जलसंपदा विभागाने हिशेब द्यावा, नाशिककरांना ठोस उत्तरे द्यायला हवीत !
संपादकीय जलसंपदा विभागाने हिशेब द्यावा, नाशिककरांना ठोस उत्तरे द्यायला हवीत ! राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते लवकरच सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होत आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचे खूप काटेकोर नियोजन करणे जलसंपदा विभागासाठी डोकेदुखी ठरू नये यासाठी पारदर्शक प्रयत्न व्हावेत. केवळ बैठका, आश्वासने आणि कागदोपत्री नियोजन पुरेसे नाही. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदावरीत पाणी सोडण्याची तयारी करताना जलसंपदा विभागाने जनतेसमोर पाण्याचा संपूर्ण ताळेबंद मांडला पाहिजे. १५ ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन करताना त्यासाठी जिल्ह्यातील धरणांचा यथोचित आढावा घेणे क्रमप्राप्त आहे. यासाठी जनसामान्यांच्या पुढील काही ठोस मागण्या आहेत. धरणनिहाय जलसाठ्याचा ताळेबंद जाहीर करा! गंगापूर, मुकणे, दारणा, आणि दिंडोरी तालुक्यातील संबंधित धरणांतील उपयुक्त जलसाठा, मंजूर पाणीआरक्षण, अपेक्षित वापर आणि कुंभमेळ्यासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याची अधिकृत आकडेवारी सार्वजनिक करावी. कुंभमेळ्यातील प्रत्येक प्रमुख स्नानपर्वणीसाठी किती पाणी आवश्यक आहे, ते ...