पोस्ट्स

साप्ताहिक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आजचा न्यूज मसाला अंक ! संपादकीय- छत्रपतींच्या घराण्यात कोल्हापूर-सातारा न पेटलेला वाद पेटविल्याचा आव आणणाऱ्या औलादींना छत्रपती संभाजीराजे यांनी नासिक दौऱ्यात चांगलीच चपराक लगावली !! इतर बातम्यांसह वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क-7387333801. बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव साप्ताहिक !!!!!

इमेज
संपादकीय छत्रपतींच्या घराण्यात ( कोल्हापूर-सातारा )  न पेटलेला वाद पेटविल्याचा आव आणणाऱ्या औलादींना छत्रपती संभाजीराजे यांनी नासिक दौऱ्यात चांगलीच चपराक लगावली, छत्रपती उदयनराजे यांचे भाचे अर्थातच छत्रपती संभाजीराजे यांचे ही भाचे यांची झालेली भेट व दिवसभर एकत्र, एकाच वाहनातून मामा-भाचे यांचा एकमेकांस लाभलेला सहवास !            तोडा फोडा आणि राज्य करा या इंग्रजाळलेल्या नीतीचा भारतीय लोकशाहीत वारेमाप वापर केला गेला आहे, भारतीय राजकारणाला लाभलेला मोठा शाप आहे मात्र छत्रपती घराणे या शापाला कालच्या भेटीने अपवाद ठरले व ते आजतागायत गेली साडेचारशे वर्षे टिकून आहे, छत्रपतींच्या दरबारात ही इंग्रजांना नतमस्तक व्हावे लागले, इतिहास साक्षीला असलेल्या छत्रपतींना जगाचे, रयतेचे एकमेव राजा बिरूद लागले त्याला जगात तोड नाही तेथे काही बुजगावणे फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची अवकाद न बोलता दाखविण्याची धमक आजही छत्रपतींमधील प्रगल्भतेच्या माध्यमातून समाजाला दिसली,  दाखवून दिली.         छत्रपती संभाजीराजे भ...

मराठा क्रांती मोर्चाच्या तांबडी-रोहा येथील आंदोलनाला अभूतपूर्व यश ! सिंघमसारख्या अपेक्षा करू नका- पोलिस आयुक्त दीपक पांडेय !! विकासकामामध्ये राजकारण व दुजाभाव नाही- जिप अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर !!! न्यूज मसाला सर्विसेस 7387333801. सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
लाखोंच्या संख्येने मराठा क्रांती मोर्चे निघाले आणि जगाला शिस्तप्रिय आणि मोर्चा कसा असतो दाखवून गेले कोरोना लॉकडाऊन काळात अनेक आंदोलन,मोर्चे होत आहेत पण त्यातही मराठा क्रांती मोर्चा चे रोहा तांबडी येथे झालेले आंदोलन शिस्तबद्ध आणि आंदोलन कसे आदर्श असावे याचे आगळेवेगळे उदाहरण ठरले त्याची दखल महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा घेत आंदोलकर्त्यांचे समनव्यकांचे कौतुक करत सर्व मागण्या मान्य करत लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्याचे वचन व्हीडिओ कॉन्फरन्स झुम मिटींग द्वारे दिले आणि यशस्वी आंदोलनाची नोंद घेतली. या श्रध्दांजली अर्पण व निवेदन देण्याचा कार्यक्रम मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र,  मराठा क्रांती मोर्चा तांबडी, सकल मराठा समाज, पंचक्रोशीतील सरपंच यांच्याकडून आयोजित करण्यात आला होता.

न्यूज मसाला प्रकाशनाच्या "कळी उमलली" कथासंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार ! नरेंद्र पाटील, संपादकीय-राष्ट्रीय विकासाची काळजी तसेच घसरलेल्या जीडीपीबद्दल काळजी करू नका !! जगायला जातो- प्रसिद्ध वारली चित्रकला अभ्यासक संजय देवधर यांचा लेख !! न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संपादकीय नरेंद्र पाटील राष्ट्रीय विकासाची काळजी तसेच घसरलेल्या जीडीपीबद्दल फार काळजी करू नका !! एका कुटुंबात कमावणारा एक आणि खाणारे चार धष्टपुष्ट पोरं असतात. बाप कमावतो म्हणून ते निश्चिंत असतात‌. एका अपघातात कुटुंब प्रमुखाला आपला हात गमवावा लागतो. कुटुंबप्रमुख त्याच्या कामाशी संबंधित आस्थापनेत प्रामाणिकपणे काम करत असतो. म्हणूनच संबंधित आस्थापना अर्ध्या पगारावर कुटुंब प्रमुखाला नोकरीवर कायम ठेवते. पण अर्ध्या पगारात त्याच्या कुटुंबाचे अर्थचक्र प्रभावित होते. शुद्ध बिजापोटी रसाळ फळे उपजतात, हे प्रमाणभूत सत्य. त्यान्वये, बापाची झालेली आर्थिक कोंडी सोडविण्यासाठी हे चार पोरं पुढे येतात. मिळेल ते काम करतात. पैसे कमवत आपल्या कुटुंबाला तारतात. कुटुंबाची आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठा वर्धिष्णू करतात. 'वसुधैव कुटुंबकम' या भारतीय संस्कृतीचे हे उदाहरण एक उत्तम निदर्शक.       उपरोक्त उल्लेखित उदाहरण आज घराघरांत पाहावयास मिळेल. कारण आहे कोरोना नावाची वैश्विक महामारी आणि त्यामुळे प्रभावित झालेली अर्थव्यवस्था. घसरलेला जीडीपी हा या महामारीचा दृश्य परिणाम आहे. हवं तर सुरुवात...

आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना (IDAA) स्पर्धा २०१९ चा, न्यूज मसालाच्या "लोकराजा" दिवाळी विशेषांकास पुरस्कार !न्यूज मसालाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ! अंक दि. २७ आॅगस्ट २०२० न्यूज मसाला सर्विसेस 7387333801 सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
"लोकराजा" दिवाळी विशेषांकास आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना (IDAA) २०१९ चा पुरस्कार ! नासिक:- न्यूज मसालाच्या लोकराजा दिवाळी विशेषांकास आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेच्या (IDAA) चा सन  २०१९ स्पर्धेत चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून कोव्हिड-१९ मुळे पुरस्कार वितरण लांबणीवर पडले आहे,  न्यूज मसाला परीवाराचे वाॾमयीन क्षेत्रातून तसेच हितचिंतक, जाहीरातदार यांचेकडून अभिनंदन करण्यात येत आहे.       लोकराजा दिवाळी विशेषांकाच्या मुखपृष्ठावर आजी-माजी संसंद सदस्यांचे छायाचित्र प्रकाशित करण्याचा उपक्रम राबविणारा एकमेव विशेषांक आहे. अंकाच्या सुरूवातीला संसद सदस्यांची थोडक्यात त्यांनी केलेल्या कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला  जातो, इतर मजकूर हा निखळ आनंद देणारा, आबालवृद्धांना सामावून घेत समाविष्ट केला जातो त्यामुळे घराघरात "सेंट्रल टेबलावर" स्थान प्राप्त करतो, मराठी भाषेतील नामवंत लेखक कवी यांच्या निवडक उत्तम लिखाणाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते.         सन २०१२ मा. खा.  ड...

न्यूज मसाला अंक दि. १३ आॅगस्ट २०२०,. संपादकीय- पत्रकार महापूरावर लिहीता लिहीता वाहून गेला ! इतर बातम्यांसह सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !! 7387333801, न्यूज मसाला संपर्क भ्रमणध्वनी !!!

इमेज
संपादकीय पत्रकार महापुरावर लिहीता लिहीता वाहून गेला ! समृद्ध मराठी भाषेतील म्हणी, "दिव्याखाली अंधार" "आई जेवू घालेना, बाप भिक मागू देईना" "वैद्याचं पोरगं पांगळं"       अर्थ सर्वसामान्यांसाठी खूप काही सांगून जातो मात्र पत्रकारिता क्षेत्रात या म्हणी फक्त वापर म्हणून वापरायच्या असतात  काय ? जगाला प्रकाशाकडे नेणारा पत्रकार इतका उपेक्षित असू शकतो हे आजच्या परिस्थितीने त्याला त्याचे अस्तित्व दाखवून दिले, अरे बाबा आधी तुझ्या बुडाखाली अंधार असताना तू जो प्रकाश दाखवतो त्यावर किती विश्र्वास ठेवावा ?     माध्यमांचे मालक यांनाच प्रती आईबाप मानणारी पत्रकार जमात इतकी "निर्बुद्ध" असू शकते की मालक आई जेवू घालेना आणि मालक बाप भिक मागू देईना तरीही शांत बसू शकतो यापलीकडे त्याच्या हाती कोणताही निर्णय घेऊ शकण्याची शक्ती नसणे ही शोकांतिकाच आहे.       सामाजिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारा वैद्य-पत्रकार आपल्या स्वत:च्या कुटुंबासाठी एका पांगळ्या जबाबदारीचा बाप गणला जावा यांसारखे दुर्देव काय ?    ...

न्यूज मसाला दि. ६ आॅगस्ट २०२० चा प्रकाशित अंक

इमेज
न्यूज मसाला दि. ६ आॅगस्ट २०२० चा प्रकाशित अंक

न्यूज मसालाचा अंक दि. ३० जुलै २०२०. संपादकीय-मुलाखतीचा सोस !! दीपक दंडवतेंच्या लेखणीतून-सारस्वतांच्या नगरीतील संतोष !!! रासाका-निसाका सहकार विशेषांक !!! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
संपादकीय                      मुलाखतींचा सोस !! मुलाखतीला जायचं म्हणजे तयारी करावी लागते पण कितीही अभ्यास करून जा, जर मुलाखत घेणाऱ्यांनी आधीच ठरवलेले असेल तर काय कुणाची बिशाद की तुमची निवड होईल ? बरं मुलाखत कोणी कोणाची घ्यावी याचे काही संकेत असतात, अनेक ठिकाणी स्पष्ट लिहीलेले असते की परीक्षार्थी ने जर कुणाची ओळख दाखविली, मुलाखत घेणाऱ्यावर दबाव आणला किंवा अनैतिक मार्गाचा अवलंब केला तर उमेदवाराला मुलाखत देण्यापासून रोखले जाईल ! आणि रोखले जातेच ! मात्र आज कुणीही मुलाखत घ्यायला येतो आणि स्वत:ची पाठ थोपटून घेत असतो ! अनाकलनीय असे वाटते. माध्यमांमध्ये मुलाखतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे हा संशोधनाचा विषय आहे तरीही अनेक माध्यमे मुलाखत या गोंडस नावाखाली उखळ पांढरे करून घेतात, सर्वच मुलाखती अशा असतात असे नाही.          मुलाखतीची प्रश्नावली कशी, कधी कुणाला अडचणीत आणेल हे सांगता येत नाही व कधी किती सोयीस्कर असेल हेही सांगता येत नाही. मुलाखतीला विच...

साप्ताहिक न्यूज मसाला चा दि. २३ जुलै २०२० चा अंक ! @@ आॅनलाईन शिक्षणासाठी 'डोनेट अ डिवाईस' चळवळ, @@ पत्रकारांसाठी उघडली जिल्हा माहिती कार्यालयाची दारे, @@ ऐतिहासिक बौद्ध लेणी जतन करा अन्यथा सिडकोला टाळे ठोकू-पॅंथर आॅफ सम्यक योद्धाचा इशारा ! @@ पुण्यस्मरणानिमित्त भक्ताने पुतळ्यावरील अंधार केला दूर ! @@ बाजार समित्यांनी कोरोनाबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात-आदेश ! @@ गटविकास अधिकाऱ्यांविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार ! @@ अष्टपैलू व्यक्तिमत्त्व-संजय देवधर ! @@ जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या चे कोरोनाने निधन ! @@ प्रसिद्ध सायंदैनिकाचे संपादक शहा यांना मातृशोक ! @@ छावा मराठा कृती समितीकडून सॅनिटायजर फवारणी ! @@ स्थायीची सभा व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारेच होणार ! @@ सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
साप्ताहिक न्यूज मसाला चा दि. २३ जुलै २०२० चा अंक ! @@ आॅनलाईन शिक्षणासाठी 'डोनेट अ डिवाईस' चळवळ, @@ पत्रकारांसाठी उघडली जिल्हा माहिती कार्यालयाची दारे, @@ ऐतिहासिक बौद्ध लेणी जतन करा अन्यथा सिडकोला टाळे ठोकू-पॅंथर आॅफ सम्यक योद्धाचा इशारा ! @@ पुण्यस्मरणानिमित्त  भक्ताने पुतळ्यावरील अंधार केला दूर ! @@ बाजार समित्यांनी कोरोनाबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात-आदेश ! @@ गटविकास अधिकाऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार ! @@ अष्टपैलू व्यक्तिमत्त्व-संजय देवधर ! @@ जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या चे कोरोनाने निधन ! @@ प्रसिद्ध सायंदैनिकाचे संपादक शहा यांना मातृशोक ! @@ छावा मराठा कृती समितीकडून सॅनिटायजर फवारणी ! @@ स्थायीची सभा व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारेच होणार ! @@ सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

साप्ताहिक न्यूज मसाला चा १६ जुलै २०२० अंक ! https://drive.google.com/file/d/1-1P2myIY46qogPirwQpPCiDnur0z7-KT/view?usp=drivesdk

इमेज
साप्ताहिक न्यूज मसाला चा १६ जुलै २०२० अंक, https://drive.google.com/file/d/1-1P2myIY46qogPirwQpPCiDnur0z7-KT/view?usp=drivesdk

@ वर्तमानपत्रांचे भवितव्य याविषयी सतिष जोशी यांचा लेख ! @ आश्र्वासित प्रगती योजनेचा कर्मचाऱ्यांना लाभ ! @ राजगृहावरील तोडफोडीचा निषेध ! @ राष्ट्रीय वेबिनार-कोविड १९ सकारात्मक मिडीया आणि समाज ! @ रासाकासाठी ठिय्या आंदोलन ! @ निसाकासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून पाठींबा ! @यासह इतर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
@ वर्तमानपत्रांचे भवितव्य याविषयी सतिष जोशी यांचा लेख ! @ आश्र्वासित प्रगती योजनेचा कर्मचाऱ्यांना लाभ ! @ राजगृहावरील तोडफोडीचा निषेध ! @ राष्ट्रीय वेबिनार-कोविड १९ सकारात्मक मिडीया आणि समाज ! @ रासाकासाठी ठिय्या आंदोलन ! @ निसाकासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून पाठींबा ! यासह इतर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !