पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुख्याध्यापकांसाठी शैक्षणिक मार्गदर्शक पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नंदुरबार जिल्ह्यातील माध्य. शाळांतील मुख्याध्यापकांसाठी शैक्षणिक मार्गदर्शक पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन !        नंदुरबार :- मुख्याध्यापकांना शैक्षणिक कामकाज करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.मुख्याध्यापकांचे प्रशासकीय कामकाज सुलभ होण्यासाठी, नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर प्रथमतः माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी "शैक्षणिक मार्गदर्शक पुस्तिका सन २०२१-२२" ची निर्मिती करण्यात आली.         नंदुरबार जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी यांचे संक्षिप्त कार्यभार, वर्षभराचे नियोजन, शाळा पातळीवरील विविध समित्या व त्यांचे कामकाज,शालेय अभिलेख, इयत्ता निहाय तासिका वाटप नियोजन, इ.५ वी ते इ.१० वी वर्गांचे मूल्यमापन तक्ते, रजेचे प्रकार, मुख्याध्यापकांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या, महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके अशा विविधांगी विषयांचे एकत्रित संकलन करून नंदुरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, नंदुरबार यांच्या संयोजनाद्वारे श्री.आप्पासो.आ.ध.देवरे माध्यमिक विद्यालय विखरण ता. जि.नंदुरबार विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक मार्गद

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावतीने जि. प. कामकाजाचा आढावा ! महीला बचत गटाच्या वतीने तयार केलेल्या कौशल्यपूर्ण वस्तू मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी प्रातिनिधिक स्वरुपात देऊन स्वागत केले !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावतीने जि. प. कामकाजाचा आढावा       नाशिक(प्रतिनिधी)::- राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी आज नाशिक जिल्हा परिषदेतील सर्व विभागांची आढावा बैठक घेतली, यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे महिला बचत गटांच्या वतीने तयार केल्या गेलेल्या कौशल्यपूर्ण वस्तू या प्रातिनिधिक स्वरूपात देऊन स्वागत केले.          राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांची माहिती घेत जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या सर्व योजनांचा आढावा यावेळी ना. हसन मुश्रीफ यांनी घेतला, विविध विकास योजनांसाठी केंद्र व राज्य शासनाचा किती निधी उपलब्ध आहे यातील खर्चित अखर्चित निधीची माहिती घेतली, त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात एकूण किती घरकुलांचे उद्दिष्ट आणि पूर्तता झाली याची देखील माहिती घेतली व महिला बचत गटांनी तयार केलेल्या कौशल्यपूर्ण वस्तूंची विक्री करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी असे सांगितले. पंडित दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन लाभार

वसईच्या नागले गावातील "यश" ! खेड्यातील मुलगा देशपातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो या अभिमानास्पद बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
वसईच्या नागले गावातील "यश" न्यूज मसाला वृत्तसेवा          वसई (गुरुदत्त वाकदेकर) : संपूर्ण भारतातून एनसीसी कॅडेटचे शिबिर ग्वालियर, मध्यप्रदेश येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात पालघर जिल्ह्यातून वसई तालुक्यातील नागले गावातील यश अनिल पाटील यांनी संत गोंसलो गार्सिया महाविद्यालयाच्या माध्यमातून सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातून २८ व संपूर्ण भारतातून २४८ एनसीसी कॅडेट्स यात सहभागी झाले होते. यश याने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत "खडक चढणी व गोळीबार" स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला. शिबिरात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची संस्कृती यावर आधारित कार्यक्रम झाला. डिजी एनसीसी लेफ्टनंट जनरल गुरबिरपाल सिंग यांनी प्रेरणादायी विचार सर्व सहभागी एनसीसी कॅडेट्स समोर व्यक्त केले. सदरचे एनसीसी शिबिर हे कर्नल अरविंद दास यांच्या निरीक्षणाखाली पार पाडले. छोट्याशा गावातील एक हुशार मुलगा देश पातळीवर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो ही नक्कीच नागले वासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. सर्व स्तरातून "यश"च्या यशाचं कौतुक होत आहे.

युवा कवयित्री कु. वर्षा शिदोरे यांच्या "स्मितरहस्य" काव्यसंग्रहास सन्मान पुरस्कार ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
युवा कवयित्री कु. वर्षा शिदोरे यांच्या "स्मितरहस्य" काव्यसंग्रहास सन्मान पुरस्कार !       नासिक::- युवा कवयित्री कु. वर्षा शिदोरे, नाशिक यांच्या 'स्मितरहस्य' या पहिल्या-वहिल्या काव्यसंग्रहास  पुणे येथे ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.      ी कवी चंद्रकांत जोगदंड यांच्या काव्यार्चना कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त कै. गंगाधर श्रावण आबक यांच्या स्मरणार्थ 'विशेष सन्मान' म्हणून दिला जाणारा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार देण्यात आला.       काव्यार्चना काव्यसंग्रहाच्या प्रकाशन व पुरस्कार सोहळ्यानिमित्त खुले काव्यसंमेलन आयोजित केले गेले होते. अनेक कवी/कवयित्रींच्या काव्यसुमनांनी आनंदलेल्या सोहळ्याला थाटामाटात सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक व कथाकार बबन पोतदार, भारत हायस्कुल ज्युनिअर कॉलेज जेऊर ता. करमाळाचे प्राचार्य हनुमंत धालगडे , विश्वरत्न इंग्लिश मेडियम विष्णूपंत ताम्हाणे विद्यालय चिखलीचे अध्यक्ष प्रा. व्यंकटराव वाघमोडे, सुभाष वारे, एस.एम

तारप्याच्या कथा अन् व्यथा... "मी तारपा !" आदिवासी संस्कृतीचे सुरेल प्रतीक! जव्हार संस्थानातील डौलदार तारपा नृत्याचे संवर्धन होईल का ? जाणण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
तारप्याच्या कथा अन् व्यथा... "मी तारपा !" आदिवासी संस्कृतीचे सुरेल प्रतीक!                 एकेकाळी मला मानाचे स्थान होते. जव्हार संस्थानच्या दरबारात डौलदार तारपा नृत्य आयोजित केले जाई. आज मला घडवणारे आहेत, सारे कौशल्य पणाला लावून प्राणपणाने वाजवणारे आहेत; पण हळूहळू माझ्या सुरावटीवर भान हरपून, बेभान होऊन नाचणारे पाय शहरांकडे वळले आणि माझे सूर हरपले! नवीन पिढीत माझे संगोपन, संवर्धन करण्याची ऊर्मी नाही. तारपा वाजवून पोट भरणार का ? असा प्रश्न युवकांना पडतो. तसे मला आठवणीत ठेवण्यासाठी काही प्रयत्न केलेही जातात; पण ते अगदीच नगण्य! हे असंच होत राहिलं तर माझी रवानगी लवकरच वस्तुसंग्रहालयात होईल! पुढच्या पिढ्यांना 'कोणे एके काळी' तारपा नावाचे  वारली जमातीचे एक   वाद्य होते, असे ऐकावे लागेल. ते टाळण्यासाठी आज मी माझी कथा आणि व्यथा मांडणार आहे...   सरकार दरबारी घुंगरांचा आवाज ऐकला जातो, लावणी नृत्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. त्याबद्दल मला अभिमानच वाटतो. पण त्याच वेळी माझी सुरावट ऐकायला मात्र कुणाला वेळ नाही. इतिहासाने कधी माझी दखल घेतली नाही आणि वर्तमानाला देखिल माझ्

दुबईतील महाबीज कॉन्फरन्समधील सहभागातून महाराष्ट्रातील व्यावसायिकांना व्यवसाय विस्तारण्याची संधी बिझनेस कोचसह ब्रिजमोहन टुरिझमची वैशिष्ट्यपूर्ण दुबई टूर करण्याची संधी ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
दुबईतील महाबीज कॉन्फरन्समधील सहभागातून महाराष्ट्रातील व्यावसायिकांना व्यवसाय विस्तारण्याची संधी ! बिझनेस कोचसह ब्रिजमोहन टुरिझमची वैशिष्ट्यपूर्ण दुबई टूर करण्याची संधी !           नाशिक ::- सार्‍या जगाचे लक्ष वेधून घेणार्‍या ‘दुबई एक्स्पो’ प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील व्यावसायिकांना दुबईमध्ये होऊ घातलेल्या ‘महाबीज बिझनेस कॉन्फरन्समध्ये’ सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक येथील प्रसिध्द ब्रिजमोहन टुरिझमने बिझनेस कोचसह स्पेशल दुबई टूरचे आयोजन करण्यात आल्याची माहीती प्रसिध्द बिझनेस कोच अतुल ठाकूर व ब्रिजमोहन टुरिझमचे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. याविषयी अधिक माहीती देतांना ब्रिजमोहन चौधरी म्हणाले की, दि. १७ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘दुबई एस्न्पो’च्या माध्यमातून ‘गल्फ फूड फेअर’ या महत्त्वाच्या खाद्य-पेय आणि कृषी संदर्भातील प्रदर्शनाला भेट देता येईल आणि महाराष्ट्रीयन व्यावसायिकांसाठी महत्त्वाच्या अशा ‘महाबीज बिझनेस कॉन्फरन्सला’ १९-२० फेब्रुवारी २०२२ रोजी उपस्थिती लावता येईल तसेच गरजे प्रमाणे दोन दिवसाची ‘दुबई लोकल व्हिजीट’ ची टूर ही करता येईल. या टूर

गोदावरी उत्सवाला वारसाफेरीने सुरूवात ! १५ ते २१ डिसेंबर कालावधीत साजरा होणारा गोदावरी उत्सवाची रुपरेषा जाणण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
गोदावरी उत्सवाला वारसाफेरीने सुरूवात      नासिक ( जिमाका वृत्तसेवा)::- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी नासिक, राज्य पुरातत्त्व विभाग व नासिक इतिहास संशोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी उत्सव १५ ते २१ डिसेंबरदरम्यान साजरा केला जात आहे. या उत्सवाची सुरूवात बुधवारी सकाळी गोदाकाठावर देवमामलेदार महाराज मंदिरासमोरून वारसा फेरीच्या माध्यमातून झाली. यावेळी पूजा निलेश यांचा सुलेखन प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला. तर चित्रकार रमेश जाधव यांनी गोदावरी व नदी संदर्भातील चित्रांचे सादरीकरण केले होते. याला नाशिककरांनी उत्तम प्रतिसाद दिला. गोदावरी उत्सव व वारसाफेरीचे उद्घाटन जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सौ. मयुरा मांढरे,  पोलिस आयुक्त दिपक पांडे, पुरातत्त्व विभागाच्या उपसंचालिका आरती आळे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, नासिक इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष योगेश कासारपाटील, आनंद बोरा, डॉ. अजय कापडणीस, महेश शिरसाट उपस्थित होते. पंचवटी वरिष्ठ पोलिस निरिक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सरकारवाडा पोलिस निरिक्षक राजन सोनवणे यावेळी उपस्थित होते. सकाळी साडेसात वाज

१५ डिसेंबर आंतरराष्ट्रीय चहा दिन ! बेवफा सनम से चाय अच्छी है | ये दिल तो जलाती है, मगर होठों को चुम लेती है | चहा महात्म्य जाणण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
१५ डिसेंबर आंतरराष्ट्रीय चहा दिन !          "चहा महात्म्य"          चहा हा आपल्या जीवनातील प्रत्येक घटना आणि भावनात्मक प्रसंगांशी जोडलेला आहे. सकाळची सुरुवात चहाने होते तर चहा मुळे सायंकाळचा आनंद द्विगुणीत होतो. जगभरात १५ डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय चहा दिन’ म्हणून साजरा केला जातो. चहांच्या मळ्यामध्ये आणि कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या श्रमिकांच्या स्थितीकडे लक्ष वेधणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. जगात दररोज सुमारे तीनशे कोटी कप चहा पिला जातो. भारत सुमारे एक शतक चहा उत्पादनात आघाडीवर होता. भारत हा जगातील सर्वात जास्त चहा उपभोक्ता देश असून भारतातील एकूण चहा उत्पादनापैकी ७० टक्के चहा देशातच वापरला जातो.             बेवफा सनम से अच्छी ‘चाय’ !             किंवा                                                      चहा : एक अमृत तुल्य पेय ! किंवा चहा : एक लोकप्रिय पेय !      जगातील पाण्याखालोखाल लोकप्रिय असलेल्या चहा या पेयाचे अनेक प्रकार,  फायदे, उपयोग असल्याने चहा शिवाय राहू न शकणाऱ्या तसेच चहा म्हणजे  ‘अ‍ॅसिडिटी’  किंवा  ‘निद्रानाश’ असा समज करून चहाला  दूर ठेवणाऱ्यानाही ‘च

भिंत नव्हे कॅनव्हास ! वारली चित्रकलाशैली जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
भिंत नव्हे कॅनव्हास !     आदिवासी वारली चित्रकला प्रामुख्याने झोपडीच्या भिंतीवर रेखाटली जाते. ही परंपरा ११०० वर्षे जीवंत आहे. झोपडीतील भिंत हाच त्यांचा कॅनव्हास ! शेणाने सारवलेल्या भिंतीवर गेरुच्या गडद रंगाने चौकोन आखला जातो. त्यावर तांदळाच्या पिठाने चित्रे रेखाटली जातात.बांबूच्या काडीचा ब्रश तयार केला जातो. पूर्णपणे पर्यावरणपूरक अशी ही चित्रशैली निसर्गस्नेही आहे. झोपडीची भिंत पुन्हा पुन्हा सारवावी लागते. भिंत सारवल्यावर त्यावर परत नवी चित्रे काढली जातात. त्यामुळेच या कलेचे स्वरुप नीत्यनूतन असे आहे. चित्राखेरीज भिंत म्हणजे कपड्याविना मनुष्य अशी वारली जमातीची समजूत आहे. त्यांच्या झोपड्याही अतिशय कलात्मक असतात. अनेक वारली चित्रांमध्येही त्यांचे सुंदर दर्शन घडते.       वारली जमातीत शेतांजवळ घरे बांधून राहण्याची पद्धत आहे.एखादी मोठी विहीर, ओढा, नदी जवळ आहे असे बघूनच पाडा वसविला जातो. पंधरा -वीस झोपड्यांच्या वस्तीला पाडा असे म्हणतात. तीनचार ते दहा-बारा पाडे मिळून एक गाव तयार होते.सर्वसाधारणपणे खेड्यांत रस्त्यांवर व घरांजवळ जी अस्वच्छता दिसते तशी ती वारल्यांच्या पाड्यांवर नसते.घर व पाडा त

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त, दिव्यांग बांधवांसाठी विशेष कोविड १९ लसीकरणाचे भव्य शिबीर संपन्न ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त, दिव्यांग बांधवांसाठी विशेष कोविड १९ लसीकरणाचे भव्य शिबीर ! शिंदे. ता. जि. नाशिक      दिनांक १० डिसेंबर रोजी शिंदे गाव, तुळजाभवानी लान्स, नाशिक पूना हायवे, टोल नाक्या जवळ, नाशिक येथे आमदार सरोजताई आहेर यांच्या अध्येक्षतेखाली दिव्यांग बांधवांसाठी विशेष कोविड १९ लसीकरण आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी पंचक्रोषीतील दिव्यांग बंधू -भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन शिबिरामध्ये कोविड १९ अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र शिंदे येथील नाशिक तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांनी कोविड १९ लसीकरणाचा पहिला तसेच दुसरा डोसचे लसीकरण करून घेतले. सदर दिव्यांग कोविड १९ लसीकरणासाठी तालुक्यातील मान्यवर पंचक्रोषीतील सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपस्थित होते, तसेच तालुका स्तरावरील अधिकारी तहसीलदार अनिल दौंड, नासिक पंचायत समिती च्या गटविकास अधिकारी डॉ. सारिका बारी, सहा. गटविकास अधिकारी विनोद मेठे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश निकम, विस्तार अधिकारी सानप, अबू नाना शेख, प्रा. आ. केंद्र. शिंदे येथील आरोग्य अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

एलन करिअर इन्स्टिटयूट आता नाशिक मध्ये ! २८ डिसेंबरपासून सुरु होतील नीट व आयआयटी, जेईई च्या बॅचेस ! आता नाशिकमध्ये मिळेल ३३ वर्षाच्या कोटा कोचिंगचा लाभ ! आयआयटी, जेईई, नीट, एमएचटी -सीईटी ची होणार तयारी ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
एलन करिअर इन्स्टिटयूट आता नाशिक मध्ये !                 २८ डिसेंबरपासून सुरु होतील नीट व आयआयटी, जेईई च्या बॅचेस ! आता नाशिकमध्ये मिळेल ३३ वर्षाच्या कोटा कोचिंगचा लाभ !                 आयआयटी, जेईई, नीट, एमएचटी -सीईटी ची होणार तयारी ! नाशिक - दि . ११: मेडिकल आणि इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या एलन करिअर इन्स्टिट्यूटने आता नाशिकमध्ये आपले केंद्र सुरु केले असून, नाशिकच्या प्रेरणादायी वक्त्या व योग गुरु छोट्या गुरु माँ , एलन करिअर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष जीवनज्योती अग्रवाल व एलन च्या मुंबई शाखेचे मार्गदर्शक  अमित मोहन अग्रवाल यांनी विधिवत पूजन आणि फित कापून अनौपचारिक शुभारंभ केला. नीट आणि आयआयटी, जेईई  च्या विद्यार्थ्यांसाठी दि २८ डिसेंबर पासून कॅनडा कॉर्नर स्थित बिजिनेस स्क्वेअर येथे नवीन बॅचेस सुरु होणार असून, त्याची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. छोटी गुरु माँ यांनी यावेळी बोलताना सांगितले की , शिक्षणाबरोबरच संस्कार सुद्धा फार महत्वाचे आहेत. घरातील मोठी माणसं असतील किंवा शिक्षक यासर्वांनी विद्यार्थ्यांवर योग्य त्या संस्कारासाठ

वसईत एकाच दिवशी २० ठिकाणी होणार महारक्तदान ! वसईचा राजा गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
वसईत एकाच दिवशी २० ठिकाणी होणार महारक्तदान ! वसई चा राजा गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम !!               वसई (गुरुदत्त वाकदेकर) : रक्तदान म्हणजे जीवनदान. रक्ताचं नातं हेच जिव्हाळ्याचं नातं असतं. कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर वसई विरार रक्तदान महोत्सवाच्या अंतर्गत वसईचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या   वतीने १२ डिसेंबर २०२१ रोजी द्वितीय महारक्तदान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. एकाच दिवशी विविध २० ठिकाणी विविध सामाजिक संस्थांतर्फे वसई तालुक्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीदत्त मंदिर, रमेदी, वसई येथे महारक्तदानाची सुरूवात होईल. सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात वसई विरार तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहान वसईचा राजा गणेशोत्सव मंडळाचे निलेश भानुशे यांनी केले आहे. द्वितीय महारक्तदान महोत्सवासाठी योगेश भानुशे (वसईचा राजा), जितेंद्र पोतदार (रमेदी आळी), स्वप्नील परुळेकर (रूद्र तांडव), प्रशांत कदम (भास्कर आळी), मंगेश म्हस्के (स्वराज्य यूथ फ

पवारांच्या वाढदिवशी शिवडी तालुक्यात रक्तदान ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
पवारांच्या वाढदिवशी शिवडी तालुक्यात रक्तदान !    (गुरुदत्त वाकदेकर यांजकडून)            मुंबई :: रक्तदान म्हणजे जीवनदान. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने १२ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अभ्युदय एज्युकेशन सोसायटीज् हायस्कूल, काळाचौकी येथे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात शिवडी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहान शिवडी तालुका अध्यक्ष उमेश येवले यांनी केले आहे. १८ ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्ती रक्तदान करू शकतात. कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसाने रक्तदान करता येते. कोविड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसाने तर दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसाने रक्तदान करता येते.  कोविड संकटाच्या काळात रक्त तुटवड्यामुळे ज्यांना नियमित रक्ताची गरज भासते असे थॅलेसीमिया, सिकलसेल रुग्णांचीही गैरसोय होत आहे. गर्भवती मातांसह अपघातग्रस्तांना

इंडिया फर्स्ट नीडल फ्री व्हॅक्सिन भारतात पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यामध्ये ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नाशिक जिल्ह्यामध्ये केंद्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार covid-19 लसीकरण अधिक सुलभतेने होणे कामी तसेच शंभर टक्के लसीकरण यशस्वी होणे कामी इंडिया फर्स्ट नीडल फ्री व्हॅक्सिन भारतात पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यामध्ये दिले जाणार आहे यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत त्याची पूर्वतयारी म्हणून मा. जिल्हाधिकारी सुरज मांढरे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांचे मार्गदर्शनानुसार जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यालयामार्फत जिल्हा प्रशिक्षण केंद्रामध्ये ग्रामीण भागातील आरोग्य सेविकांचे इन्स्ट्रुमेंट हाताळणीचे  एक दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते यामध्ये covid-19 प्रतिबंधात्मक झायडस कंपनीची लस आता शासनामार्फत दिली जाणार आहे यासाठी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात covid-19 लसीकरणाचे काम करणाऱ्या आरोग्य सेविका यांचे प्रशिक्षण जिल्हास्तरावर घेण्यात आले यामध्ये झायडस कंपनीचे फार्माजेट हे इन्स्ट्रुमेंट तयार केले असून या इंस्ट्रूमेंट द्वारे लस दिली जाणार आहे हे नीडल फ्री वॅक्सिंग असून आत्तापर्यंत  एकही लस न घेतलेल्या व्यक्तींना ती दिली जाणार आहे त्यासाठी जिल्हास्तरा

विजयालक्ष्मी मणेरीकर यांचा काव्यसंग्रह “हृदयरंग” चे प्रकाशन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
विजयालक्ष्मी मणेरीकर यांचा काव्यसंग्रह “हृदयरंग” चे प्रकाशन नाशिकच्या लेखिका विजयालक्ष्मी मणेरीकर यांचा पहिला कवितासंग्रह “हृदयरंग “ चे प्रकाशन ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज प्रकाशित झाला. सुप्रसिद्ध समीक्षक , वक्ते, लेखक  मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. दिलिपराज प्रकाशनचे मॅनेजिंग डायरेक्टर मसापा चे अध्यक्ष राजीव बर्वे, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उपाध्यक्ष प्रा. प्रशांत पाटील , मराठी प्रकाशन मंचाचे प्रमुख वसंत खैरनार, तसेच जी पी खैरनार, अर्जुन वेलजाळी , शशांक मणेरीकर , प्रमोद पुराणिक, प्रकाश कोल्हे , राजेन्द्र नारखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा संग्रह प्रकाशित झाला. यात एकूण ९५ कविता आहेत. हा कविता संग्रह प्रेम कवितांचे संकलन आहे. यातील कविता मुक्तछंदातल्या आहेत. प्रत्येकाच्या हृदयाच्या कुपीत दडलेल्या प्रेमभावनांचे प्रकटीकरण या कवितांतून प्रकट होते. या संग्रहातील काही काव्यपंक्ती… व्रण - तू बोलला नाहीस पण दिसले व्रण कोणी बोचकारून हळवे केलेले तुझे मन चेहरे - कवितेत त्या म्हणतात - चेहरे बरंचं काह

आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांसाठी बहुउद्देशीय शेडचे लोकार्पण ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
आदिवासी भागातील शाळांसाठी बहुउद्देशीय शेडचे लोकार्पण !  नाशिक ( प्रतिनिधी )- विद्यार्थ्यांचे संस्कारवर्ग, सांस्कृतिक व अन्य कार्यक्रम कोरोनाच्या काळात मोकळेपणाने घेता यावेत या उद्देशाने मुंबईतील माटुंग्याच्या अजरामर महिला मंडळातर्फे पेठ तालुक्यातील कुळवंडी व कोहोर येथील जि.प.शाळांना प्रशस्त बहुद्देशीय शेड बांधून देण्यात आले. नुकतेच या शेडच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त दोन्ही शाळेतील ५०० विद्यार्थ्यांना स्वेटर, चॉकलेट, बिस्किट, चिक्की, कॅडबरी, ,फळे व शिरा यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाबद्दल विद्यार्थी, शिक्षकांनी व पालक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.           यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमास सेवा ग्रुपचे संचालक चंद्रकांतभाई देढिया , शिक्षक हरिश्चंद्र भोये (पाटे), विजय भोये (घोसाळी), तसेच दोन्ही शाळेतील शिक्षकांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी घंटेवाड, मुरलीधर महाले यांनी केले तर कोहोर व कुळवंडी शाळेचे मुख्याध्यापक बोरसे सर, भोये सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी अजरामर ग्रुपच्या अध्यक्षा पानबाई

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे !  मंत्री सुभाष देसाई यांची मागणी ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे !  मंत्री सुभाष देसाई यांची मागणी !    नाशिक( प्रतिनिधी)  ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सकाळच्या सत्रात काल ( दि.३ ) मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी मंत्री देसाई व भुजबळ यांनी राष्ट्रपतींना ‘पत्र’ लिहिले.केंद्र सरकारने २००४ साली भाषांना ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यानुसार मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशी लेखी शिफारस केंद्र सरकारने नेमलेल्या भाषातज्ज्ञांच्या समितीने एकमताने केलेली आहे.त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा त्वरित मिळायला हवा असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री ना. सुभाष देसाई यांनी केले.        प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा, महानुभावी धर्मभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे.           या संदर्भातील अनेक पुराव्यांनी सिध्द झाले आहे की, मराठी ही अभिजात भाषा आहे. तरी  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा असे  मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई  यांनी सांगितले.साहित्य संमेलनात अभिजात मराठी भाषा दालन निर्माण करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन काल सकाळी मान्य

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा...     जवळपास सारे जग  वेठीस धरणाऱ्या कोरोनाच्या संकटामुळे, यंदा मार्च महिन्यात नाशिकला होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ९ महिने लांबणीवर पडले. आता ते ३ ते ५ डिसेंबर दरम्यान होणार आहे. भुजबळ नॉलेज सिटीच्या परिसरात होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ संशोधक, शास्त्रज्ञ व विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर आहेत. यापूर्वी नाशिकला १९४२ साली ऑक्टोबर महिन्यात २७ वे व २००५ साली जानेवारी महिन्यात ७८ वे  अशी दोन संमेलने झाली होती. नाशिकला समृद्ध अशी साहित्यिक, सांस्कृतिक परंपरा आहे. नाशिक ही मंत्रभूमी, देवभूमी, धर्मभूमी, कर्मभूमी, स्वातंत्र्य चळवळीतील शौर्यभूमी, साहित्य क्षेत्रातील सारस्वतांची भूमी, मोक्षभूमी तसेच आधुनिक काळातील तंत्रभूमी म्हणून ओळखली जाते. नाशिक हे जनस्थान म्हणजे साधकांसाठी सिद्धस्थान आहे. श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही तपोभूमी आहे. येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो; तशीच सारस्वतांची मांदियाळी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तीन दिवस जमणार आहे.   नाशिकला साहित्य, संस्कृतीची दीर्घ व समृद्ध परंपरा लाभलेली आहे. ये

नव्या पिढ्यांमध्ये कलापरंपरा  रुजवणारे संपत ठाणकर !  लेखाचा उत्तरार्ध वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नव्या पिढ्यांमध्ये कलापरंपरा  रुजवणारे संपत ठाणकर  (उत्तरार्ध)   अभ्यासू आदिवासी वारली चित्रकार संपत ठाणकर सातत्याने कलेच्या  प्रसारासाठी प्रयत्नशील आहेत. स्वतः चित्रे रेखाटण्याबरोबरच जमातीतील इतर प्रज्ञावंत कलावंत, लेखक, कवी यांचा ते शोध घेतात. त्यांना प्रोत्साहन देण्याचेही काम करतात. हाडाचे शिक्षक असल्याने स्वस्थ न बसता नोकरीव्यतिरिक्त त्यांनी असंख्य आदिवासी मुलांना वारली चित्रकला शिकवली आहे. त्यातील अनेकजण पारंगत होऊन कलेच्या माध्यमातून उदरनिर्वाह करीत आहेत. कुडाच्या भिंतीवरची ही कला जगभरात पोहोचली. मात्र वारल्यांच्या नव्या पिढ्यांनी आपली परंपरा, संस्कृती विसरु नये ही संपत यांची तळमळ आहे. त्यासाठी वारली चित्रकलेवर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या तिन्ही भागात तपशीलवार, सचित्र मार्गदर्शन केले आहे.    'वारली चित्रकला' या पुस्तकाच्या पहिल्या भागात ही कला ठिपके, रेषा व सोप्या-मूलभूत आकारांवर आधारित आहे हे संपत यांनी सोदाहरण सांगितले आहे. रेखाटनाचा सराव कसा करावा हे देखील ते सांगतात. त्रिकोण, वर्तुळ व चौकोन या प्राथमिक भौगोलिक आकारांचा वापर करून मानवी आकृत्या, त्यांच्या हाल

त्र्यंबकनगरीत २२ नोव्हेंबरपासून रंगणार राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धा ! पिंच्याक सिलॅट खेळाविषयी थोडक्यात जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
त्र्यंबकनगरीत २२ नोव्हेंबरपासून रंगणार राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धा !           नाशिक : महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन आयोजित ११ व्या राज्यस्तरीय पिंक्याच सिलॅट स्पर्धा २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान त्र्यंबकेश्‍वर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत अशी माहिती इंडियन पिंच्याक फेडरेशनचे अध्यक्ष तथा महा. पिंच्याक सिलॅट असोसिएशनचे महासचिव किशोर येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.           त्र्यंबकेश्‍वर येथील ओम जगद्गुरू जनार्दन स्वामी, मौनगिरी महाराज आश्रमात होणाऱ्या पिंच्याक सिलॅट स्पर्धा सर्व वयोगटातील महिला आणि पुरुष खेळाडूंसाठी खुल्या आहेत. स्पर्धेत राज्यभरातील ३४ जिल्ह्यातील सुमारे ७०० खेळाडू यामध्ये सहभागी होणार असून पहिल्या दिवशी (दि.२२) १० ते १४ वयोगटातील २३० खेळाडू खेळणार आहेत. मंगळवार (दि.२३) १४ ते १७  वयोगटातील २४० तर तिसऱ्या दिवशी (दि.२४) १७ ते ४५ वयोगटातील २३० खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती येवले यांनी दिली. स्पर्धेचे उद्घाटन दुपारी दोन वाजता खासदार हेमंत गोडसे, किशोर येवले, तृप्ती बनसोडे व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. बक्षीस वितरण २३ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वा

१५ नोव्हेंबर महाराष्ट्राचे ख्यातनाम संख्याशास्त्रज्ञ, संख्याशास्त्राचे प्रसारक, डॉ.वसंत शंकर हुजुरबाजार यांचा स्मृतिदिन ! प्रा. कोष्टी यांनी घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
                                                                     . १ ५ (नोव्हेंबर )  महाराष्ट्राचे ख्यातनाम संख्याशास्त्रज्ञ ,  संख्याशास्त्राचे   प्रसार क ,  डॉ . वसंत शंकर  हुजुरबाजार  यांचा स्मृतिदिन. मूळ गणिताचे विद्यार्थी असलेल्या  हुजुरबाजार   यांनी  संख्याशास्त्रा मध्ये संशोधन करून संभाव्यता सिद्धांतामध्ये मौलिक योगदान दिले.  संभाव्यता सिद्धान्तातील अलौकिक कामगिरी साठी अ‍ॅडम्स पारितोषिक (१९६०) ,  पद्माभूषण पुरस्कार (१९७४) ,  सर जेफ्रीज यांनी एका निष्पत्तीला दिलेले  ‘ हुजुरबाजारांचा अपरिवर्तनीय घटक (इनव्हेरिअंट) ’  हे नाव (१९७६) ,  इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटतर्फे गौरवग्रंथ (१९७९) अशा अनेक सन्मानांनी गौरविलेल्या हुजुरबाजार यांचे संख्याशास्त्रातील योगदान निश्चीतच स्फूर्तिदायी आहे.  आयुष्याच्या अखेरपर्यंत अध्ययन-अध्यापनात व्यस्त असणाऱ्या  हुजुरबाजार   यांचे देशातील संख्याशास्त्राच्या प्रसाराला चालना देण्यातील योगदान कधीही विसरता येणार नाही .  त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने   त्यांच्या   कार्याची ओळख तरुणाईला व्हावी म्हणून त्यांच्या कार्याचा थोडक्या त घेत लेला आ ढावा