पोस्ट्स

2024 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गटविकास अधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
गटविकास अधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !      नासिक(नंदुरबार)::- गट विकास अधिकारी (वर्ग १) विजय लोंढे व सहाय्यक लेखाधिकारी रवींद्र सुखदेव लाडे पंचायत समिती अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.          दोन्ही आलोसेे यांची एकुण २६०००/- रु. अशी लाचेची मागणी आलोसे लाडे यांनी केली. गटविकास अधिकारी लोंढे साठी १८०००/- रुपये व सहाय्यक लेखाधिकारी लाडे यांनी स्वतः साठी ८०००/- रु. लाचेची मागणी केली होती .           तक्रारदार यांनी पंचायत समिती अक्कलकुवा  व  ग्रामपंचायत डाब अंतर्गत एकूण तीन अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण केले आहे. नमुद तिन्ही कामांच्या बिलाची रक्कम  ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तक्रारदार यांनी सहाय्यक लेखाधिकारी यांना वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु तक्रारदार यांची बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केली नाही. यानंतरही तक्रारदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असता, आलोसे यांनी तक्रारदार यांच्या एका कामाचे  बिल २४६८५०/- रु.  ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केले जे तक्रारदार यां

एकदा सर्वांनी कवयित्री फरझाना इकबाल यांची पंढरीच्या "विठ्ठलाच्या भेटीसाठी मन विठाई विठाई" रचना ऐकायला हवी !

इमेज
ख्यातनाम कवयित्री फरझाना इकबाल यांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या कवितेला गायक रमेश गुजर यांनी दिलेली चाल आणि त्यांच्याच सुमधुर आवाजात गायिलेल्या कवितेच्या ओळींनी विठ्ठल प्रेमींमध्ये नवचैतन्य निर्माण होत आहे. सध्या पंढरीच्या वारीची लगबग सुरू आहे. वारक-यांचे अनेक विडीओ बघून मन प्रसन्न होते. मात्र या कवितेने विठ्ठल वारी साहित्यात नवीन भर टाकली आहे असे कवयित्री फरझाना इकबाल यांनी सांगितले. गायक रमेश गुजर यांचे आभार मानत विठ्ठल चरणी आपली सेवा रूजू झाली अशा भावना व्यक्त केल्या.  सर्वांनी सदर रचना एकदा ऐकायला हवी !

'श्री दत्त माहात्म्य कथामृत' ग्रंथाचे लोकार्पण !

इमेज
'श्री दत्त माहात्म्य कथामृत' ग्रंथाचे लोकार्पण !             नाशिक( प्रतिनिधी ) प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी लिहिलेल्या ' श्री दत्त महात्म्य ' या ग्रंथाचा आजच्या सुलभ मराठीत भावानुवाद असलेला निरुपणकार पद्माकर देशपांडे यांचा 'श्री दत्त महात्म्य कथामृत ' हा ग्रंथ आषाढ शुद्ध प्रतिपदा टेंबे स्वामी यांच्या पुण्यस्मरणदिनी त्यांचे जन्मस्थान असलेल्या माणगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग  येथील दत्त मंदिरात लोकार्पण करण्यात आला. मुंबईच्या प्रसिद्ध नवचैतन्य आणि हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.  या सोहळ्यास प. प. दंडी स्वामी वल्लभानंद महाराज, दंडी स्वामी वामनानंद महाराज, दत्त मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सुभाष भिसे, दीपक साधले, ट्रस्टी गुरुनाथ गाणपत्ये, परमपूजनीय विमल भाई, वैभव पेंढारकर, नाशिकच्या श्री दत्त सेवा समितीचे संस्थापक प्रभाकर पाठक,  समितीचे अध्यक्ष व नाशिकच्या गणेश बाबा देवस्थानचे विश्वस्त विवेक महाराज दंडवते, माणगाव देवस्थानचे व्यवस्थापक शिवराम काणेकर, अनिल राज कवीश्वर आदींसह राज्यभरातून आलेले वासुदेवानंद सरस्वती यांचे परंपरेतील भाविक अनुयाय

महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ..

इमेज
महाराष्ट्राला  ‘ मार्वल ’  च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ..                आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्ध‍िमत्ता किंवा एआय हा सध्या तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक झाला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने केला तर मानवाचे जीवन सुकर होऊ शकते. याच उद्देशाने आता जगभर विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र पोलीस दलालाही आता  ‘ मार्वल ’  कंपनीच्या स्थापनेमुळे गुन्ह्यांची उकल गतीने करण्यासाठी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची जोड मिळाली असून भविष्यात सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी महाराष्ट्राला याचा मोठा लाभ मिळणार आहे.          मागील काही वर्षांत कृत्रिम बुद्ध‍िमत्तेच्या माध्यमातून अनेक नवकल्पना निर्मित होऊन प्रगती साधली जात आहे. अनेक वर्षांपूर्वी ज्या बाबी कल्पनेबाहेरच्या वाटत होत्या त्या वैज्ञानिक सिद्धांताद्वारे मान्य होऊन हळूहळू वास्तविकतेत रूपांतरित झाल्या. त्याचेच आजचे आधुनिक स्वरूप म्हणून आपण कृत्रिम बुद्धीमत्तेकडे पाहू शकतो.                 कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवाप्रमाणे विचार करण्यासाठ

अंध व्यक्तींच्या सामान्य मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

इमेज
अंध व्यक्तींच्या सामान्य मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ! नाशिक::- येथील ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड अँड‌ डिझॅबल्ड या संस्थेच्या वतीने डॉ. हेलेन केलर यांच्या जयंती निमित्त २७ जुन २०२४ रोजी साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट येथे दिव्यांग व्यक्तींच्या सामान्य मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलिस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ व एम.एस.एल. ड्राइवलाइन सिस्टीम कंपनीचे पर्सनल मॅनेजर हेमंत राख उपस्थित होते. दोन्ही पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्याचे कौतुक करून संस्था राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती करून घेतली व आपण देखील संस्थेला सर्वतोपरी मदत करू असे सांगितले. तसेच या प्रसंगी उपस्थित असलेले इतर मान्यवर पिंपळगाव कृषी उत्पन्न समिती चे अध्यक्ष पाटील व विंचूरहून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले अशोक लोळगे व परिवार यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन उपक्रमासाठी आर्थिक मदत केली. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, कृष्णकुमार चावरे, विद्या जगताप, नीमिता शेजवळ आदी उपस्थित होते. या प्रसंगी संस्थ

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

इमेज
दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४, नासिक::- साप्ताहिक न्यूज मसाला च्या  "लोकराजा" (वर्ष १३ वे)  दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन संपादक नरेंद्र पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.            राष्ट्रीय विक्रम प्राप्त एकमेव दिवाळी विशेषांक तथा आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना स्पर्धेत निवड व गौरव पुरस्कार तसेच काव्यमंच पुरस्कारासह अनेक मान्यवरांनी गौरविलेल्या, ११ वर्षे मुखपृष्ठावर आजी-माजी संसद सदस्याचे छायाचित्र प्रकाशित करणारा एकमेव दिवाळी विशेषांक व २०२३ ला प्रभू  श्रीराम मंदीराचे मुखपृष्ठ प्रकाशित करण्यात आले.            न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी अंक यंदा १३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मराठी साहित्यिक विचारांचा गौरव व नव साहित्यिकांच्या लेखनाला यथोचित सन्मानाने स्थान देण्याचा मानस या वैशिष्ट्यांसह "लोकराजा" अंकाने सर्वदुर सहस्रावधी वाचकांची आवड जोपासली आहे. लेखक, कवी, विचारवंतानी आपण स्वत: लिहिलेली साहित्य कृती (कथा, कविता, ललित लेख यापैकी फक्त एकच साहित्य रचना )

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इमेज
विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !                  नाशिक ( प्रतिनिधी) -अफलातून म्युझिक लव्हर्स व संतोष फासाटे यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक ग्रुपतर्फे सूरसम्राज्ञी लता (भाग २) हा हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी दि.२९ रोजी संध्याकाळी ५.४५ वाजता ही विनामूल्य मैफल परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रंगेल. यावेळी लतादीदींचा सुरेल सुवर्णकाळ अनुभवायला मिळणार आहे.     सुप्रसिद्ध गायिका नमिता राजहंस, अपर्णा देशपांडे, डॉ. विशाखा जपताप, अश्विनी सरदेशमुख, मीनाक्षी भुतडा, सीमा जाधव, स्वाती जाधव, अर्चना सोनवणे लतादीदींनी गायलेली लोकप्रिय गाणी सादर करतील. त्यांना ख्यातनाम सुमधुर गायक हरीशभाई ठक्कर, मयूर तुकडिया, मनोज पळसकर, राजू पवार व उमेश मालवी स्वरसाथ करणार आहेत. त्याचबरोबर संतोष फासाटे यांच्या खुमासदार निवेदनामध्ये लतादीदींचा प्रदीर्घ जीवनप्रवास, त्यांचा संघर्ष, अलौकीक प्रतिभा व अविस्मरणीय आठवणींनाही उजाळा देण्यात येणार आहे. प्रकाश गोसावी पाहुणे गायक तर विशेष सहकार्य सुनील भुतडा यांचे लाभले आहे. पवन वंजारी ध्वनी संयोजन करतील. कार्यक्

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

इमेज
"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी ! छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)::- ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिग्दर्शित केलेला "राजकारण गेलं मिशीत" हा विनोदी चित्रपट नुकताच सगळीकडे प्रदर्शित झालेला आहे.             सुप्रसिद्ध साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या कथेवर आधारित या चित्रपटातील  बहुतांश कलाकार मराठवाड्यातील असून छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ कवी आणि गीतकार उद्धव भयवाळ यांच्या 'लावण्य बहार' या अल्बम मधील एक लावणी या चित्रपटात घेण्यात आलेली आहे.              या लावणीच्या निमित्ताने उद्धव भयवाळ यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले असून समाजातील सर्व स्तरांमधून भयवाळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. २० एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथील प्रोझोन मॉल मधील आयनॉक्स चित्रपटगृहात या चित्रपटाचा प्रिमियर शो झाला. यावेळी दिग्दर्शक मकरंद अनासपुरे, संगीतकार अतुल दिवे, गीतकार उद्धव भयवाळ तसेच चित्रपटातील इतर कलाकार उपस्थित होते.

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

इमेज
इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !  नाशिक ( प्रतिनिधी ) इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग व एअर कंडीशनींग इंजिनिअर्स (इशरे) या संस्थेच्या नाशिक शाखेचा नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचा पदग्रहण व शपथग्रहण समारंभ  शनिवारी (दि. २०) एप्रिल रोजी हाॅटेल ग्रॅन्ड रिओ येथे करण्यात आला. शपथग्रहण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुप बालानी, उपाध्यक्ष मिहीर संघवी, पश्चिम विभागीय व्यवस्थापक  मनीष गुलालकरी उपस्थित होते.     नवनिर्वाचित अध्यक्ष अशफाक कागदी, उपाध्यक्ष वरुण तिवारी, सचिव अनिकेत चौधरी, खजिनदार अनिता बोराडे व कार्यकारिणी सदस्य  गुलाम हुसेन, प्रविण कामाले, प्रविण पातुरकर, सारंग दिडमिशे, रोहिणी मराठे, शामसुंदर कापसे यांनी शपथ घेतली. संस्थेचे मावळते अध्यक्ष गोविंद नायर यांनी  २०२३ - २४ या वर्षातील संस्थेच्या कार्यक्रमांचा आढावा घेतला व विविध उपक्रमातील सहकार्याबद्दल मावळत्या संचालक मंडळाचे आभार मानले. नवनिर्वाचित अध्यक्ष अशफाक कागदी यांनी आगामी संकल्पित कार्यक्रमांची रूपरेषा विषद केली.       यावेळी इतर सोसायटीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची उपस्थ

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

इमेज
निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते ! लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार घ्यावी लागते शपथ नाशिक::- लोकसभा, राज्यसभा,  विधानसभा आणि विधानपरिषदेसाठी  निवडणूक लढविणा-या उमेदवारांना भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार त्यांचा उमेदवारी अर्ज म्हणजेच नामनिर्देशन पत्र दाखल करतांना भारताच्या संविधानावर माझा खरा विश्वास आणि निष्ठा असेल आणि आणि मी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखेल अशी शपथ किंवा प्रतिज्ञा घ्यावी लागते. ही शपथ आयोगाने निर्देशित केलेल्या व्यक्तींपुढेच घ्यावी लागते, ही माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास सर्वसाधारणपणे निवडणूक होणा-या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेपुढे अशी शपथ घेता येते. तसेच आयोगाचे निर्देशानुसार प्रथम वर्ग दंडाधिकारी, जिल्हा न्यायाधीश यांच्यापुढे देखील उमेदवारांना अशी शपथ घेता येते. नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी निवडणूक लढविणारा उमेदवार जर प्रतिबंधात्मक स्थानबद

अनंत कान्हेरे मैदान विकसित तरी समस्या कायम ! आयुक्तांना निवेदन !

इमेज
अनंत कान्हेरे मैदान विकसित तरी समस्या कायम ! आयुक्तांना निवेदन !            नासिक::- नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान कोट्यवधी रुपये निधी मंजूर होऊन खर्च करण्यात आला परंतु तिथे अद्यापही पूर्णपणे सुविधा जॉगर्स धारकांना मिळत नाहीत. पुर्वी ज्या समस्या होत्या त्या अजूनही जशाच्या तशा कायम आहेत. मैदान विकसीत होऊन समस्या मिटतील असे वाटत होते. परंतु त्या समस्या तत्पूकाळ सुटण्याऐवजी हळूहळू पूर्व पदावर येत आहेत मग मैदान विकसित करून मिळवले काय हा प्रश्न कायम आहे, आज मैदानात झाडांना पाणी मारले जात नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. हिरवळ तयार करून हिरवाईचा हिरवा रंग राहिला नाही, संध्याकाळी मैदानात वाहने येतात अन जातात  यावर कुठलेही निर्बंध नाही. मैदानात रात्री टवाळखोरांची मनसोक्त सोय होते, प्रेमीगुलांचा तर प्रेमाचे अड्डे निर्माण झाले आहेत. मग या मैदानाला सुसज्ज कसे म्हणता येईल. मैदान विकसित केले तरी मैदानाची देखभाल होत नाही. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मैदानाची अशी अवस्था असेल तर बाकीच्या मैदांनाचे काय ? या सर्व बाबीकडे प्रशासनाकडून लक्ष देण्यात यावे म्हणून मोरया ज

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड युके कडून उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर सन्मानित !

इमेज
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड युके कडून उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर सन्मानित !        छत्रपती संभाजीनगर::- येथील प्रथितयश लेखिका, प्रेरक व्याख्यात्या तथा उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांना रविवार दिनांक दहा मार्च रोजी शिर्डी येथे एका समारंभात लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् (युनायटेड किंगडम) या संस्थेचे अध्यक्ष संतोष शुक्ला यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र आणि पदक देऊन गौरविण्यात आले. समाजातील सर्व स्तरातून अंजली धानोरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !

इमेज
सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !        नासिक::-  दिनांक ७ मार्च २०२४ रोजी जिल्हा परिषद नाशिक मधील अनिल गीते व अनिल सानप यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी मधून सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली. तसेच वरिष्ठ सहाय्यक श्रीमती छाया सोनवणे, राजेंद्र येवला, धनराज पवार, दिलीप पाटील, विलास ननावरे, मंगेश चव्हाण, ओम प्रकाश पाटोळे, किरण माळवे, चंद्रकांत पगारे यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली. गजेंद्र घाडगे व जीवन पारधी यांना कनिष्ठ सहाय्यक पदावरून वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यात आली.       पदोन्नती चार प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता आज हा प्रश्न मार्गी लागल्याने लिपिक वर्गीय कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले. सदरच्या पदोन्नती पारदर्शकपणे राबविल्याने व कर्मचाऱ्यांची गैरसोय न झाल्याने कर्मचारी यांनी समाधान व्यक्त करत परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्रीमती वर्षा फडोळ, मुख्य

सार्वजनिक आरोग्य विभागाची १९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान विशेषमोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम, पंधरवड्यात १ लाख शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट !

इमेज
सार्वजनिक आरोग्य विभागाची १९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम पंधरवड्यात १ लाख     शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट               मुंबई  :    राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षिणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत दि. १९ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२४ दरम्यान राज्यभरात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे.    या कालावधीत १ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.    शासकीय रुग्णालय ,  मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्था रुग्णालय येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा ,  असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.           या मोहिमेंतर्गत १ लाख शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हानिहाय नियोजन केले असून संबंधित आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्र शासनामार्फत  ‘ राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान ’  ही विशेष मोहीम जून , २०२२  पासून राबविण्या

प्रेरणादायी गोष्टींमधून विशेष बालकांनी अनुभवले छत्रपती शिवाजी महाराज !

इमेज
प्रेरणादायी गोष्टींमधून विशेष बालकांनी  अनुभवले छत्रपती शिवाजी महाराज !         नाशिक ( प्रतिनिधी ) निरागस विशेष  बालकांनी शिवचरित्र समजून घेत स्वराज्य संस्थापक शिवरायांच्या गोष्टींमधून नवे स्वप्न बघितले. स्वतःतील न्यूनगंड दूर करून प्रगती करण्याची प्रेरणा घेतली. प्रेरणादायी गोष्टींमधून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज अनुभवले.     रायझिंग चाईल्ड डेव्हलपमेंट अँड लर्निंग सेंटरतर्फे आज ( दि. १८ ) शिवजयंतीच्या औचित्याने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गतीमंद विशेष बालकांच्या या प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका मोनिका गोडबोले - यशोद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या छोट्या प्रेरक कथा सांगितल्या. मुलांनी मावळ्यांचा वेष परिधान करून शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला.‌ शिवरायांचा‌ जयजयकार केला. मुलांनी कुतुहलाने अनेक प्रश्न विचारले. त्यांची समर्पक उत्तरे मिळाल्याने त्यांचे समाधान झाले. यावेळी अनुष्का यशोद, ऋतुजा ढोरे, लीना काळे, मयूर कारंडे यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. पालकांनीही सहभाग नोंदवला.

'Maharashtra MSME Defence Expo' to be held in Pune from Feb 24

इमेज
'Maharashtra MSME Defence Expo' to be held in Pune from Feb 24 Mumbai, Feb 17: In order to further strengthen the progress of self-reliant India in the sector of defence production and to promote the micro, small and medium industries producing defence materials in Maharashtra through the Industries Department of the State Government, a 3-days 'Maharashtra MSME Defence Expo' has been organized in Pune from 24th to 26th February 2024. Notably, this is the first of its kind Defence Expo in Maharashtra to enable the Micro, Small and Medium Enterprises (MSMEs) of the state to contribute significantly to the defence manufacturing sector and is being held at the International Exhibition and Convention Center in Pune.        All the three armed forces namely navy, army and air force are going to play an important role in this with the aim of promoting the coordination of industries with advanced technology and expertise in the sector of defence production. More than two hundre

अभियंता महेश व डॉ.नरेश बागूल यांच्या मातोश्री निलादेवी यांचे निधन !

इमेज
अभियंता महेश व डॉ.नरेश बागूल  यांच्या मातोश्री निलादेवी यांचे निधन !        नासिक::- रा. भालेर ह.मु. नासिक येथील पर्यटन विभागाचे विभागीय अभियंता महेश बागूल यांच्या मातोश्री, बागूल कुटुंबियांचा आधारवड स्व.निलादेवी शिवाजीराव बागुल (ताई) यांना आज दि.१६ शुक्रवार रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास देवाज्ञा झाली.            डॉक्टर नरेश शिवाजीराव बागुल वैद्यकीय अधिकारी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, पुणे, व महेश बागूल, विभागीय अभियंता पर्यटन विभाग, नाशिक यांच्या त्या मातोश्री.     स्व.ताईंचा अंत्यविधी उद्या दि.१७/२/२०२४ शनिवार रोजी दुपारी १२ वा नाशिक पंचवटी अमरधाम येथे आहे.

अश्विन अघोर यांच्या रूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार गमावला : सुधीर मुनगंटीवार

इमेज
अश्विन अघोर यांच्या रूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार गमावला : सुधीर मुनगंटीवार   चंद्रपूर/मुंबई::-" राष्ट्र प्रथम" हा विचार प्रखरपणे मांडणारे पत्रकार श्री अश्विन अघोर यांचे अकाली निधन धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या रूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार आपण गमावला आहे ,  अशा शब्दात सांस्कृतिक कार्य ,  वने व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिवंगत पत्रकार श्री अश्विन अघोर यांच्या निधनाबद्दल आपले दुःख व्यक्त केले आहे.        ते पुढे म्हणाले की त्यांच्या स्वभावात वैदर्भीय दिलखुलासपणा आणि मिश्किलपणा ठासून भरला होता. जीवनात यश मिळवतांना अनेक संकटांना त्यांनी खिलाडूपणे हसतमुखाने तोंड दिले. अनेक वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनेल्समधील यशस्वी कारकिर्दीनंतर आपल्या "घनघौर" या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलवरून खऱ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या सत्याचा शोध अव्याहतपणे मांडणाऱ्या अश्विनजींच्या अकाली जाण्याने तयार झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील. आपल्या लिखाणातून आणि व्हिडियो वार्तापत्रातून मांडलेल्या विश्लेषणातून त्यांनी जनजागृतीचे मोठे कार्य सातत्याने केले. माध्यम क्षेत्

बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी पहिले १००० दिवस महत्वाचे !

इमेज
बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी  पहिले १००० दिवस महत्वाचे !         नाशिक ( प्रतिनिधी) - माता गर्भवती राहिल्यापासून ते जन्मलेले बाळ दोन वर्षांचे‌ होईपर्यंतच्या काळात बाळाच्या‌ मेंदूची ७५ टक्के वाढ पूर्ण होते. बाळ गर्भावस्थेत असल्यापासून पहिले १००० दिवस त्याच्या‌ सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्वाचे असतात. या काळात बाळाला योग्य पोषण, माया देऊन त्याचे उत्तम संगोपन केले तरच मेंदूची पूर्णपणे वाढ होते. मेंदूतील अनेक केंद्रांची जोडणी होऊन बाळाची आकलन शक्ती, समाजिक कौशल्ये विकसित होते. त्याचा योग्य दिशेने संज्ञात्मक‌ व गुणात्मक विकास होतो. हा विकासाचा अतिआवश्यक टप्पा असून बाळाला स्पर्श, प्रेम आणि पोषणाची जरुरी असते. आई देखील सशक्त, निरोगी व आनंदी असणेही महत्वाचे आहे.  मुलाच्या वाढीसाठी आवश्यक सर्व गोष्टी त्याला वेळच्यावेळी मिळणे हा त्याचा अधिकार आहे. युनिसेफ व सर्वजणी महिला उत्कर्ष संस्थेच्या कार्यशाळेत अशी माहिती देण्यात आली.       प्रारंभी सुजाता शिर्के यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, या संदर्भात  पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे. जनजागृतीसाठी पत्रकारांनी आपल्या माध्यमाद्वारे स

जिल्हा परिषदेतील ५१ परिचर यांना कनिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती !

इमेज
जिल्हा परिषदेतील ५१ परिचर यांना कनिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती !        नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत ५१ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या कै.रावसाहेब थोरात सभागृहात समुपदेशनाने पदोन्नती प्रक्रिया पार पडली. यामध्ये परिचर या पदावरून कनिष्ठ सहाय्यक लिपिक या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा परिषद अधिनस्त सर्व विभागांनी पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे निर्देश दिले होते, यानुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या तत्परतेने मागील महिन्यात अनुकंपा कर्मचारी गट ड मधून गट क संवर्गात समुपदेशनाचे समायोजन करण्यात आले. यानंतर आज सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने परिचर संवर्गातुन पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात आली. परिचर संवर्गातून ४९ तर वाहन चालक संवर्गातून २ कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आली.          दि. ८ फेब्रुवारी रोजी सामान्य प्रशासन विभागांतर्गत परिचर कर्मचारी पदोन्नती संदर्भात मुख्य

संविधानात सर्वांना एकत्र ठेवण्याची ताकद- हफिजुल्लाह खान

इमेज
संविधानात सर्वांना एकत्र ठेवण्याची ताकद- हफिजुल्लाह खान            नाशिक::- सर्व भारतीयांना गुण्यागोविंदाने एकत्र ठेवण्याची ताकद आपल्या संविधानामध्ये आहे. अशा संविधानाची अमोल भेट पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना दिली. संविधानाच्या जोरावर व मार्गावर आपण सर्व भारतीयांनी आपला देश व देशातील लोकशाही मजबूत ठेवण्याचे आवाहन अल्जामीयातुल इस्लामिया एजुकेशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष हफिजुल्लाह खान यांनी केले.             सातपूर - अंबड लिंकराेडवरी आझादनगर येथील अल्जामीयातुल इस्लामिया एज्यकेशनल स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त पुरस्कार वाटपासह विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्षा फिदा हूसैन ताबीर अली चाैधरी, जनरल सेक्रेटरी आबीद अली हफिजुल्लाह खान, सदस्य अबरार अहमद अजिमुल्लाह खान, हुसैन अली माेहम्मद खान, मौलाना अब्दुल हमीद चौधरी  उपस्थित हाेते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका अमिरूनिस्सा, शिक्षक शाहिद, शोएब, झुबेर, संदीप, मुसद्दीक यांन

मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
    नासिक(धुळे)::-  शासकीय प्राथमिक आश्रम शाळा, म्हळसर कॅम्प सुलवाडे, ता. शिंदखेडा जि. धुळे येथील मुख्याध्यापक प्रदीप कुमार वामनराव राठोड व शासकीय प्राथमिक आश्रम शाळा म्हळसर शिरपूर जि. धुळे येथील कार्यालय अधीक्षक हनुक फुलसिंग भादले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.           यातील तक्रारदार यांच्या पत्नी महिला आदिवासी बचत गटाच्या सचिव आहेत. त्यांच्या बचत गटाने शासकीय प्राथमिक आश्रम शाळा म्हळसर, कॅम्प सुलवाडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे शालेय पोषण आहारा करिता भाजीपाला पुरवठा करण्याचे कंत्राट घेतले असून तक्रारदार हे त्यांच्या पत्नीस मदत करत असतात. सदर महिला बचत गटास वरील आश्रम शाळेकडून भाजीपाला पुरवठ्याचे मागील ९ महिन्याचे देयक मंजूर करून दिले होते. त्याचा मोबदला म्हणून तसेच उर्वरित २ महिन्याचे पुढील देयक अदा करण्यास मदत करण्यासाठी वरील आलोसे क्र. १ व आलोसे क्र. २ यांनी तक्रारदार यांच्याकडून २००००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती १२०००/- रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. सदरची लाच रक्कम ही वरील आलोसे क्र.२ यांनी पंचांसमक्ष स्वीकारल्याने त्यांना रं

जागृती श्रवण विकास विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा ! स्वामी श्री कंठानंद महाराज यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत !

इमेज
जागृती श्रवण विकास विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा ! स्वामी श्री कंठानंद महाराज यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत !       मखमलाबाद (नासिक)::- सह्याद्री शिक्षण प्रसारक व समाज विकास मंडळ संचलित अमर बन्सीलाल छाजेड जागृती श्रवण विकास विद्यालय मखमलाबाद नाशिक येथे भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख मान्यवर स्वामी श्री कंठानंद अध्यक्ष श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान, प्रवर्तक जागृत नाशिक जागृत भारत अभियान यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील दिव्यांग बालकांनी आपले विविध कलाविष्कार प्रमुख मान्यवरांच्या समोर सादर केले. तसेच या कार्यक्रमास स्वामी श्रीकंठानंद, साप्ताहिक न्यूज मसाला चे संपादक नरेंद्र पाटील, प्रदीप बंब कोपरगाव, निनाद पुरोहित, विलास पंचभाई, विजय शंकपाल, श्रीकांत चिंचोलीकर, श्रीकांत कुलकर्णी, संस्था अध्यक्ष डॉ.सतीष लुंकड, सचिव  कोठारी, उपाध्यक्ष प्रशांत मुथा, उपसचिव शरद शिरोडे, संस्थापक रामचंद्र सूर्यवंशी, संचालक संदीप लुंकड, बाळासाहेब गिरी, शालेय समितीचे सर्व सदस्य
NEWS MASALA 

हृदयातील राम ! नागेश शेवाळकर, पुणे

इमेज
हृदयातील राम !             'राम' या पवित्र शब्दात प्रचंड ऊर्जा, अलौकिक शक्ती आहे. जो या शब्दाचा सातत्याने उच्चार करतो त्याचे जीवन बदलून जाते. रस्त्याने चालताना, घरात बसलेले असताना कुठेही ही दोन अक्षरे कानावर पडली की, अंतःकरणात आणि शरीरात एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह संचारला जातो, आपल्याही मुखातून रामनाम बाहेर पडते, हात भक्तिभावाने जोडले जातात कारण राम सर्वांच्या मनात, हृदयात वसलेला आहे. हा भाव हनुमंताने स्वतःची छाती फाडून व्यक्त केला. प्रत्येकाच्या हृदयात आहे परंतु प्रत्येक जण हनुमंत नाही म्हणून आपण तशी कृती करू शकत नाही. इतकेच नाही तर रत्नाकरला राम नामाची संथा, मंत्र देऊन अंतर्धान पावलेले नारदमुनी अनेक वर्षांनंतर त्याच मार्गाने जात असताना त्यांना 'राम... राम...' हा मंत्र कानी पडला. नारदमुनींनी तो आवाज कुठून येतोय ह्याचा शोध घेतला. आवाज मानवाचा होता परंतु कुणी दिसत नव्हते. एकवेळ अशी आली की, त्या आवाजाचा मागोवा घेताना त्यांच्या लक्षात आले की, त्या परिसरातील झाडे, वेली, पक्षी इतकेच काय पण दगड मातीपासून तो रामनामाचा ध्वनी येत आहे. बाजूला असलेले एक वारूळ त्या ध्वनी -प्रतिध्

साप्ताहिक न्यूज मसाला ची वाटचाल एक सकारात्मक पत्रकारितेची !

इमेज
साप्ताहिक न्यूज मसाला ची वाटचाल एक  सकारात्मक पत्रकारितेची !               सन २०१२ मध्ये न्यूज मसाला या साप्ताहिकाला प्रारंभ झाला. काही उद्दिष्टे व पथ्ये ठरवून व ती नेटाने पाळून वाटचाल करण्यात आली. सकारात्मक पत्रकारितेला यंदा बारा वर्षे म्हणजे एक तप पूर्ण करतांना राजकीय उलथापालथ, सामाजिक स्थित्यंतरांचा अनुभव आपण घेतला. तीन वर्षांपूर्वी जागतिक महामारी कोरोना सारख्या संकटाला तोंड देत आपली सर्वांची वाटचाल कधी सुखाचे क्षण तर कधी दु:खाचे चटके सोसत झाली. आयुष्यातील जगण्याचे निकष बदलत गेले. अनेकांनी आपले आप्तस्वकीय, स्नेही गमावले. काहींनी संकटाला संधी मानून लुबाडणूक केली. मानवी स्वभावाचे नमुने समजले. एका सूक्ष्म विषाणूच्या संसर्गामुळे बऱ्यावाईट अनुभवांनी खूप काही शिकवले. हे नमूद करताना मनाच्या संमिश्र भावनांचा सर्वसामान्यांसोबत परामर्श घेत आहोत.  न्यूज मसाला साप्ताहिक कायमच न डगमगता वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवीत आहे.          एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस हा त्याच्या आयुष्यातील आनंदाचा ठेवा असतो.  सिंहावलोकन करण्याचा क्षण असतो. त्याचबरोबरीने जीवनात काय कमावले ? काय गमावले याचा ताळमेळ जमवण्याचाह

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

इमेज
।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।           २२ जानेवारी रोजी अयोध्या नगरीत रामाच्या मूर्तीची स्थापना होत आहे. त्या दृष्टीने गेल्या काही दिवसापासून घरोघरी कार्यक्रमाची पत्रिका, मंदिराचा फोटो, आणि अक्षदा पोहोचवल्या गेलेल्या आहेत. २२ जानेवारी रोजी घरोघरी उत्सव साजरा होत आहे . बारा वाजून वीस मिनिटांनी अयोध्याला मूर्तीची स्थापना होणार आहे. याप्रसंगी आपल्याकडे आपल्या अक्षदा रामाला वहायच्या आहे. राम नामाचा जप करायचा आहे. रामरक्षा स्तोत्र पठण करायचे आहे. दिवे लावायचे आहे. रोषणाई करायची आहे. पंजीरीचा, पेढ्याचा नैवेद्य दाखवा.( पंजीरी म्हणजे, गुळ, धनेपावडर, सुंठ, खडीसाखर, खोबरे. एकत्रित पावडर.) दिवाळी साजरी करायची आहे.  राम नामाचा झेंडा हाती घेतलेला प्रत्येकाने फोटो काढायचा आहे. एकूणच सर्वदूर राममय वातावरण झालेले आहे. अनेक ठिकाणी अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. काही ठिकाणी गेल्या चार-पाच दिवसांपासून एकत्रित जप रामरक्षा स्तोत्र पठण सुरू आहे. शाळांमधून रामरक्षा स्तोत्र म्हटले जात आहे. रामरक्षा स्तोत्र पठणाचे महत्त्व खूप मोठे आहे. त्या दृष्टीने गावोगावी ते सुरू आहेत. जेणेकरून