पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोरोना साथ काळात औषध निर्माण अधिकारी संघटनेमार्फत प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
न्यूज मसाला सर्विसेस, नासिक 7387333801 कोरोना साथ काळात औषध निर्माण अधिकारी संघटनेमार्फत प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन !       नाशिक  दि.९ : भारत देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या साथीच्या लाटेने कहर केला आहे. नाशिक जिल्हा हा कोरोना वाढत्या संख्येत संपूर्ण भारत देशात दहा क्रमांकामध्ये असल्याची नोंद झाली आहे. कोरोना साथ काळात गेल्या वर्षभरापासून शासकीय रुग्णालयीन औषध निर्माण अधिकारी हे कोरोना साथरोग कार्यक्रमात पहिल्या फळीतील कर्मचारी म्हणून आरोग्य सेवेत कर्तव्य बजावत आहे. सामाजिक बांधिलकी उपक्रम म्हणून दैनंदिन शासकीय कामकाज सांभाळून शासकीय रुग्णालयात कामकाज करणाऱ्या औषध निर्माण अधिकारी यांची नोंदणीकृत औषध निर्माण अधिकारी संघटना, जिल्हा शाखा नाशिक यांचे मार्फत रक्तदान शिबिर, आपत्तीग्रस्तांना मदत, शासकीय कन्या विद्यालय नाशिक येथील मुलींना मोफत वह्या वाटप असे सामाजिक बांधिलकीचे उपक्रम संघटनेच्या व्यासपीठावरून राबविले जातात.       सध्या महाराष्ट्र राज्यात त्यात प्राधान्याने नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढलेला असुन कोरोना बाधित रुग्णांसाठी प्लाझ्मा

चित्रविषय खुलविणारी आकर्षक किनार ! हिऱ्याला सोन्याचे कोंदण केल्यावर त्याचे मूल्य अनेकपटीने वाढते तसेच काम या रेखीव किनारींमुळे होते !! न्यूज मसाला सर्विसेस नासिक, 7387333801. सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
चित्रविषय खुलविणारी आकर्षक किनार !    आदिवासी वारली स्त्री - पुरुष भिंतीवर चित्र रेखाटताना सर्वप्रथम आयताकृती किनार ( बॉर्डर ) रंगवतात. नंतर त्यामधील मोकळ्या जागेत चित्र काढतात. आकर्षक अशा किनारीमुळे चित्रातील विषय अधिकच खुलतो. चित्र जास्त उठावदार दिसते. चित्राला बंदिस्त स्वरूप येऊन बघणाऱ्या रसिकांचे लक्ष मुख्य चित्रातील घटकांवर एकवटते. एखाद्या चित्राला फ्रेम केल्यावर त्याचे सौंदर्य वृद्धिंगत होते. हिऱ्याला सोन्याचे कोंदण केल्यावर त्याचे मूल्य अनेकपटीने वाढते. तसेच काम या रेखीव किनारींमुळे होते.    ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या आदिवासी वारली चित्रशैलीत मुलाकारांचा वापर केला जातो. चित्रांची किनार रेखाटताना बिंदू, रेषा, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ यांचाच वापर करतात. आकार - घटकांची पुनरावृत्ती केली जाते.कोणत्याही चित्राला जशी आपण फ्रेम करतो त्याप्रमाणे वारली चित्र काढण्यापूर्वी किनार रेखाटली जाते. त्यामुळे चित्राला मर्यादा येते मात्र किनारीने उठाव देखिल मिळतो. किनारीत मोजकेच आकार असले तरी त्यांच्या उपयोजनात वैविध्य आढळते. वारली कला हा आदिवासींच्या काळजाचा हुंकार आहे. शेतीकाम

पश्र्चिम बंगाल मध्ये भाजपा जिंकली ! हे वाक्य चूकीचे आहे का ? याचे उत्तर खचितच नाही असे येणाऱ्या काळात दिसणार ! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
पश्र्चिम बंगाल मध्ये भाजपा जिंकली ! हे वाक्य चूकीचे आहे का ?            याचे उत्तर खचितच नाही असे म्हणावे लागेल, ममता बॅनर्जी यांनी दोनशेपार जागा जिंकून हॅटट्रिक साधली आहे ती एका अर्थाने राज्यापुरती मर्यादीत समजावी लागेल. पश्र्चिम बंगालच्या निवडणूकीत ममता बॅनर्जी यांच्या विजयाविषयी आज माध्यमांमधून रकानेच्या रकाने भरून येतील, तसे यायलाही हवेत याबद्दल कुणाचेही दुमत असू नये, लोकशाहीचा तो सन्मानच म्हणावा लागेल, ही नाण्याची एकच बाजू आहे, दुसऱ्या बाजूनेही विश्लेषण केल्यास केंद्रात भाजपाची सत्ता आहे आणि भाजपाचा काही छुपा अजेंडा असेल तर त्यासाठी तीन वरून ऐंशीच्या आसपास जागा जिंकणे व पश्र्चिम बंगाल मध्ये मोठा विरोधी पक्ष म्हणून बसणे हा वरकरणी पराभव दिसत असला तरी भाजपासाठी हाच खरा मोठा विजय आहे !         केंद्रात तील भारतीय जनता पक्षाचे सरकारचा अजेंडा व त्यासाठी लागणारे राज्यसभेतील संख्याबळ याचा विचार केल्यास काही मर्यादा येत आहेत, मात्र काल झालेल्या पश्चिम बंगाल मधील निवडणूक निकालानंतर भाजपाचे राज्यसभेतील संख्याबळ पाच ते सहा जागांनी वाढते आहे तद्वतच विरोधातील संख्याबळ पाच ते सहा ने कमी होत

हिरकमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या पुण्यातील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक ! व्यासंगी लेखक, जिज्ञासू संशोधक, विचारवंत व उत्तम प्रशासक असलेले डॉ. गोविंद गारे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व !

इमेज
आदिवासी संशोधनाचे हिरकमहोत्सवी पदार्पण !     आदिवासींच्या कला त्यांच्या जीवनशैलीशी निगडित आहेत. चित्र, नृत्य, संगीत यांनी त्यांचे जीवन समृद्ध केलेले आहे. त्यांच्या जगण्यातले कलात्मक अंतरंग पुण्यातील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयात उलडगलेले दिसते. महाराष्ट्रातील आदिम संस्कृतीच्या सखोल अभ्यासासाठी दि.३ मे १९६२ रोजी राज्य शासनाने आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची ( टीआरटीआय ) स्थापना केली. पुढे १९६५ साली या संस्थेतर्फेच हे संग्रहालय दिमाखात उभे राहिले. आदिम संस्कृतीचा आकर्षक चेहरा येथे बघायला मिळतो. यंदा ही संस्था हिरकमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.सध्या श्रीमती पवनीत कौर आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत आहेत. या संग्रहालयाच्या कलात्मक वाटचालीचा प्रवास महाराष्ट्र राज्य एकसष्टी निमित्ताने...       महाराष्ट्रात एकूण ४७ आदिवासी जमाती सुखाने नांदतात. त्यातील वारली,महादेव कोळी, कोलाम, कातकरी, ठाकर,भिल्ल, गोंड, माडिया, पावरा अशा जमातींचा अवघा संसार पुण्यातील या संग्रहालयात सजला आहे. त्यांची पारंपरिक आगळीवेगळी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, आकर्षक घरेदारे, दररोजच्या वापरण्यात येणारी मातीची व ध