्यक्षित नाशिक -  कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे बहुप्रतीक्षित कोविड-१९ प्रतिबंधक लस ही नेमकी कधी दिली जाणार याबद्दल उत्सुकता असतांना जिल्हा प्रशासनाकडून दिनांक ८ रोजी कोरोना लसीकरण मोहिमेचा ड्राय रन घेण्यात आला,  यामध्ये हे लसीकरण कशाप्रकारे पार पाडले जाणार याची रंगीत तालीम करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी सय्यद पिंपरी येथे उपस्थित राहून घेतला.कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्यासाठी आरोग्य केंद्रांमध्ये तीन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, पहिल्या कक्षात आलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यात येईल त्यानंतर दुसऱ्या कक्षात लसीकरण करण्यात येईल, लसीकरण झाल्यानंतर तिसऱ्या कक्षात लसीकरण झालेल्या व्यक्तीला ३० मिनिटे निरीक्षणाखाली ठेऊन त्यानंतरच सोडण्यात येईल. यावेळी एखाद्या व्यक्तीस प्राथमिक उपकेंद्रातून जिल्हा रुग्णालयात हलवण्याची वेळ आल्यास १०८ रुग्णवाहिकेची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी जिल्ह

ट्रक्टर व ट्राॅली या वाहनांचा व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीमध्ये टाकण्यास विरोध ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
ट्रक्टर व ट्राॅली या वाहनांचा व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीमध्ये टाकण्यास विरोध ! नासिक::- केंद्रीय मार्ग व राज्यमार्गाची अधिसूचनेच्या ड्राफ्टमध्ये ट्रक्टर व ट्राॅली या वाहनांना गैरव्यावसायिक वाहन श्रेणीतून बाहेर करण्यात येणार असल्याचे निदर्शनास आले याचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष रतन चावला यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.        ट्रक्टर व ट्राॅलीला सडक परीवहन विभाग किंवा एन एच ए आय च्या नियमावलीत संशोधन करून ट्रक्टर व ट्राॅलीला व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीत आणले तर टोल संकलन केंद्रावर यापुढे ट्रक्टर व ट्राॅलीला टोल भरावा लागेल यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागेल तथापी राज्यात तथा देशात पुन्हा मोठे शेतकरी आंदोलन उभे राहिल. यावर समर्पक निर्णय घेण्यात यावा अशा आशयाचे निवेदन विभागीय आयुक्त कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष येथे आज देण्यात आले.

समर्पित कार्यकर्ता हेच जनजाती कल्याणकारी उपक्रमांचे बळ -  अतुल जोग. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !! न्यूज मसाला सर्विसेस 7387333801.

इमेज
समर्पित कार्यकर्ता हेच जनजाती कल्याणकारी उपक्रमांचे बळ -  अतुल जोग      नाशिक ( प्रतिनिधी ) जनजाति समाजाला स्वावलंबी स्वाभिमानी आणि संघटित करण्याचे कार्य "वनवासी कल्याण आश्रमाच्या" माध्यमातून संपूर्ण देशभरात होत आहे. समर्पित कार्यकर्ता व त्याच्यातील सातत्य हेच अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या विस्ताराचे बळ व गमक असल्याचे प्रतिपादन कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय संघटन मंत्री अतुल जोग यांनी केले. काल नाशिकमध्ये एका बैठकीसाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी  संवाद साधला.        पत्रकार परिषदेत बोलतांना अतुल जोग म्हणाले ,संपूर्ण भारतभरातील २०८ जिल्ह्यातील ७७ हजारांपेक्षा अधिक कुटुंबांनी कल्याण आश्रमाच्या विविध सेवा योजनांचा लाभ घेतला आहे, १७० जनजातीपर्यंत आणि २३ अतिमागास जनजातींपर्यंत कल्याण आश्रमाचा सतत संपर्क आहे.आज अखिल भारतीय पातळीवर कल्याण आश्रमाचे तब्बल ४५१० शैक्षणिक प्रकल्प सुरू असून १ लाख ३८  हजारपेक्षा जास्त लाभार्थी कल्याण आश्रमाच्या विविध सेवाकार्यांचा लाभ घेत आहेत. यात क्रीडा केंद्रे,सांस्कृतिक केंद्रे, स्वमदत गट ग्राम विकास प्रकल्प, आरोग्य शिबिरे, ग्रामीण आरोग्यरक

श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा ! निवेदनात नमूद केले कारण,,,,,,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा ! निवेदनात नमूद केले कारण,,,,,,, नासिक::- श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे निवेदन विशेष पोलिस महानिरीक्षक यांना देण्यात आले.       श्री श्री रविशंकर यांच्या अधिकृत पेजवर एक व्हिडिओ (कार्टून फिल्म) अपलोड करण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचा अपमान होत आहे अशी भावना निवेदनात व्यक्त केली आहे.          निवेदनात औरंगाबाद खंडपीठातील एका प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांचा कोणताही संबंध नाही असे नमूद करण्यात आले असून रामदास स्वामी यांचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. रामदास स्वामी यांचे उदात्तीकरण करताना जे लिखाण केले व त्याचा व्हिडिओ (कार्टून फिल्म) बनविण्यात आला यातून समस्त शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्यामुळे श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेड चे नासिक महानगरप्रमुख हार्दिक निगळ, यांनी दिले, निवेदनावर योगेश पोटे, हर्षल पवार, प्रसाद गोसावी, आदित्य खरात, अभय खरात, शुभम ईतबारी, विनायक गोसावी, तसेच महाराष्ट्र जनस्वराज्य सेना तर्फे समाधान

विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ साहेब यांचा महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटनेकडून सत्कार व विविध विषयांवर चर्चा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ साहेब यांचा महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटनेकडून सत्कार व विविध विषयांवर चर्चा ! भागवत गायकवाड सुरगाणा यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस,      नासिक (२)::- वनारे  ता. दिंडोरी येथे विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ  यांची महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटना  सदस्यांनी भेट घेतली.  मंत्रालयातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी  केलेल्या मंत्रालयातील सहकार्याबद्दल त्यांचा भागवत धूम यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामविकास सचिव यांच्याशी चर्चा करून एक प्रसिद्धी पत्रक लागू करावे जेणेकरून आदिवासी भागातील सर्व कर्मचारी बांधवाना एकस्तर योजनेचा लाभ मिळेल. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांनी जुनी पेन्शन योजनेसाठी मागील काही दिवसांपूर्वी राज्याध्यक्ष नितेश खांडेकर यांची जिल्हा सल्लागार भागवत धुम यांनी  घडवून आणलेली भेट व त्यानंतर झालेली चर्चा याविषयी आज झिरवाळ यांनी सांगितले की आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे "जुनी पेन्शन योजना, मी अजित पवार यांना याविषयी बोललो आहे, लवकरच आपण त्यांच्याबरोबर वर

माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली सामूहिक "हरित शपथ" ! नववर्षानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा केला संकल्प ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!

इमेज
माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत  जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली सामूहिक "हरित शपथ " ! नववर्षानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा केला संकल्प नाशिक : "माझी वसुंधरा" या अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सामुहिक हरित शपथ घेत पर्यावरण संवर्धनासाठी व्यक्तिगत स्तरावर कृतिशील प्रयत्न करण्याचा संकल्प केला. जिल्हा परिषदेच्या मुख्य आवारात सकाळी सर्व कर्मचारी एकत्र येत जिल्हा परिषदेचे  अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर,मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात करत पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी "माझी वसुंधरा" अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना "हरित शपथ" दिली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी याप्रसंगी सर्व कर्मचा-यांना नुतन वर्षाच्या शुभेच्छा देत येत्या वर्षात पर्यावरण संवर्धनासाठी जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परिने प्रयत्न करण्याचे आवाहन केले,