पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिलापूर रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्गाचे खा. हेमंत गोडसे यांच्या हस्ते भूमिपुजन. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
शिलापूर रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्गाचे खा. हेमंत गोडसे यांच्या हस्ते भूमिपुजन माडसांगवी वार्ताहर : शिलापूर येथील रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्ग व्हावा या खा. हेमंत गोडसे यांनी केलेल्या  प्रयत्नांना यश आले आहे. काही महिन्यांपूर्वीच रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या शिलापूर येथील रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्गाचे आज रविवारी सकाळी खा. गोडसे यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले. गेल्या चाळीस वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने शिलापूर, विंचूर गवळी आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. या भुयारी मार्गाचे काम येत्या चार महिन्यात पूर्ण होणार असून या भुयारी मार्गामुळे शिलापूर, विंचूर गवळी या दोन मोठ्या गावांचा थेट संपर्क होणार आहे. या भुयारी मार्गामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आपला शेतीमालाची वाहतूक करणे अगदीच सहज सोपे होणार आहे. शिलापूर परिसरातून मध्य रेल्वेचा लोहमार्ग जात असल्याने शिलापूर आणि विंचूर गवळी या दोन मोठ्या गावांचा थेट संपर्क होत नव्हता. येथील नागरिकांना औरंगाबाद रोड महामार्ग आणि शिलापूर येथे जाण्यासाठी माडसांगवी किंवा आडगाव मार्गे जावे लागत असे. य

शिक्षक रत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन !

इमेज
शिक्षक रत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन नाशिक -  शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या निवडक शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे.      नाशिक येथील एस.एस.डी.टी. कॉलेज, पारख क्लासेस आणि निर्मल गंगा गोदा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक शिक्षकांनी आपले प्रस्ताव व्हॉट्सअॅप द्वारे 7020135542 क्रमांकावर २ सप्टेंबरपर्यंत पाठवावेत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

महिलांनी जोपासली वारली चित्रशैली ...! दीर्घ लेखमालेचा सचित्र आढावा ( भाग दुसरा). सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
महिलांनी जोपासली वारली  चित्रशैली ...!  दीर्घ  लेखमालेचा सचित्र आढावा  !  ( भाग दुसरा)    आजही ८० टक्के आदिवासी निसर्गाच्या सान्निध्यात राहतात. त्यांच्या जगण्याच्या मूलभूत बाबी जंगलाशी निगडित आहेत. म्हणून निसर्गातील विविध प्रतिके त्यांची कुलदैवते असून त्यांविषयी त्यांच्या मनात नितांत आदरभाव, श्रद्धा आहे. त्यातून आपोआपच जैवविविधता जपली जाते. शहरातील माणूस जीवनाचा शाश्वत आनंद शोधतो आहे. स्वाभाविक प्रवृत्तीचा हा शोध आपल्याला आदिम संस्कृतीची जीवनमूल्ये, जीवनशैली यांच्याकडे डोळसपणे बघायला शिकवतो. महिलांनी अकरा शतके जोपासलेली वारली चित्रशैली अभ्यासताना  त्यांची परंपरा, लोकसंस्कृती यांची होणारी ओळख अंतर्मुख करते. मी या दीर्घ लेखमालेतील पन्नास लेखांमध्ये त्यातील विविध पैलूंचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. अकराशे वर्षे ही समूहकला टिकून राहिली, याचे कारण ती दैनंदिन जीवनशैलीशी जोडली गेलेली आहे. रीतिरिवाज, सण - उत्सव, परंपरा यांच्याशी या कलेचे घट्ट नाते निर्माण झाल्याने ती अखंड ताजी,🎂 टवटवीत राहिली आहे. परिवर्तन झाले तरी मूळ गाभ्याला धक्का लागणार नाही, याचीही दक्षता या कलावंतांनी घेतली. पुढच्या

महाराष्ट्र राज्य जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाची पंचायत राज समितीकडे मागणी ! सर्व विभागांतील रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
सर्व विभागातीला रिक्त पदे तात्काळ भरा... महाराष्ट्र राज्य जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाची पंचायत राज समितीकडे मागणी.         नाशिक - जिल्हा परिषदेचे सर्व संवर्गीय कर्मचाऱ्यांचे शासन स्थरावर वर्षानुवर्ष प्रलंबीत असलेले प्रश्न सोडवण्यासाठी पंचायत राज समितीने राज्य शासनास शिफारस करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाने निवेदनाद्वारे केली.  महाराष्ट राज्य विधान मंडळ पंचायत राज समितीचे अध्यक्ष संजय रायमुलकर, सचिव विलास आठवले यांना याबाबत महाराष्ट्र राज्य जिल्हा परीषद कर्मचारी महासंघ नाशिकचे जिल्हाध्यक्ष अरुण आहेर, कार्याध्यक्ष डॉ. भगवान पाटील, सरचिटणीस महेंद्र पवार विभागीय उपाध्यक्ष कैलास वाघचौरे, राज्य उपाध्यक्ष शोभा खैरणार यांनी निवेदन दिले. यावेळी निवेदनात विभागातील रिक्त पदांची भरती करून कर्मचाऱ्यावरील अतिरिक्त ताण कमी करणे, बक्षी समिती खंड दोन अहवाल प्रकाशीत करून जिल्हा परीषदेचे लिपीक,लेखा, ग्रामसेवक, पशु चिकीत्सा, नर्सेस, आरोग्य सेवक, औषध निर्माण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अंगणवाडी सुपरवायझर, विस्तार अधिकारी ( ग्रां. पं., कृषी, शिक्षण ), आरोग्य सेवक, शिक्षक, मु

ओबीसीचे राजकीय आरक्षणास आमचा विरोध नाही.... आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री सोबत बैठकीत आ. विनायकराव मेटे यांचे मत. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
ओबीसीचे राजकीय आरक्षणास आमचा विरोध नाही.... आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री सोबत बैठकीत आ. विनायकराव मेटे यांचे मत.      मुंबई .  ओबीसी आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक आज सह्याद्री अतिथिगृहात पार पडली. यासंदर्भात पुढील शुक्रवारी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे..सदर बैठकीसाठी शिवसंग्रामच्या वतीने  आ. विनायकराव मेटे यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.सदर  बैठकीदरम्यान आपले मत व्यक्त करताना आ. मेटे यांनी मा. मुख्यमंत्री यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करून सांगितले की ओबीसीचे राजकीय आरक्षणास आमचा विरोध नव्हता, नाही आणि भविष्यातही नसणार.परंतु अनेक मंडळी राजकीय आरक्षण भेटत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये या मतावर ठाम आहेत. त्यासाठी सरकारने स्पष्ट केले पाहिजे की, निवडणुका किती कालावधीसाठी पुढे ढकलणार आहे हे स्पष्ट केले पाहिजे निवडणूक आयोग यासाठी परवानगी देणार आहे का. याबाबत आराखडा मांडला पाहिजे, तसेच या बाबतीत निवडणूक आयोग आणि  विधी व न्याय विभागाचे काय म्हणणे आहे त्याबाबत त्यांचे मत जाणून घेतले पाहिजे       तसेच ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत आजच्या इम्पेरियल डाटा जो जमा आहे त्यावरू

पिंपळगाव खांबला युवकांच्या आग्रहास्तव म.न.पा अतिरिक्त आयुक्त सुरेशजी खाडे यांची भेट !

इमेज
पिंपळगाव खांबला युवकांच्या आग्रहास्तव म.न.पा अतिरिक्त आयुक्त सुरेशजी खाडे यांची भेट ! नासिक::- गेल्या अनेक दिवसांपासून प्रभाग क्रमांक २२ व ३१ मधील पिंपळगाव खांब ग्रामस्थांनी मागणी केली होती कि आयुक्त साहेबांनी गावाला भेट देऊन समस्या जाणून घ्याव्यात, यासाठी पिंपळगाव खांब गावचे अमित जाधव, नामदेव बोराडे, आनंद बोराडे, राहुल जाधव आदींनी अतिरिक्त आयुक्त सुरेशजी खाडे यांची भेट घेऊन त्यांना तसे लेखी पत्रा द्वारे गावात येऊन समस्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढावा अशी मागणी केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त सुरेशजी खाडे यांनी स्वतः गावात येऊन पिंपळगाव खांबचा मुख्य रस्ता व रस्ता रुंदीकरणासंदर्भात शेतकऱ्यांसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले, तसेच आहे तो रस्ता त्वरित दुरुस्त करू असे सांगितले. दोन्ही लसीकरण केंद्राला, महापालिका शाळेला, व्यायाम शाळेला आणि जाधव वाडी ड्रेनेज ची पाहणी करून व भेट देऊन समस्या जाणून घेतल्या व संबंधीत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यासाठी गावकऱ्यांनीही त्यांचे आभार मानून सत्कार केला. यावेळी सोबत बाळू मामा बोराडे, प्रेमा बाबा बोराडे, प्रभाकर बोराडे, चंदर बाबा बोराडे

कलाशिक्षकाने साकारले १०० फुट लांबीचे सलग वारली भित्तीचित्र ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
कलाशिक्षकाने साकारले १०० फुट लांबीचे सलग वारली भित्तीचित्र ! नाशिक ( प्रतिनिधी ) :- महाराष्ट्रातील आदिवासी वारली चित्रशैलीने जगाला मोहिनी घातली आहे. मनमोहक अशी ही साधीसुधी चित्रे लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच सकारात्मक ऊर्जा देतात.मराठा विद्या प्रसारक संस्थेतील निवृत्त कलाशिक्षक गोविंद कोठावळे यांनी आपल्या बंगल्याच्या कंपाऊंड वॉलवर आकर्षक चित्रे रंगवली आहेत. चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत येणारे सण, उत्सव, समारंभ रेखाटून संपूर्ण वर्ष सलगपणे चित्रित केले आहे. १०० फूट लांबीची ही भिंत आकर्षक वारली चित्रांनी सजली आहे.     सेवानिवृत्तीपूर्वीच लॉकडाऊनमध्ये सलग भित्तिचित्र करावे अशी कल्पना त्यांच्या मनात घोळत होती. आधी त्यांनी भारतीय अलंकारिक चित्रशैलीत आपली संस्कृती, परंपरा रेखाटण्याचे ठरवले पण त्यासाठी जागा अपुरी पडेल असे वाटल्याने काय करावे असा विचार करीत असतानाच पी. टी. जाधव व अशोक ढीवरे या कलाशिक्षक मित्रांनी वारली चित्रशैलीत भित्तिचित्र रंगविण्याची कल्पना सुचवली. कोठावळे लगेचच कामाला लागले. दररोज २ - ३ तास काम करून त्यांनी गेरू रंगाच्या पार्श्वभूमीवर ऍक्रिलीक पांढऱ्य

वारली चित्रशैलीच्या लेखमालेचा मागोवा

इमेज
वारली चित्रशैलीच्या लेखमालेचा मागोवा (भाग पहिला)     आदिवासी वारली चित्रशैलीचा अभ्यास, संशोधन करून मी ४ मराठी व २ इंग्रजी पुस्तके प्रकाशित केली. एखाद्या कलेचा अभ्यास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे पुढच्या काळात मला जे जे नवनवे गवसले त्याची सचित्र लेखमाला लिहावी अशी कल्पना मनात आली. ती अनेकांनी उचलून धरली. दैनिक हिंदुस्थान, साप्ताहिक न्यूज मसाला तसेच इतरही काही नियतकालिकांमध्ये गेली दोन वर्षे ही लेखमाला सुरू आहे. त्यामुळेच मला अनेक वाचकांपर्यंत पोहोचता आले.प्रत्येक लेखासोबत एक लक्षवेधी चौकट दिल्याने वाचनीयता वाढली. पुढील महिन्यात ५१ नव्या लेखांचा माझा संकल्प पूर्ण होईल. या लेखमालेतील महत्त्वाच्या लेखांचा आवाका मोठा असल्याने, तीन भागांत आढावा घेतांना आनंद होत आहे.वारली चित्रशैलीत देवचौक, तारपानृत्याचे चित्रण व मोर यांना महत्वाचे स्थान आहे.      या लेखमालेतील लेखांची शीर्षके जरी बघितली तरी विषय- आशयाची विविधता लक्षात येईल. निसर्गपुत्रांचा सुगम कलाविष्कार, चैतन्यशील वारली चित्रे, धवलेरीची कला,  स्त्रीशक्तीची अभिव्यक्ती, सामूहिक वृत्तीची कलाकृती, वारली कलेचा शोध

महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर ! नासिकच्या छायाचित्रकार प्रशांत खरोटे तोलाराम कुकरेजा राज्यस्तरीय पुरस्कार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर      बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) – राजन पारकर, वार्ताहर, दै.दोपहर का सामना. मुंबई यांना देण्यात आला आहे           मुंबई, दि. 14 : पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे 2019 वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) – राजन पारकर, वार्ताहर, दै.दोपहर का सामना. मुंबई यांना देण्यात आला आहे           राज्य शासनाच्यावतीने विकास वार्तांकनासाठी पत्रकारांना दिले जाणारे विविध पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. विकास वार्तांकनासाठी 2019 साठीचा राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार हा दै. युथ सकाळचे संदीप काळे यांना जाहीर करण्यात आला. मुंबईत लवकरच होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.           51 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे सर्व पुरस्कारांचे स्वरुप आहे. पुरस्कार खालीलप्रमाणे : वर्ष-2019 – बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)- संदीप क

यकृत रुग्णांसाठी काही आशेच्या कहाण्या: नाशिककरांचे आयुष्याला कलाटणी देणारे अनुभव आपल्या आईला आपल्या यकृताचा भाग देऊ करणारी मुलगी, आज स्वत: आई बनली आहे ! आज अवयवदान दिवसानिमित्त मुंबईतील ग्लोबल हाॅस्पिटल आयोजित नासिकमधील रुग्णांसह भेटीच्या कार्यक्रमाचा खास वृत्तांत !!

इमेज
यकृत रुग्णांसाठी काही आशेच्या कहाण्या: नाशिककरांचे आयुष्याला कलाटणी देणारे अनुभव आपल्या आईला आपल्या यकृताचा भाग देऊ करणारी मुलगी, आज स्वत: आई बनली आहे !      नाशिक (प्रतिनिधी१३)::- अवयवदान दिवस म्हणून साजरा केल्या जाणा-या १३ ऑगस्ट रोजी मुंबईमधील परेल भागातल्या ग्लोबल हॉस्पिटल या मल्टी-स्पेश्यालिटी हेल्थकेअर इन्स्टिट्यूटमध्ये नाशिकमधील यकृत प्रत्यारोपणाच्या रुग्णांसोबत (दाते आणि प्राप्तकर्ते) भेटीगाठीचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इगतपुरी येथे राहणा-या ५० वर्षीय आल्थिया परेरा यांना २०१७ मध्‍ये यकृताची गरज निर्माण झाली; त्याप्रसंगी त्यांची २२ वर्षीय मुलगी लिसा परेरा अवयवदाता म्हणून पुढे आली. एका शैक्षणिक संस्थेच्या मुख्याध्यापक आणि विश्वस्त असलेल्या श्रीम. आल्थिया आपल्या आजारातून पूर्णपणे ब-या झाल्या व आपल्या लाडक्या कार्यक्षेत्रात पुन्हा रुजू झाल्या. त्यांना आपले यकृत देऊ करणारी त्यांची मुलगी लिसा हिचे २०२० च्या ऑगस्ट महिन्यात लग्न झाले आणि आज ती एका ८ महिन्यांच्या बाळाची आई आहे. आजारपणामुळे विस्कटू पाहणारी या दोघींच्याही आयुष्याची घडी पुन्हा एकदा बसली आहे व त्यांचे जगणे प

माझी साप्ताहिकीः विचारांची पर्वणी! प्रभाकर येरोळकर यांचा मरणोत्तर लेखसंग्रह " साप्ताहिकी " कुटुंबिय व चपराक प्रकाशनाकडून १४ आॅगस्ट ला प्रकाशित होत आहे ! तुम्हारे याद के, जख्म भरने लगते है, आप को पढ़ने के बहाने तुम्हे, याद करने लगते है। नागेश शेवाळकर यांनी लिहीलेले वाचनीय दोन शब्द !!

इमेज
माझी साप्ताहिकीः विचारांची पर्वणी!         'सर्वोत्कृष्ट नि सर्वोत्तम' हे कुण्या संस्थेचे ब्रीदवाक्य नव्हे तसेच तो कुणाचा प्रण नाही तर तो ध्यास आहे, पुण्यातील एका नामांकित साहित्य प्रकाशन संस्थेचा! घनश्याम पाटील ह्या तरुणाने 'किशोर' वयात 'चपराक' प्रकाशनाची निर्मिती केली. निर्मितीपासूनच पाटील एक गोष्ट सातत्याने करीत आहेत ती म्हणजे 'सर्वोत्कृष्ट नि सर्वोत्तम' साहित्य निर्मितीची! लेखक मग तो जुना असो, प्रतिष्ठित असो की नव्याने लिहिणारा असो. ज्या लेखकाजवळ उत्कृष्ट साहित्य आहे हे समजायला अवकाश घनश्याम पाटील हे त्या लेखकाचा शोध घेतात आणि ते साहित्य वाचक दरबारी अत्यंत आकर्षक स्वरुपात सादर करतात.        बाह्यरंग हे कोणत्याही पुस्तकाचे महत्त्वाचे अंग असते. पुस्तक हातात घेतल्यानंतर मुखपृष्ठ असेल, कागद असेल, अक्षरांचा आकार असेल, साहित्याची मांडणी असेल ह्या बाबी वाचकांना आकृष्ट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. चपराक प्रकाशन, पुणे यांची पुस्तके पाहिली म्हणजे बाह्यरंग किती महत्त्वपूर्ण ठरतात याची कल्पना येते. या कोणत्याही बाबतीत तडजोड करायची नाही ही महत्त्वाकांक

डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी सर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू अंध कुटुंबांना मदतीचा हात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी सर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू अंध कुटुंबांना मदतीचा हात !    नासिक(१२)::- ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड अॅण्ड डिसेबल्ड या संस्थेच्या वतीने संस्थेचे आधारस्तंभ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी सर यांचा ५५ वा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट या ठिकाणी वाढदिवसाचं औचित्य साधून नाशिक परिसरातील गरजू अंध कुटुंबांना अन्नधान्याचे संस्थेच्यावतीने वाटप करण्यात आले तसेच नाना काळे यांच्या मित्र परिवारातर्फे छत्रीचे वाटप करण्यात आले.          ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड अॅण्ड डिसेबल्ड ही संस्था गेल्या अकरा वर्षांपासून संस्थेचे मानद अध्यक्ष डॉक्टर धर्माधिकारी सरांच्या मार्गदर्शनाखाली नासिक व नासिकबाहेरील ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवून दिव्यांग व्यक्तींची सेवा करीत आहे. या संस्थेच्या मार्फत चालविल्या जाणाऱ्या मोफत निवासी संगणक केंद्रातून गेल्या वर्ष पर्यंत ५७ अंध मुलींना प्रशिक्षण दिले असून त्यापैकी १७ ते १८ मुलींना सरकारी व खासगी कार्यालयात रोजगार मिळाला आहे. तसेच गेल्यावर्षापासून कोरोना महामारी चे संकट असल्याने अनेक स्वयंरोजगार

हयासा ई - स्कुटर्सचे शानदार लॉंचिंग ! नासिकमधून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ई - स्कुटरची निर्मिती !! अवघ्या १५ ते २० रुपयांत ९० किलोमीटर !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
हयासा ई - स्कुटर्सचे शानदार लॉंचिंग !  नाशिक ( प्रतिनिधी ) :- हयासा ई - मोबिलिटी प्रा. लि. कंपनीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संपूर्ण भारतीय बनावटीच्या इलेक्ट्रिक स्कुटर्सचे शानदार लॉंचिंग करण्यात आले. हयासा कंपनी नाशिकमध्ये ओजस, दक्ष, इरा आणि निर्भर या चार आकर्षक मॉडेल्सची निर्मिती करीत आहे. हयासा म्हणजे वेग ! आता वेगाचा अनुभव वाहनधारकांना या चार मॉडेल्सद्वारा घेता येईल. दिंडोरी येथे या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वाहनांची निर्मिती करण्यात येत आहे. लवकरच या ई - वाहनांच्या विक्रीसाठी संपूर्ण देशभरात वितरण व्यवस्था उभी राहील.अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.          हयासा ई - मोबिलिटी कंपनीची स्थापना फेब्रुवारी २०२१ मध्ये करण्यात आली. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय दर्जाची आधुनिक वाहने ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. याचा निश्चितच आनंद वाटतो. ओजस व दक्ष या स्कुटर्स तरुणाईला भुरळ घालतील. ' इरा ' हे मॉडेल विशेषतः महिलांना आकर्षित करेल. निर्भर हे मॉडेल व्यावसायिकांना उपयुक्त ठरेल. कंपनीचे उत्पादन दिंडोरी या आदिवासी व अतिदु

आदिवासी पाड्यांवरील ५८ शाळांतील ३५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे विनामूल्य वितरण ! ■ 'शाळा बंद, शिक्षण सुरु' उपक्रमाला बळ ! मुंबई च्या अमास सेवा ग्रुप चा उपक्रम !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
आदिवासी पाड्यांवर शैक्षणिक साहित्याचे विनामूल्य वितरण ■ 'शाळा बंद, शिक्षण सुरु' उपक्रमाला बळ !         नाशिक ( प्रतिनिधी ) - अमास सेवा ग्रुप, मुंबई यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-घोटविहिरा व इतर शाळेतील विद्यार्थ्याना काल शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.  आपल्या कर्तृत्वाने जनमानसात समाजसेवेने व सामाजिक कार्याने सुगंधीत असणारे व्यक्तीमत्व म्हणजे अमास सेवा ग्रुपचे सर्वेसर्वा चंद्रकांतभाई देढीया व विजय भगत त्यांच्यातर्फे जि.प.प्राथमिक शाळा-घोटविहिरा, पिंपळवटी, घोसाळी, गांवधबर्डा व पळशी या शाळेतील विद्यार्थ्यांना व पेठ,दिंडोरी आणि सुरगाणा तालुक्यातील ५‌‌८ शाळेतील ३५१४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.     कोविडच्या प्रादुर्भावामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळा बंद आहेत. अशा कालावधीत गरीब गरजू विद्यार्थ्यांना अमास सेवा ग्रुप मुंबई यांनी शैक्षणिक साहित्य दिल्याने ' शाळा बंद पण शिक्षण सुरु ' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी निश्चितच मदत होईल. त्यामध्ये वह्या, पेन व इतर लेखन साहित्याचा समावेश आहे. या उपक्रमाला हरिश्चंद

पेट्रोलची शंभरी मध्यमवर्गाला पडतेय भारी ! लेखक उद्धव भयवाळ यांनी केलेले उपहासात्मक तथा विनोदी लेखन !! सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
पेट्रोलची शंभरी मध्यमवर्गाला पडतेय भारी ! अलीकडे पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली तेव्हा पेट्रोलला उद्देशून म्हणावेसे वाटले की, "बा पेट्रोल राजा ! तू शेवटी शंभरी गाठलीच. तुझे अभिनंदन. एखाद्या क्रिकेट खेळाडूने नव्वद, पंचाण्णव धावा कराव्यात. परंतु त्याला शतक गाठता येऊ नये, तेव्हा त्याला जे दु:ख होत असेल, तसेच दु:ख मागच्या वर्षभर तुझ्या वाट्याला आले ना? नव्वद, पंचाण्णव, शहाण्णव, एवढ्या किमतीतच खेळलास वर्षभर. शंभरी गाठायला तुला बराच संघर्ष करावा लागला. शेवटी शंभरी गाठण्याचा आनंद वेगळाच असतो. नाही का? शतायुषी माणसाला किती आनंद होत असेल! तू शंभरी गाठल्यामुळे तुला तर आनंद झाला असेल पण आता सामान्य माणसाचे काय होईल ते सामान्य माणसालाच माहित!" पेट्रोलच्या किमती कितीही वाढल्या तरी श्रीमंतांना काहीच फरक पडत नाही. गरिबांकडे तर पेट्रोलवर चालणारे वाहनच नसते. त्यामुळे त्यांचाही प्रश्न नाही. प्रश्न असतो तो फक्त मध्यम वर्गाचा. आधी गरिबी बघितलेल्या, पण हळू हळू श्रीमंत होण्याची इच्छा धरणाऱ्या या मध्यमवर्गीय माणसाला अनेकानेक समस्यांनी ग्रासलेले असते. किमतीचे शतक झळकावून पेट्रोलने तर आपले हेल्म

बाॅईज टाऊन पब्लिक स्कूलचा अनोखा गौरव सोहळा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
अनोखा गौरव सोहळा !                                                                            नासिक ::- बॉईज टाऊन पब्लिक स्कूल मधील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा अनोखा ऑनलाईन गुणगौरव सोहळा. बॉईज टाऊन पब्लिक स्कूलच्या २०२०-२१ च्या शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंतांचा आगळा वेगळा ऑनलाइन सत्कार समारंभ दि.१ ऑगस्ट २०२१ रविवार रोजी शाळेचे विश्वस्त माननीय नेवील मेहता,  माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ मॅडम, शिक्षकवृंद व यंदाच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सध्याच्या परिस्थितीत गुणवंतांचा प्रत्यक्ष सत्कार करणे शक्य नसल्याने शाळेने इ-प्रमाणपत्र देऊन गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अनोखा सत्कार सोहळा आयोजित केला होता. विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणवत्तेनुसार शाळेने वेगवेगळी प्रमाणपत्रे तयार केली आणि या इ-प्रमाणपत्रांची झलक या  सत्कार समारंभात  दाखविण्यात आली. शाळेचा या वर्षीचा शालांत परीक्षेचा निकाल १००% लागला असून धनंजय हिरे या विद्यार्थ्याने १००% गुण प्राप्त करून पहिला क्रमांक पटकावला तर प्रथमेश बोरसे या

कोपरगावच्या मातीचा सुगंध कवितेच्या माध्यमातून जगभर पसरावा - प्रा. डॉ. सदानंद भोसले. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
कोपरगाव (२९)::-- कोपरगाव च्या मातीचा सुगंध कवितेच्या माध्यमातून जगभर पसरावा आणि येथील साहित्यिक वारशाचे पुनर्निर्माण व्हावे,आजच्या परिस्थिती मध्ये कविता माणुसपणा ची जाणीव करून देत असल्याने ती समृद्ध व्हावी,यासाठी असे साहित्यिक उपक्रम महत्वाचे आहेत असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे अध्यक्ष प्रा.डॉ.सदानंद भोसले यांनी केले.        शब्दगंध साहित्यिक परिषद,कोपरगाव शाखेच्या वतीने आयोजित ऑनलाईन काव्यसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली व कोपरगाव चे नगराध्यक्ष विजयराव वहाडणे,कवी सुभाष सोनवणे, ऐश्वर्याताई सातभाई, प्रा.डॉ.कैलास कांबळे, सुधीर कोयटे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये काव्य संमेलन संपन्न झाले,           पुढे बोलताना प्रा.डॉ.  सदानंद भोसले म्हणाले की, 'कवितेत भावनेचा ओलावा असावा, विचार कवितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन व  जनजागृती साठी मांडले जातात,आपली पाळेमुळे कोपरगावच्या मातीत रुजली,वाढली त्यामुळे कोपरगाव चे आकर्षण कायम आहे,या काव्य संमेलनात सर्व कविता प्रासंगिक आशावादी आणि प्रेरणादायी आहे