सृजनोत्सवी चित्रसृष्टी ! शिशिरात सुस्त झालेली, गारठलेली सारी सृष्टी वसंताच्या स्पर्शाने रसरशीत होते. चैतन्याने बहरुन जाते. वसंतोत्सवाच्या या धुंदीत,,,,,,,,,,,,. २९ मार्च पुपुल जयकर यांचा स्मृतिदिन त्यानिमित्ताने,,,,,,,,,,,. सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सृजनोत्सवी चित्रसृष्टी ! फाल्गुन पौर्णिमेनंतर, म्हणजे होळीपौर्णिमा झाल्यावर दुसऱ्या दिवसापासूनच वसंतोत्सवाला प्रारंभ होतो. वसंतोत्सव हा निसर्गाप्रती तसंच समष्टीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सृजन सोहळा ! निसर्गात रममाण झालेल्या आदिवासी वारली जमातीच्या चित्रशैलीत बहारदार निसर्गाच्या विविधतेचे नेहमीच दर्शन होते. त्यांच्या कलानिर्मितीला वसंतऋतू पोषक ठरतो. म्हणूनच वारल्यांच्या चित्र, संगीत आणि नृत्यामध्ये निसर्ग विविध मोहक रूपं घेऊन सामोरा येतो. शिशिरात सुस्त झालेली, गारठलेली सारी सृष्टी वसंताच्या स्पर्शाने रसरशीत होते. चैतन्याने बहरुन जाते. वसंतोत्सवाच्या या धुंदीत सृष्टीशी एकरुप होण्याची प्रेरणा आदिम आहे. वसंतऋतू येताना आपल्याबरोबर नवसृजनाचे सप्तरंग लेवून येतो. सर्वत्र विविधरंगी उधळण होते. सृष्टीतील प्रत्येक सूक्ष्म बदल टिपत असताना, आपण या सृष्टीचाच एक भाग आहोत हे भान आदिवासी बांधवांना जन्मजात असते. कारण ते निसर्गाच्या सान्निध्यात राहून सृष्टीतील प्रत्येक घटकाशी एकरूप झालेले असतात. मात्र निसर्गातील विविध प्रतिमा ते केवळ पांढऱ्या रंगात रंगवतात. अर्थात हे 'एकरंगी' बंधन त्